Maharashtra

Kolhapur

CC/10/100

Uttam Madhavrao Raut - Complainant(s)

Versus

Sidhivinayak Nagari Sah. Pat Sanstha Ltd and Others - Opp.Party(s)

Adv.S.S. Jadhav

30 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/100
1. Uttam Madhavrao RautSanyukt Maharashtra Hous. Soc. Rajarampuri Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Sidhivinayak Nagari Sah. Pat Sanstha Ltd and OthersShahupuri 3 rd Lane, Kolhapur 2. Secretary, Siddhi Vinayak Nagari Sahakari Pat Sanshta Maryadit, KolhapurAK Complex, Gala No.20, Shahupuri 3rd LaneKolhapurMaharashtra3. Chairman, Shri Malharrao Hanmantrao Bhosale,Siddhi Vinayak Nagari Sahakari Pat Sanshta Maryadit, Kolhapur428, D, Gangavesh,KolhapurMaharashtra4. Ashok Gopal Nakate, Vice Chairman327-A, Shivaji Peth, KolhapurMaharashtra5. Shri Mahipati Dnyandeo Koigade, Director424, D, GangaveshKolhapurMaharashtra6. Shri Shahaji Anandrao Bhosale, Director427, D, GangaveshKolhapurMaharashtra7. Shri Sandip Laxman Desai, DirectorKanerkar Nagar, KolhapurMaharashtra8. Shri Sambhaji Bapuso Kate, DirectorPlot No.28, Rajopadheynagar, KolhapurMaharashtra9. Shri Narayan Bapuso Kate, DirectorPlot No.29, Sane Guruji VasahatKolhapurMaharashtra10. Shri Dipak Vasantrao Chavan, DirectorR K Nagar, KolhapurMaharashtra11. Shri Nandkumar Vasantrao Kadam, DirectorPanchganga Road, Sukrawar Peth, KOlhapurMaharashtra12. Shri Mahendra Pandurang Bolake, DirectorY P Powar Nagar, Kolhapur Maharashtra13. Sou.Suryaprabha Malharrao Bhosale, Director428-D, GangaveshKolhapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.S.S. Jadhav, Advocate for Complainant
Adv.Umesh Mangave, Advocate for Opp.Party Advl.Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party Adv Umesh Mangave, Advocate for Opp.Party

Dated : 30 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी एकत्रितपणे म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद व कॉल डिपॉझिट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
1.
3157
25000/-
04.02.2004
2.
3156
25000/-
--”--
3.
3158
25000/-
--”--
4.
3161
26000/-
--”--
5.
3160
25000/-
--”--
6.
1936
30000/-
08.07.2002
7.
2440
24000/-
02.12.2002
8.
2560
7500/-
08.01.2003
9.
2632
16000/-
02.05.2003
10.
2755
9000/-
02.05.2003
11.
2756
4500/-
02.05.2003
12.
2698
10000/-
10.02.2003
13.
2606
20000/-
17.02.2003
14.
2607
20000/-
16.02.2003
15.
2608
20000/-
17.02.2003

 
(3)        वरीलप्रमाणे तक्रारदारांच्‍या ठेवी सामनेवाला यांचेकडे जमा आहेत. सदर ठेवींपैकी पावती क्र.2606, 2608, 2607, 2755, 2698, 1967, 2440, 2560, 2632, 2756 या पावत्‍यांवरील दि.31.08.2006 नंतर व्‍याज तक्रारदारांना मिळालेले नाही. तसेच, पावती क्र.3758, 3161, 3157, 3156, 3160 या पावत्‍यांवरील व्‍याज रक्‍कम ठेवले तारखेपासून मिळालेले नाही. मुदत बंद ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली आहे, तर कॉल डिपॉझिट पावत्‍यांवरील वरीलप्रमाणे व्‍याज मिळालेले नाही. तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारांना सदर रक्‍कमांची तक्रारदार क्र. 2 व 4 यांच्‍या शिक्षणासाठी व तक्रारदार क्र.1 यांचे व्‍यवसायासाठी पैशाची निकड आहे तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.12.03.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकार कायद्यातील नोंद असलेली सहकारी संस्‍था असलेने प्रस्‍तुतची तक्रार या मे.मंचात चालणेस पात्र नाही.   कोल्‍हापूर जिल्‍हया‍तील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्‍था बुडीत गेल्‍याने मुदतपूर्व ठेवीची मागणी एकाचवेही सर्व ठेवीदारांनी ठेवींची मागणी केलेने संस्‍थेतील रक्‍कमेची तरलता कमी झालेने संस्‍थेचे दैनंदिन कामकाज चालविणे अडचणीचे झाले आहे. तसेच, ठेवीदारांकडून घेतलेल्‍या रक्‍कमा कर्जरुपाने वाटप केलेल्‍या असून त्‍या अद्याप येणेबाकी आहेत. त्‍यामुळे ठेवीदारांना एकरकमी पैसे देणे अडचणीचे झाले आहे.   तसेच, तक्रारदारांच्‍या मुदत बंद ठेवींची मुदत 2006 मध्‍ये संपली असून तक्रारदारांच्‍या तक्रारीस मुदतीच्‍या कायद्याचा बाध येतो. सध्‍या महाराष्‍ट्र शासनाकडून कर्ज माफीच्‍या वेगवेगळया घोषणा प्रसिध्‍द होत असलेने संस्‍थेचे कर्जदार कर्जाची रक्‍कम भरणेस टाळाटाळ करीत असलेने तक्रारदारांची ठेव देणेस अडचण निर्माण होत आहे. संस्‍थेची वसुली कारवाई सुरु आहे, जसजशा रककमा वसुल होतील त्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांची ठेव रक्‍कम परत करणेचे सामनेवाला हे मान्‍य करीत आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
 
(6)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
(7)        सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्‍याने कारण घडत आहे. सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. तक्रारीत उल्‍लेख केलेल्‍या मुदत बंद ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍यापैकी पावती क्र.3758, 3161, 3157, 3156, 3160 या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
 
 
(10)       तसेच, तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावत्‍यांच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या तक्रारीत पावती क्र.2606, 2608, 2607, 2755, 2698, 1967, 2440, 2560, 2632, 2756 या कॉल डिपॉझिट पावत्‍यांवरील दि.31.08.2006 नंतर व्‍याज तक्रारदारांना मिळालेले नाही असे कथन केले आहे. तदनंतर, सदर कॉल डिपॉझिट पावत्‍यांची रक्‍कम ही त्‍यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि. 12.03.2009 रोजीच्‍या वकिलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसीने मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कमा दि.01.09.2006 रोजीपासून 12.03.2009 रोजीपर्यन्‍त ठेव पावत्‍यांवर नमूद म्‍हणजेच द.सा.द.शे.16 व 14 टक्‍के व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(11)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील कॉल डिपॉझिटच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.01.09.2006 रोजीपासून दि. 12.03.2009 रोजीपर्यन्‍त कोष्‍टकात नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
व्‍याजदर
1.
1936
30000/-
16%
2.
2440
24000/-
14%
3.
2560
7500/-
14%
4.
2632
16000/-
14%
5.
2755
9000/-
14%
6.
2756
4500/-
14%
7.
2698
10000/-
14%
8.
2606
20000/-
14%
9.
2607
20000/-
14%
10.
2608
20000/-
14%

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
3157
25000/-
2.
3156
25000/-
3.
3158
25000/-
4.
3161
26000/-
5.
3160
25000/-

 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT