द्वारा: मा.सदस्या : श्रीमती सुजाता पाटणकर.
// नि का ल प त्र //
1) अर्जदाराने प्रस्तुतचा अर्ज जाबदार यांनी करारनाम्यात ठरल्याप्रमाणे
सदनिकेचे काम करुन न दिल्यामुळे सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे.
अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, जाबदारांनी इमारतीचे बांधकाम अपूर्ण केले. सोयीसुविधा न दिल्यामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम देण्यात यावी असे आदेश होऊन मिळण्या संदर्भात दाखल केला आहे. जाबदारांने मिळकत विकसीत करुन प्लॅन सन 1993 माहे 08/04/1993 रोजी व प्लॉट दुरुस्ती नं 4069 दिनंाक 12/11/1998 जाबदारांने तळेगांव नगर परिषदेने मंजूर केला. प्लॅट प्रमाणे कामे करण्याचे अभिवचन नगरपरिष्रदेय दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही. प्लॅन प्रमाणे अ रुममध्ये पंपहाऊस बांधले नाही ब रुम ही स्वत:साठी वापरतात सामान अडगळ ठेवतात. बिल्डींगची कामे केलेली नाहीत व सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारी नगरपालिका कर पाणी बील भरणे ही जबाबदारी जाबदारांची आहे ते मिळावे.
जाबदेणार यांनी गाळा क्रमांक 5 मयत दिलीप छगनलाल ओसवाल यांचे नांवे नोंद नगरपरिषदेस केली ती चुकीची माहिती देवून केली. गाळा क्रमांक 6 चे मालक तुकाराम वामनराव बनसोडे त्यांचे नांवे तळेगांव दाभाडे नगरपरिषद येथे दोन बेडख् किचन, बाथरुम व एक बैठक गाळा अशी नोंद केली ती कराराप्रमाणे नाही. गाळा क्रमांक 6 चे बांधकाम अंतर्गत कराराप्रमाणे पुर्ण केले नाही. त्याचे पोटमाळा दिला नाही त्यामुळे कधीही भरुन न येणारे नुकसान केले आहे. सदरची नुकसान हा सुध्दा या तक्रारीचा विषय आहे.
जाबदाराने गाळा क्र 5 मयत दिलीप ओसवाल किंवा त्याचें वालीवारस व बिल्डर प्रमोटर्स त्यांचे फायदयासाठी दुरूयम निबंधक वडगांव मावळ येथे करार किंवा खरेदीखत केले नाही. बेनामी विक्रीचे फायदे मिळवतात हे बेकायदेशीर आहे. जाबदारांनी इमारतीचे पश्चिम दिशेस बाजूने दरवाजे उघडे छोटा गाळा व इमारती फेरफार बांधकाम तोडून गाळा क्र 1 त्यामध्ये सिमेंट, चुना, बेकायदेशीर ठेवतात. पश्चिमेच्या बाजूने खिडक्या उघडल्यानंतर सभासद गाळेधारकांना धुळीचा त्रास होतो. शुध्द हवापाणी मिळत नाही.
सदर इमारतीचे दक्षिण उत्तरेस जाणा-या पाण्याच्या नळ वाहिण्या जातात त्यावरुन जाबदेणार हे ट्रक सिमेंट, चुना लोडींग अनलोडींग करतात ते बेकायदेशीर आहे. सिमेंट गोडावून तळेगांव दाभाडे दुस-या ठिकाणी होते ते कलम 1 मिळकतीत नव्हते. जाबदारांने पिण्याच्या पाण्याची टाकी ड्रेनेजसाठी बांधली होती. तीचा वापर आता पिण्याच पाण्यासाठी वापर करतात हे मान्य नाही. त्या पिण्याच्या टाकीकडे व बोअरवेलकडे जाण्यायेण्यासाठी रोड समांतर फरशी दक्षिण उत्तर बांधकाम रस्ता करुन दिला नाही. त्यामुळे इमारत बांधकामे अपूर्ण ठेवले आहे हे ते बेकायदेशीर आहे.
जाबदार यांचे मालकीचे दुसरा प्लॅट क्र 6 मध्ये सिमेंट गोडावून रोड जाणेयेण्याचा रस्ता व बांधकाम सुमारे 50 मिटर दूर नविन केले आहे तिथे सिमेंट गोडावून इमारतीचे बाजूने गटार बांधले नाही. त्यामुळे गटाराचे पाणी अस्वच्छ पावसाचे पाणी पिण्याच्या टाकीकडे आणून सोडले आहे. गाळेधारकांस सभासदांना डास यांचा त्रास होतो. परिणामी गाळेधारकांची मुले आजारी पडतात दवाखाण्याचा खर्च वाढतो. जाबदार हे मानसिक त्रास देतात हे सर्व जाणिवपूर्वक सिमेंट वाहतूक, सिमेंट ठेवणे, टरपेन्टाईल तेलाचे डबे अनधिकृत जाबदार ग्राळा क्र 1 मध्ये ठेवतात. त्यामुळे इमारतीस धोका होईल असे वकीलां मार्फत दि 19/9/2008 रेाजी कळविले आहे. जाबदारांना संस्थेच्या बिल्डींग मधून सिमेंट चुना हलविण्याची समज देऊन सुध्दा ते बेकायदेशीर सिमेंट चुना ठेवतात.
इमारतीत प्रत्येक गाळेधारक सभासदाला 1 संडास, 1 बाथरुमच्या सुविधा इमारतीत दिली. परंतु बिल्डर प्रमोटर्स जाबदार 2 संडास व 2 बाथरुम बांधलेत व वापरतात त्यापैकी संस्थेला एकाच संडज्ञस बाथरुममध्ये मेन्टनन्स खर्च देतात. एक दुकानातील संडास बाथरुम सुविधा मेन्टेनन्स खर्च देत नाहीत. हे बेकायदेशीर आहे ती नुकसानभरपाई मिळावी.
3) जाबदार यांनी बिल्डींग या पश्चिमेस प्लॉट क्रमांक 6 यांचे कंपाऊंड तोडले आहे. त्यामुळे संस्थेचे बोअरवेल इलेक्ट्रीक मोटर, पिण्याच्या पाण्याची टाकी, व त्यावरील इलेक्ट्रीक मोटार असुरक्षित आहे ते सुध्दा जाबदार यांना दिनांक 19/09/2008 या नोटीसीने कळविले आहे त्यामुळे जाबदार विरुध्द मे कोर्टात येणे भाग पडले आहे तेव्हां पासुन घडले व त्यानंतर रोजच्या रोज घडत आहे. दिनंाक 29/522008 रोजी मासीक बैठकीमध्ये समज दिली. तसे घडत नाही. जाबदार यांनी बिल्डींगला कंपाऊन्ड रोड समांतर फुटपाथ त्याला फरशी न बसविल्यामुळे दुस-या प्लॉट नं 6 मधून येणा-या लोकांची रात्री बेरात्री ये जा असते त्यामुळे 2 मोटर्स इलेक्अ्रीक मोटारी चोरी जाण्याची शक्यता आहे.
जाबदारांनी दोन मेन गेट बिल्डींग भोवती कंपाऊन्ड जाण्याची टाकी उंचावर बसविणे त्याला सिडी रोड समांतर फुटींग डबर, वाळू, रेती गट्टू टाईल्स इंटरलॉक त्याचा खर्च जाबदार यांनी देववावा.
जाबदारांनी इमारत बांधकाम अपूर्ण ठेवले आहे व सुविधा पुरविलेल्या नाहीत. इमारतीचे व जमिनीचे खरेदीखत त्याचा खर्च नुकसानभरपाई मिळावी. जाबदार यांची इमारत मे कोर्टाचे अधिकार कक्षेत आहे. न्यायनिवाडा करण्याचे अधिकार मे कोर्टाचे अखत्यारीत आहे. संस्थेच्या नांवे खरेदीखताचे कामे भोगवटा प्रॉपर्टी कार्ड नोंदी व इतर दस्त करुन दयावेत.
तक्रारदार – प्रज्ञादिप सह. गृह रचना संस्था यांनी खालील प्रमाणे नुकसानभरपाईच्या रकमांची मागणी केलेली आहे –
प्रस्तुत प्रकरणातील तक्रार अर्ज, म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे ( Points for Consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात; मंचाचे मुद्दे व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे : -
मुद्दा क्रमांक 1 ) बिल्डरने तक्रारदारांना सदोष सेवा दिली :
ही बाब सिध्द होते का ? :
2 ) तक्रार अर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो :
का ? :
3 ) काय आदेश ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेंचन:
मुद्दा क्रमांक 1 :
मुद्दा क्रमांक : मुद्दा क्रमांक 1 व 2 मध्ये नमूद विवेंचन व निष्कर्षाचा आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की –
// आ दे श //
1) तक्रारअर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2) यातील बिल्डरने तक्रारदारांना रक्कम रु. 12,00,000/-
( रु बारा लाख फक्त ) दिनांक 06/04/2009 पासून
संपूर्ण रककम फिटे पर्यन्त 18 % व्याजासह अदा करावेत.
3) यातील बिल्डरने तक्रारदारांना रक्कम रु रु.1,09,520/-
( रु एक लाख नऊ हजार पाचशे वीस फक्त) कराराच्या
तारखे पासून म्हणजे दिनांक 06/04/2009 पासून
संपूर्ण रक्कम फिटे पर्यन्त 9 % व्याजासह अदा करावेत.
4) यातील बिल्डरने तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची
नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु. 25,000/- ( रु पंचवीस
हजार फक्त) व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम
रु. 5,000/- ( रु पाच हजार ) अदा करावेत.
5) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी विहीत
मूदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण
कायदयाच्या तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
6) निकालपत्रांच्या प्रति दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.