Maharashtra

Gadchiroli

CC/08/15

Vijaya Vaman Khobragade - Complainant(s)

Versus

Sineor Division Manager, Bhartiya Jivan Vima Nigam Ltd. Nagpur Division, Nagpur - Opp.Party(s)

Adv.Sachin D.Kumbhare

09 Jan 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/15
 
1. Vijaya Vaman Khobragade
Resd.Kurkheda, Ta.Kurkheda, Age-42 year, Occ.Household
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Sineor Division Manager, Bhartiya Jivan Vima Nigam Ltd. Nagpur Division, Nagpur
Sineor Division Manager, Bhartiya Jivan Vima Nigam Ltd. Nagpur Division, Nagpur, Ta.Nagpur,
Nagpur
Maharastra
2. Branch Officer, Bhartiya Jivan Vima Nigam Ltd.,Gadchiroli
Bhartiya Jivan Vima Nigam Ltd.,Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(पारीत दिनांक :9 जानेवारी 2009)

 

(आदेश मंचाचे निर्णयान्‍वये- श्री अनिल एन. कांबळे, अध्यक्ष.)

 

 

 

1.        अर्जदार हिने सदरची तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्‍द दाखल करुन, मृतक पतीच्‍या नावाने असलेली विमा पॉलीसीची रक्‍कम गैरअर्जदाराकडून वसुल करुन मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे.  अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणे.

 

2.        अर्जदार ही मय्यत वामन खोब्रागडे याची पत्‍नी आहे.  मय्यत वामन खोब्रागडे हे पंचायत स‍मिती, गडचिरोली येथे कार्यरत होते.  त्‍याचा मृत्‍यु दिनांक 29/4/07 ला झाला.  मृतकाने आपल्‍या हयातीत गैरअर्जदाराकडून एकुण 6 विमा पॉलीसी काढल्‍या होत्‍या.  पॉलीसी क्र. 972838043, 973473414, आणि 973408560 याची रक्‍कम रुपये 1,86,666/- दिली असून, त्‍यापैकी, 1,00,000/- रुपये फिक्‍स डिपॉझीट मध्‍ये ठेवले.  गैरअर्जदाराने पॉलीसी क्र. 973135597, 973484180 आणि 975772575 यांचा विमा दावा नाकारला. गैरअर्जदाराने, दिनांक 8/2/08 च्‍या पञान्‍वये मृतकाच्‍या तब्‍बेतीचे कारण सांगुन रक्‍कम देण्‍यास नकार दिला.  अर्जदाराने, दिनांक 17/5/07 रोजी गैरअर्जदाराकडे अर्ज सादर केला.  गैरअर्जदाराने मृत्‍यु दाव्‍याचा फार्म, मेडिकल रिपोर्ट व इतर दस्‍ताऐवजाची मागणी केली.  सर्व दस्‍ताऐवजाची पुर्तता अर्जदाराने करुन दिल्‍यानंतर गैरअर्जदाराने 3 पॉलीस्‍या मंजुर केल्‍या आणि 3 पॉलिसीचा दावा नाकारला असल्‍याचे पञ दिले.

3.        अर्जदार ही पतीचे मृत्‍युनंतर अत्‍यंत हालाखीचे परिस्थितीत जगत असुन, तिचे तिनही मुले शिक्षण घेत आहे.  त्‍यांच्‍या शिक्षणाचा खर्च अर्जदारास करावा लागतो.  अशापरिस्थितीत, गैरअर्जदाराने विमा रक्‍कम न दिल्‍यामुळे अर्जदारास हालाखीचे जीवन जगत आहे.  गैरअर्जदाराचे, न्‍युनतापूर्ण सेवेमुळे, अर्जदाराला विनाकारण शारीरीक व मानसिक ञास सहन करावा लागत आहे.  गैरअर्जदाराच्‍या कृत्‍यामुळे अर्जदारास आर्थीक अडचण निर्माण झाली आहे व आर्थीक नुकसान सोसावे लागत आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराने पॉलिसी क्र. 973484180 रुपये 1,00,000/-, पॉलिसी क्र. 975772575 रुपये 10,000/- आणि पॉलिसी क्र. 973135597 रुपये 50,000/- गैरअर्जदाराकडून वसुन करुन देण्‍यात

 

 

यावे व अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- व येण्‍या-जाण्‍याचा खर्च व कागदपञाचा खर्च रुपये 10,000/- असे एकुण 2,70,000/- गैरअर्जदारानी अर्जदारास द्यावे, असा आदेश व्‍हावा अशी मागणी केलेली आहे.

4.        अर्जदाराने, आपले तक्रारी कथना पृष्‍ठयर्थ निशाणी 2 नुसार एकुण 11 अस्‍सल व झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले आहेत.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन अर्जदारास नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार हजर होऊन आपला लेखी बयाण निशाणी 11 नुसार दाखल केले आहे.

5.        गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणातील परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये माहिती अभावी हे अमान्‍य केले आहे की, तक्रारकर्ती ही मय्यत वामन खोब्रागड याची पत्‍नी असून, मय्यत वामन खोब्रागडे, पंचायत समिती, गडचिरोली येते कार्यरत होते.  गैरअर्जदाराने, याबद्दल वाद उपस्थित केला नाही की, मय्यत वामन खोब्रागडे यांनी 6 विमा पॉलिसी घेतल्‍या होत्‍या, त्‍या खालीलप्रमाणे.

     (1)  973135597              रुपये  50,000/-

     (2)  973484180              रुपये 1,00,000/-

     (3)  975772575         रुपये   10,000/-

     (4)  972838043

     (5)  973473414          रुपये  1,86,000/-

     (6)  973408560

 

6.        तसेच, याबद्दल वाद नाही की, गैरअर्जदाराने तक्रारकर्ती हिला 1,86,666/- अदा केले आहे.  गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात पुढे हेही मान्‍य केले आहे की, 6 पॉलिसी अंतर्गत रक्‍कम मिळण्‍याबाबतचा विमा दावा अर्ज, वैद्यकीय अहवाल व इतर कागदपञासह सादर केले होते.  गैरअर्जदाराने याबद्दल वाद उपस्थित केला नाही की, 3 पॉलिसीच्‍या विमा दावा संबंधात दिनांक 8/2/2008 रोजीच्‍या पञान्‍वये खारीज केला.  सदर पॉलिसी तक्रारकर्तीच्‍या मय्यत पतीने, त्‍याच्‍या आजारपणाचे काळात घेतल्‍या होत्‍या.  विमा कंपनीच्‍या नियमाप्रमाणे, सदर दावा मुदतपूर्व  

 

(Early claim) मध्‍ये मोडत असल्‍यामुळे विमा कंपनीला दाव्‍याची सत्‍यता पडताळून पाहण्‍याची गरज असते.  अर्जदाराने नमुद केलेल्‍या माहितीच्‍या अनुषंगाने संपूर्ण बाबीची पडताळणी व शहानिशा करुनच, सदर दावा योग्‍य किंवा अयोग्‍य असे पडताळून निकाली काढण्‍यात येतो.  गैरअर्जदार यांचेमुळे तक्रारकर्ती हिला कोणत्‍याही प्रकरचा शारीरीक व मानसिक ञास झालेला नसल्‍यामुळे तक्रारकर्तीने केलेला विमा दावा, शारीरीक व मानसिक ञास आणि खर्चाबाबत केलेली मागणी खारीज होण्‍यास पाञ असल्‍यामुळे नुकसान भरपाईपोटी रुपये 2,70,000/- एवढी रक्‍कम मिळण्‍यास पाञ नाही.  अर्जदाराने केलेली मागणी ही खोटी असल्‍यामुळे तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

7.        गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणातील विशेष कथनात असे म्‍हटले आहे की, श्री वामन दादाजी खोब्रागडे यांनी त्‍याचे हयातीत स्‍वतःचा जिवन विमा उतरविण्‍याबाबत प्रस्‍ताव गैरअर्जदाराकडे सादर केला होता.  त्‍यानुसार, गैरअर्जदाराने 6 विमा पॉलिसी मय्यत वामन दादाजी खोब्रागडे यांच्‍या नावाने निर्गमीत केल्‍या होत्‍या.  त्‍यापैकी, 3 पॉलिस्‍या early claim या सदरात मोडत नसल्‍यामुळे निकाली काढण्‍यात आल्‍या आणि 3 पॉलिसी हया early claim या सदरात मोडत असून, विमा धारकाचा मृत्‍यु हा पॉलिसी घेतल्‍यापासून 2 वर्षाचे आंत झालेला आहे.  पॉलिसी क्र. 973135597 ही जिवन मिञ दूहेरी संरक्षण एन्‍डोमेन्‍ट +  लाभ व दूर्घटना अशी असून पुर्नःजिवीत केल्‍यानंतर 2 महिने 30 दिवसाने मृत्‍यु झाला.  फेब्रूवारी 2007 फस्‍ट अनपेड आहे.

8.        मृतक वामन खोब्रागडे यांनी काढलेली पॉलिसी क्र. 975772575 ही मनी प्‍लस पॉलिसी असून 30/3/07 ला पॉलिसीची सुरुवात झाली असून वार्षीक हप्‍ता रुपये 10,000/- असा असून नॉमिनी व्‍यक्‍ती म्‍हणून विजया (पत्‍नी) हीचे नांव दर्ज आहे.  तसेच, पॉलिसी क्र. 973484180 ही विमा मुल्‍य रुपये 1,00,000/- ची असून मासीक हप्‍ता रुपये 820/- आहे. विमा पॉलिसी 28/3/07 पासून जिवन आनंद अपघात लाभासह सुरु करण्‍यात आलेली आहे व तिची परिपक्‍वता तिथी 3/2022 अशी आहे.

 

9.        विमा धारक हा सिरोसीस ऑफ लीव्‍हर टयूबरक्‍युलॉसीस vWन्‍ड अनहिलींग अलसर (Cirrhosis of liver Tuberculosis unhealing ulcer.) या आजाराने, डॉ. एम.पी. कन्‍नाके यांनी दिनांक 29/4/07 रोजी निर्गमीत केलेल्‍या प्रमाणपञानुसार आजारग्रस्‍त होता.  डॉ.एम.पी.कन्‍नाके यांचेकडून सल्‍ला घेतला असता, विमा धारक हा सिरोसीस ऑफ लिवर अन्‍ड टयूबरक्‍युलॉसीस या आजाराने ग्रस्‍त असल्‍याचे निदान डॉक्‍टराने केले होते.  विमा धारकाने दिनांक 8/2/07, 28/3/07 आवेदन पञ दिनांक 8/2/07 रोजीची वैयक्‍तीक विवरणामध्‍ये उघड केलेली नाही.  गैरअर्जदारानी त्‍याची दिनांक 14/9/07 रोजीच्‍या विशेष अन्‍वेषन अर्जा नुसार डॉ.एम.पी.कन्‍नाके यांचेकडून पुरावा गोळा करण्‍यात आला असता, विमा धारक हा ulcer not healing since 6 month and bleeding while coughing  असे नमुद करण्‍यात आले आहे.  गैरअर्जदाराने गोळा केलेल्‍या पुराव्‍यावरुन आणि डॉक्‍टरचे कथनावरुन विमा धारकाने त्‍याला असलेल्‍या आजाराबाबतची बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवली.  विमा धारकाने आरोग्‍या विषयी कोणतीही माहिती उघड केलेली नाही.  विमा धारकाने एक पॉलिसी पुर्नःजीवीत केली होती, पॉलिसी पुर्नःजीवीत करतेवेळेस देखील विमा धारकाने आरोग्‍याविषयी माहिती उघड केली नव्‍हती.  पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन हे सर्वस्‍वी  विमा धारकाच्‍या जिवनाच्‍या जोखमीवर अवलंबून असते.  सर्व बाबीचा विचार करता तक्रारकर्ती ही विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पाञ नसल्‍यामुळे तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी मागणी आपले  लेखी बयाणात केली आहे.

10.       गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणासोबत, पॉलिसी डिटेल, पॉलिसीची झेरॉक्‍सप्रत, मनी प्‍लस प्‍लॅन पॉलिसीच्‍या प्रस्‍तावाची प्रत, जिवन आंनद पॉलिसी प्रस्‍तावाची प्रत, प्रपोझल फार्म, मेडिकल अटेंड सर्टीफिकेट, स्‍पेशल क्‍युरी फार्म, जिवन मिञ पॉलिसीची प्रत व प्रस्‍तावाची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेले आहेत.

 

11.       अर्जदाराने, शपथेवर दाखल केलेल्‍या तक्रारीवरुन व दस्‍ताऐवजावरुन, तसेच गैरअर्जदार यांनी शपथपञावर दाखल केलेल्‍या लेखी बयाण आणि उभय पक्षाच्‍या वकीलाने केलेल्‍या तोंडी युक्‍तीवादावरुन

 

खालील मुद्दे उपस्थित होतात.

          मुद्दे                          उत्‍तर

(1) गैरअर्जदाराने विमा दावा खोटे कारण सांगुन        होकारार्थी

    नाकारले आहे काय ?

(2) गैरअर्जदारानी सेवा देण्‍यात ञृटी केली           होकारार्थी

    आहे काय ?

(3) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ               होकारार्थी

    आहे काय ?

(4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ?         अंतिम आदेशाप्रमाणे

 

              //  कारण मिमांसा  //

मुद्दा क्रमांक 1 ते 3 :

 

12.       अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यात मृतक वामन दादाजी खोब्रागडे याचे नावाने 6 विमा पॉलिस्‍या काढल्‍या होत्‍या, त्‍यापैकी, 3 पॉलिसीची रक्‍कम रुपये 1,86,666/- अर्जदारास देण्‍यात आले आणि 3 पॉलिसीचा विमा दावा दिनांक 8/2/07 नुसार नाकारण्‍यात आला याबद्दल वाद नाही.  गैरअर्जदाराने 3 विमा पॉलिसी क्र. 973135597, 975772575 आणि 973484180 हया early claim म्‍हणून नाकारल्‍या.  विमा धारकाने, विमा पॉलिसी काढण्‍याकरीता सादर केलेल्‍या प्रस्‍तावात स्‍वतःच्‍या आजाराबद्दल महत्‍वाची माहिती लपविल्‍यामुळे early claim च्‍या तपासणीत अडचण आल्‍याने नाकारले आहे.  त्‍यामुळे, अर्जदार ही विमा रक्‍कम अनुक्रमे रुपये 50,000/-, 10,000/- आणि 1,00,000/- मिळण्‍यास पाञ नाही.  गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणसोबत डॉ. एस.एन. कुमारे, जिल्‍हा उप-रुग्‍णालय, सिरोंचा यांचे मेडिकल अटेंड सर्टीफिकेट, तसेच विशेष पुछताछ प्रपञ, डॉ. एम.डी. कन्‍नाके, वैद्यकीय अधिकारी, जिल्‍हा उप-रुग्‍णालय, सिरोंचा यांनी दिलेल्‍या प्रमाणपञाच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सदर वैद्यकीय प्रमाणपञाचे अवलोकन

 

 

केले असता, मृतकाचा मृत्‍यु हा Cirrhosis of liver and Tuberculosis असे नमुद केले आहे.  पोस्‍ट मार्टम, डॉ. कन्‍नाके यांनी केल्‍याचे मेडिकल सर्टीफीकेट च्‍या कालम 10 वरुन दिसून येतो. मृत्‍युचे कारण Gmlivic ulcer c  Cirrhosis of liver and T.B. असे नमुद केले आहे.  त्‍याच वैद्यकीय अधिका-यांनी पॉलिसी क्र. 973135597 करीता विशेष पुछताछ प्रपञ दिनांक 14/9/07 मध्‍ये 6 महिने पूर्वी पासून ulcerT.B. असल्‍याचे नमुद केले आहे.  परंतु, कालम नं. 8 मध्‍ये मृतकाला नियमीत अटेंड करीत नसल्‍याचे नमुद केले आहे.  यावरुन दोन्‍ही पञात तफावत असल्‍याचे दिसुन येते.  विशेष पुछताछ परिपञकातील मुद्दा क्र. 4-ए मध्‍ये बिमारी के लक्षण क्‍या थे, यात Bleeding while coughing, असे नमुद केले आहे.  गैरअर्जदाराने सदर आजार विमा धारक वामन खोब्रागडे याला पूर्वीपासून होता व तो पूर्वीपासून वैद्यकीय उपचार दवाखान्‍यामधून घेत होता, याबद्दलचा कुठलाही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे, विमा धारकाला प्रस्‍ताव सादर करण्‍याचे पूर्वी T.B.ulcer आजार होता आणि त्‍याला त्‍याची पूर्ण जाणकारी होती.  तरी प्रस्‍तावात नमुद केले नाही, हे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  आदरणीय जम्‍मू-काश्‍मीर राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, श्रीनगर यांनी लाईफ इंशुरन्‍स कार्पोरेशन व इतर विरुध्‍द हदमलाल धर्मानीया, I-2005-सी.पी.जे.-45, याप्रकरणात आपले मत दिले आहे.  त्‍यात दिलेले मत याप्रकरणाला तंतोतंत लागु पडतो.  यात दिलेल्‍या मतानुसार विमा धारकाने महत्‍वाचा मुद्दा लपविले ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  वरील न्‍यायानिवाडयातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Jammu and Kashmir consumer Protection Act, 1987—Section 13—Insurance—Repudiation of claim – Suppression of material facts—Complainant’s kidneys failed, transplantation advised – Surgery conducted – Contention, complainant diabetic patient for last 13 years not disclosed – No hospital record, no prescriptions in support of treatment produced – Complainant had knowledge of disease and deliberately concealed it, not proved --- Burden of proof not discharged by insurer – Company liable under policy – Directions given.

 

Life Insurance Corporation & Anr.

-V/s.-

Hadamlal Dharmania

I(2005)CPJ.-45

 

          ******                  ******                  *****                    ******

 

13.       गैरअर्जदाराने, दाखल केलेल्‍या मेडिकल अटेंड सर्टीफिकेट व विशेष पुछताछ प्रपञाच्‍या बाबत, संबंधित डॉक्‍टराचा पुरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेला नाही, यामुळेही गैरअर्जदाराने डॉक्‍टरच्‍या प्रमाणपञावरुन विमा दावा चुकीच्‍या कारणाने नाकारले असल्‍याचे, या न्‍यायमंचाचे मत आहे.  विमा धारकास T.B. हा आजार होता.  तसेच, ulcer झाला होता हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे.  तसेच, हे आजार पूर्वीपासून होते, याबद्दलचे उपचाराचे दस्‍ताऐवज दाखल करण्‍याची जाबाबदारी गैरअर्जदारावर आहे.  परंतु, गैरअर्जदाराने आपले म्‍हणणे सिध्‍द करण्‍याबाबत कुठलाही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदाराने, हेतुपुरस्‍परपने अर्जदाराचा 3 पॉलिसीचा विमा दावा नाकारला असलयाचे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.  याच आशयाचे मत, आदरणीय, छत्‍तीसगड राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, रायपूर यानी एल.आय.सी. ऑफ इंडिया  व इतर विरुध्‍द रानी कौर, I(2005) सी.पी.जे.-547, या प्रकरणात दिले आहे.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Consumer Protection Act, 1986 --- Sections 2(1)(g) and 15 – Insurance (life) – Repudiation of claim – Suppression of material facts – Company failed to prove and discharge its burden – Deceased completely all right prior to taking of policy proved by complainants and doctor’s affidavit – Complaint rightly allowed by Forum.

 

          ******                  ******                  ******                  ******

 

 

14.       तसेच, विमा धारकाने पॉलिसी पुर्नःजीवीत करतेवेळी आजाराबद्दल माहिती लपवून ठेवली हे गैरअर्जदाराचे म्‍हणणे पुराव्‍या अभावी ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  आदरणीय, उत्‍तरांचल राज्‍य ग्राहक

 

 

तक्रार निवारण आयोग, देहरादून, यांनी बसंत भल्‍लप तिवारी विरुध्‍द लाईफ इंशुरन्‍स कर्पोरेशन ऑफ इंडिया व इतर, II-सी.पी.जे.-2005-760, या प्रकरणात आपले मत दिले आहे. त्‍या प्रकरणातील बाबी या प्रकरणातील बाबीला तंतोतंत लागु पडतो.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Consumer Protection Act, 1986 –Section 2(1)(g) – Life Insurance – Repudiation of claim – Suppression of material facts – Contention, Insured suffering from brain tumor  malignancy at time of revival of policy – No evidence produced in support – Existence or knowledge of earlier illness not proved – Repudiation illegal, beyond scope of Insurance Authorities – Company liable under policy.

 

          *****                    *****                    ******                  ******

15.       गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात आणि तोंडी युक्‍तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, विमा धारकाला T.B. हा आजार होता.  परंतु, दिनांक 28/3/07, 28/2/03, 30/3/07 च्‍या प्रस्‍तावात लपवून ठेवले आहे.  T.B. हा आजार 100 % टक्‍के बरा होणारा आजार आहे.  विमा धारकास खोकल्‍यातून रक्‍त पडत होता (Bleeding while Coughing) त्‍याबद्दल त्‍यांनी वैद्यकीय रजा उपभोगल्‍या याबद्दलचा कुठलाही पुरावा (Employer Certificate) तक्रारीत दाखल नाही.  T.B. च्‍या आजाराने तात्‍काळ मृत्‍यु पावत नाही, तर तो बरेच दिवस पर्यंत जिवन जगु शकतो असे मत आदरणीय राजस्‍थान राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, जयपूर यांनी मनजीत कनवर विरुध्‍द लाईफ इंशुरन्‍स कार्पोरेशन ऑफ इंडिया, I (2006) सी.पी.जे.-553, या प्रकरणातील परिच्‍छेद 30 मध्‍ये आपले मत दिले आहे.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

(i)      Consumer Protection Act, 1986 --- Section 2(1)(g) and 15 – Life Insurance – Suppression of material facts – Contention, deceased suffering from T.B. not disclosed – No evidence produced in support – death due to heart attack – No nexus of T.B. with cause of death – Suppression of chest disease not amounts to suppression of material facts – Repudiation arbitrary, unjustified – Claim allowed with interest @ 9 % p.a.

 

वरील निकालातील परिच्‍छेद क्र. 30 खालील प्रमाणे.

 

30.  Apart from this, even for the sake of argument that deceased might have been suffering from the disease TB, now TB is 100 % Curable disease and patient of that disease can survive for a longer period and besides this, the immediate cause of death deceased was heart attack and not TB and there is not nexus between the cause of death of deceased and TB.  The death of the deceased having not been connected with the TB disease, it cannot be considered to be material so far as death of the deceased is concerned.  Thus, it cannot be said that there was suppression of material facts by the deceased.

 

 

          ******                  ******        ******                  *****

 

16.       अशाच प्रकारचे मत, आदरणीय, छत्‍तीसगड राज्‍य ग्राहक तक्रार

निवारण आयोग, रायपुर यांनी, खालील प्रकरणात व्‍यक्‍त केले, ते येणेप्रमाणे.

Consumer Protection Act, -- Section 2(1)(g)—Insurance – Repudiation of claim – Suppression of material fact – Deceased suffered from tuberculosis and jaundice not disclosed – Insured died due to “Mayo cardial infarction” – No nexus between jaundice, tuberculosis and cause of death – Repudiation unjustified – Deficiency in service proved – Company liable.

 

Sushila Bai Shukla

-V/s.-

L.I.C. of India

I (2005) CPJ-78

 

          ******                  ******                  *****                 ******

 

17.       प्रस्‍तुत प्रकणात विमा धारकाने दिनांक 28/3/07 आणि 30/3/07 ला प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर त्‍याचा मृत्‍यु 29/4/07 ला झाला.  त्‍यामुळे विमा धारकाचा मृत्‍यु T.B. ह्या आजाराने झाला असे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  दूसरा महत्‍वाचा मुद्दा असा की, विमा धारकाला मागील 6 महिन्‍यापासून ulcer हा आजार होता, याबाबतचा पुरावा उपलब्‍ध नसल्‍यामुळे, तेही गैरअर्जदाराचे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  त्‍यामुळे, पॉलिसी क्र. 973484180, विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- मिळण्‍यास पाञ आहे.  तर, पॉलिसी क्र. 975772575 ही पॉलिसी मनी प्‍लस ही वार्षीक रुपये 10,000/- भरुन युनीट मध्‍ये गुंतवणारी पॉलिसी असल्‍यामुळे, ज्‍या तारखेला विमा धारकाचा मृत्‍यु झाला त्‍या तारखेला जेवढी किस्‍तीची रक्‍कम जमा झाली ती रक्‍कम परत मिळण्‍यास पाञ आहे असे या न्‍यायमंचाचे मत आहे.

18.       पॉलिसी क्र. 973135597 ही दिनांक 28/2/03 पासून अस्तित्‍वात आली व विमा किस्‍तीची रक्‍कम प्रती माह 392/- रुपये कपात द्यावयाचे होते.  सदर पॉलिसी ही जिवन मिञ दूहेरी संरक्षणची होती, सदर पॉलिसी ही 2003 मध्‍ये काढण्‍यात आली असून, नियमीत फेब्रूवारी-07 पर्यंत चालु असल्‍यामुळे, ती early claim या सदरात मोडत नाही, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.  सदर पॉलिसी ही पुर्नःजीवीत केल्‍यानंतर 2 महिने 30 दिवसानंतर विमा धारकाचा मृत्‍यु झाला, त्‍यावेळी गैरअर्जदाराने विमा धारकाकडून वैद्यकीय प्रमाणपञ घेतल्‍यानंतरच पुर्नःजीवीत केली असल्‍यामुळे, त्‍याची रक्‍कम रुपये 50,000/- देण्‍यास पाञ आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.

19.       गैरअर्जदाराने वामन खोब्रागडे यांचे मृत्‍यु बाबत तीन पॉलिसीची रक्‍कम अदा केले आणि 3 पॉलिसीचा विमा दावा महत्‍वाचा मुद्दा लपविल्‍याचे कारणावरुन नाकारले, ही बाब ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही. आदरणीय, राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी, एल.आय.सी.ऑफ इंडिया विरुध्‍द पटेल गणेशभाई रामजीभाई, II (2007) सी.पी.जे.-242 (एन.सी.) या प्रकरणात दिले आहे, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) and 14(1)(d) –Life Insurance—Suppression of material fact – Death – Policy for Rs. 1 lakh taken on 28/3/1987 –Death took place on 23/5/1988 – Repudiation of claim – Suppression material fact that life assured suffering from pre-existing disease TB prior to taking policy – Complaint – Compensation awarded with 12 % interest – hence appeal – Life assured medically examined before issuance of policy – Presence of TB not found at that point of time – No suppression of material fact as alleged – Claim wrongly repudiated – Order of State Commission upheld – Cost awarded.

