Maharashtra

Nagpur

CC/10/106

Dr. Ku. Raj Baccharam Bhojwani - Complainant(s)

Versus

Sindhi Hindi Higher Secondary Employees Credit Co-op. Society Ltd. - Opp.Party(s)

Adv. Vivek Gawali

30 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/106
 
1. Dr. Ku. Raj Baccharam Bhojwani
60, Sindhunagar Society, Jaripatka, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Sindhi Hindi Higher Secondary Employees Credit Co-op. Society Ltd.
pachpawali, Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Vivek Gawali, Advocate for the Complainant 1
 ADV.S.B.WALEKAR, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री. विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 30/11/2011)
 
 
1.                 तक्रारकर्तीने सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीचे कथनानुसार,  तिने गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये तिचे बचत खाते क्र. 193 असून, या खात्‍यात वेळोवेळी रकमा जमा केल्‍या व काढल्‍या. दि.31.03.2009 पर्यंत रु.4,21,726/- या खात्‍यात जमा होते. सदर रकमेची मागणी केली असता गैरअर्जदारांचे कर्मचा-यांनी रक्‍कम देण्‍यास नकार दिला, म्‍हणून त्‍यांनी गैरअर्जदारांना नोटीस दिला व उपनिबंधक, सहकारी संस्‍था नागपूर शहर यांचेकडे तक्रार केली. गैरअर्जदार संस्‍थेने या प्रकरणात शेवटपर्यंत त्‍यांना जमा रक्‍कम दिली नाही. म्‍हणून शेवटी त्‍यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे जमा रक्‍कम रु.3,71,726/- व त्‍यावर 31.03.2009 पासून 18 टक्‍के व्‍याज, शारिरीक मानसिक खर्चापोटी रु.50,000/- मिळावे अशी मागणी केली. आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्तीने एकूण 5 दस्‍तऐवज दाखल केले आहेत.
 
2.          गैरअर्जदारातर्फे प्रशासकांनी आपले उत्‍तर दाखल केले व सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. मात्र तक्रारकर्ती या संस्‍थेत, संबंधित ठिकाणची कर्मचारी नसल्‍यामुळे असे खाते उघडण्‍याचे अधिकार नाही, त्‍यांची मागणी गैरकायदेशीर व चुकीची आहे व ही तक्रार गैरकायदेशीर व चुकीची आहे असा उजर घेतला. आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराने एकूण 5 दस्‍तऐवज दाखल केले आहेत.
 
3.          सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता आली असता, मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांचे वकील प्रतिनीधीद्वारे ऐकला. तसेच दाखल दस्‍तऐवजांचे व शपथपत्रांचे अवलोकन केले असता, मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.          सदर तक्रारीतील एक बाब स्‍पष्‍ट आहे की, तक्रारकर्ती हीची रक्‍कम गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये जमा आहे. तक्रारकर्ती खातेदार होऊ शकते किंवा नाही याबाबी गौण आहे, कारण सदर संस्‍थेने रक्‍कम स्विकारलेली आहे आणि ती तक्रारकर्तीने मागितली तेव्हा तिला परत देण्‍याची जबाबदारी संस्‍थेचे आहे.
5.          तक्रारकर्तीने सुरुवातीस आपल्‍या तक्रारीत रु.4,21,726/- रक्‍कम दर्शविली असली तरीही नंतर रु.3,71,726/- इतक्‍या रकमेची मागणी केली आहे. गैरअर्जदार संस्‍थेला, उपनिबंधक, सहकारी संस्‍था यांनी तक्रारकर्तीच्‍या अर्जावर योग्‍य ती कारवाई करावी व तक्रारकर्तीचे समाधान करावे व अहवाल सादर करावा असे निर्देश दिलेले असतांना गैरअर्जदार संस्‍थेमार्फत तक्रारकर्तीला तिची रक्‍कम परत देण्‍यात आली पाहिजे ही वस्‍तूस्थिती आहे व गैरअर्जदारांनी ती रक्‍कम तिला परत न देणे ही त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे, ही परिस्‍थती लक्षात घेऊन खालीलप्रमाणे आदेश.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार संस्‍थेने, तक्रारकर्तीला रु.3,71,726/- ही रक्‍कम 31.03.2009 पासून प्रत्‍यक्ष रकमेच्‍या अदाएगीपावेतो, संस्‍थेच्‍या नियमाप्रमाणे बचत खात्‍याचे रकमेवर  देय असलेल्‍या व्‍याज दराने द्यावी.
3)    मानसिक व शारिरीक त्रासाच्‍या क्षतिपूर्तीबाबत रु.रु.3,000/- व तक्रारीच्‍या      खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून एक महिन्‍याचे       आत करावे.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.