जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/230 प्रकरण दाखल तारीख - 18/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 31/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मे.हिराचंद नागेश येवनकर (पंढरपुरकर) महात्मा गांधी रोड, नांदेड तर्फे भगीदार, श्री.प्रफुल्ल पि हिराचंद येवनकर वय 55 वर्षे, धंदा व्यापार, अर्जदार रा. शिवाजीनगर,नांदेड. विरुध्द. 1) सिध्दीविनायक फ्रेट प्रा.लि, गैरअर्जदार पहिला मजला श्रीराम कॉम्लेक्स, लोकमत कार्यालयाच्यावर साकरी रोड, धुळे,
2) सिध्दीविनायक फ्रेट प्रा. लि. धुळे शाखा नांदेड. मध्यवर्ती बसस्थानक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.संदीप अग्रवाल गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही. चौधरी निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, गैरअर्जदार ही ट्रान्स्पोर्ट कंपनी असून महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करते. गैरअर्जदाराचे मुख्य कार्यालय धुळे येथे असून शाखा कार्यालय नांदेड येथे आहे. दि.19/01/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 मार्फत तांबे व पितळ यांचे भंगार माल व्यंकटेश्वरा मेटल इंडस्ट्रीज भंडारा येथे रसिद क्र.1328427 बुक नं.550 अन्व्ये सात (7) डाग रु.70,000/- किंमतीचे रु.556/- किराया भरुन पाठविले. सदरहू सात डाग मध्ये एक डाग तांबा भंगारीचा होता. तांबा भंगारीच्या डागाची किंमत रु.13,000/- इतकी व सहा पितळ भंगारीच्या डागांची एकत्रित किंमत रु.57,000/- इतकी होती. दि.29/01/2010 रोजी व्यंकटेश्वरा मेटल इंडस्ट्रीजच्या प्रतीनीधीने भंडारा येथील गैरअर्जदाराच्या शाखा कार्यालयातून सात डाग घेण्यासाठी गेला असता, येथे तांब्याच्या डाग व्यतिरीक्त पितळ भांगारीच्या सहा डागांची पोहच देण्यात आली व तांब्याचा डागा गहाळ झाल्या बाबतचे सागण्यात आले व तस उल्लेख पोहच पावती व पार्सल पेड पावतीवर करण्यात आला आहे. दि.30/01/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 2 ला त्यांच्याकडुन गहाळ झालेल्या तांब्याचे डागांचा शोध घेण्या बाबत विनंती केली पण गैरअर्जदार यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा गहाळ झालेला डाग परत केला नाही. अर्जदार यांनी अनेक वेळा विनंती करुन देखील गैरअर्जदार यांनी कुठलेच समानधानकारक उत्तर दिले नाही म्हणुन अर्जदारास मानसिक त्रास झाला. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारास अर्जदाराला रु.13,000/- दि.29/01/2010 पासुन 18 टक्के व्याज देण्याचे आदेश करावे. तसेच गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेच्या त्रुटीबद्यल रु.10,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे हजर झाले हे आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी पावती क्र.550,1328427 दि.29/01/2010 अन्वये सात डागाचे बुकींग केले हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला मान्य आहे. परंतु सदर सात डागाची किंमत रु.70,000/- होती हे अर्जदाराचे म्हणणे चुकीचे आहे. बुकींग नियमावलीनुसार अर्जदाराने मालाचे बुकींग करतांना मालाची किंमत जाहीर करणे व बुकींग नियमावली क्र. 1 नुसार प्रती हजारी रु.3 मुल्य आधारीत अधीभार अदा करणे आवश्यक होते. परंतु मालाचे बुकींग करताना मालाची किंमत जाहीर केलेली नाही त्याच प्रमाणे मुल्य आधारीत अधीभार अदा केलेला नाही. सबब बुकिंग पावतीवर नियम क्र.2 अन्वये कंपनीची जबाबदारी एका पार्सलसाठी रु.50,000/- किंवा 10 पेक्षा जास्त पार्सलसासाठी एकुण रु.500/- ची राहील असे स्पष्ट केले आहे. अर्जदारांने असे म्हटले आहे की, सदरील डागाची किंमत एकुण रु.70,000/- व रु.57,000/- चे डाग भेटले व रु.13,000/- किंमतीचे डाग भेटले नाही हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की,पार्सल विभागाकडुन सात डाग घेण्यासाठी गेले असता तांब्याच्या डागा व्यतीरिक्त पितळ भंगाराचे सहा डागाची पोच देण्यात आली व तांब्याचा डाग गहाळ झाल्याचे सांगण्यात आले व त्यांचा उल्लेख पावतीवर करुन दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.अर्जदाराची तक्रार खोटी असुन ती फेटाळण्यात यावी. अर्जदाराचे असे ही म्हटले आहे की, मालाच्या विमा खेरीज इतर शुल्क आकारुन सदरचा माल योग्यरित्या पाठवला असून कुठल्याही प्रकारची सेवेतील कमतरता दिली नाही व मानसिक त्रास दिला नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व दोन्ही बाजूंचास युक्तीवाद ऐकल्यानंतर खालील मुद्ये स्पष्ट झाले. मुद्ये उत्तर.
1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार हे अजदाराची नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय? होय 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र.1 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे मार्फत कुरीअरने तांबे व पितळ मालाचे डाग पाठवले होते. या बद्यल अर्जदाराने मंचासमोर कुरीअर सर्व्हीसची पावती दाखल केली आहे. म्हणुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत त्यास्तव मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र.2 अर्जदार यांनी दि.29/01/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचे मार्फत तांबे व पितळ भंगाराचे सात डाग रु.536/- किराया देऊन पाठवले होते. सदरचा माल श्री.व्यंकटेश्वरा मेटल इंडस्ट्रीज भंडारा यांचेकडे पाठवलेले होते. याबद्यलची पावती दि.29/01/2010 ची सात डाग नोंद असलेली व रु.536/- व इतर सर्व्हीस चार्र्जस मिळून रु.656/- रुपयाचे अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली आहे. तसेच ते सात डागापैकी सहा डाग मिळाले एक डाग कमी आला आहे, अशा नोंदीची व दि.30/01/2010 ची सहा डाग मिळाल्याची पावती (Delivery receipt) अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत जोडली आहे. गैरअर्जदार हजर झाले व आपले लेखी म्हणणे मांडले व पुरावा म्हणून शपथपत्र दिले त्यामध्ये कंपनीची जबाबदारी फक्त 50 रु पुरतीच आहे त्यामुळे ते सदरचा गहाळ झालेल्या डागाची किंमत देण्यास जबाबदार नाहीत पण अर्जदार यांनी दाखल केलेल्या सात डागाची नोंद असलेल्या पावतीवरुन व गैरअर्जदार यांच्या नांदेड शाखेत भंडारा येथे पाठवण्यासाठी सात डाग दिले होते हे सिध्द होत आहे. कुरीअर सर्व्हीसेस देणा-यांनी ते काय कुरीअर मध्ये नेत आहेत याबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. सर्व जबाबदारी ग्राहकाचीच आहे तुम्ही आत काय भरले आहे हे आम्हास माहीत नाही अशी भुमीका न ठेवता कुरीअने पाठवण्यात येणा-या सामानाचे व त्यांच्या किंमतीचे एक छोटेसे पत्र आपल्या रेकॉर्डला ठेवल्यास या प्रकाराचा घोटाळा टळू शकतो. एखादया दुकानदाराकडुन व त्यातलेत्यात सेवा केंद्राकडुन ही पध्दत आवश्यक आहे. जेंव्हा एखादया व्यक्तीकडुन सात डागाचे रु.656/- रुपये घेतले जातात तेंव्हा त्यांच्या मालाचे रक्षण करुन ते दिलेल्या पत्यावर पाठवणे ही त्यांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे अर्जदार यांचे एक डाग कमी गेल्यामुळे रु.13,000/- रुपये नुकसान झाले हे निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. जर कुरीअर सर्व्हीसेसने पाठवण्यात येणा-या मालाच्या किंमतीचे एक पत्र पाठवणा-याकडुन घेऊन आपल्या रेकॉर्डला ठेवले असते तर आतील माल किती रुपयाचे होते हे स्पष्ट झाले असते व ग्राहकास तेवढीच किंमत घ्यावी लागली असती. म्हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.13,000/- गहाळ झालेल्या डागाची किंमत द्यावी तसेच मानसीक त्रासापोटी रु.1,000/- व कोर्ट खर्चा प्रीत्यर्थ रु.1,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत.
आदेश 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या रु.13,000/- द्यावेत. 3. मानसिक त्रासाबद्यल गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.1,000/- द्यावेत. 4. कोर्ट खर्चा प्रित्यर्थ रु.1,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत. 5. रु.13,000/- + 1000 + 1000 एकुण रु.15,000/- रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्यात द्यावेत अन्यथा रक्कम फिटेपर्यंत 9 टक्के व्याज द्यावे. 6. उभय पक्षांना निर्णय कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |