नि. 69
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 924/2008
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 14/08/2008
तक्रार दाखल तारीख : 26/08/2008
निकाल तारीख : 19/06/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री अशोक राघोबा खाडे,
वय वर्षे 50, धंदा– शेती
2. सौ सुमन अशोक खाडे
वय वर्षे 40, धंदा– घरकाम
3. कु. धनश्री अशोक खाडे
वय वर्षे 19, धंदा– शिक्षण
4. कु. अनिषा अशोक खाडे
वय वर्षे 15, धंदा– शिक्षण
नं.4 अ.पा.क. जनक आई नं.2
सर्व रा.कवठेएकंद ता.तासगांव जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री सिध्दराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.
कवठेएकंद, मु.पो.कवठेएकंद, ता.तासगांव जि. सांगली
2. श्री रामचंद्र हरी थोरात, संचालक
3. प्रकाश बाबूराव देशमाने, संचालक
4. सुभाष आऊबा लवटे, संचालक
5. सखाराम केशव गुरव, संचालक
6. अजित श्रीपाल लंगडे, संचालक
7. बादशहा मस्तान व्हनवाड, संचालक
8. शंकर मारुती पवार, संचालक
9. निर्मला रघुनाथ थोरात, संचालक
10. बबन ज्ञानू तपासे, संचालक
11. मारुती जगन्नाथ थोरात, संचालक
12. बबन नारायण साळुंखे, संचालक
13. अश्विनी अनिल पवार, संचालक
14. सुदाम बाळासो पावसे, संचालक
सर्व रा.कवठेएकंद, ता.तासगांव जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदारतर्फे – अॅड अश्विनी अष्टपुत्रे
जाबदार क्र.3,12 व 13 तर्फे – अॅड एस.पी.मगदूम
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदाराने जाबदारांनी मुदत संपल्यानंतरही मुदत ठेव पावतीमध्ये गुंतविलेली रक्कम परत केली नाही म्हणून या मंचासमोर दाखल केली आहे.
2. सदरचे तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदाराने जाबदार क्र.1 ते 14 या पतसंस्थेमध्ये भविष्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करुन स्वतःसह, पत्नी-मुलांच्या नांवे मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेली होती. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. |
पावती क्र. |
रक्कम रु. |
ठेवलेली तारीख |
परतीची तारीख |
1 |
0100 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
2 |
पावती संस्थेच्या ताब्यात आहे. |
10000 |
|
|
3 |
0099 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
4 |
0098 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
5 |
0097 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
6 |
0189 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
7 |
0096 |
10000 |
06/06/06 |
06/06/08 |
8 |
पावती संस्थेच्या ताब्यात आहे. |
25000 |
|
|
सदर गुंतवणूकीची मुदत संपल्यानंतर तक्रारदाराने जाबदारकडे अनेकवेळा तोंडी विनंती, तसेच संस्थेमध्ये अनेक वेळा हेलपाटे मारुनही जाबदारांनी रक्कम दिलेली नाही. ठेवपावत्यांची रक्कम विहीत मुदतीत न देणे ही सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारदाराचे म्हणणे असून ठेव पावत्यांची व्याजासह रक्कम व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व प्रकरण खर्च रु.3,000/- इ. मागण्या प्रस्तुत अर्जात जाबदारांनी केल्या आहेत. मूळ तक्रारअर्जातील जाबदार क्र.3, 5, 6, 8, 10 यांना वगळण्यात आले असून तक्रारदाराने नि.1 वर मूळ अर्जात काही बदल करुन पुढील जाबदारांना अंतर्भूत केले आहे.
जाबदार क्र.3 – प्रकाश बाबुराव देशमाने
जाबदार क्र.5 – सखाराम केशव गुरव
जाबदार क्र.6 – अजित श्रीपाल लंगडे
जाबदार क्र.8 – शंकर मारुती पवार
जाबदार क्र.10 – बबन ज्ञानू तपासे
जाबदार क्र.12 – बबन नारायण साळुंके
जाबदार क्र.14 – सुदाम बाळासो पावसे
3. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने अर्जासोबत स्वतःचे शपथपत्रासह नि.5 वर एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 3, 5, 6, 8, 10, 12, 13 यांनी आपले म्हणणे सादर केले नसलेने तसेच उपस्थिती दर्शविली नसलेने नि.क्र.1 वर त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
5. जाबदार क्र.4 यांनी नि.31 वर आपले लेखी कथन सादर केले आहे. त्यामध्ये तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. आपण संचालक कधीही नव्हतो असे कथन केले आहे.
6. जाबदार क्र.1, 2, 7, 9, 11, 14 यांनी नोटीस मिळूनही उपस्थिती दर्शविली नाही अथवा म्हणणे दाखल केले नाही.
7. तक्रारदाराची तक्रार, लेखी म्हणणे, कागदोपत्री पुरावे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
- कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 ते 3
1. तक्रारदाराने मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतविलेली होती त्याबाबत नि.क्र. 66 सोबत रक्कम भरल्याच्या मूठ ठेवपावत्या जोडलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-सेवादार नाते निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.
2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी (जाबदार क्र.4 वगळून) तक्रारदाराच्या मुदत ठेवीची मुदत पूर्ण होऊनसुध्दा तक्रारदाराच्या रकमेची परतफेड केलेली नाही ही सेवेतील त्रुटी आहे असे स्पष्टपणे दिसून येते.
3. नि.क्र.52 वर सहा.निबंधकांनी संचालकांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये जाबदार क्र.4 सुभाष आऊबा लवटे यांचे संचालक म्हणून नांव दिसून येत नाही. त्याप्रमाणे जाबदार क्र.4 यांनी आपले लेखी म्हणणे देऊन आपण जाबदार क्र.1 संस्थेचे कधीही संचालक नव्हतो असे कथन केले असून ते मंचाला मान्य करावे लागत आहे. त्यामुळे तक्रारदाराने क्र.4 वर त्यांना केलेले जाबदार म्हणून वगळण्यात येत आहे.
4. त्याचप्रमाणे नि.क्र.52 वर सहा.निबंधकांच्या यादीवरुन श्रीधर आबा गुरव हे संचालक असल्याचे दिसून येत आहे. मात्र तक्रारदाराने त्यांना जाबदार म्हणून समाविष्ट केलेले नसलेने त्यांनाही या प्रकरणातून वगळण्यात येत आहे.
5. तक्रारदाराने स्वतःची रु.10,000/- ची पावती व अनिषा अशोक खाडे हिची रु.25,000/- ची पावती जाबदार यांचेकडे त्रयस्थ इसमाच्या कर्जखात्यास तारण म्हणून संस्थेकडे जमा केली आहे. सदर पावती जाबदार संस्थेकडे आहे. त्याची रक्कमही तक्रारदारास मिळणे क्रमप्राप्त आहे.
6. जाबदार क्र.1 ही संस्था असून जाबदार क्र.2 ते 14 तिचे संचालक आहेत. संस्थेची पूर्ण आर्थिक जबाबदारी, त्यातील व्यवहार हे संचालक मंडळामार्फत होत असतात. त्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह वैयक्तिक अथवा संयुक्तपणे देणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 14 (जाबदार क्र.4 वगळून) आहे. त्याप्रमाणे मानसिक शारिरिक त्रासापोटी नुकसान तसेच प्रकरण खर्चापोटी तक्रारदारास रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे असे मंचाला वाटते. सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारीतील नमूद जाबदार क्र.1 ते 14 (जाबदार क्र.4 वगळून)यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या ठेवपावत्यांची एकूण रक्कम रु.1,10,000/- (रुपये एक लाख दहा हजार फक्त) दि.6/6/2008 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने तक्रारदारास अदा करावी.
3. शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- जाबदार क्र. 1 ते 14 (जाबदार क्र.4 वगळून) यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदारास अदा करावेत.
4. जाबदार क्र. 1 ते 14 (जाबदार क्र.4 वगळून) यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांना प्रकरण खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून 30 दिवसांत
करावी.
6. जाबदार यांनी विहीत मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 19/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष