Maharashtra

Nagpur

CC/2/2017

Shri Dnyneshwar Baliram Wankar - Complainant(s)

Versus

Smt. Vasundhara Masurkar, President- Gandhinagar Co-Operative Housing Society Ltd., Nagpur - Opp.Party(s)

Adv. S.K. Tembhurne

08 Mar 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/2/2017
 
1. Shri Dnyneshwar Baliram Wankar
R/o. House No. 662/B/1, Ramabai Ambedkar Nagar, Jaitala, Nagpur 440036
Nagpur
Maharashtra
2. Shri Dayal Ramteke (Late) Through, Legel H. Smt. Durgatai Dayal Ramteke
R/o. Plot No. 106, Building No. 3, Kamal Crist Town, Kalawati Nagar, Hudkeshwar Road, Pipla, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Smt. Vasundhara Masurkar, President- Gandhinagar Co-Operative Housing Society Ltd., Nagpur
Office- 381/1, Gandhinagar, North Ambazari Road, Nagpur 440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:Adv. S.K. Tembhurne, Advocate
For the Opp. Party:
Dated : 08 Mar 2018
Final Order / Judgement

 (मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

 

1.     तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्तांचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे दि.12.04.2003 आणि दि.08.07.2003 रोजी भुखंड खरेदी करण्‍याकरीता नोंद केली होती. त्‍याकरीता तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी दि.25.04.2005 आणि 21.03.2006 पर्यंत रु.75,000/- आणि रु.25,500/- विरुध्‍द पक्षाकडे भरणा केला होता. तक्रारकर्ता क्र.2 यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर त्‍यांचे वारसदार यांनी तक्रारकर्ता क्र.1 यांचे सोबत सदरची तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांकडून भुखंड क्र.3 व 35, प.ह.नं.5-अ, खसरा क्र.44-45, मौजा-देवलामेटा, जिल्‍हा नागपूर येथे स्थित असलेला भुखंड खरेदी करण्‍याचा करार केला. तक्रारकर्त्‍यांनी सदर भुखंडाकरीता विरुध्‍द पक्षाकडे रळहम भरली असुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्‍या संबंधात विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍यांनी वारंवार विरुध्‍द पक्षांशी संपर्क साधला असता त्‍यांनी कोणतीही दखल घेतली नाही. विरुध्‍द पक्षांनी 2000 ते 2007 या सात वर्षांच्‍या कालावधीत शेतमालक व शासन यांच्‍यात योग्‍य समन्‍वय नसल्‍यामुळे व विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांना सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांची  आर्थीक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. विरुध्‍द पक्षंनी तक्रारकर्त्‍यांना विक्रीपत्र करुन दिले नाही व त्‍याकरीता रक्‍कम स्विकारली ही बाब विरुध्‍द पक्षांची तक्रारकर्त्‍यांप्रती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला. म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

2.   तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांना आवंटीत केलेल्‍या भुखंडाचे करारनाम्‍याप्रमाणे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा घेतलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.  

3.     तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला. सदर नोटीस विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त होऊनही प्रकरणात हजर झाले नाही व आपला जबाब दाखल केला नाही. त्‍यामुळे मंचाने निशाणी क्र.1 वर दि.01.07.2017 रोजी प्रकरण विरुध्‍द पक्षाविरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला. 

4.     तक्रारकर्त्‍यांची तक्रार, दाखल दस्‍तावेज, लेखी व तोंडी युक्तिवादावरुन खालील कारणमिमांसेवरुन आदेश पारित करण्‍यांत येते.

- //  कारणमिमांसा // -

5.    तक्रारकर्त्‍यांनी निशाणी क्र.2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजांवरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्ता क्र. 1 ने विरुध्‍द पक्षासोबत भुखंड खरेदीचा करार केला होता व त्‍याकरीता तक्रारकर्ता क्र. 1 यांनी विरुध्‍द पक्षाकडे वेळोवेळी रकमेचा भरणा केला होता. तक्रारकर्ता क्र.2 चे दिवंगत पती श्री. दयाल रामटेके यांनी सुध्‍दा विरुध्‍द पक्षासोबत वादातील भुखंड खरेदीचा करार केला होता व त्‍यासंबंधी भरण्‍यात आलेल्‍या पैशांच्‍या पावत्‍या दस्‍त क्र.2 वर लावण्‍यांत आलेल्‍या आहेत. तक्रारकर्ती क्र.2 ही श्री. दयाल रामटेके (दिवंगत) यांची वारसदार असुन व तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्‍द पक्षासोबत वादातील भुखंडाचा व्‍यवहार केला असल्‍यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे विरुध्‍द पक्षांचे ‘ग्राहक’ आहे हे सिध्‍द होते.

6.    विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास वादातील भुखंडास योग्‍य परवानगी नसुनही तक्रारकर्ता क्र. 1 व 2 सोबत भुखंड विक्रीचा करार केला व त्‍याकरीता रक्‍कम स्विकारली. तक्रारकर्त्‍यातर्फे विरुध्‍द पक्षांना दि.13.07.2016 रोजी पत्र लिहूनही विरुध्‍द पक्षांनी भुखंडाकरीता घेतलेली रक्‍कम परत केली नाही, ही बाब निशाणी क्र.2 वर दाखल दस्‍त क्र.1 वरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षांनी वादातील भुखंडाची अनुचित व्‍यवहार पध्‍दतीचा अवलंब करुन रक्‍कम स्विकारली व भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच रक्‍कमही परत केली नाही ही बाब विरुध्‍द पक्षांची तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यवहार पध्‍दतीचा अवलंब ठरतो व सिध्‍द होते. तसेच विरुध्‍द पक्षाला सदर प्रकरणाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते बचाव पक्षात हजर झाले नाही व आपला जबाब दाखल केला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांविरुध्‍द लावलेले आरोप सिध्‍द होते. सबब मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. 

                                        - // अंतिम आदेश // -

1.    तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

2.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता क्र.1 यांचेकडून भुखंडाकरीता घेतलेली रक्‍कम रु.75,000/- व तक्रारकर्ता क्र.2 यांचेकडून भुखंडाकरीता घेतलेली रक्‍कम रु.25,500/- दि.13.07.2016 पासुन प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.12% व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍यांना परत करावी.

3.   विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांना झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून प्रत्‍येकी रु.5,000/-  व तक्रारीचा खर्च प्रत्‍येकी रु.2,500/-  देण्‍यात यावा.

4.   विरुध्‍द पक्षांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी.

5.    उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.