मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 51/2010 तक्रार दाखल दिनांक – 10/05/2010 अंतिम आदेश दिनांक – 25/02/2011 कुमारी मंदा लोके, अँडव्होकेट, ए नॉर्थ, 1-55, लक्ष्मी कॉटेज, डॉ. बी. अंबेडकर रोड, परेल, मुंबई 4000 012. ........ तक्रारदार विरुध्द
1) सायर्रा मोबाईल कम्युनिकेशन्स प्रा. लि., तर्फे श्री. अगरवाल/श्रीमती सीमा, 225, पांडुरंग भवन, सल. जे. रोड, दादर, (पश्चिम), मुंबई 4000 016. 2) सँमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., 7 व 8 वा मजला, आय.एफ.सी.आय.टॉवर, 61, नेहरु पॅलेस, न्यू दिल्ली 110 019.
3) सँमसंग सर्व्हिस सेंटर, शॉप नंबर , आनंदजी लोधा बिल्डींग, लालबाग (पूर्व), मुंबई 400 012. ......... सामनेवाले क्रं. 1 ते 3
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार हजर
- आदेश - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केले होते. प्रस्तुत तक्रार प्रकरण लोक न्यायालयासमक्ष ठेवण्यात आले होते. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीत अर्ज दाखल करुन त्यात नमूद केले आहे की, तिच्या मागणीप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तीला मोबाईल बदलून दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीतील कोणतीही मागणी शिल्लक राहीलेली नसल्याचे सदर तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.- - अंतिम आदेश - 1) उभयपक्षांचा वाद हा लोक न्यायालयासमक्ष सोडविण्यात आल्यामुळे तक्रारदाराची तक्रार क्रमांक 51/2010 या प्रकरणाची नस्ती बंद करण्यात येते. 2) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा.
3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 25/02/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |