Maharashtra

Nagpur

CC/54/2021

KAMLESH KHUBCHAND NECHANI - Complainant(s)

Versus

SMT. BIMAL (VIMAL) BANWARILAL CHAWLA - Opp.Party(s)

ADV. VAIBHAV K. NANKANI

13 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/54/2021
( Date of Filing : 22 Jan 2021 )
 
1. KAMLESH KHUBCHAND NECHANI
R/O. 402, NAMAN EXOTICA, 4TH FLOOR, NEAR KADBI CHOWK, CLARK TOWN, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SMT. SWATI KAMLESH NECHANI
R/O. 402, NAMAN EXOTICA, 4TH FLOOR, NEAR KADBI CHOWK, CLARK TOWN, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SMT. BIMAL (VIMAL) BANWARILAL CHAWLA
R/O. CARE OF SHOP NO.3, VIKAS ENGINEERING COMPLEX, SMALL FACTORY AREA, BHANDARA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. ASHWINI KUMAR BANWARILAL CHAWLA
R/O. CARE OF SHOP NO.3, VIKAS ENGINEERING COMPLEX, SMALL FACTORY AREA, BHANDARA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. YOGESH BANWARILAL CHAWLA
R/O. CARE OF SHOP NO.3, VIKAS ENGINEERING COMPLEX, SMALL FACTORY AREA, BHANDARA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. M/S. NAMAN INFRA
OFF.AT, 4/4, VHB COLONY,EAST HIGH COURT ROAD, RAMDASPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
5. INDRAKUMAR GHISULAL AGRAWAL (KEJDIWAL)
R/O. 604, KAPDA CHAAL, EMPRESS MILL ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
6. NISAR NOORALLAH AJANI
R/O. 4/4, WEST HIGH COURT ROAD, RAMDASPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. VAIBHAV K. NANKANI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 13 Feb 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. वि.प.क्रं.1 ते 3 हे मौजा-वालपाकड, भुमापक क्रं. 74/1, जुना क्रं.74, शिट क्रं.(203) 12, नझुल भुखंड क्रं.14/ए, एकुण क्षेत्रफळ 532.432 चौ.मि. कॉरपोरेशन घर क्रं.904, वार्ड क्रं.63, क्लार्क टाऊन, नागपूर या जमीनीचे मालक आहेत. वि.प.क्रं.4 ही भागीदारी संस्था असुन वि.प.क्रं. 5 व 6 हे त्या फर्मचे भागीदार आहेत.  वि.प.क्रं.1 ते 3 यांनी वि.प.क्रं.4 मार्फत वि.प.क्रं.5 व 6 यांचेशी वरील भुखंड क्रं.4 चे विकसनाचा आणि विक्रीचा करार केला. सदर करार सब-रजिस्टार क्रं.1 यांचेकडुन सिरियल क्रं.1730/2013, दिनांक 15.3.2003 ला नोंदणीकृत करण्‍यात आला. सदर कराराचे अनुषंगाने वि.प.कं. 1 ते 3 यांनी वि.प.क्रं. 4 यांना वि.प.क्रं.5 व 6 मार्फत आममुख्‍्त्यारपत्र करुन दिले व सदर मुख्‍्त्यारपत्र सब-रजिस्टार क्रं.1 यांचे अनुक्रमांक-1731/2013 दिनांक 15.3.2013 अन्वये नोंदणी करण्‍यात आले.
  2. दिनांक 28.7.2017 ला तक्रारदाराने वि.प.सोबत क्लार्क टाऊन नागपूर येथील “नमन एक्झॉटिका” या बहुमजली इमारतीतील चौथा माळयावरील सदनिका क्रं. 402 अविभाज्य भाग 10.105% सह कारचे पॉर्कींग (कव्हर्ड) भाग करिता एकुण रुपये 77,50,000/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा तोंडी करार केला. त्याअनुषंगाने त्याचदिवशी दिनांक 28.7.2017 रोजी तक्रारदाराने वि.प.क्रं. 4 व 6 यांना धनादेश क्रं. 218305 व 236446, नागपूर नागरिक सहकारी बॅंक लि.गांधीबाग या शाखेचा रुपये 5,00,000/- प्रत्येकी असे दोन धनादेशान्वये एकुण रुपये 10,00,000/- अदा केले. तक्रारदाराने दिनांक 9.10.2017 पर्यत वि.प.क्रं.4 व 6 ला रुपये 24,50,000/- अदा केले. वि.प.ने तक्रारदाराला दिनांक 28.12.2017 ला सब-रजिस्टार क्रं.1, नागपूर यांचेकडे सिरियल क्रं.8303/2017 अन्वये विक्रीपत्र करारनामा नोंदणी करुन दिला आणि रिकाम्या सदनिकेचा फर्निचरसह ताबा दिला. तक्रारकर्ता दिनांक 28.12.2017 पासुन सदनिकेचा उपभोग घेत आहे व त्यापोटी संबंधीत प्राधिकरणाला महानगरपालीका कर, देखभाल खर्च व पाणी देयक अदा करीत आहे. वि.