Maharashtra

Jalgaon

CC/08/1529

Sudhakar Bhaurao Patil - Complainant(s)

Versus

sisiya seeds and garden - Opp.Party(s)

Adv.Rane

17 Oct 2014

ORDER

final order
District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/08/1529
 
1. Sudhakar Bhaurao Patil
Phapore Tal.Amalner
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. sisiya seeds and garden
Pune
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'BLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र

व्‍दाराः-श्री.विश्‍वास दौ.ढवळे, अध्‍यक्षः   तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी निकृष्‍ठ प्रतीचे कारले हिरकणी बियाणे विक्री करुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.

            2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,

तक्रारदार हे प्रगतीशील शेतकरी असुन अधुनिक पध्‍दतीने शेती करतात.    तक्रारदाराने दि.4/9/2008 रोजी विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी उत्‍पादीत केलेले कारले हिरकणी बियाणे लॉट क्र.185 चे 8 पाकीटे व 175 लॉटचे एक पाकीट असे एकुण 10 पाकीटे प्रत्‍येकी रु.45/- प्रमाणे एकुण रु.450/- इतक्‍या किंमतीस विकत घेतली.  तक्रारदाराच्‍या अज्ञाचा गैरफायदा घेऊन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास कालबाहय झालेली पाकीटे दिले व तक्रारदाराची फसवणुक केली.   सदरचे बियाणे दि.25/9/2008 रोजी योग्‍य ते खत टाकुन हलक्‍या हाताने जमीनीत कालवुन पाणी दिले त्‍यानंतर सदरचे बियाणांची उगवण 5 टक्‍के म्‍हणजे अगदी तुरळक आढळुन आली.   तक्रारदाराने निकृष्‍ठ बियाणांबाबत केलेल्‍या तक्रारीनुसार समितीचे लोकांनी पंचासमक्ष रोपांचा पंचनामा करुन अहवाल दिला असुन उगवण 5 टक्‍के एवढीच आढळुन आलेचे नमुद केले आहे.   संकरीत व सुधारीत बियाणांच्‍या वाणामुळे शेतक-यांना 0.20 आर जमीनीत कमीत कमी 60 क्विंटल एवढे कारल्‍याचे उत्‍पन्‍न येते.    सदर कारले विक्री केल्‍यास 2000/- प्रती क्विंटल भाव असतो त्‍यामुळे 60 X 2000 बरोबर रु.1,20,000/- एवढे उत्‍पन्‍न मिळाले असते.   त्‍यामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले असुन सदरचे नुकसानीस विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 हे जबाबदार आहेत.   सबब विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास हिरकणी कारले बियाणे निकृष्‍ठ दर्जाचे पुरवून केलेल्‍या नुकसानी दाखल रु.1,20,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्‍द पक्षाकडुन तक्रारदारास देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.

            3.    सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्‍द पक्ष यांना  ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब  प्रमाणे  नोटीसा काढण्‍यात आल्‍या.  

            4.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  बियाणांची उत्‍पादन क्षमता ही जमीची प्रत, जमीनीची अंतरमशागत, योग्‍य प्रकारे योग्‍य वेळी पिकाची लागवड, पिकास जमीनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य प्रमाणांत व गरजेनुसार पाणी, योगय वेळी खताच्‍या मात्रा तसेच योग्‍य वेळी योग्‍य त्‍या किटकनाशकाची फवारणी, योग्‍य हवामान, पाण्‍याचा निचरा, सुर्यप्रकाश या बाबींवर अवलंबुन असते.   तक्रारदारास विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी बियाणे विक्री करतांना बिलावर बॅच नंबर, लॉट नंबर लिहणे बंधनकारक असतांनाही ते लिहीले नाही तसेच तक्रारदाराने त्‍यावर खरेदीदार म्‍हणुन सही केलेली नाही.   बियाणे विक्री करतांना बियाणे विक्रेते यांनी बिलाचे मागील बाजुस काही बियाणे संकरीत नमुना म्‍हणुन राखुन ठेवले आहेत, तसे लिहण्‍याचा व बियाणांचे नमुना ठेवण्‍याचा अधिकार नसतांना देखील विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी सदरील बियाणे विक्री केलेले आहे.   विक्री केलेले बियाणे मोहरबंद पॅकेट मध्‍ये खरेदी केले होते किंवा नाही याबाबत तक्रारदाराने कोणताही उल्‍लेख केलेला नाही.   कारले-हिरकणी नावाने अनेक बियाणे कंपन्‍या एकच व्‍यापारी चिन्‍ह वापरुन बियाणे विक्री करीत आहेत त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी विवादीत बियाणे उत्‍पादीत केले होते असे म्‍हणता येणार नाही.   तक्रारदाराचे तक्रार अर्जाशिवाय अन्‍य कोणत्‍याही शेतक-याने विरुध्‍द पक्षाचे बियाणांचे गुणवत्‍तेबाबत व उगवण शक्‍तीबाबत तक्रार केलेली नाही.   बियाणे मध्‍ये दोष असल्‍याचे शोधुन काढण्‍यासाठी ते प्रयोगशाळेतुन तपासणी करुन अहवाल मागवुन त्‍यातुन निष्‍कर्ष काढणे शक्‍य आहे.   तपासणी अहवालाचे अवलोकन करता त्‍यावरील सहया बनावट वाटतात तसेच सहयांखाली कार्यालयीन पदाचा कुंठलाही शिक्‍का नाही.  विवादीत बियाणांचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला होता याचा कोणताही पुरावा नाही.  खताची मात्रा ही योग्‍य वेळी योग्‍य प्रमाणांत द्यावी लागते, सप्‍टेंबरच्‍या चौथ्‍या आठवडयात पाऊस पडल्‍यामुळे बियाणे दबले जाण्‍याची शक्‍यता अधिक असते.   तक्रारदाराने विरुध्‍द पक्षास विनाकारण खर्चात टाकुन याकामी सामील केलेले आहे.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करावा व विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांना कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट दाखल रक्‍कम रु.10,000/- तक्रारदाराकडुन देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी केलेली आहे.

            5.    विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे.    बियाणांची उगवण क्षमता ही बियाणांसोबत इतर अनेक बाबींवर अवलंबुन असते.    कारले बियाणे हिरकणी नावाने ट्रेड चिन्‍ह वापरुन अनेक कंपन्‍या विक्री करीत असतात त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी विवादीत बियाणे उत्‍पादीत केले असे म्‍हणता येणार नाही.   तक्रारदारव्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही शेतक-याचा सदरचे बियाणे सदोष असल्‍याबाबत तक्रार आलेली नाही.   विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी कारले हिरकणी बियाणे बाजारात विक्रीसाठी आणण्‍याअगोदर संपुर्ण लॉटची प्रयोगशाळेत चाचणी करुन फील्‍ड टेस्‍ट करुन शासनाने निर्देशीत केलेल्‍या गुणवत्‍तेनुसार आहे याची खात्री करुनच बाजारात विक्रीसाठी आणलेले आहे.   विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी बियाणे प्रयोगशाळेत विवादीत बियाणांची चाचणी केली असता उगवण शक्‍ती 74 टक्‍के आढळुन आलेली आहे.    कृषी अधिकारी, पंचायत समिती,अंमळनेर यांनी केलेला अहवाल हा प्रत्‍यक्ष अवलोकन न करता चुकीच्‍या व खोटया माहितीच्‍या आधारावर केलेला आहे तो खोटा असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांना मान्‍य नाही.   तक्रारदाराने नमुद केलेली बियाणांची वैधता दि.10/6/2008 पर्यंतची नसुन दि.10/8/2008 पर्यंतची आहे.   रासायनीक खतांच्‍या अधीक मात्रामुंळे व सप्‍टेंबरच्‍या चौथ्‍या आठवडयात पाऊस पडल्‍यामुळे बियाणे बदल्‍याची शक्‍यता आहे.   याकामी तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांना विनाकारण खर्चात टाकले आहे.   सबब विरुध्‍द पक्ष क्र. 2 विरुध्‍द तक्रार खर्चासह रद्य करावी, तक्रारदाराकडुन कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट दाखल रु.10,000/- मिळणेबाबत योग्‍य ते आदेश व्‍हावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी केलेली आहे. 

             6.    तक्रारदार यांची तक्रार,  त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी म्‍हणणे व उभयतांचा युक्‍तीवाद याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

            मुद्ये                                       उत्‍तर

1)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास मुदतबाहय बियाणे

      विक्री करुन सेवेत त्रृटी केली आहे काय ?               होय.

2)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.

 

                              वि वे च न

            7.    मुद्या क्र.1  -        तक्रारदाराने दि.4/9/2008 रोजी विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी उत्‍पादीत केलेले कारले हिरकणी बियाणे लॉट क्र.185 चे 8 पाकीटे व 175 लॉटचे एक पाकीट असे एकुण 10 पाकीटे प्रत्‍येकी रु.45/- प्रमाणे एकुण रु.450/- इतक्‍या किंमतीस विकत घेतली त्‍यादाखल नि.क्र.3 लगत विरुध्‍द पक्ष क्र.2 कडील मुळ पावती दाखल आहे.  तक्रारदाराच्‍या अज्ञाचा गैरफायदा घेऊन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास कालबाहय झालेली पाकीटे दिले व तक्रारदाराची फसवणुक केली.   सदरचे बियाणे दि.25/9/2008 रोजी योग्‍य ते खत टाकुन हलक्‍या हाताने जमीनीत कालवुन पाणी दिले त्‍यानंतर सदरचे बियाणांची उगवण 5 टक्‍के म्‍हणजे अगदी तुरळक आढळुन आली त्‍यामुळे तक्रारदाराचे झालेले उत्‍पन्‍नाचे नुकसान तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्जातुन मागणी केलेली आहे.

            8.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.    बियाणे उगवणीस अनेक बाबी कारणीभुत असल्‍याचे तसेच जमीनीची प्रत, पाण्‍याच्‍या पाळया, रासायनीक व नत्र खतांच्‍या योग्‍य मात्रा इत्‍यादी बाबींवर अवलंबुन असुन तक्रारदारास दिलेले बियाणे हे विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी उत्‍पादीत केलेले नव्‍हते याबाबत शंका उपस्‍थीत केलेली असुन विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी लेखी म्‍हणण्‍याचे परिच्‍छेद क्र. सी मध्‍ये काही बियाणे संकरीत नमुना म्‍हणुन राखुन ठेवलेले आहेत तसे लिहण्‍याचा व बियाणांचा नमुना ठेवण्‍याचा अधिकार नसतांना देखील विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी सदरील बियाणे विक्री केलेले असुन तशी कल्‍पना तक्रारदारास देऊन देखील त्‍याने सदरचे बियाणे खरेदी केले असे म्‍हटले आहे.   तसेच नुकसान भरपाई देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 हे जबाबदार नसल्‍याचेही त्‍यांनी लेखी म्‍हणण्‍यातुन व युक्‍तीवादातुन प्रतिपादन केलेले आहे.

            9.    उपरोक्‍त विवेचन, तक्रारदाराची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 चे लेखी म्‍हणणे व उभयबाजुंचा युक्‍तीवाद इत्‍यादी विचारात घेता तसेच तक्रारदाराने दाखल केलेला पिक परिस्थितीचा पंचनामा पाहता त्‍यात बियाणांची तुरळक प्रमाणांत उगवण आढळते, उगवण 5 टक्‍के दिसुन येते असे नमुद करुन पंचाच्‍या तसेच संबंधीत शेतकरी व अधिका-यांच्‍या स्‍वाक्ष-या नमुद आहेत.    तसेच सर्वात महत्‍वाची बाब म्‍हणजे तक्रारदाराने हिरकणी बियाणांचे मुळ पाकीटे दाखल केलेले असुन त्‍यावर बियाणांची वैधता दि.11/9/2008 पर्यंत असल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद असुन तक्रारदाराने सदरचे बियाणे विरुध्‍द पक्ष क्र. 2 कडुन दि.4/9/2008 रोजी खरेदी केलेले असुन विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारास बियाणांची वैधता संपुष्‍टात येत असलेले मुदतबाहय बियाणे विक्री करुन तक्रारदारास प्रदान केलेल्‍या सेवेत त्रृटी केल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.   सबब मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

            10.   तक्रारदाराने दाखल केलेले मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाने दिलेले निकालातील न्‍यायीक तत्‍वे खालीलप्रमाणेः

1) 2008 (1) सी.पी.आर.459 (राष्‍ट्रीय आयोग) नॅशनल सिडस कॉर्पोरेशन लि // विरुध्‍द // भीम रेडडी मल्‍या रेडडी यात नमुद महत्‍वाचे न्‍यायीक तत्‍वः- Where total failure of crop was an account of poor quality of seeds as reported by Agriculture Officer of District supplier of seed was liable to compensate the farmer.

2) 2009 (1) सी.पी.आर.92  राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई  यांचे परिक्रमा खंडपीठ,औरंगाबाद. राशी सिडस प्रा.लि. व इतर // विरुध्‍द // सौ.कलाबाई डिगंबर बडगुजर व इतर यात नमुद महत्‍वाचे न्‍यायीक तत्‍वः- Where agriculture crop seed did not germinate and was found sterile, manufacturer and dealer of such seed was liable to compensate for loss suffered by agriculturist. 

                        11.    मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वर नमुद केलेली न्‍यायीक तत्‍वे व प्रस्‍तुत तक्रारीतील वाद व मुद्ये हे एकसारखेच असल्‍याने वरील न्‍यायीक तत्‍वे या तक्रारीस तंतोतंत लागु होतात या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलेलो आहोत.

            12.   विरुध्‍द पक्ष यांनी याकामी 1) 2009(1) सी पी आर 182 राष्‍ट्रीय आयोग यांचेकडील महाराष्‍ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि // विरुध्‍द // श्री.परचुरी नारायण तसेच 2) 2008(3) सी पी आर 280 राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य,मुंबई यांचेकडील राशी सिडस प्रा.लि. व इतर // विरुध्‍द // सुदामसिंग धनसिंग गिरासे व इतर या निकाल-पत्रांचा आधार घेतला तथापी त्‍यात नमुद न्‍यायीक तत्‍वे व प्रस्‍तुत तक्रार अर्जातील मुद्ये व वाद हे भिन्‍न असल्‍याने वर नमुद विरुध्‍द पक्षाने दिलेले मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायीक तत्‍वे या तक्रारीस लागु होत नाही या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.

            13.  मुद्या क्र. 2 - विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास हिरकणी कारले बियाणे निकृष्‍ठ दर्जाचे पुरवून केलेल्‍या नुकसानी दाखल रु.1,20,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्‍द पक्षाकडुन तक्रारदारास देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.   तक्रारदाराने त्‍याचे शेजारील शेतक-याचे शपथपत्र तक्रार अर्जासोबत दाखल असुन मखमल फुला पाटील व गणपत खंडु कोळी यांनी कारले पिकास सरासरी प्रती क्विंटल रु.2,000/- भाव असतो व 20 आर जमीनीत तक्रारदारास कारले पिकाचे 60 क्विंटल उत्‍पन्‍न आले असते त्‍यामुळे एकुण रु.1,20,000/- चे उत्‍पन्‍न आले असते असे शपथेवर नमुद केलेले आहे.  त्‍यामुळे आमचे मते तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडुन वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या नुकसान भरपाई रक्‍कम रु.1,20,000/- बियाणे खरेदी केलेची दि.04/09/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत, तसेच तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत.  सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                              आ    दे    श 

( अ )       तक्रारदार यांचा तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येतो.

 

( ब )       विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई दाखल एकुण रक्‍कम रु.1,20,000/- (अक्षरी रु.एक लाख वीस हजार मात्र ) दि.04/09/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजासह या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसाचे आंत तक्रारदारास अदा करावेत.

 

( क )       विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/-(अक्षरी रु.तीन हजार मात्र) या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसाचे आंत तक्रारदारास अदा करावेत.

 

ज  ळ  गा  व

 

दिनांकः-   17/10/2014.  

 
 
[HON'BLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.