Maharashtra

Nagpur

CC/11/679

Shri Mohan Wadibhasme - Complainant(s)

Versus

Silver System - Opp.Party(s)

Adv. Jagdish Gaidhane

17 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/679
 
1. Shri Mohan Wadibhasme
1st floor, Block No. 6, NIT Complex, Ajani Chowk, Wardha Road,
Nagpur 440015
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Silver System
Silver Palace, BS-1, & BS-2, Opp. Yashwant Stadium, Dhantoli,
Nagpur 440012
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Jagdish Gaidhane, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

सौ. जयश्री येंडे, सदस्‍या यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/03/2012)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या कथनानुसार, त्‍यांना कलर प्रींटरची आवश्‍यकता असल्‍याने, त्‍यांनी गैरअर्जदाराचे दुकानातून दि.11.05.2011 रोजी प्रींटर इप्‍सन स्‍टायलस टीएक्‍स 121 या कंपनीचा कलर प्रींटर रु.4,200/- देऊन खरेदी केला. सदर प्रींटरची एक वर्षाची वारंटी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला दिली व तसे कार्डही अदा केले. प्रींटरचा वापर केल्‍यानंत जुलै 2011 पासून प्रींटर वारंवार बिघडण्‍यास सुरुवात झाली. यावर गैरअर्जदाराने ‘एडव्‍हांस कॉम्‍प्‍युटर सर्विस सेंटर, धंतोली’ येथे दुरुस्‍तीला देण्‍यास सांगितले. त्‍यानुसार 14.09.2011 रोजी प्रींटर त्‍यांचेकडे दुरुस्‍तीला घेऊन गेले असता त्‍यांनी प्रींटरची वारंटी रद्द केली व त्‍याचे कारण प्रींटरचे कार्ट्रीज नकली असल्‍याचे सांगितले. त्‍याचदिवशी गैरअर्जदाराचे सांगण्‍यावरुन परत इप्‍सन सर्विस स्‍टेशन या वर्कशॉपमध्‍ये प्रींटर दाखविला असता त्‍यांनीही प्रींटरमध्‍ये नकली कार्ट्रीज लावून दिल्‍यामुळे कार्ट्रीज बदलावा लागेल आणि त्‍याची किंमत द्यावी लागेल असे सांगितले. याबाबत वारंवार गैरअर्जदारास सुचित केल्‍यानंतरही त्‍यांनी कार्ट्रीज बदलवून दिले नाही. सदर बाब सिध्‍द होऊनही गैरअर्जदाराने काहीच प्रतिसाद न दिल्‍याने रजिस्‍टर्ड पोस्‍टाने पत्र पाठविले. परंतू गैरअर्जदाराने मुळ कार्ट्रीज लावून प्रींटर दुरुस्‍त करुन दिले नाही. पर्यायाने तक्रारकर्त्‍याला नविन दुसरा प्रींटर विकत घ्‍यावा लागला. गैरअर्जदाराचे या कृतीमुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रास झाला व त्‍याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, प्रींटर गैरअर्जदाराने परत घेऊन रु.4,200/- व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला द्यावे, मानसिक आणि आर्थिक त्रासाबाबत रु.25,000/- द्यावे अशा मागण्‍या केल्‍या. तक्रारीसोबत प्रींटरचे टॅक्‍स इनव्‍हाईस, ग्राहक सेवा केंद्राचा अहवाल, नोटीस इ. च्‍या प्री जोडलेल्‍या आहेत.
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांस पाठविण्‍यात आली असता त्‍यांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.07.10.2012 रोजी पारित केला.
 
3.          मंचासमोर सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता आली असता मंचाने तक्रारकर्ता व त्‍यांच्‍या वकिलांचे म्‍हणणे ऐकले. गैरअर्जदार गैरहजर. तसेच दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
4.          सदर प्रकरणी मंचाने दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता दस्‍तऐवज क्र. 1 वर तक्रारकर्त्‍याने प्रींटर खरेदी केल्‍याचे देयक जोडलेले आहे व रु.4,200/- स्विकारल्‍याची गैरअर्जदाराची नोंद असल्‍याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो.
 
5.          दस्‍तऐवज क्र. 2 जॉब कार्डचे अवलोकन केले असता प्रींटरमध्‍ये प्रींट येत नसल्‍याचा दोष नमूद केलेला असून, त्‍यामध्‍ये This printer is warranty void असे नमूद केलेले आहे. तसेच ऍडव्‍हांस कॉम्‍प्युटर सर्व्हिस सेंटरने प्रींटरमध्‍ये “Ink Refilling” बाबत दोष असल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याचे मते सदर प्रींटरचे कार्टीज नकली आहे. परंतू या म्‍हणण्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने कुठलाही पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे हे म्‍हणणे या मंचाला मान्‍य करता येणार नाही. परंतू दाखल दस्‍तऐवजावरुन व तक्रारकर्त्‍याच्‍या शपथपत्रावरुन सदर प्रींटरमध्‍ये दोष आहे हे दिसून येते. गैरअर्जदार यांनी उपस्थित होऊन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले नाही अथवा त्‍याविरोधी कुठलाही पुरावा सादर केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत तथ्‍य आहे या निर्णयाप्रत हे मंच येते. तसेच वारंवार प्रींटर दुरुस्‍त करण्‍याची मागणी करुनही तो दुरुस्‍त करुन न देणे ही सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून प्रींटर इप्‍सन     स्‍टायलस टीएक्‍स 121 हा घेऊन विनामुल्‍य दुरुस्‍त करुन द्यावा किंवा तो दुरुस्‍त      होत नसल्‍यास, तक्रारकर्त्‍याला दुसरे प्रींटर इप्‍सन       स्‍टायलस टीएक्‍स 121 हे    द्यावे.
3)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.500/- द्यावे.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30  दिवसाचे आत करावी.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.