Exh.No.10
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 07/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.17/01/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.13/07/2015
श्री प्रभाकर शंकर इसवलकर
वय 62 वर्षे, व्यवसाय- काजुगर विक्री,
रा.मु.पो.खारेपाटण, ता.कणकवली,
जिल्हा- सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) सौ. शैलजा मंगेश कुबल
वय 46 वर्षे,
अध्यक्षा,
सन्मती महिला वि.का.स. औद्योगिक
संस्था मर्यादित खारेपाटण,
रा. मु.पो. खारेपाटण,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
2) श्री सचिन दीपक मांजरेकर
सचिव,
सन्मती महिला वि.का.स. औद्योगिक
संस्था मर्यादित, खारेपाटण,
रा.मु.पो. वारगाव, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
3) सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक
संस्था मर्यादित, खारेपाटण,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी. अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार – व्यक्तीशः हजर.
विरुद्ध पक्ष – गैरहजर.
निकालपत्र
(दि. 13/07/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
- तक्रारदाराच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की,
तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष यांच्या सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक संस्था मर्यादित, खारेपाटण या संस्थेत पिग्मी खाते असून त्यांना रक्कमेची आवश्यकता असल्याने विरुध्द पक्षाकडे मागणी करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष यांच्या सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक संस्था मर्यादित, खारेपाटण या संस्थेत पिग्मी खाते असून त्याचा खाते क्र.1614 असा आहे. तक्रारदार हे सदर पिग्मी खात्यात दि.19/06/2013 पासून दि.19/06/2014 पर्यंत रक्कम भरणा करीत होते. तक्रारदार यांची सदर पिग्मी खात्यात रु.65,600/- जमा होते. तक्रारदार यांनी सदर पिग्मी खाते बंद केले व जमा असलेल्या रक्कमेची व्याजासह मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी वेळोवेळी कारणे सांगून रक्कम देणेस टाळाटाळ केली. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी वेळीच रक्कम परत न दिल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी भरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
3) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या संस्थेत जमा असलेली रक्कम रु.65,600/- व्याजासह मिळावी तसेच तक्रारदारास झालेल्या तक्रार खर्चापोटी रु.5,000/-, तसेच झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे.
4) सदर तक्रार दाखल झाल्यावर विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना अनुक्रमे नि.5,6 व 7 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या.
5) दरम्यान विरुध्द पक्ष दि.24/2/2015 रोजी मंचासमोर उपस्थित राहून तक्रारदारास रोखीने रु.65,700/- अदा केलेले आहेत व उर्वरीत व्याजाची रक्कम रु.5,000/- दि.31/5/2015 रोजी तक्रारदारास देत असलेबाबत नि.8 वर पुरसीस दाखल केलेली आहे.
6) तथापि तक्रारदार यांनी नि.9 वर आज दि.13/7/2015 रोजी शपथपत्र दाखल करुन व्याजाची रक्कम रु.5,000/- मिळाली नसलेने विरुध्द पक्ष यांना आदेश देणेबाबत विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष यांना पुकारले असता गैरहजर. तक्रारदार यांना तक्रारीत नमुद रक्कम मिळाली असून व्याजापोटी रक्क्म रु.5,000/- मिळणे आवश्यक आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे तक्रारदारास व्याजाची रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) आदेश प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत देणेबाबत आदेश पारीत करणेत येतात.
- वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे 30 दिवसांत न केल्यास तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 अन्वये दंडात्मक कारवाई करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 30 दिवसानंतर म्हणजेच दि.14/08/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः13/07/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत धर्माजी कुबल,)
सदस्या, प्र. अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.