(मा.अध्यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालाकडून मुदतठेवीची रक्कम रु.44,221/- मिळावी, या रकमेवर दि.13/8/2010 पासून 12% दराने व्याज मिळावे व इतर न्यायाचे हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी याकामी पान क्र.13 लगत लेखी म्हणणे व पान क्र.14 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-- होय. 3. अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून ठेवपावतीवरील रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय 4. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे विवेचनः याकामी अर्जदार यांचेवतीने पान क्र.15 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.16 लगत युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी याकामी पान क्र.4 लगत ठेवपावती क्र.1045 ची झेरॉक्स प्रमाणीत प्रत हजर केलेली आहे. पान क्र.4 चे कागदपत्र सामनेवाले यांनी स्पष्टपणे नाकारलेले नाहीत. पान क्र.4 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सदर संस्था आर्थीक अडचणीत आहे. सर्व ठेवीदारांनी एकदम ठेवी काढून घेतल्यामुळे व वाटप केलेले कर्जाची वसुली होण्यास वेळ लागत असल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकिय मंडळाची नेमणूक केलेली आहे. कर्ज वसुलीसाठी प्रशासकिय मंडळास खुप त्रास होत आहे. कर्जदार कर्ज भरत नसल्यामुळे संस्थेस ठेवी परत करणे अवघड झाले आहे. जसजशी कर्ज रक्कम वसुली होईल तसतशी ठेवीदारांची रक्कम परत करण्यात येईल.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला हे सिध्देश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांचे प्रशासक आहेत. संस्थेचा संपूर्ण कारभार पाहत असतांना कर्जदार यांचेकडून कर्जाऊ रकमेची वसुली करणे तसेच ठेवीदारांची ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.5 प्रमाणे दि.18/2/2011 रोजी अँड.अ.जे.कुलकर्णी यांचेमार्फत रजि.ए.डी.पोष्टाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांची पान क्र.4 चे ठेवपावतीवरील संपूर्ण रक्कम व्याजासह परत केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाला पतसंस्था व प्रशासक यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. याबाबत मंचाचे वतीने मा.राष्ट्रीय आयोग नविदिल्ली यांचेसमोरील रिव्हीजन अर्ज क्र.2528/2006 नि.ता.24/7/2008 भारतीय रिझर्व बँक वि.ईश्वर आप्पा या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. पान क्र.4 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला पतसंस्था व प्रशासक यांचेकडून पान क्र.4 चे ठेवपावतीवरील रक्कम रु.44,221/- इतकी रक्कम व या रकमेवर दि.14/8/2010 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% इतक्या दराने व्याज वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च मिळावा किंवा मानसिक त्रासापोटी रक्कम मिळावी अशी मागणी केलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, दोन्ही बाजुची युक्तीवादाबाबतची पुरसिस व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला पतसंस्थेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला पतसंस्था, प्रशासक यांनी अर्जदार यांना ठेवपावती क्र.1045 वरील रक्कम रु.44,221/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.14/8/2010 पासून रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे. 3) वर कलम 2 प्रमाणे देय असलेल्या रकमेपैकी काही रक्कम यापूर्वी अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्थेने अदा केलेली असल्यास त्याची वजावट वरील रकमेतून करावी. |