सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 58/2015
श्री प्रदीप महादेव मिठबावकर
वय – 29 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा.कुसरवे, वराड, ता.मालवण,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा करीता
श्री सतिश दिगंबर वंजारी, अध्यक्ष,
वय सु.54 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा.वराड – हडपीवाडी, ता.मालवण,
जि. सिंधुदुर्ग
2) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा करीता
श्री केशव महादेव परुळेकर – उपाध्यक्ष,
वय सु.58 वर्षे, धंदा – शेती व व्यवसाय,
रा.वराड – शिरकोंड, ता.मालवण,
जि. सिंधुदुर्ग
3) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा करीता
श्री सुरेश बापू धुरी – सचिव,
वय सु.56 वर्षे, धंदा – शेती व नोकरी
रा.नांदोस – सारंगवाडी, ता.मालवण,
जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध 1 ते तर्फे विधिज्ञ – श्री रुपेश परुळेकर
आदेश नि.1 वर
(दि. 20/01/2016)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष
- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या पतसंस्थेत पिग्मी खात्यात गुंतवलेल्या रक्कमेची मागणी करुनही रक्कम परत न मिळाल्याने सदरची तक्रार या मंचात दाखल करण्यात आलेली आहे.
- तक्रार दाखल झाल्यावर विरुध्द पक्ष यांना नि.4 अन्वये नोटीसा काढण्यात
आल्या. विरुध्द पक्ष यांना नि.5 ते 7 अन्वये नोटीसांची बजावणी करण्यात आली. विरुध्द पक्ष 1 ते 3 प्रकरणात हजर होऊनही म्हणणे दाखल न केल्याने तक्रारदारास रु.200/- कॉस्ट देण्यात आली.
- दरम्यान आज तक्रारदार यांनी नि.12 वर अर्ज दाखल करुन उभय पक्षात तडजोड होत असल्याने प्रकरण निकाली काढण्याबाबत विनंती केली. त्यामुळे हे मंच सदरच्या पुरसीसला अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदार यांच्या नि.12 च्या पुरसीसला अनुसरुन सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 20/01/2016
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.