Maharashtra

Satara

cc/12/45

Anand Mohite - Complainant(s)

Versus

Siddhi Developers - Opp.Party(s)

31 Aug 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/12/45
 
1. Anand Mohite
Karanje Turf, Satara
...........Complainant(s)
Versus
1. Siddhi Developers
Satara
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

             

                तक्रार अर्ज क्र. 45/2012

                      तक्रार दाखल दि.16-03-2012.

                            तक्रार निकाली दि.31-08-2015. 

 

1. श्री. आनंद उत्‍तम मोहीते

2. श्री. भारत श्रीमंत खिलारे,

3. श्री. सुहास कृष्‍णा जंगम,

4. श्री. संतोष मानसिंग मोरे,

5. श्री. देवीदास कोंडीबा कदम,

6. श्री. मुरलीधर दगडुजी मोरे,

7. श्री. किरणकुमार मुरलीधर मोरे,

8. श्री. संजय वामन वाघ,

9. श्री. विजय वामन वाघ,

   अर्जदार क्र. 8 व 9 तर्फे मुखत्‍यार

   श्री. वामन आनंदराव वाघ

   सर्व रा. प्रथमेश गार्डन, स.नं.300,

   करंजे तर्फ, सातारा.                        ....  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

मे. सिध्‍दी डेव्‍हलपर्स तर्फे भागीदार

1. श्री. संतोष राजाराम चिंचणे,

2. श्री. दिनेश राजाराम चिंचणे,

   दोघे रा.इंदिरा गांधी वसाहत,

   साळुंखे विहार रोड, कोंढवा, पुणे 4.           ....  जाबदार.

 

                                 तक्रारदारांतर्फे अँड.व्‍ही.आर.बडदरे.

                                              अँड.एस.ए.पाटणकर.

                                 जाबदार तर्फे अँड.व्‍ही.आय.शेट्टी.                                

 

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                      

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे करंजे तर्फ सातारा येथील रहिवासी असून तर जाबदार हे जमीन विकत घेऊन विकसन करुन व त्‍यावर इमारती बांधून त्‍यातील सदनिकांची विक्री करत असतात.  जाबदाराने ‘प्रथमेश गार्डन’ या स्किमची जाहीरात राधीका रोड येथे लावलेली होती.  प्रस्‍तुत जाहीरात पाहून तक्रारदाराने जाबदार यांचेकडून माहीती घेवून, जाबदाराचे सांगणेवर विश्‍वास ठेवून, जाबदार यांच्‍या स्‍कीममध्‍ये तक्रारदाराने फ्लॅट घेण्‍याचे ठरवले.  जाबदाराने दिले माहितीनुसार व जाहीरातमध्‍ये नमूद केलेप्रमाणे जाबदार यांचे सदर स्‍कीमचे बांधकाम न्‍यू राधिका रोड, सर्व्‍हे नं.300, प्‍लॉट नं.12/13, भोसले मळा, करंजे तर्फ, हॉटेल राजताराच्‍या मागे, सातारा येथे सुरु होते.  प्रस्‍तुत जाबदार हे ‘सिध्‍दी डेव्‍हलपर्स’ या नावाने व्‍यवसाय करत होते.  तक्रारदाराने प्रस्‍तुत जाबदार यांचे सदर स्‍कीममध्‍ये फ्लॅट  खरेदी करणेचे ठरवल्‍यावर सर्व तक्रारदार व जाबदार यांचे दरम्‍यान वेगवेगळया तारखांना लेखी करारपत्रे झालेली आहेत.  सदरील करारात ठरलेप्रमाणे तक्रारदार यांनी फ्लॅटचे खरेदीपोटी ठरलेली सर्व रक्‍कम सर्व तक्रारदार यांनी वेगवेगळया तारखांना अदा केली आहे.  याबाबतीत तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये कोणताही वाद नाही.  कारण करारात ठरलेली सर्व रक्‍कम यातील सर्व तक्रारदारांनी जाबदाराला अदा केलेनंतरच करारात ठरलेप्रमाणे फ्लॅटचा/सदनिकेचा ताबा जाबदाराने सर्व तक्रारदार यांना वेगवेगळया तारखांना दिलेला आहे.  प्रस्‍तुत ‘प्रथमेश गार्डन’ या अपार्टमेंटमधील सदनिकेमध्‍ये तक्रारदार राहणेस गेलेनंतर सदर इमारतीमधील बांधकामातील उणिवा तक्रारदाराचे लक्षात आलेनंतर त्‍याबाबत तक्रारदाराने जाबदाराचे निदर्शनास त्‍या बांधकामातील उणीवा आणून दिल्‍या, त्‍यावेळी जाबदाराने प्रस्‍तुत उणीवा काढून देतो असे आश्‍वासन वेळोवेळी तक्रारदारांना दिले आहे.  परंतू प्रत्‍यक्षात बांधकामातील उणीवांचे निराकारण जाबदाराने आजअखेर केलेले नाही.  तक्रारदाराने ब-याच उणिवा, रहायला गेलेनंतर स्‍वखर्चाने दूर केलेल्‍या आहेत.  प्रस्‍तुत जाबदाराने ‘प्रथमेश गार्डन’ मधील सर्व सदनिकाधारकांना कांही सामाईक सोयीसुविधा देणेचे मान्‍य व कबूल केलेले होते.  परंतू त्‍याचे निराकारण जाबदाराने केलेले नाही.  तक्रारदारांनी अनेकवेळी लेखी व तोंडी कळवूनही जाबदार यांनी सामाईक सोयीसुविधा देणेबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.  सबब तक्रारदार यांनी जाबदार यांना अँड अशोक जाधव यांचेमार्फत नोटीस पाठवून सामाईक सुविधांचे निराकरण करणेबाबत कळविले, परंतू जाबदार यांनी प्रस्‍तुत नोटीस घेण्‍याचे टाळले.  त्‍यामुळे नोटीस परत आली.  त्‍यामुळे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना सामाईक सोयीसुविधा करुन मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

     जाबदार यांनी तक्रारदार यांना दिले सामाईक सोयीसुविधांमधील उणीवा खालीलप्रमाणे,-

     अ.  जाबदार यांनी तक्रारदार यांना दिले ‘प्रथमेश गार्डन’ या इमारतीच्‍या समाईक पार्कींगच्‍या जागेत पत्र्याचे शेड उभारलेले आहे.  सदर शेडमध्‍ये जाबदाराने त्‍यांचे साहित्‍य ठेवून शेडला कुलूप लावले आहे.  सदर शेडमुळे तक्रारदार यांना पार्कींग जागेत अडचण निर्माण झाली आहे.  तसेच प्रस्‍तुत शेडमधील जुन्‍या अडगळीच्‍या सामानामुळे  शेडमध्‍ये साप, विंचू यासारखे विषारी प्राणी आसरा घेत आहेत.  त्‍यामुळे या इमारतीतील फ्लॅटधारकांच्‍या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.  तसेच वाहने पार्कींगची गैरसोय होत आहे.  याबाबत जाबदारांना वेळोवेळी तक्रारदारानी कळविले तरी ही  जागा रिकामी केली नाही.  प्रस्‍तुत शेड काढून जागा खुली करुन मिळावी.

   ब.   ‘प्रथमेश गार्डन’ इमारती शेजारील प्‍लॉट नं. 14 मध्‍ये डिसेंबर, 2011 ला प्‍लॉटचे मालकांनी बांधकाम सुरु केले आहे.  त्‍यावेळी मोजणी करताना लक्षात आले की जाबदार यांनी जमीनीखालील समाईक पाण्‍याच्‍या टाकीचे बांधकाम प्‍लॉट नं. 14 च्‍या दक्षिणेकडील हद्दीत अतिक्रमण करुन बांधले असलेचे तक्रारदार यांचे डिसेंबर,2011 मध्‍ये निदर्शनास आले.  त्‍यामुळे प्रस्‍तुत समाईक पाण्‍याचे टाकीचे प्‍लॉट नं. 14 मधील अतिक्रमण काढून जाबदेणार यांनी प्रथमेश अपार्टमेंटचे जमीनीखालील समाईक जागेत प्रस्‍तुत पाण्‍याची टाकी बांधावी.

    क.  जाबदाराने ‘प्रथमेश गार्डन’ या इमारती सभोवतालची समाईक जागेतील (इमारतीच्‍या पूर्वेकडील व उत्‍तरेकडील) जवळ-जवळ 1000 चौ.फू. क्षेत्र अनाधिकृतपणे, बेकायदेशीरपणे श्री. दरवेशी यांना विकले आहे.  सदरची बाब जाबदारांना नोटीसने कळविली असता नोटीस स्विकारली नाही परत आली आहे. प्रस्‍तुत समाईक जागा जाबदाराने तक्रारदारांना वापरणेस खुली करुन द्यावी.

    ड.  ‘प्रथमेश गार्डन’ इमारतीकरीता केलेले सेफ्टी टँकचे बांधकाम अर्धवट व असुरक्षित असे केले आहे.  सदर सेफ्टी टँकचे चेंबर उघडे ठेवलेले आहेत.  तक्रारदार श्री. मोरे यांचा मुलगा सदर टाकीत पडला होता.  सदर टँकचे बांधकाम हे तक्रारदार व त्‍यांचे कुटूंबियांच्‍या जीवीतास धोका निर्माण करणारे आहे.  सेफ्टी टँक व त्‍यावर टाकलेला स्‍लॅब यामध्‍ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  तेथून सदर टँकमध्‍ये केरकचरा जात आहे.  सेफ्टी टँकचे झाकन उघडेच आहे.  तक्रारदारांनी तो नारळाच्‍या झावळयांनी झाकला आहे. तो नव्‍याने स्‍वतंत्र बांधकाम, न खचणारे, उत्‍तम दर्जाचे करुन तो झाकणासह अच्‍छादित करुन द्यावा.  

    ई.  जाबदाराने ‘प्रथमेश गार्डन’ या इमारतीला दिले कंपाऊंड वॉलपैकी अपार्टमेंटचे पश्चिमेकडील ओढयाकडील रिटेनिंग वॉल बाहेरचे बाजूस झुकली आहे.  दोन भिंतींचे कोप-यात मोठा गॅप पोकळी निर्माण झाली आहे.  प्रस्‍तुत ओढा हा 15 ते 20 फूट खोल आहे.  सदर ओढयाकडील रिटेनिंग वॉल टाळण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार व त्‍यांचे कुटूंबीयांच्‍या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. 

    फ.   तक्रारदार व जाबदार यांचेत ठरले कराराप्रमाणे फ्लॅट खरेदीपोटी ठरलेली सर्व रक्‍कम जाबदाराला तक्रारदार यांनी अदा केलेली असतानाही तक्रारदार क्र. 1 ते 9 यांना प्रस्‍तुत फ्लॅटचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. तसेच तक्रारदारांना बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला, भोगवटापत्र व खरेदीपत्र करुन दिलेले नाही.

    अशाप्रकारे तक्रारदारांना सामाईक सोयीसुवीधा देणेमध्‍ये जाबदाराने कमतरता केलेली आहे.  त्‍यामुळे सदरचा तक्रार अर्ज सर्व तक्रारदारांनी याकामी जाबदारांकडून प्रस्‍तुतच्‍या सोयीसुविधा व त्‍यातील उणीवा पूर्ण करुन मिळणेसाठी मे. मंचात दाखल केला आहे.

2.    तक्रारदारानी प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदार क्र. 1 ते 9 यांना त्‍यांचे फ्लॅटचे खरेदीपत्र करुन मिळावे, तक्रारदाराने तक्रार अर्ज पॅरा क्र. 6 अ ते फ मध्‍ये नमूद केलेल्‍या सामाईक सोयीसुविधांमध्‍ये केलेल्‍या उणीवा काढून दुरुस्‍त करुन देण्‍याचे आदेश जाबदाराला व्‍हावेत.  जर जाबदार यांनी प्रस्‍तुत उणीवा दूर केल्‍या नाहीत तर प्रस्‍तुत उणीवा काढणेसाठी व बांधकामातील कमतरता दूर करणेसाठी येणारा खर्च जाबदारांकडून तक्रारदारांना मिळावा, जाबदार यांनी तक्रारदार यांना सोसायटी रजिस्‍टर करुन घेणेबाबत आदेश व्‍हावेत, अर्जाचा खर्च म्‍हणून जाबदाराकडून रक्‍कम रु.5,000/- मिळावेत तर तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मिळणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.   

3. तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी नि. 2 ते 9 कडे अँफीडेव्‍हीट/प्रतिज्ञापत्रे, नि. 16 चे कागदयादीसोबत नि.16/1 ते 16/7 कडे अनुक्रमे तक्रारदार खिलारे व जाबदार यांचेदरम्‍यान झालेला करारनामा सर्टीफाईड प्रत, तक्रारदारांने जाबदाराला वकीलामार्फत पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, नोटीस परत आलेला लखोटा, तक्रारदार भारत खिलारे यांनी जाबदार यांना रक्‍कम अदा केलेचा एच.डी.एफ.सी बँकेचा दाखला, जाबदाराने श्री. शैलेंद्र दरचेशी यांना करुन दिले करारनाम्‍याची प्रत, वाद मिळकतीचे फोटो, तक्रारदार क्र. 8 व 9 यांनी वामन वाघ यांना करुन दिलेले मुखत्‍यारपत्र, नि.24,25 कडे शपथपत्र, नि. 26 कडे लेखी युक्‍तीवाद, नि. 25 अ चे कागदयादी सोबत प्रथमेश गार्डन या इमारतीचा मंजूर आराखडा, जाबदाराने केलेले डीड ऑफ डिक्‍लेरेशन, तक्रारदार क्र. 1 यांना जाबदाराने फ्लॅट क्र.एफ 2 चे करुन दिलेले साठेखत, तक्रारदार क्र. 1 ने जाबदार यांना पाठवलेली नोटीस प्रत, प्रस्‍तुत नोटीस जाबदाराला मिळालेली पोहोच पावती, तक्रारदार क्र. 2 ते 9 यांनी जाबदाराला पाठवलेली नोटीस व त्‍याची पोहोचपावती, मौजे करंजे तर्फ सातारा येथील सि.स.नं. 300, प्‍लॉट क्र. 12 व 13 मधील ‘प्रथमेश गार्डन’ या मिळकतीबद्दल, गर्व्‍हमेंट व्‍हॅल्‍यूएटर व इंजिनियर शशीकांत धुमाळ यांनी तक्रारदाराला दिलेला इमारत पाहणी अहवाल, नि. 33 कडे जादा पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 34 कडे पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे.

4.  जाबदार यांनी नि. 33 कडे त्‍यांचे म्‍हणणे व नि. 33/अ कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट हाच जाबदार यांचा पुरावा समजणेत यावा या व्‍यतिरिक्‍त जादा पुरावा जाबदारांना देणेचा नाही अशी पुरसीस, नि.44 कडे जाबदाराचा लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत.  जाबदार क्र. 1 व 2 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये पुढील आक्षेप नोंदवलेले आहेत.

      तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व त्‍यातील कथने मान्‍य व कबूल नाहीत, तक्रार अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही, तक्रारदार हे स्‍वच्‍छ हाताने आलेले नाहीत, जाबदाराने करारात नमूद केले अटी व शर्थी यांचे व्‍यतिरिक्‍त कोणत्‍याही प्रकारचे आश्‍वासन तक्रारदारांना कधिही दिलेले नव्‍हते व नाही.  तक्रारदार क्र. 7 ते 9 यांचेकडून जाबदार यांना जादा कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.  जाबदाराने उणिवा व बांधकामातील त्रुटी दूर करुन दिल्‍या नसलेने  तक्रारदाराने स्‍वखर्चाने त्‍या त्रुटी व उणिवांचे निराकारण केलेचे कथन मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदारांच्‍या बिल्डिंगमध्‍ये सामाईक सुविधांमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची त्रुटी राहीलेली नाही.  त्‍यामुळे त्‍याचे निराकारण करणेचा प्रश्‍नच येत नाही.  विनाकारण खोटया मजकूराची नोटीस तक्रारदाराने जाबदाराला पाठवली आहे.  जाबदाराने इमारती भोवतालची समाईक 1000 चौ.फूट जागा कधीही विक्री केलेली नाही.  या जागेत जाबदाराने सामाईक मंदिर स्‍वखर्चाने बांधलेले आहे व मंदिराच्‍या सभोवतालची जागाही तक्रारदार वापरतात.  प्‍लॉट नं. 14 चे मालकाने त्‍यांचे जागेत अतिक्रमण केलेची कोणतीही तक्रार जाबदारांविरुध्‍द केलेली नाही.  तसेच सेफ्टी टँकचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित असून कोणाचेही जीवीतास धोका निर्माण होऊ शकत नाही. व झालेला नाही.  इमारतीच्‍या कंपौंडच्‍या सर्व भिंती सुस्थितीत बांधून दिल्‍या आहेत.  तक्रारदार क्र. 7 ते 9 यांचे फ्लॅटमध्‍ये जादा काम (जादा किचन कट्टा, व किचन व बाथरुममध्‍ये जादा टाईल्‍स बसवून दिल्‍या आहेत, जादा खिडकी, वॉल टाईल्‍स सिलींग पर्यंत बसवून दिले आहे.  या जादा कामाचे पैसे सदर तक्रारदारांनी अद्याप जाबदार यांना अदा केलेले नाहीत.  त्‍यामुळे तक्रार अर्ज मान्‍य नाही.  तक्रारदार यांना जाबदाराने खरेदीपत्र करुन देणेस कधीही टाळाटाळ केली नाही.  तक्रारदार स्‍वतःच खरेदीपत्र करुन घेणेस टाळाटाळ करत आहेत.  सबब तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.  जानेवारी, 2012 चे दरम्‍यान जाबदार देवदर्शनासाठी सर्व कुटूंबियांसमवेत बाहेरगावी पश्चिम बंगाल येथे गेले होते.  त्‍यामुळे तक्रारदाराने पाठवले नोटीस कधीही जाबदाराला मिळाली नव्‍हती व नाही.  सबब विनाकारण तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल करुन जाबदार यांना खर्चास भाग पाडलेबद्दल तक्रारदार यांचेकडून जाबदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.25,000/- मिळावेत.  तक्रारदाराला तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदाराने मे. मंचात दाखल केले आहे.

5.  प्रस्‍तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे, जाबदारांचे म्‍हणणे, तक्रारदार व जाबदार यांचा पुरावा यांचे  काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.नं.                 मुद्दा                              निष्‍कर्ष

1.   तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ?                होय

2.   जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?      होय

3.   अंतिम आदेश काय ?                                                                  खालील नमूद

                                                    आदेशाप्रमाणे  

विवेचन-

6.   वर नमूद मुद्दा क्र.1 व 2  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- सर्व तक्रारदार यांनी जाबदार यांचे न्‍यू राधिका रोड, सर्व्‍हे नं. 300, प्‍लॉट नं. 12/13, भोसले मळा, करंजे तर्फ हॉटेल राजताराच्‍या मागे, सातारा येथे बांधलेल्‍या ‘प्रथमेश गार्डन’ या अपार्टमेंटमधील अनुक्रमे फ्लॅट नं.एफ-6, एस.टी.1, एस.2, एस.टी.1, एस.4, एफ- 3, एफ-4 असे फ्लॅट जाबदार यांचेकडून खरेदी घेणेचे ठरविले व तसा नोंदणीकृत खरेदी करारनामा Agreement to sale  जाबदार यांनी तक्रारदार यांना करुन दिला आहे व करारनाम्‍यात नमूद केलेप्रमाणे वेगवेगळया बांधकामाचे टप्‍पे पूर्ण होतील तस-तसे  तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्‍कम अदा केलेली आहे व करारात ठरलेप्रमाणे रक्‍कम जाबदाराने स्विकारुन नंतरच फ्लॅटचा ताबा दिलेला आहे.  तसेच त्‍याबाबतचे संदर्भांत खरेदी करारपत्रे तक्रारदार यांनी याकामी नि. 25 अ चे कागदयादीसोबत दाखल केली आहेत.  तसेच जाबदार यांनी करुन दिलेले डीड ऑफ डिक्‍लेरेशन ही याकामी नि. 25 अ चे कागदयादीसोबत दाख्‍ंल आहे.  तक्रारदार यांना सदर फ्लॅटचे साठेखत करुन दिलेचे जाबदाराने मान्‍य केले आहे.  सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद सिध्‍द होते.  तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना दिले फ्लॅटमध्‍ये जाबदाराने राखलेल्‍या उणीवा वारंवार जाबदार यांना निदर्शनास आणून देऊनही जाबदार यांनी त्‍या उणिवा पूर्ण केल्‍या नाहीत तर तक्रारदार यांनी स्‍वखर्चाने प्रस्‍तुत उणिवा दूर केल्‍या आहेत.  तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना कराराप्रमाणे द्यावयाच सामाईक सोयी सुविधामध्‍येही खालीलप्रमाणे उणिवा असलेचे नि. 25 अ चे कागदयादीसोबत अनुक्रमे नं. 26 कडे गर्व्‍हमेंट व्‍हॅल्‍यूएटर व इंजिनियर श्री. शशिकांत धुमाळ यांचा इमारत पाहणी अहवाल याकामी दाखल केलेला आहे.  प्रस्‍तुत अहवालावरुन असे स्‍पष्‍ट होते की, प्रस्‍तुत इमारतीच्‍या पार्कींगचे जागेत जाबदार यांनी 21.55 sq. m. A.C.  शीटने पार्टीशन करुन शेड उभारले आहे.  तसेच त्‍यांनी पुढीलप्रमाणे  opinion दिले आहे. 

     1.  Underground Water Storage Tank -  Underground Storage  tank is constructed separately at proper place i.e. side margin of  Building with waterproof plaster insider the tank as per design  and drawing.

           2.   Retaining Wall  -  Due to lateral Pressure of soil, balance of septic tank goes outside day by day , & there is no any remedies to develop stability or prevent failure of Retaining Wall, So I give suggestion as per my knowledge reconstruct R.C.C. retaining Wall as per R.C.C. design & drawing with proper work and  material Specification.

         3.   Septic Tank -  After starting use of septic tank there we can’t do any internal construction work like Waterproof Plaster & we Can’t  remove top slab, only when we can repair or renovate when septic tank is totally dry condition.

         As per my knowledge I give suggestion reconstruct septic tank separately at proper place of side margin or Building as per design & drawing as per proper work specification and connect to the outlet to soak pit with proper Inlet and outlet chamber with gas cut pipe up to terrace of top floor.

       याप्रमाणे व्‍हॅल्‍युअर व इंजिनियर धुमाळ यांनी त्‍यांचे इन्‍स्‍पेकशन रिपोर्टमध्‍ये मत दिले आहे.  प्रस्‍तुत रिपोर्टसोबत त्‍यांनी तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे सामाईक सोयी सुविधांमध्‍ये उणीवा असलेले त्‍या-त्‍या भागाचे फोटो मे. मंचात दाखल केले आहेत.  प्रस्‍तुत इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्टवर जाबदाराने कोणतेही आक्षेप नोंदवलेले नाहीत. तसेच सदरचा रिपोर्ट खोटा असलेचे शाबीत करणेसाठी कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदाराने याकामी दाखल केलेला नाही.  तसेच प्रस्‍तुत इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्टसोबत दाखल केले फोटोबाबतही जाबदाराने कोणतेही आक्षेप नोंदविलेले नाहीत.  सबब तक्रारदार यांनी श्री. शशिकांत धुमाळ यांचेमार्फत इमारतीची पाहणी करुन प्रस्‍तुत धुमाळ यांनी केले इमारत पाहणीचा अहवाल मे. मंचात नि. 15 अ चे कागदयादीसोबत अ.नं.26 कडे दाखल आहे तो योग्‍य व विश्‍वासार्ह आहे असे म्‍हणणे न्‍यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व या रिपोर्टमध्‍ये दिले रिपोर्टनुसार जाबदाराने तक्रारदाराचे कथनाप्रमाणे सामाईक सोयीसुविधांमध्‍ये तक्रार अर्जात नमूद केलेनुसार उणिवा/त्रुटी राखलेचे निदर्शनास येते व सदरची बाब तक्रारदाराने कागदोपत्री पुराव्‍यानुसार सिध्‍द केलेली आहे.  म्‍हणजेच जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी/कमतरता केली असून अशी कमतरता/उणीवा राखलेल्‍या नाहीत हे दाखवणेसाठी जाबदार यांनी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही.  सबब प्रस्‍तुत जाबदार यांनी याकामी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे हे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेले आहे.  त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.  तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना खरेदीपत्रे करुन दिलेली नाहीत हे स्‍पष्‍ट झालेले आहे ही सेवेतील त्रुटीच आहे.

        वरील स्‍पष्‍टकरण, दाखल सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन करता, जाबदार यांनी सर्व तक्रारदार यांना त्‍यांचे करारपत्रात नमूद केले फ्लॅटचे रजिस्‍टर खरेदीपत्र करुन देणे, तसेच तक्रार अर्ज कलम 6 मधील अ ते फ मध्‍ये नमूद सामाईक सोयीसुविधांमध्‍ये ठेवलेल्‍या उणीवा काढून त्‍या दुरुस्‍त करुन देणे न्‍यायोचीत होणार आहे.  तसेच उणीवा काढून दुरुस्‍त करुन देणे जाबदार यांना शक्‍य नसलेस प्रस्‍तुत उणीवा काढून दुरुस्‍तीसाठी येणारा खर्च जाबदार यांनी तक्रारदार यांना देणे, तक्रारदार यांना सोसायटी रजिस्‍टर करुन देणे न्‍यायोचीत होणार आहे.  तसेच  तक्रारदार यांना झालेला मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी जाबदार यांचेकडून योग्‍य ती रक्‍कम तक्रारदार यांना मिळणे न्‍यायाचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.   सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.         

7.  सबब आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.    

आदेश

1.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  सर्व तक्रारदारांना त्‍यांचे फ्लॅटची रजिस्‍टर खरेदीपत्रे जाबदाराने करुन द्यावीत.

3.  जाबदार यांनी तक्रारदारांनी तक्रार अर्ज पॅरा क्र. 6 अ ते फ मध्‍ये नमूद केले

    सामाईक सुविधांमधील उणीवा काडून त्‍या दुरुस्‍त करुन द्याव्‍यात.  जर

    जाबदार यांना प्रस्‍तुत उणीवा काढून दुरुस्‍त करुन देणे अशक्‍य असेत तर

    प्रस्‍तुत उणिवा काढून दुरुस्‍तीसाठी येणारा सर्व खर्च जाबदार यांनी तक्रारदार

    यांना अदा करावा.

4.  जाबदाराने तक्रारदार यांना सोसायटी रजिस्‍टर करुन द्यावी.

5.  जाबदार यांनी सर्व तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण

    रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र)  अदा करावेत.

6.  प्रस्‍तुत अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) जाबदारांनी

    तक्रारदारांना अदा करावेत.

7.  वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45

    दिवसात करावे.

8.  विहीत मुदतीत जाबदारांनी आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदार यांना

    जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई

    करणेची मुभा राहील.

9.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

10.  सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

ठिकाण- सातारा.

दि. 31-08-2015.

 

(सौ.सुरेखा हजारे)    (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

सदस्‍या             सदस्‍य             अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.