सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.01/2013
सौ.रुक्मिणी कृष्णा सावंत
वय सु.51 वर्षे, धंदा- घरकाम,
रा.ओंकार नगर, दोडामार्ग,
ता.दोडामार्ग, जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार/अर्जदार.
विरुध्द
श्रीमती मनिषा सुभाष चव्हाण
वय सु.45 वर्षे, धंदा- बांधकाम,
चव्हाण अँड कंपनी
बिल्डर्स अँड डेव्हलपर्स,
दोडामार्ग, सुरुचीवाडी
दोडामार्ग तहसीलदार कार्यालयानजिक,
ता.दोडामार्ग, जिल्हा – सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – श्री आर.एस. गव्हाणकर.
विरुद्ध पक्षातर्फे – श्री. बी. एम. दळवी.
आदेश नि.1 वर
(दि.24/04/2015)
द्वारा : मा. सौ. वफा जमशीद खान, सदस्या
1) प्रस्तुत प्रकरणात मुळ तक्रार अर्ज क्र.36/2006 मधील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी केली नसल्याने ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 प्रमाणे अर्ज दाखल करणेत आला होता. उभय पक्षकारांमध्ये तडजोड होऊन त्यांनी तडजोडनामा दाखल केला तो नि.क्र.39 वर आहे. तडजोडनामा हा उभय पक्षकारांवर बंधनकारक आहे. उभय पक्षकारांनी तडजोडनाम्यास अनुसरुन प्रकरण निकाली काढणेत यावे अशी विनंती केली आहे.
2) सबब नि.क्र.39 ला अनुलक्षून दरखास्त प्रकरण तडजोडीने निकाली करणेत येते.
3) आरोपीचे बेल बॉंड रद्द करण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/04/2015
(व्ही.जे. खान) (के. डी. कुबल)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग