सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.19/2010
श्री शशिकांत मधुसुदन म्हाडदळकर
वय वर्षे 58, धंदा – बांधकाम ठेकेदार,
रा.मु.पो.कुडाळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
व्यवस्थापक,
सिध्दार्थ ऑटो इंजि.प्रा.लि.
रजपूत कँपस, राजारामपूरी,
नववी गल्ली, मु.पो./ता.कोल्हापूर,
जि.कोल्हापूर. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एन.एन. गावडे
विरुद्ध पक्षातर्फे- व्यक्तीशः हजर.
- आदेश निशाणी 1 वर -
(दिनांक 10/08/2010)
1) मुळ तक्रार क्रमांक 83/2009 मध्ये पारीत आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाच्या सिध्दार्थ ऑटो इंजि.प्रा.लि. यांनी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्षाला बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष हे त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचासमोर हजर होऊन वैयक्तिक जातमुचलका मंचासमोर सादर केला व नि.9 वर अर्ज दाखल करुन आपण मंचाने पारीत केलेल्या निकालपत्रानुसार रक्कमेची अदायगी करणेस तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रकरण आज तक्रारदाराचे म्हणणे येणेसाठी ठेवण्यात आले होते.
3) परंतु तक्रारदार व त्यांचे वकील तसेच विरुध्द पक्ष/आरोपी व त्यांचे वकील मंचासमोर हजर होऊन त्यांचे दरम्यान आपसात तडजोड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार तक्रारदाराने नि.12 वर पुरसीस दाखल करुन त्याला आदेशाची रक्कम रु.6461/- प्राप्त झाल्याचे मान्य केले व आपली आरोपीविरुध्द कोणतीही तक्रार राहिली नसल्यामुळे आपला दरखास्त अर्ज मागे घेत असल्याचे पुरसीसमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही तक्रारदाराच्या पुरसीसनुसार खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) मंचाने पारीत केलेल्या तक्रार क्रमांक 83/2009 मधील मुळ आदेशाची पूर्ण अंमलबजावणी आरोपीकडून करणेत येऊन तक्रारदारास रु.6461/- (रुपये सहा हजार चारशे एकसष्ट मात्र) प्राप्त झाल्याचे तक्रारदाराने मान्य केल्यामुळे व तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.12 वरील पुरसीसनुसार आम्ही तक्रारदारास सदरची तक्रार Withdrawal करणेस परवानगी देत आहोत.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
3) आरोपिचे बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 10/08/2010
सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-