मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 116/2011 श्री. चंद्रकांत जिनदास देशमाने पो.म्हसवड, ता.माण, जि. सातारा तक्रारदार विरूध्द सिध्दीविनायक फ्रेट प्रा.लि. जाबदार पहिला मजला, श्रीराम कॉम्प्लेक्स, लोकमत ऑफिसचे वर, साकरी रोड, धुळे - 424001 नि.1 खालील आदेश 1) तक्रादाराने त्यांचे कापडाचे पार्सल विरूध्द पक्षाचे मार्फत भिवंडी येथ पाठवून देखील ते पार्सल नमूद पत्त्यावर न मिळाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2) मंचाचे रजिस्टार यांनी तक्रारदाराची तक्रार दाखल रजिस्टर मध्ये नोंद करून मंचापुढे अडमशिन हिअरिंगसाठी ठेवली परंतु अडमिशनच्या दिवशी तक्रारदार मंचासमोर हजर नव्हते तसेच तक्रारदार हा कापड विक्रेता असल्याने त्याला मंचासमोर हजर ठेवण्याची सूचना मंचाने केली त्यानुसार आज प्रकरण अडमिशन हिअरींगसाठी मंचासामोर ठेवण्यात आले. त्या दरम्यान आज मंचासमोर तक्रारदार स्वतः हजर असून मंचाने त्यांना प्रत्यक्ष विचारण केली असता त्यांचे ‘रूपम क्लॉथ सेंटर’ नावाचे कापड सेंटर म्हसवड येथे असल्याचे व वार्षिक व्यवसायाचा टर्न ओव्हर 5 ते 6 लाख रूपये असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तकारदार हा वाणिज्य हेतूने व नफा कमविण्याच्या हेतूने कापड विक्रीचा व्यवसाय करतो हे दिसून आले. 3) त्यामुळे तक्रारदारने स्वतः मंचा समोर नि. 6 वर पुरसिस दाखल करून आपणास तक्रार चालवावयाची नाही व तक्रार अर्ज मागे घेत आहे असे स्पष्ट केले. त्या नुसार मंच सदरचे प्रकरण निकाली काढणेच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रारदार यांनी नि. 6 वर दिलेल्या पुरसिस नुसार तक्रारदारास तक्रार मागे घेण्याची परवानगी देण्यात येते. 2) तक्रारदारास वेगवेगळया नव्याने तक्रार दाखल करण्याची सूचना करण्यात येते 3) तक्राराराने दाखल केलेली मूळ कागदपत्र तक्रादारास परत करण्यात यावीत. 4) खर्चाबासब काही आदेश नाही. 5) प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 15/9/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |