Maharashtra

Nagpur

CC/52/2021

REKHA NATTHU RAIKWAR - Complainant(s)

Versus

SILVER SYSTEM - Opp.Party(s)

ADV. A.S. SIDDIQUI

30 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/52/2021
( Date of Filing : 22 Jan 2021 )
 
1. REKHA NATTHU RAIKWAR
R/O. NEAR BIG MASJID, BESIDE SADIQ COMPANY, P-13 MUSKAN, MANKAPUR, NAGPUR-13
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SILVER SYSTEM
SILVER PALACE, BS-1 &2, OPPOSITE YASHWANT STADIUM, DHANTOLI, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
2. ASP NAME : F1 INFO SOLUTIONS & SERVICES PVT. LTD.
FS-019, 1ST FLOOR, KESHAV IMPERIAL, MALVIYA ROAD, NEAR SHANI MANDIR, SITABULDI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.S. SIDDIQUI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 Mar 2022
Final Order / Judgement

 ​आदेश पारीत व्दारा  श्री. एस आर आजने , मा. सदस्य,

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ,च्या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचे कडुन वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत केलेला एक लॅपटॉप दिनांक 5.11.2018 रोजी एकुण रुपये 48000/- एवढया किमतीत खरेदी केला व त्यासोबत वि.प.क्रं.1 यांनी सुचित केल्यप्रमाणे दोन स्पीकर एकुण रुपये 1850/- अदा करुन वि.प.क्रं.1 यांचे कडुन खरेदी केले. वि.प.क्रं.2 यांनी दिलेल्या दिवाळी ऑफर प्रमाणे तक्रारकत्याने वि.प.कं.1 ला दिनांक 13.11.2018 ला रुपये 2098/- अदा करुन तीन वर्षाची एक्स्टेंड वॉरन्टी घेतली व ती वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीच्या ई-मेलवर पाठविली त्यामूळे तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचे कडुन विकत घेतलेल्या लॅपटॉपची वॉरन्टी दिनांक 11.4.2021 पर्यत आहे.
  3. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचे कडुन विकत घेतलेल्या लॅपटॉपचा सप्‍टेंबर-2020 ला डिस्प्ले कार्यरत नव्हता (डाटा दाखवित नव्हता) त्यामूळे तकारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचेशी संपर्क साधला व वि.प.क्रं.1 यांनी तक्रारकर्तीला वि.प.क्रं.2 बरोबर संपर्क साधण्‍यास सांगीतले. तक्रारकर्तीने दिनांक 25.9.2020 ला वि.प.क्रं.2 बरोबर संपर्क साधला व लॅपटॉप मधील दोषाबाबत सांगीतले तसेच लॅपटॉप सोबत पुरविण्‍यात आलेल्या चॉर्जर बाबत शंका उपस्थीत केली. वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीला चार्जर लॅपटॉप सोबत जमा करण्‍यास सांगीतले. वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीला लॅपटॉप वॉरन्टी मध्‍ये असल्यामूळे लॅपटॉप दुरुस्तीबाबत आश्‍वासित केले. वि.प.क्रं.2 यांनी दिनांक 25.9.2020 ला जॉबशिट बनविली व त्यामधे लॅपटॉपमधे असलेल्या दोषाबाबत नोंद घेतली. तकारकर्तीला 9 दिवसानंतर म्हणजे दिनांक 2.10.2020 ला वि.प.क्रं.2 यांचेकडुन इ-मेल प्राप्त झाला व त्यानूसार तक्रारकर्तीला लॅपटॉप दुरुस्त झाल्याबाबत व तो घेऊन जाण्‍याबाबत कळविले. तक्रारकर्ती वि.प.क्रं.2 यांचेकडे गेली व तक्रारकर्तीने दुरुस्त झालेल्या लॅपटॉप दाखविण्‍याबाबत विनंती केली पंरतु वि.प.क्रं.2 यांचेकडे कार्यरत व्यक्तीने टेक्नीशीयन रजेवर असल्याबाबत सांगीतले व लॅपटॉपचा चार्जर टेक्नीशियनचे ड्रावर मधे असल्याने व त्याची चाबी टेक्नीशियन जवळ असल्यामूळे कार्यरत कर्मचा-याने तक्रारकर्तीला लॅपटॉप परत घेऊन जाण्‍यास सांगीतले व टेक्नीशीयन कामावर परत आल्यावर टेक्नीशीयनला दाखविण्‍यास सांगीतले. वि.प.क्रं.2 च्या कर्मचा-याचे बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्ती लॅपटॉप घरी परत घेऊन गेली व दोन-तीन दिवसांनंतर तक्रारकर्ती जेव्हा वि.प.क्रं.2 चे दुकानात गेली असता वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीला लॅपटॉपचा चार्जर परत करण्‍याचे नाकारले. तक्रारकर्तीचा लॅपटॉप उघडयात आला होता व सदरचा लॅपटॉप वॉरन्टीमध्‍ये येत नसल्यामूळे तो विनामूल्य दुरुस्त करुन देता येणार नाही जर तक्रारकर्तीला लॅपटॉप दुरुस्त करावयाचा असल्यास तीला दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल असे वि.प.क्रं.2 ने तक्रारकर्तीला सांगीतले.
  4. वि.प.क्रं.2 यांनी लॅपटॉप विकतेवेळी आश्वासीत केल्याप्रमाणे सेवा दिली नाही व वि.प.क्रं.1 ने सदरचा लॅपटॉप वि.प.क्रं.2 यांचेकडे दुरुस्ती करण्‍याकरिता देण्‍यास सांगीतले व वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारकर्तीला त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे. वि.प.क्रं.2 यांनी दिनांक 25.9.2020 ला जॉबशिट तयार करतांना जॉबशिट मधे कुठेही यापूर्वी लॅपटॉप उघडयाचे नमुद केलेले नाही. तक्रारकर्ती व्यवसायाने एलआयसी एजन्ट असुन तिचा लॅपटॉप वि.प.कं.2 यांनी वॉरन्टी कालावधीमधे दुरुस्त करुन न दिल्याने तिचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारकर्तीने आयोगासमक्षआ तकार दाखल करुन  पूढील प्रमाणे मागणी केली आहे.
  5. तक्रारकर्तीचा लॅपटॉप वॉरन्टी कालावधी दुरुस्त करुन न दिल्याने  वि.प.क्रं.1 व 2 हे दोघेही तक्रारकर्तीला लॅपटॉपची व चॉर्जरची किंमत व तिला झालेल्या आर्थिक नुकसान रुपये 1,00,000/- दिनांक 25.9.2021 पासून तक्रारकर्तीला 15 टक्के व्याजासह प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत रक्कम देण्यास जबाबदार आहेत असे आदेशीत करावे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  6. विरुध्द पक्षाला आयोगा नोटीस पाठविण्यात आली असता सदर नोटीस दिनांक 17.2.2021 रोजी प्राप्त झाली परंतु सदर नोटीस मिळूनही वि.प. आयोगा समक्ष हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्याच्या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 11.10.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  7. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्ती, तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

          मुद्दे                                            उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?    होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय? होय
  4. काय आदेश                                     अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचे कडुन वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत केलेला एक लॅपटॉप दिनांक 5.11.2018 रोजी एकुण रुपये 48,000/- एवढया किमतीमधे खरेदी केल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तवेजावरुन दिसुन येते यावरुन तक्रारकर्ती ही वि.प.ची ग्राहक आहे हे सिध्द होते. नि.क्रं.2 (अॅनक्सर सी) दाखल दस्तऐवजांवर वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीकडुन रुपये 2098/- स्वीकारुन 3 वर्षाची वाढीव वॉरन्टी दिल्याचे निर्देशनास येते. तक्रारकर्तीने वि.प.कं.2 यांचेकडुन वि.प.क्रं.1 यांनी निर्मीत केलेला लॅपटॉप मधे तांत्रीक दोष असल्यामूळे वि.प.कं.1 सुचनेनुसार वि.प.क्रं.2 यांचेकडे सादर केल्याचे नि.क्रं.2(अॅनेक्सर-डी) वरुन स्पष्‍ट होते व जॉबकार्ड मधील मेमो या मथळयाखाली operation system : cannot power on, abnormal software/app and version असे नमुद आहे व तक्रारकर्ती कडुन चार्जर जमा केल्याची नोंद आहे.
  2. तकारकर्तीचा लॅपटॉप वॉरन्टी कालावधीमधे असुन सुध्दा वि.प.यांनी तकारकर्तीने सदरचा लॅपटॉप दुरुस्तीला उघडला म्हणुन सेवा देण्यास नकार दिला व लॅपटॉप दुरुस्त करुन दिला नाही परंतु तक्रारकर्तीने वि.प.क्रं.2 यांचेकडे लॅपटॉप दुरुस्तीला सादर करतांना जॉब कार्डमधे तसे नमुद केल्याचे दिसून येत नाही ही वि.प.ची तक्रारकर्तीचे प्रती दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापारी प्रथेला अवलंब केल्याचे स्पष्ट होते म्हणुन तक्रारकर्ती वि.प.क्रं.1 व 2 यांचे कडुन आर्थीक व शारिरिक व मानसिक त्रासापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीरित्या तक्रारकर्तीला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमूळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/- द्यावे.
  3. वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारकर्तीला तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  4. वि.प.क्रं.1 व  यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
  6. तक्रारकर्तीला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.