(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 23 डिसेंबर 2009)
1. अर्जदार, सौ. वच्छला किसन चुधरी व मनिषा किसन चुधरी यांनी, गैरअर्जदाराचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदार क्र. 1 व 2 यांची अनुक्रमे मुलगी व बहीन कु. वैशाली किसन चुधरी हीचे गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगम गडचिरोली यांचेकडून काढलेल्या
... 2 ... ग्रा.त.क्र.14/2009.
पॉलिसीची रक्कम रुपये 40,000/- हे व्याजासह मिळण्याबाबत अर्जदार यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार क्र. 1 ची मुलगी वैशाली हीच्या नावे गैरअर्जदार क्र. 1 हीच्या मार्फत पॉलीसीच्या रकमेचा भरणा गैरअर्जदार क्र. 2 कडे करीत होत्या.
3. दिनांक 2/12/2006 रोजी कु.वैशाली हीचे अपघाती निधन झाले. अर्जदार क्र. 1 व 2 हे मृतक वैशालीचे वारसदार आहेत. अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे वैशालीच्या पॉलीसीच्या रकमेविषयी विचारले असता, तुमची पॉलिसी लॅप्स झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही, असे सांगितले. अर्जदार क्र. 1 ही वेळोवेळी गैरअर्जदार क्र. 1 यांनी काढून दिलेल्या पॉलिसीच्या रकमेचा भरणा करीत होत्या. वैशालीच्या मृत्युनंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 कडे गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द लेखी अर्ज दिनांक 2/1/2009 ला दिला, परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
4. अर्जदार ह्या पॉलिसीची रक्कम गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे देत होत्या. गैरअर्जदार क्र. 1 यांची गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे रक्कम भरण्याची नैतिक जबाबदारी होती. अर्जदार यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमजोर असल्यामुळे व उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे अर्जदारांना आर्थिक व मानसिक ञासास सामोरे जावे लागत आहे. अर्जदार मागणी करतात की, विमा पॉलिसीची रक्कम रुपये 40,000/- हे 12 % व्याजासह, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/- व खर्चाचे रुपये 2,000/- असे एकुण रुपये 62,000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत.
5. गैरअर्जदार क्र. 1 ही आपल्या लेखी बयाणात निशाणी क्र. 7 वर म्हणतो की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या मार्फत 97497538 या क्रमांकाची पॉलिसी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून मय्यत वैशाली हीचे नावे काढलेली होती. पॉलिसी काढल्यावर दूसरा हप्ता सप्टेंबर 2006 ला दिला त्यानंतर मार्च 2007 च्या हप्त्याची रक्कम अर्जदार यांनी स्वतःही भरली नाही आणि गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सुध्दा दिली नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी हप्त्याची रक्कम भरण्याविषयी वारंवार विनंती केली होती. परंतु, अर्जदार क्र. 1 यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते व गैरअर्जदार क्र. 1 यांचे पती सोबत भांडणही केले, त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांनी हप्त्याची रक्कम मागणे बंद केले.
6. गैरअर्जदार क्र. 1 म्हणतो की, अर्जदार क्र. 1 यांची मुलगी वैशाली हीचे निधन झाल्यावर अर्जदार यांना पॉलिसीची आठवण झाली, त्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे विचारणा केली. अर्जदार यांनी पॉलिसीचे हप्ते बरोबर काळजीपूर्वक न भरल्यामुळे पॉलिसीची रक्कम मिळाली नाही, यास अर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत. त्यामुळे, अर्जदार यांची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
... 3 ... ग्रा.त.क्र.14/2009.
7. गैरअर्जदार क्र. 2 हे आपल्या लेखी बयाणात निशाणी क्र. 10 वर म्हणतात की, अर्जदार यांनी रुपये 40,000/- ची पॉलिसी कु. वैशाली हीच्या नावे काढलेली होती. याबाबत वाद नाही. सदर पॉलिसी ही दिनांक 28/3/06 रोजी काढली होती, त्याचा पॉलिसी क्र. 974947538 आणि प्रिमियीमचा हप्ता रुपये 833/- होता.
8. विमाधारक मय्यत वैशाली ही दिनांक 2/12/08 रोजी मरण पावली, परंतु अर्जदार क्र. 1 व 2 हे मृतक वैशाली हीचे कायदेशिर वारसदार आहेत की नाही याबद्दल गैरअर्जदार क्र. 2 यांना शंका आहे. मृतक वैशाली हीची पॉलिसी व्यपगत अवस्थेत आहे. अर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना हप्त्याची रक्कम दिली होती की नाही ते माहीत नाही. परंतु, गैरअर्जदार क्र. 1 यांची हप्ताभरण्याची जबाबदारी होती हे गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य नाही. विशेष कथनात गैरअर्जदार क्र. 2 म्हणतात की, गैरअर्जदार क्र. 1 ही प्रिमियमची रक्कम गोळा करण्याकरीता अभिव्यक्त, अथवा घोषीत प्राधिकारी नाहीत. त्यामुळे, अर्जदार यांची रुपये 40,000/- ही रक्कम 12 % व्याजासह मिळण्याची मागणी, तसेच तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, असे गैरअर्जदार क्र. 2 यांचे म्हणणे आहे.
// कारणे व निष्कर्ष //
1. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे, शपथपञ व गैरअर्जदार यांनी केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार क्र. 1 यांनी आपली मुलगी कु. वैशाली किसन चुधरी हीचे नावाने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे विमा पॉलिसी काढली होती, याबद्दल वाद नाही. मय्यत वैशालीची पॉलिसी ही रुपये 833/- ची अर्धवार्षीक प्रिमीयमची विमा गोल्ड पॉलिसी होती. त्याचा क्र. 974947538 असा होता. मय्यत वैशाली हीची पॉलिसी ही पॉलिसीची रक्कम न भरल्यामुळे व्यपगत अवस्थेत होती.
2. अर्जदार यांचे म्हणणे आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना प्रिमीयम भरण्यासाठी रक्कम दिली. परंतु, त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पैसे जमा केलेले नाहीत. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना प्रिमीयम भरण्यासाठी दिलेली रक्कम ही कोणत्या तारखेला व केंव्हा दिली याबद्दल कोणतीही माहीती अथवा पुरावा अर्जदारांनी दाखल केला नाही, यावरुन अर्जदार यांचा स्वतःच्या कामातला निष्काळजी पणा दिसून येतो, असे न्यायमंचाचे मत आहे.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी, अर्जदार क्र. 1 व 2 हे मृतक वैशाली किसन चुधरी हीचे कायदेशिर वारस आहेत की नाही, हा मुद्दा उपस्थित केला, तो न्यायमंचास योग्य वाटतो. विमाधारक वैशाली किसन चुधरी हीच्या मृत्युच्या दिनांका रोजी पॉलिसी व्यपगत अवस्थेत होती. पॉलिसी दस्ताऐवजाच्या मागील पृष्ठावर छापण्यात आलेल्या पॉलिसीच्या शर्त क्र. 2 नुसार, “ a grace period of one month but not less than 30
... 4 ... ग्रा.त.क्र.14/2009.
days will be allowed for payment of yearly, half yearly or quarterly premiums and 15 days for monthly premiums. If death occurs within this period and before the payment of the premium then due, the policy will still be valid and the sum assured paid after deduction of the said premium as also unpaid premium/s falling due before the next anniversary of the policy. विद्यमान न्यायमंचा समक्ष असलेल्या प्रस्तुत प्रकरणामधील पॉलिसी सुध्दा व्यपगत अवस्थेत असल्यामुळे काहीही रक्कम अदा करता येणार नाही. तसेच, गैरअर्जदार क्र. 1 ही प्रिमीयमची रक्कम गोळा करण्याकरीता अभिव्यक्त अथवा घोषीत प्रधिकारी नाही हे गैरअर्जदार क्र. 2 यांचे कथन योग्य आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
4. अर्जदार व तीचे वकील सतत गैरहजर असल्यामुळे प्रकरणात अर्जदाराने युक्तीवाद केला नाही. सबब तक्रार उपलब्ध रेकॉर्डवरुन गुणदोषावर निकाली काढण्यात येत आहे, असा आदेश निशाणी क्र. 1 वर करण्यात आला.
5. वरील तथ्य व परिस्थिती यावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदार यांची तक्रार खारीज करण्यांत येत आहे.
(2) उभय पक्षानी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/12/2009.