जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/120. प्रकरण दाखल तारीख - 19/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 02 /08/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. शिवसिंह राजसिंह परदेसी रा. न्याय नगरी, वसरणी रोड, नांदेड अर्जदार विरुध्द. 1. सिध्दी विनायक फरगी पी.व्ही. टी.एल.टी.डी.(एस.टी.पार्सल) हेड ऑफिस धुळे गैरअर्जदार 2. सिध्दी विनायक फरगी पी.व्ही. टी.एल.टी.डी.(एस.टी.पार्सल) शाखा कार्यालय नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, दि.07.12.2009 रोजी त्यांचे यवतमाळच्या होलसेल व्यापारी यांना आमच्या कंपनीच्या मोना निलची अंर्जट ऑर्डर मिळाली होती. हा माल कंपनीने यावयास साधारण पाच ते सहा दिवस लागतील म्हणून कंपनीची वाट न बघता आमचे नादेडचे होलसेल व्यापारी यांना सांगितले की, तूमच्याकडून हा माल लवकरात लवकर यवतमाळला पोहचावा या हेतूने ट्रान्सपोर्ट मध्ये टाकून दया. त्याप्रमाणे दूस-याच दिवशी गैरअर्जदार यांना पार्सल ने पाठविले त्यासाठी त्यांनी पावती क्र.550-1216038 दिली. पण चौकशी केली असता आठ ते दहा दिवसांनी सूध्दा तो माल यवतमाळ येथे पोहचला नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांचे कार्यालयात तक्रार केली असता आमचा माल इतक्या उशिरा पोहचत नाही असे सांगीतले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेशी संपर्क केला व महिनाभर वाट पाहिली तरी माल मिळाला नाही. माल न पोहचवून गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व अशी मागणी केली आहे की,झालेल्या गैरसोयीबददल जास्तीत जास्त दंड लावावा. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस पाठवून ही ते गैरहजर राहीले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला व गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु त्यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ तपासून व त्यांनी केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदांराचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय होय 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी काही माल गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला त्या बाबतची गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेली पावती क्र.1216038 दि.08.12.2009 ची पावती दाखल केली आहे. त्यात मालाचे दोन डाग दिलेले आहेत, तसेच तो डाग नांदेड येथून यवतमाळ येथे पाठवावयाचा होता तसेच त्याबददल चार्जेस रु.107/- घेतलेले आहेत. म्हणजे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. अर्जदार यांचे दोन डाग यवतमाळ येथे पोहचले नाही म्हणून अर्जदार यांनी ही बाब त्यांनी शपथपञामध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे हे अर्जदाराचे म्हणणे खरे आहे की, वरील दोन डाग गैरअर्जदार क्र.1 कडे पोहचलेच नाहीत. तसेच त्यांचेकडे चकरा मारल्या असता उडवाउडवीची उत्तरे देत राहीले. तक्रार चालू असताना अर्जदार यांनी दि.05.06.2010 रोजी मंचासमोर अर्ज देऊन माल मिळाल्याचे म्हटले आहे पण माल चांगल्या स्थितीत नव्हता असे म्हटले आहे म्हणजे अर्जदाराचे मालाचे नूकसान झाले आहे हे सिध्द होते त्यामूळे अर्जदार हे नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत. गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर ते हजर झाले नाही व त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. यावरुन हेच दिसून येते की, त्यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे म्हणजे ञूटीची सेवा दिलेली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई बददल रु.1000/- व दावा खर्च म्हणून रु.500/- दयावेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आंत अर्जदार यांना नूकसान भरपाई बददल रु.1000/- व दावा खर्चा बददल रु.500/- दयावेत. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा.. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |