Maharashtra

Nanded

CC/09/45

Narandersingh Chansingh - Complainant(s)

Versus

Sky Lark Experase Pvt.Limited.Unit No.2/4 ,Mumbai. - Opp.Party(s)

Adv.Bhure B.V.

30 Sep 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/45
1. Narandersingh Chansingh R/o.Nanded Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Sky Lark Experase Pvt.Limited.Unit No.2/4 ,Mumbai. NandedMaharastra2. Sky lark Experase Pvt.Limited.Through,Directer,Branch,Trasingha Market,Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Sep 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र. 2009/45
                                                     प्रकरण दाखल दिनांक  10/02/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 30/09/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील          अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,          सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते,                 सदस्‍य.  
 
नरेंद्रसिंघ पि. चरणसिंघ
वय, सज्ञान वर्षे, धंदा व्‍यापार
रा. नांदेड.                                             अर्जदार
विरुध्‍द
1.   मा. व्‍यवस्‍थापक,
स्‍काय लार्क एक्‍सप्रेस प्रा.लि.युनिट नं.2/4,
ग्राऊंड फलोअर, स्‍टील मेड इंडस्‍ट्रीज,
स्‍टेट किंग फीशर, एअरलेन, विअर हाऊस,
मोरेश रोड, अंधेरी ईस्‍ट, मुंबई.
2.   स्‍कॉय लार्क एक्‍सप्रेस प्रा.लि. मार्फत व्‍यवस्‍थापक,
शाखा तारासिंघ मार्केट, नांदेड.                        गैरअर्जदार
3.   युनायटेड इंडिया कं.लि.मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
शाखा गुरु कॉम्‍प्‍लेक्‍स, जी.जी.रोड,नांदेड. 
 
अर्जदारा तर्फे.               - अड.भूरे.बी.व्‍ही.
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे      - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे         -   अड.जी.एस.औढेंकर.
                            निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
              सर्व गैरअर्जदारांनी   सेवेत ञूटी केली म्‍हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांचे इन्‍शूरन्‍स कंपनीकडे आपले वाहन ट्रक नंबर सीजी-04डब्‍ल्‍यू-7498 चा विमा घेतला आहे. अर्जदाराचा ट्रक हा अपघातात क्षतीग्रस्‍त झाला. संबंधीत ट्रकचे कागदपञ अर्जदाराने वाहनाचे नूकसान भरपाई मिळण्‍यासाठी जसे की, एफ.आय.आर. स्‍पॉट पंचनामा, स्‍पेअर पार्टचे बिल, स्‍पॉट रिपोर्ट, फोटोज, फायनल रिपोर्ट, आर.बी. बूक, फिटनेस, ड्रायव्‍हीग लायसन्‍स, इन्‍शूरन्‍स कव्‍हर नोट इत्‍यादी कागदपञ नूकसान भरपाई मिळण्‍यासाठी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दिले. पंजाब येथील इन्‍शूरन्‍स कंपनीने सांगितल्‍याप्रमाणे त्‍यांचे येथील शाखेत कागदपञ मिळल्‍यानंतर  गैरअर्जदार क्र.3 यांनी दिलले कागदपञ दि.22.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेमार्फत त्‍यांची शाखा जालंधर येथे पाठविण्‍यासाठी  दिले. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांचेकडे पाठविण्‍याचा खर्च घेऊनही ती कागदपञ संबंधीतास जांलधर  यांचेकडे मिळाली नाही. कागदपञे त्‍यांना मिळाली नसल्‍याकारणाने तूमच्‍या वाहनाच्‍या नूकसान भरपाईचा क्‍लेम आम्‍ही देऊ शकत नाही असे त्‍यांना सांगितले. गैरअर्जदार क्र.3 यांनी जाऊन प्रत्‍यक्ष आपण पाठविलेले कागदपञ जालधंर येथील शाखेवरुन मिळाले नसल्‍याचे कळले असता त्‍यांनी परत  गैरअर्जदार क्र.2 कडे जाऊन चौकशी केली असे सांगितले परंतु कागदपञ मिळाले नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी कूरीअर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे  चौकशी कराा असे सांगितले असता त्‍यांनी स्‍पष्‍ट शब्‍दात नकार दिला. शेवटी गेरअर्जदार यांना वकिलामार्फत नोटीस दि.3.1.2009 व  12.01.2009 रोजी पाठविली. अर्जदाराचा ट्रक  7 ते 8 महिन्‍यापासून बंद आहे. गेरअर्जदार यांना आजपर्यत झालेलया नूकसान भरपाई बददल रु.7,50,000/- व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- दयावेत अशी विनंती केली आहे.
 
              गेरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविण्‍यात आल्‍या. दोघानांही नोटीस तामील होऊनही  ते हजर झाले नाहीत किंवा संधी असताना आपले म्‍हणणे दिले नाही. यानंतर परत अर्जदारांनी परवानगी घेऊन नांदेड व मूंबई येथील वर्तमान पञात जाहीर प्रगटन दिले त्‍यांची प्रत सोबत जोडली आहे. यानंतरही गैरअर्जदार हजर झाले नाही म्‍हणून प्रकरण  त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन पूढे चालविण्‍यात आले.
 
              गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना प्रकरण दाखल करण्‍यास  कॉज ऑफ अक्‍शन नाही. त्‍यांचेकडून सेवेतील कोणतीही ञुटी झालेली नाही. संबंधीत तक्रार ही प्रिमॅच्‍यूअर स्‍वरुपाची आहे. अर्जदारानी अपघातावीषयीचे सर्व कागदपञ त्‍यांना दिले हे त्‍यांना मान्‍य आहे. हे कागदपञ मिळाल्‍याबरोबर नियमाप्रमाणे एक बंद लिफाफयात सर्व कागदपञ संबंधीत शाखा अदमपूर जांलधर  येथे गेरअर्जदार क्र.2 यांचेमार्फत पावती नंबर 5974877 द्वारे दि.22.07.2008 रोजी पाठविण्‍यात आले आहे. कागदपञ पोहचविण्‍याची जिम्‍मेदारी गैरअर्जदार क्र.2 ची आहे.   अर्जदाराची स्‍वतःचीही चूक आहे, त्‍यांनी त्‍यांचे परस्‍पर विमा कार्यालयाशी हे सर्व कागदपञ दाखल करावयास पाहिजे होते. परंतु त्‍यांनी असे केले नाही, त्‍यामूळे  त्‍यांचेवर जबाबदारी येते. गैरअर्जदार क्र.3 यांचे शाखेचा काही संबंध नसल्‍याकारणाने हे प्रकरण खर्चासह खारीज करावे असे म्‍हटले आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.3 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                   उत्‍तर
      1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी  
      सिध्‍द होते काय  ?                              होय.
   2. काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात त्‍यांचे ट्रक क्र.सीजी-04डब्‍ल्‍यू-7498 या ट्रकच्‍या विमा काढला व या ट्रकचा नांदेड येथे अपघात झाला त्‍यामूळे नूकसान भरपाईसाठीचा क्‍लेम त्‍यांनी शाखा कार्यालय यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी नांदेड येथे दाखल केला होता. अर्जदाराने विमा पॉलिसी या प्रकरणातदाखल केलेली नाही व ते म्‍हणतात ट्रकचा अपघात झाला, त्‍या अपघाताविषयीचा अर्जात उल्‍लेख केल्‍याप्रमाणे एकही कागदपञाची सत्‍य प्रत दाखल केलेली नाही. ट्रकच्‍या मालकी संबंधीची सर्व कागदपञे गाडीचे आर सी बूक हे सर्व क्‍लेम मागण्‍यासाठी यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी नांदेड या शाखेत त्‍यांनी दाखल केलेले आहेत. अर्जदारांनी आपल्‍या तक्रार अर्जात ते नांदेडचे सहीवासी असून त्‍यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे विमा काढल्‍याचा उल्‍लेख केलेला आहे. पण त्‍यांचे हया तक्रारीत काही तथ्‍य वाटत नाही. कारण ट्रकच्‍या नंबर वरुन हा ट्रक चंदीगढ पासींग होता. एकंदर प्रकरणावरुन पॉलिसी ही जांलधर पंजाब येथून काढलेली दिसते.नांदेड येथे विमा काढला असता तर जांलधर  येथे पाठविण्‍याची गरज नव्‍हती. निर्णय हा नांदेड शाखेने घ्‍यावयाचा होता. यांचा अर्थ विमा हा अदमपूर पंजाब येथे काढला आहे. अपघात हा नांदेड येथे झालेला असल्‍यामूळे  गैरअर्जदारांने नांदेड येथील शाखेस संपर्क केला असता त्‍यांनी सर्व्‍हेअर पाठवून त्‍या वाहनाची नूकसान भरपाई ठरवली असेल व अर्जदाराकडून एफ. आय. आर. स्‍पॉट पंचनामा स्‍पेअर्स पार्टसची बिल, फोटो, आर.सी. बूक, ड्रायव्‍हींग लायसन्‍स  व इन्‍शूरन्‍स कव्‍हर नोट इत्‍यादी कागदपञ अर्जदाराकडून त्‍यांचे कार्यालयात जमा करुन घेतले आहे. हे गैरअर्जदार क्र.3 यांनी आपले लेखी म्‍हणण्‍यात मान्‍यच केलेले आहे. परंतु विमा  पॉलिसी ही शाखा जांलधर पंजाब येथील असल्‍याकारणाने त्‍यांनी ती सर्व गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत जालंधर ला पाठविली. त्‍याबददल त्‍यांनी पावती नंबर 5974877 दि..22.07.2008 ची दाखल केलेली आहे. यात पाठवीणारे गैरअर्जदार क्र.3 जरी असले तरी अर्जदार हे बेनिफीशीयरी आहेत. हा  कागदपञाचा लिफाफा विमा कंपनी जालधंर यांना मिळाला नाही असे अर्जदाराचे म्‍हणणे आहेव गैरअर्जदार क्र.3 हे म्‍हणणे हे कागदपञ पाठविले म्‍हणजे आमची जबाबदारी संपली. यात अर्जदार यांनी यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी जालंधर यांना पार्टी करणे आवश्‍यक होते. कारण त्‍यांना हे पाकीट मिळाले की नाही या बददल काहीही पूरावा नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा लिफाफा पाठविला व संबंधीतास पोहचविला  हे सांगण्‍याची संधी दिली असताना त्‍यांनी संधी घेतली नाही व त्‍यांचे म्‍हणणेही दिले नाही. गैरअर्जदार क्र.3 म्‍हणतात आमच्‍या शाखेचा यांचे काहीही संबंध नाही. त्‍यांचा संबंध जरी नसला तरी  त्‍यांनी अर्जदाराकडून ही सर्व कागदपञ घेण्‍याचे काही कारणच नव्‍हते व अर्जदारास सरळ तूम्‍ही जालंधर शाखेत जाऊन तूमचे प्रपोजल दाखल करा असे सांगणे जरुरीचे होते परंतु त्‍यांनी असे न करता सर्व प्रोसेस करुन कूरीअर सर्व्‍हीसने पाठविले व कूरीअर सर्व्‍हीसने गहाळ केले परंतु जी फाईल गैरअर्जदार क्र.3 यांनी तयार केली होती त्‍या अनुषंगाने ती सर्व कॉपी त्‍यांचेकडे ठेवणे आवश्‍यक होते असे कागदपञ स्‍वतःकडे न ठेवता ते कूरिअरने पाठविले. जे कागदपञ कूरिअर मार्फत पाठविले त्‍या पाकीटाचा इन्‍शूरन्‍स केलेला नव्‍हता. गैरअर्जदार क्र.2 यांना यात काय कागदपञ पाठविले आहे यांची काहीही माहीती नाही. त्‍यामूळे नूकसानीचा पूर्ण क्‍लेम देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 व 2 वर येऊ शकत नाही. कूरिअर सर्व्‍हीसने त्‍यांना दिलेल्‍या पत्‍त्‍यावर पाठवीणे ही त्‍यांची जबाबदारी आहे व यासाठी त्‍यांचीएक लिमिटेड जबाबदारी येते. ती फार तर रु.1,000/- ते रु.2,000/- पर्यतची असू शकते.
              अर्जदार यांनी हे सर्व प्रपोजल देताना स्‍वतःकडे दाखल केलेल्‍या कागदपञाची एकही सत्‍य प्रत ठेवली नाही व सर्व कागदपञे देऊन मोकळे झाले हे अशक्‍यप्राय आहे.  समजा हे कागदपञ गहाळ झाले यांचा अर्थ सर्वच संपले असे होत नाही. त्‍यांचकडे असलेलया सत्‍यप्रती ते सर्व कागदपञ संबंधीताकडून डूप्‍लीकेट काढून त्‍यांना त्‍यांचा दावा प्रपोजल गैरअर्जदार यांचेकडे देता येईल. त्‍या कागदपञावरुन विमा कंपनीस नीर्णय घेता येईल. सर्वकागदपञ पाठविण्‍याची गरज नव्‍हती. गैरअरर्जदार क्र.3 यांनी अपघात झालेल्‍या स्‍पॉट वरुन सर्व्‍हेअर पाठवून त्‍यांचा आढावा घेणे एवढेच काम होते व तो सर्व्‍हेअरचा रिपोर्ट देऊन अर्जदाराला त्‍या पंजाब शाखेकडे जाण्‍यास सांगावयास पाहिजे होते. अर्जदाराने या संबंधी गैरअर्जदार क्र.3 शी केलेला पञव्‍यवहार दाखल केलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1,2, व 3 यांनी पाठविलेली कायदेशीर नोटीस यात जोडलेली आहे. या नोटीसला एकाही गैरअर्जदाराने उत्‍तर दिले नारही. यात त्‍यांची लापरवाही दिसून येते. अर्जदारानी दिलेली सर्व कागदपञ खरेच गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे नसतील   एफ.आय.आर., स्‍पॉट पंचनामा, सर्व्‍हे रिपोर्ट, ड्रायव्‍हींग लायसन्‍स, इन्‍शूरन्‍स कव्‍हर नोट इत्‍यादी कागदपञ नांदेड येथून त्‍यांना डूप्‍लीकेट काढता येतील. सर्व्‍हे रिपोर्ट गैरअर्जदार क्र.3 यांचेकडेच असेल हे सर्व कागदपञ काढण्‍यास गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास मदत करावी व हे सर्व कागदपञ काढण्‍यासाठी जो काही खर्च येईल तो खर्च गैरअर्जदार क्र.3 यांनी दयावा. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी लिफाफा संबंधीतास न पोहचविल्‍यामूळे रु.2,000/- दंड व रु.1,000/- दावा खर्च देण्‍याचे आदेश करता येतील.
 
              अर्जदारांनी मा. राष्‍ट्रीय आयोग न्‍यू दिल्‍ली, IV (2006) CPJ 144 (NC)  दिले आहे परंतु हे ट्रान्‍सपोर्ट विषयी आहे. ट्रान्‍सपोर्ट मध्‍ये माल पाठविताना पावती सोबत जोडलेली असते त्‍यामूळे मालाची किंमत दिली असते. त्‍यामूळे दिलेला माल नाही मिळाला तर पूर्ण रक्‍कम देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांची असते. या प्रकरणात लिफाफा पाठविला आहे यांची किंमत किंवा इन्‍शूरन्‍स नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार यांची लिमिटेड जबाबदारी येते.
              III (2004) CPJ 3  गूजरात राज्‍य आयोग या प्रकरणात कूरिअर कंपनीने रक्‍ताचा नमूना दूस-याच प्रयोग शाळेत दिला. या प्रकरणात लिफाफा मिळाला नाही म्‍हणून हे सायटेशन या प्रकरणात लागू होत नाही.
              2009 (2) सीपीआर 443 (एनसी)   मा. राष्‍ट्रीय आयोग यांचे हे सायटेशन दाखल केलेले आहे. प्रस्‍तूत प्रकरणात शाखा जालंधर यांना तो लिफाफा मिळाला का नाही व हा लिफाफा कोणाला व कसा दयायचा यांची स्‍पेसिफिक सूचना दिल्‍या गेल्‍या नव्‍हत्‍या व यात अर्जदार यांचा नूकसान भरपाईचा दावा अजूनही प्रिमॅच्‍यूअर स्‍वरुपाचा असून त्‍यांना नकार दिलेला नाही. म्‍हणजे सद्य स्थितीत अर्जदार यांचे कोणतीही नूकसान झालेले नाही. कागदपञ परत दिल्‍यास त्‍यांना नूकसान भरपाई मिळू शकते. अजूनही नूकसान न झाल्‍या कारणाने हे सायटेशन या प्रकरणास लागू होत नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकञित व संयूक्‍तीकरित्‍या सेवेच्‍या ञूटी बददल रु.2,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- अर्जदारास दयावेत.
 
3.                                         गैरअर्जदार क्र.3 यांनी रकान्‍यात वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, सर्व्‍हे रिपोर्ट, आर.सी. बूक, ड्रायव्‍हींग लायसन्‍स, इत्‍यादी कागदपञाची डूप्‍लीकेट प्रत काढण्‍यासाठी अर्जदारास मदत करावी व यासाठी लागणारा पूर्ण खर्च गैरअर्जदार क्र.3 यांनी करावा. हे सर्व कागदपञ उपलब्‍ध झाल्‍यानंतर पूनश्‍च अर्जदाराचे प्रपोजल सर्व कागदपञासह अर्जदाराच्‍या हाती देऊन संबंधीत विमा शाखा जालंधर येथे अर्जदारा सोबत पाठवावा. जांलधर येथील शाखेने सर्व कागदपञ तपासून यावर नीर्णय घ्‍यावा.
 
4.                                         गैरअर्जदार क्र.3 यांचे कृतीमूळे झालेल्‍या मानसिक ञासाबददल त्‍यांनी अर्जदारास रु.5,000/- दयावेत.
 
5.                                         गैरअर्जदार क्र.3 यांनी दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
 
6.                                         वरील सर्व आदेशाची अमंलबजावणी या निकालापासून 30 दिवसांचे आंत करावी.
 
7.                                         संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)     (श्रीमती सुजाता पाटणकर)   (श्री.सतीश सामते)
     अध्यक्ष.                                          सदस्‍या                      सदस्‍य
 
 
 
जे.यू.पारवेकर
लघूलेखक