सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.12/2012
श्री सतिश सगूण नाटेकर
वय सु.50, धंदा – शेती,
रा. बांदा, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार/फिर्यादी.
विरुध्द
सरव्यवस्थापक,
तर्फे श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर (सज्ञान)
श्री सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,
साटेली, ता.दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
व स्वतः रा.साटेली, ता. दोडामार्ग,
जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे – व्यक्तीशः
आदेश नि. 1 वर
(दि.17/12/2015)
द्वारा : मा. सौ. वफा जमशीद खान.
1) मूळ तक्रार क्रमांक 29/2011 चे अंतिम आदेशाप्रमाणे विरुध्द पक्ष /आरोपी यांनी पुर्तता केली नाही म्हणून मूळ तक्रारदार /फिर्यादी यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. दरम्यान विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना निकालपत्रातील आदेशाप्रमाणे रक्कमा परत देणेचे मान्य केले. तक्रारदार यांनी वेळोवेळी रक्कमा स्वीकारलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर दाखल करुन फिर्याद अर्ज निकाली काढणेची विनंती केली. तसेच ठेवीचे मूळ सर्टीफिकेट मिळावे अशी विनंती नि.क्र.37 वर केली. नि.क्र.37 चे अर्जावर तक्रारदार /फिर्यादी यांचे म्हणणे मागविणेत आले परंतु फिर्यादी मंचामध्ये सतत गैरहजर असल्याने नि.37 वर म्हणणे आले नाही.
2) विरुध्द पक्ष/आरोपी यांनी तक्रारदाराचे/फिर्यादीची निकालपत्राप्रमाणे देय रक्कम संपूर्ण अदा केल्याचे मंचासमोर स्पष्ट केले आहे. त्यास तक्रारदार यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे मूळ ठेवीचे सर्टीफिकेट विरुध्द पक्ष/आरोपी पतसंस्थेला परत करणे ही तक्रारदार यांची कायदेशीर जबाबदारी आहे. मूळ तक्रार क्र.29/2011 मधील कागदपत्रांचे अवलोकन करता सदर ठेव पावती नि.क्र.23 सोबत मंचामध्ये दाखल आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार/फिर्यादी यांचा ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 प्रमाणेचा अर्ज रक्कम पूर्ण फेड झाल्याने निकाली काढणेत येतो.
2) जिल्हा ग्राहक मंचाचे रजिस्ट्री विभागाने मूळ तक्रार क्र.29/2011 मधील नि.क्र.23 सोबत तक्रारदार यांनी दाखल केलेली मूळ पावती क्र.861 विरुध्द पक्ष पतसंस्थेस परत करावी. तसेच मूळ पावती परत केल्याचा शेरा तक्रार क्र.29/2011 चे नि.23, रोजनामा आणि दरखास्त क्र.12/2012 चे रोजनाम्यामध्ये ठेवणेत यावा.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 17/12/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग