निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 12/05/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 16/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 03/10/2011 कालावधी 04 महिने 17 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. चंद्रकांत गुलाबराव लऊळकर. अर्जदार वय 78 वर्ष. स्वतः रा.साईकृपा रामकृष्ण नगर,पुर्व वसमत रोड. परभणी ता.जि.परभणी. विरुध्द सिध्दी विनायक फ्रेट प्रा.लि. मार्फत प्रतिनिधी (मध्यवर्ती बस स्थानक परभणी जि.परभणी) गैरअर्जदार. पहिला मजला.श्रीराम कॉम्पलेक्स लोकमत कार्यालयाचेवर अड.एस.एन.वेलणकर. साक्री रोड,धुळे 4240001. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराने गैरअर्जदारातर्फे पाठवलेले कुरीअर नियोजित ठिकाणी न गेल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने विजापुर येथील त्यांच्या मुलीला काही सामान एस.टी.कुरीअर व्दारे सोलापुर पर्यंत दिनांक 14/02/2011 ला पाठवले हे सामान दिनांक 15/02/2011 पर्यंत सोलापुरला पोचेल असे अर्जदाराला सांगण्यात आले.दिनांक 20/02/2011 पर्यंत सामान सोलापुरला पोहोचले नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला परभणी कार्यायालत चौकशी केली असता सामान पाठवले आहे ते मिळेल असे सांगीतले,परंतु आजतागायत कुरीअर मिळाले नसल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. व विजापुर ते सोलापुर मुलीचा प्रवास भाडे खर्च रु.2,250/- फोनचा व कोर्टाचा खर्च रु.5,000/- पाठवलेल्या सामानाची किंमत रु.4,000/- मानसिक त्रासापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, कुरीअरची पावती, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार हे कागदपत्र दाखल केलेल आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने त्यांच्या मार्फत सामान पाठवल्याचे मान्य केले आहे.परंतु ते सामान रु.4000/- किंमतीचे असल्याबाबत कोणतीही खरेदी पावती मात्र सोबत जोडलेली नव्हती.सामान मिसप्लेस झाल्याचेही गैरअर्जदाराने मान्य केले आहे. मात्र अर्जदाराने मागणी केलेला प्रवासखर्च व फोनचा खर्च पूर्णपणे अमान्य केलेला आहे. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही.म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र जोडले आहे. अर्जदाराचा लेखी युक्तीवाद व गैरअर्जदाराच्या वकीलांचा युक्तीवाद व तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदारा मार्फत दिनांक 14/02/2011 रोजी रु.4000/- किमतीचे कापड सोलापुर येथे पेहेकर यांना पाठवले हे नि.3/1 वरील पावतीवरुन सिध्द होते.याचा LR No.2200004854 आहे. त्यानंतर कुरीअर अर्जदाराच्या मुलीस मिळाले नाही.म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी व तोंडी चौकशी केली असता दिनांक 24/03/2011 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास असे कळवले की, आम्ही तपास करत आहोंत.तपासाअंती पुढील कार्यवाही कळविण्यात येईल. दरम्यानच्या काळात बुकींग पावतीची प्रत व मालाचे बील पाठवावे जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल.परंतु अर्जदाराने याबाबत काहीही माहिती पाठवली नाही त्यामुळे पुढे चौकशी करत आली नाही असे र्गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे कुरीअर त्याच्याकडून Misplace झाल्याचे मान्य केले आहे.अर्जदाराने दाखल केलेल्या नि.3/1 वरील पावतीवरुन कुरीअरने पाठवलेल्या सामानाची किंमत रु.4000/- होती अर्जदाराने गैरअर्जदाराकडून मागणी केलेल्या इतर खर्चाविषयी कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नसल्यामुळे ती मागणी मान्य करता येणार नाही. अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते,म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारास अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसांच्या आत रु.4,000/- द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |