सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक – 14/2011
श्रीमती गीता ज्ञानेश्वर सावंत
वय सज्ञान, धंदा- घरकाम,
रा.93, भटवाडी, वेंगुर्ला,
ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार/फिर्यादी
विरुद्ध
बजाज अलिआन्झ लाईफ इन्शुरन्स कं.लि.
करिता व तर्फे
व्यवस्थापकीय प्रमुख
बजाज अलिआन्झ लाईफ इन्शुरन्स कं.लि.
जीइ प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा,
पुणे- 416 006 ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदार- व्यक्तीशः
विरुध्द पक्ष- गैरहजर.
आदेश नि.1 वर
(दि.30/04/2013)
श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष :- मूळ तक्रार क्रमांक 03/2011 मध्ये दि.11/07/2011 रोजी मंचाने आदेश पारीत केलेला होता. सदर आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) दरम्यान तक्रारदार यांनी नि.17 वर पुरसीस दाखल केली असून मंचाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम मिळाली असून प्रकरण पुढे चालवायचे नसून प्रकरण निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. सदर अर्जास अनुसरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश –
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.17 वरील अर्जानुसार सदरचे दरखास्त प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक - 30/04/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा जमशीद खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग