Maharashtra

Nagpur

CC/339/2021

NARENDRA HARIBHAU BHUJADE - Complainant(s)

Versus

SMT. SHEWANTABAI RAMBHAU NARNAWARE - Opp.Party(s)

ADV. P.A. TENI

11 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/339/2021
( Date of Filing : 29 Jun 2021 )
 
1. NARENDRA HARIBHAU BHUJADE
R/O. 195/B, DUBE NAGAR, HUDKESHWAR ROAD, NAGPUR-34
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SMT. SHEWANTABAI RAMBHAU NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU. SAVITA RAVINDRA NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
3. KALYANI RAVINDRA NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
4. HARSHAL RAVINDRA NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
5. PRAJWAL RAVINDRA NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
6. PRAKASH RAMBHAUJI NARNAWARE
R/O. 35, HUDKESHWAR BUJARUK, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. P.A. TENI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Jan 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019  च्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 6 हे मौजा- हुडकेश्‍वर, प.ह.नं. 37-A , खसरा क्रं. 137-/क, तह. जिल्हा नागपूर एकूण क्षेत्रफळ 0.83 हे.आर. या जमिनीचे मालक आहेत. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 6 याच्‍या नांवे सह.दुय्यम निबंधक वर्ग-2, नागपूर द्वारे दि. 06.06.2019 रोजी अधिकार पत्र करुन दिलेले आहे, त्‍या अन्‍वये  तक्रारकर्त्‍याने विरुद्ध पक्षाच्‍या  वरील नमूद जमिनीवर पाडलेल्या ले-आउट मधील प्लॉट क्रमांक 2 एकूण क्षेत्रफळ 1250 चौरस फूट एकूण रुपये 1,25,000/- एवढ्या किंमतीत विकत घेण्याचा करारनामा दिनांक 02.11.2020 रोजी केला. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याच्‍या  नांवे दुय्यम सब रजिस्टर कार्यालया मार्फत दिनांक 02.11.2020 ला विक्रीपत्राचा करारनामा करुन त्‍या अन्‍वये सक्षम अधिका-याची रीतसर परवानगी मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 6 स्‍वतः दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहून तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे विना उजर रजिस्‍टर विक्रिपत्र करुन देणार होते व मालमत्‍तेचा कब्‍जा तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र नोंदणीच्‍या वेळेस देणार होते. 
  2.      तक्रारकर्त्याला विक्रीपत्र करारनामा करुन देण्‍यात आलेल्‍या प्लॉट नंबर 2 ची  पाहणी करण्‍यास गेला असता त्‍याच्‍या असे निदर्शनास आले की, सदरचा भूखंड दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने याबाबत विरुद्ध पक्षाला विचारणा केली, त्यावेळी विरुद्ध पक्षाने सदरचा भूखंड दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे कबूल केले व विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला दुसरा भूखंड देण्याचे कबूल केले. विरुद्ध पक्षाने केलेल्या धोकाधडीमुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाला भूखंडा पोटी अदा केलेली रकमेची मार्केट दराने किंवा व्याजासहित अदा करण्‍याची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम परत न केल्‍यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षां विरुद्ध दिनांक 13.12.2020 ला हुडकेश्वर पोलिस स्टेशन नागपूर यांचेकडे तक्रार केली.
  3.      त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी केलेल्या तडजोडीनंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 10,00,000/- देण्याचे कबूल केले. त्यानुसार विरुद्ध पक्ष क्रमांक 6 यांनी दिनांक 18.02.2021 रोजी धनादेश क्रमांक 017586 अन्‍वये रुपये 2,00,000 चा धनादेश दिला व विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 12.02.2021 रोजी धनादेश क्रमांक 283069 अन्‍वये रुपये 4,10,000/- चा धनादेश दिला व उर्वरित रक्कम रुपये 3,90,000/- लवकरच नगदी स्‍वरुपात देण्‍याचे कबूल केले होते. तक्रारकर्त्‍याने  दोन्ही धनादेश कॅनरा बँकेत जमा केली असता सदरचे धनादेश स्वाक्षरी जुळत नसल्या कारणास्तव व अपु-या रक्‍कमे अभावी अनादरीत  झाल्‍याबाबतची विरुद्ध पक्षाला सूचना दिली असता, विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला पुढील महिन्यात बँकेत धनादेश  वटविण्‍याकरिता सादर करण्याबाबत सुचविले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्याने पुनश्च सदरचे धनादेश दिनांक 20.03.2021 व दिनांक 19.42021 ला बॅंकेत सादर केले, त्‍यावेळी देखील सदरचे दोन्‍ही धनादेश वटविल्‍या गेले नाही.  म्‍हणून  तक्रारकर्त्याने दिनांक 05.05.2021 ला वकिलामार्फत विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकत्याने तक्रार आयोगा समक्ष  दाखल करून खालीलप्रमाणे मागणी केली.

1  विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍या प्रति अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब  केल्याचे घोषित करावे

2   विरुद्ध पक्षाला निर्देश देण्यात यावे की, विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला करारानुसार प्लॉट नंबर 2 चे विक्रीपत्र करून द्यावे किंवा रुपये 10,00,000/-  दि.25.05.2021 पासून 12 टक्के दराने व्याजासह द्यावे.

3  मानसिक व शारीरिक कसा करिता व तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई द्यावी.

 

  1.      विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांना आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्त होऊन ही विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 आयोगा समक्ष हजर झाले नाही, त्‍यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांच्‍या विरुद्ध प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 22.10.2021 रोजी पारित करण्यात आला.
  2.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर आयोगाने निकाली  कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1    तक्रारकर्ता विरुद्ध पक्ष क्रं. 1 ते 6 चा ग्राहक आहे काय?       होय

2    विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?         होय

3.   विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय?       होय

4    काय आदेश ?                             अंतिम आदेशानुसार

 

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत - तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 6 यांच्‍या नांवे असलेली मौजा- हुडकेश्‍वर, प.ह.नं. 37-A , खसरा क्रं. 137-/क, तह. जिल्हा नागपूर येथील शेतजमीनीवर पाडण्‍यात आलेल्‍या लेआउट मधील प्लॉट क्रमांक 2 एकूण क्षेत्रफळ1250 चौरस फूट हा एकूण रक्‍कम रुपये 1,25,000/- मध्‍ये  विकत घेण्याचा दिनांक 02.11.2020 रोजी विक्रीचा करारनामा केला असल्‍याचे नि.क्रं. 2(1) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 5 यांनी विरुद्ध पक्ष क्रमांक 6 ला विक्रीपत्र करून देण्याबाबत आम मुखत्यारपत्र दिनांक 06.06.2019 रोजी करून दिले असल्‍याचे नि.क्रं.2(2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 ते 6 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विकलेल्‍या प्‍लॉट क्रं. 2 वर भेट दिली असता सदरचे प्‍लॉट हे दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असल्‍याचे निदर्शनास आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे प्‍लॉट खरेदी पोटी दिलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली, त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 13.12.2020 ला हुडेकश्‍वर पोलिस स्‍टेशन नागपूर येथे धोकाधडीबाबतची तक्रार केली असल्‍याचे नि.क्रं. 2(3) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यानंतर उभय पक्षात तडजोडी करण्‍यात आली व त्‍याप्रमाणे विरुद्ध पक्ष क्रमांक 6 यांनी तक्रारकर्त्‍याला दिनांक18.02.2021 रोजी धनादेश क्रमांक 017586 अन्‍वये रुपये 2,00,000 चा धनादेश दिला व सदरचा धनादेश दि.19.02.2021 रोजी अपु-या रक्‍कमे अभावी वटू शकले नाही. तसेच  विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 12.02.2021 रोजी दिलेला धनादेश क्रमांक 283069 , रुपये 4,10,000/- चा धनादेश हा देखील दि. 15.02.2021 रोजी स्वाक्षरी जुळत नसल्याच्‍या कारणास्तव अनादरीत  झाला  याबाबतची विरुद्ध पक्षाला सूचना दिली असता विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला पुढील महिन्यात बँकेत धनादेश  वटविण्‍याकरिता सुचविले होते. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून पुनश्च सदरचे धनादेश कॅनरा बॅंक, शाखा - रामदास पेठ, नागपूर येथे वटविण्‍याकरिता दिनांक 20.03.2021 व दिनांक 19.04.2021 ला जमा केले असता सदरचे दोन्‍ही धनादेश पुनश्‍च अनादरीत झाल्‍याचे नि.क्रं. 2(5) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.

विरुध्‍द पक्ष यांनी उपरोक्‍त मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्‍याचे वचन दिलेले आहे. म्‍हणून मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या .M/s. Narne Construction P. Ltd. Etc.  Vs. Union of India and ors. Etc.  II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ले-आऊटचे विकसन करुन देणे आवश्‍यक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडा विक्री पोटी असलेली संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारुन ही तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे भूखंड क्रं. 2 चे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा त्‍याचा प्रत्‍यक्ष ताबा दिला नाही. त्‍याच प्रमाणे उभय पक्षात झालेल्‍या तडजोडीप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेली रक्‍कमेचे धनादेश देखील अनादरीत झालेले आहे. अशा प्रकारे  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे दिसून येते.  

      

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

2.  विरुध्‍द पक्ष 1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला मौजा-हुडकेश्‍वर  खसरा क्रं. 137/क, प.ह.नं. 37-अ, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 2, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फु. चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

  • किंवा

उपरोक्‍त भूखंडाचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे    शक्‍य नसल्‍यास किंवा अडचण असल्‍यासविरुध्‍द पक्षाने1250चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या भूखंडासाठी मौजा –हुडकेश्‍वर, प.ह.नं. 37-अ, खसरा क्रं. 137/क, तह.जि.नागपूर, या मिळकतीच्‍या झोन मधील अथवा वादातीत भूखंडापासून सर्वात जवळ असलेल्‍या इतर  झोन मध्‍ये 1250 चौ.फुटाच्‍या अकृषक भूखंडाकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि  सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.   

3.   विरुध्‍द पक्ष 1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्‍हणून रुपये  50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये  30,000/- द्यावे.

        4.    वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

  1.   तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.