          ******                  ******                  ******                  *****

 

20.       तसेच, राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी सुरिंदर कौर व इतर विरुध्‍द- एल.आय.सी. ऑफ इंडिया व इतर II (2007) सी.पी.जे.-32 (एन.सी.) याप्रकरणात दिले आहे, त्‍यातील मत या प्रकरणाला लागु पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) – Life Insurance – Suppression of material facts – Contention, deceased chronic alcoholic for last 12 years, not disclosed not acceptable as not record produced in support – Doctor’s opinion based on hospital history, not sufficient – No treatment record prior to proposal produced – Repudiation on basis of hospital record unjustified – Company liable under policy – interest @ 9 % awarded.

 

          *****                    *****                    ******                  *****

 

21.       गैरअर्जदाराने विमा पॉलिसीच्‍या प्रस्‍तावाच्‍या प्रती आपले लेखी बयाणासोबत दाखल केलेल्‍या आहेत.  त्‍याचे अवलोकन केले असता, गैरअर्जदाराचे पॅनल डॉक्‍टरनी अर्जदाराची तपासणी करुन आपला रिपोर्ट दिलेला आहे.  त्‍यात विमा धारक हा स्‍वस्‍थ असल्‍याचे, डॉक्‍टर सी.ए.लेंनगुरे व डॉ.बी.एम.कावळे यांनी दिलेले आहे.  गैरअर्जदाराने विमा प्रस्‍ताव स्विकारण्‍याचे पूर्वी आपल्‍या वैद्यकीय अधिका-याकडून तपासणीकरुनच घेतल्‍यानंतर प्रस्‍ताव स्विकारलेला आहे.  त्‍यामुळे, विमा धारकाने खोटी माहिती पुरविली असे म्‍हणता येत नाही.  आदरणीय, जम्‍मू-काश्‍मीर राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, श्रीनगर यांनी, लाईफ इंशुरन्‍स कार्पोरेशन ऑफ इंडिया विरुध्‍द हरपीत कौर, II (2005) सी.पी.जे.-354, याप्रकरणात आपले मत दिले आहे, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Jammu and Kashmir Consumer Protection Act, 1987 – Section 2(g) – Life Insurance – Repudiation of claim – Suppression

of material facts alleged – Incumbent upon Insurance Company to prove previous disease – Direct nexus between disease suppressed and cause of death necessary – Onus to prove knowledge and deliberate suppression of  disease not discharged by insurer – Deceased medically examined by empanelled doctors, found quite healthy – Suppression of material facts not proved – Company liable under policy.

          *****                    *****                    *****              ******

         

22.       वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रमांक 4 :

 

 

23.       वरील मुद्दा क्रमांक 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

              //  अंतिम आदेश  //

(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.

(2) गैरअर्जदारानी, वैयक्‍तीकरित्‍या किंवा संयुक्‍तीकरित्‍या पॉलिसी क्र. 973135597 पोटी रुपये 50,000/-, पॉलिसी क्र. 973484180 पोटी रुपये 1,00,000/- आणि पॉलिसी क्र. 975772575 पोटी रुपये 10,000/- अर्जदारास दिनांक 8/2/2007 पासून द.सा.द.शे. 9 % टक्‍के व्‍याजाने, आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(3)  अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 5,000/-

व तक्रारीचा खर्च, जाण्‍या-येण्‍याचा खर्च म्‍हणून रुपये 2,000/-, आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(4) उभयतांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.