प.ला दिनांक 30.12.2017 ला एचडीएफसी  बॅंक लि.नागपूर यांचे कडुन युटीआर क्रं. एन/364170442415792, दिनांक 30.12.2017 अन्वये आरटीजीएसव्दारे रुपये 50,00,000/- प्राप्त झाले व वि.प.क्रं. 4 व 6 यांना उर्वरित रक्कम रुपये 3,00,000/- तक्रारदाराला अदा करावयाची बाकी होती. तक्रारकर्ता वि.प.ला रुपये 3,00,000/- अदा करुन विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार होता.
  3. जानेवारी-2018 चे दुस-या आठवडयात तक्रारदाराने वि.प.क्रं.5 व 6 यांचेसोबत संपर्क साधला असता विक्रीपत्र करुन देण्‍याबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रारदाराला देय रक्कम रुपये 3,00,000/- जीएसटीसह रक्कमेची मागणी केली असता तक्रारदाराने वि.प.यांना सदर सदनिकेचे बांधकाम विक्रीपत्र करारनामा नोंदणी दिनांक 28.12.2017 चे पूर्वी झालेली असल्याने तो देय नाही असे सांगीतले. वि.प.ने सदर दिनांक 28.12.2017 च्या विक्रीपत्र करारनाम्यांचे पान क्रं. 6 दुस-या परिच्छेदात चुकीने नमुद केले की, “The complainant being desire of owing an apartment No.402 on the 4th floor in the said multi story building proposed to be constructed on above said plot no.14/A, and to be known and style “ Naman Exotica ” , हे नमुद जरी केले असले तरी सदरची इमारत भुखंड क्रं.14/ए, या भुखंडावर दिनांक 15.6.2017 च्या जवळपास बांधण्‍यात आली होती आणि वि.प.क्रं. 4 ते 6 यांनी श्री सुरेश घनश्‍यामदास चंचलानी आणि श्री विजय सुरेश चंचलानी यांचे नावे “ नमन एक्झॉटीका” या बहुमजली इमारतीमधील सदनिका क्रं.501, पाचवा माळयाचे विक्रीपत्र नोंदणीकृत करुन दिले आहे. वि.प.क्रं. 4 ते 6 यांनी चुकीचे नमुद केले की, possession of said flat shall be handed over to the complainant at the time of execution and registration of sale deed but as a mater fact that the possession of said flat was given to the complainant on the date of registration of agreement to sale dated 28.12.2017.  वि.प.क्रं. 4 ते 6 यांना तक्रारदाराकडुन बेकायदेशीरपणे रक्कम वसुल करावयाची आहे त्यामूळे वि.प.क्रं. 4 ते 6 तक्रारदाराला चूकीची जीएसटीपोटी रक्कम रुपये 9,00,000/- मागीत आहे. तक्रारकर्ता आजही करारानुसार शिल्लक रुपये 3,00,000/- देण्‍यास तयार आहे आणि सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी आपले नावे करुन घेण्‍यास तयार आहे परंतु वि.प.जीएसटीची रक्कम मिळाल्याशिवाय विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार नाही. तक्रारदाराला जीएसटीपोटी रक्कम अदा करावयाची कोणतीही शर्त विक्रीपत्र करारनाम्यात नमुद नाही त्यामूळे तक्रारदाराने वकीलामार्फत दिनांक 22.7.2020 व 17.9.2020 ला कायदेशिर नोटीस वि.प.ला दिली परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प.ने कायदेशीररित्या जीएसटीपोटी रुपये 9,00,000/- ची मागणी करु शकत नाही तसेच वि.प.ने तक्रारदाराकडुन उर्वरित रक्कम रुपये 3,00,000/- स्व‍िकारुन चौथ्या माळयावरील सदनिका क्रं. 402, चे विक्रीपत्र करुन द्यावे तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावी अशी मागणी केली आहे.
  4. तक्रार दाखल करुन वि.प.1 ते 6  यांना स्थानिक वर्तमानपत्राव्दारे जाहिर नोटीस काढण्‍यात आली. नोटीस मिळुनही वि.प.1 ते 6 मंचासमक्ष हजर  झाले नाही म्हणुन दिनांक 10.8.2022 रोजी तक्रार त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय?    नाही
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय?                   नाही

  1. काय आदेश  ?                           अंतिम आदेशानुसार

 

का र ण मि मां सा

  1. वि.प.क्रं.1 ते 3 हे मौजा-वालपाकड, भुपानक क्रं.74/1,जुना क्रं.74, शिट क्रं.(203) 12,नझुल भुखंड क्रं.14/ए, एकुण क्षेत्रफळ 532.432 चौ.मि. कारपोरेशन घर क्रं.904,वार्ड क्रं.63,क्लार्क टाऊन नागपूर या जमीनीचे मालक आहे. वि.प.क्रं.4 ही भागीदारी फर्म असुन वि.प.क्रं. 5 व 6 हे त्या फर्मचे भागीदार आहेत.  वि.प.क्रं.1 ते 3 यांनी वि.प.क्रं.4 मार्फत वि.प.क्रं.5 व 6 यांचेशी वरील भुखंड क्रं.4 चे विकसनाचा आणि विक्रीचा करार केला. सदर करार सब-रजिस्टार क्रं.1 यांचेकडुन सिरियल क्रं.1730/2013 दिनांक 15.3.2003 ला नोंदणी करण्‍यात आला.
  2. दिनांक 28.7.2017 ला तक्रारदाराने वि.प.सोबत क्लार्क टाऊन नागपूर येथील नमन एक्झॉटिका या बहुमजली इमारतीतील चौथा माळयावरील सदनिका क्रं. 402 अविभाज्य शेअर 10.105% सह कारचे पॉर्कींग (कव्हर्ड) एकुण रुपये 77,50,000/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा तोंडी करार केला होता अभिलेखावर दस्त क्रं. 2(17) वरुन स्पष्‍ट होते.
  3. तक्रारदाराने नि.कं. 2(17) वर दाखल विक्रीपत्र करारातील पान क्रं. 6 परिच्‍छेद क्रं. 2 मधे खालीलप्रमाणे नमुद आहे. The complainant being desire of owing an apartment No.402 on the 4th floor in the said multi story building proposed to be constructed on the above said plot no.14/A, and to be known and style “ Naman Exotica”,  हे नमुद केले आहे. तक्रारदाराने सदरची बहूमजली इमारत भुखंड क्रं.14-ए यावर दिनांक 15.6.2017 पूर्वी बांधकाम केले असल्याबाबात कुठलाही पूरावा तसेच Completion certificate अभिलेखावर दाखल नसल्याने तक्रारकर्ता सदर सदनिकेचे खरेदीपोटी वि.प.ला नियमानुसार जीएसटी देण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.  सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.