Maharashtra

Pune

cc/2010/166

D.S.Kulkarni - Complainant(s)

Versus

SMEG S.P.A. - Opp.Party(s)

A.G.Thite

17 Mar 2011

ORDER

 
Complaint Case No. cc/2010/166
 
1. D.S.Kulkarni
Shivajinagar Pune
...........Complainant(s)
Versus
1. SMEG S.P.A.
Italy
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष, यांचेनुसार
        :- निकात्र   :-
                            दिनांक 29/4/2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
 1.                    तक्रारदारानी जाबदेणार क्र.1 उत्‍पादक कंपनीचा डबल डोअर फ्रीज मॉडेल क. एफए 720 X जाबदेणार क्र.3 – विक्रेते यांच्‍याकडून दिनांक 27/3/2008 रोजी रक्‍कम रुपये 3,61,597/- ला खरेदी केला. फ्रीजमध्‍ये निरनिराळी वैशिष्‍टये होती.   खरेदी केल्‍यानंतर तक्रारदाराच्‍या असे लक्षात आले की फ्रीज व्‍यवस्थितरित्‍या कार्य करीत नव्‍हता, बर्फ तयार होत नव्‍हता तसेच आतील पदार्थही थंड होत नव्‍हते, फिल्‍ट्रेशन देखील होत नव्‍हते. तक्रारदारानी अनेक वेळा जाबदेणार क्र.2 व 3 यांच्‍याकडे यासंदर्भात तक्रारी केल्‍या.  ई मेल केले, दुरध्‍वनीवरुन तक्रारी सांगितल्‍या. तरीही जाबदेणार यांनी दखल घेतली नाही. ब-याच तक्रारी केल्‍यानंतर जाबदेणार क्र.3 यांचे प्रतिनिधी तक्रारदाराच्‍या घरी येऊन फ्रीज पाहून गेले. फ्रीज मध्‍ये बरेच तांत्रिक दोष असल्‍याने दिनांक 30/12/2008 रोजी तक्रारदारास बदली फ्रीज देण्‍यात आला. तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की बदलून दिलेल्‍या फ्रीजमध्‍ये देखील पुर्वीच्‍याच फ्रीज सारख्‍या सर्व समस्‍या होत्‍या. याबद्यल जाबदेणार क्र.3 यांच्‍याकडे तक्रारी केल्‍यानंतर त्‍यांच्‍या तंत्रज्ञानी फिल्‍टर ची समस्‍या असावी म्‍हणून फिल्‍टर बदली करण्‍यास सांगितले. त्‍यानुसार दिनांक 30/10/2009 रोजी तक्रारदारानी रक्‍कम रुपये 14,985/- दिल्‍यानंतर फिल्‍टर बदली करुन देण्‍यात आला. तक्रारदारानी फ्रीज संदर्भात काय तक्रारी उदभवल्‍या व कुठल्‍या दिनांकास उदभवल्‍या या संदर्भातील पत्रव्‍यवहाराची यादी तक्रारीत दाखल केलेली आहे. नवीन बदली फ्रीज मध्‍ये पुर्वीच्‍याच समस्‍या निर्माण होतात म्‍हणून तक्रारदारानी दिनांक 12/1/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. जाबदेणार यांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही. दिनांक 27/3/2010 रोजी मेल द्वारे जाबदेणार यांना नोटीस देण्‍यात आली. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 1/4/2010 रोजी नोटीसचे उत्‍तर दिले. तक्रारदाराच्‍या फ्रीज मधील तक्रारी/समस्‍यांचे निराकरण झाले नाही म्‍हणून मंचात तक्रार दाखल करण्‍यात आली. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून फ्रीजची रक्‍कम रुपये 3,61,597/- व फिल्‍टरची किंमत रक्‍कम रुपये 14,985/- एकूण रक्‍कम रुपये 3,76,582/- 18 टक्‍के व्‍याजासह मागतात तसेच रक्‍कम रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.               जाबदेणार क्र.3 मंचात हजर झाले परंतू लेखी जबाब दाखल केला नाही. म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍द नो से आदेश पारीत करण्‍यात आला. जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही मंचात गैरहजर. म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. 
3.                तक्रारदारानी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी निरनिराळी वैशिष्‍टये असणारा जाबदेणार क्र.1 कंपनीचा फ्रीज दिनांक 27/3/2008 रोजी रक्‍कम रुपये 3,61,597/- देऊन जाबदेणार क्र.3 यांच्‍याकडून खरेदी केला. फ्रीज खरेदी पासूनच त्‍यात फ्रीजमधील पदार्थ थंड न होणे, बर्फ तयार न होणे यासारख्‍या समस्‍या निर्माण होत होत्‍या. जाबदेणार यांनी जी फ्रीजमधील वैशिष्‍टये नमूद केली होती त्‍यांचाही फायदा तक्रारदारास होत नव्‍हता. या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याबरोबर बराच पत्रव्‍यवहार केल्‍याचे दिसून येते. वॉरंटी कालावधीतच निर्माण झालेल्‍या क्र.1 ते 18 समस्‍या तक्रारदारानी तक्रारीत नमूद केलेल्‍या चार्ट वरुन दिसून येते. जाबदेणार हया बाबी अमान्‍य करीत नाहीत. म्‍हणून प्रथम जाबदेणार यांनी दिनांक 30/12/2008 रोजी फ्रीज बदली करुन दिला. परत तीच समस्‍या निर्माण झाल्‍यामुळे व जाबदेणार यांच्‍या तंत्रज्ञानी फिल्‍टर ची समस्‍या असावी म्‍हणून फिल्‍टर बदली करण्‍यास सांगितल्‍यानुसार दिनांक 30/10/2009 रोजी तक्रारदारानी रक्‍कम रुपये 14,985/- दिल्‍यानंतर फिल्‍टर बदली करुन देण्‍यात आला. वास्‍तविक पाहता वॉरंटी कालावधीत जे पार्ट्स निकामी होतात किंवा सदोष असतात ते पार्ट्स बदलतांना जाबदेणार यांनी त्‍याची किंमत तक्रारदाराकडून घेता कामा नये, तरीही प्रस्‍तूत प्रकरणी जाबदेणार यांनी बदली केलेल्‍या फ्रीज मध्‍ये फिल्‍टरची समस्‍या निर्माण झाल्‍यानंतर फिल्‍टर बदली करण्‍यासाठी रक्‍कम रुपये 14,985/- घेतलेले आहेत. एवढया मोठया रक्‍कमेला [ रुपये 3,61,597/-] खरेदी केलेल्‍या, वेगवेगळी वैशिष्‍टये असलेल्‍या फ्रीजमध्‍ये वॉरंटी कालावधीतच वारंवार समस्‍या निर्माण होतात, त्‍यांचे निराकरण करणे जाबदेणार यांना शक्‍य होत नाही. म्‍हणजेच फ्रीजमध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे. जाबदेणार यांनी त्‍यांच्‍या 6/1/2010 च्‍या मेल मध्‍ये “we have order for complete ice motor box it will get courer from italy on 8/1/10, it will come within a week time the part cost is 30000(thirty thousand rs) BUT we are doing it free of cost to u.”  असे नमूद केलेले आहे. फक्‍त आईस बॉक्‍स ची किंमत रक्‍कम रुपये 30,000/- नमूद करण्‍यात आलेली आहे. तक्रारदारानी नवीन फिल्‍टर बसविण्‍यासाठी जाबदेणार यांना रक्‍कम रुपये 14,985/- अदा केलेले आहेत. वॉरंटी कालावधीतच फ्रीजचे फिल्‍टर, आईसबॉक्‍स बदलावे लागले. याचाच अर्थ फ्रीजमध्‍ये उत्‍पादकीय दोष आहेत व ते जाबदेणार यांच्‍या तज्ञांनाही दुर करता आले नाहीत. फ्रीजमध्‍ये उत्‍पादकीय दोष नाहीत हे सांगण्‍यासाठी जाबदेणार यांनी मंचात लेखी जबाब किंवा तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही. परंतू त्‍यांच्‍याच मेलवरुन आईसबॉक्‍स बदलावा लागणार हे स्‍पष्‍ट होते. विविध वैशिष्‍टये असलेला फ्रीज घेऊनही तक्रारदारास त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट त्‍यामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेलच असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून फ्रीजची रक्‍कम, फिल्‍टरची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत, तसेच नुकसान भरपाई मिळण्‍यास देखील पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत करण्‍यात येतो-
                                  :- आदेश :-
1.     तक्रार मान्‍य करण्‍यात येते.
2.    जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास रक्‍कम रुपये 3,76,582/- दिनांक 30/12/2008 पासून 9 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम तक्रारदारास अदा करेपर्यन्‍त या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयात दयावी.
3.    जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास रक्‍कम रुपये 5,000/- नुकसान भरपाई पोटी व रक्‍कम रुपये 1,000/- तक्रारीचा खर्च म्‍हणून या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयात दयावी. नंतर तक्रारदारानी फ्रीज जाबदेणार क्र.3 यांना परत करावा.
4.    आदेशाची प्रत दोन्‍ही पक्षास विनामूल्‍य देण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.