जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 128/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/04/2008 प्रकरण निकाल तारीख - 30/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. विनोद पि.रामराव पाटील वय 30 वर्षे धंदा व्यवसाय अर्जदार. रा. दिपनगर, नांदेड. विरुध्द. श्री. श्याम जाधव प्रो.प्रा.सुमाशंकर मार्केटींग आशिर्वाद कॉम्प्लेक्स, आनंद नगर रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अभय.व्ही.चौधरी गैरअर्जदार तर्फे वकील - अड.अमीत डोईफोडे. निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) गैरअर्जदारांनी अर्जदार यांना कमी दर्जाचा माल मिळाला व ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक असून ते नांदेड येथे राहतात. अर्जदार यांनी दि.02.10.2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून राजा सोफासेट नांवाचा सोफासेट रु.14,725/- देऊन खरेदी केला. सात वर्षे कूठलीच तक्रार अथवा अडचण येणार नाही अथवा बीघाड होणार नाही असे सांगितले. सोफासेट खरेदी नंतर वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड दिले नाही. खरेदीकेल्यानंतर सात ते आठ महिन्यानंतर स्पींग्र गळून पडू लागल्यामूळे बसल्यानंतर आरामदायी न राहाता ञासदायक ठरु लागले, तसेच सोफासेट स्पीग्र गळून पडल्यामूळे टोचू लागला. या बाबत त्यांने गैरअर्जदाराकडे तोंडी तक्रार केली परंतु त्यांनी दूरुस्त करुन दिला नाही. त्यामूळे अर्जदाराने दि.17.1.2008 रोजी रजिस्ट्रर्ड पोस्टाने लेखी तक्रार व तसेच वकिलामार्फत नोटीस पाठवीली,परंतु दि.13.2.2008 पर्यत त्यांनी कूठलाही प्रतिसाद दिला नाही, फसवणूक करुन ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, राजा सोफासेट यांची किंमत व्याजासहीत दयावी किंवा नवीन सोफासेट बदलूनदयावा, तसेच मानसिक ञासाबददल व दावा खर्च म्हणून रु.30,000/- दयावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी दि.02.10.2006 रोजी सोफासेट खरेदी केला त्यांची किंमत रु.14,725/- असून अर्जदाराने रु.7000/- रोख दिलेले आहेत व बाकी रु.7,525/- आहेत. अर्जदाराने सोफासेट स्वतः पाहून व तपासून घेतला आहे. गैरअर्जदाराने कोणतीही सोफासेटची गॅरंटी दिलेली नाही. गैरअर्जदाराने काहीही लपवून ठेवलेले नाही. मालात बीघाड होणारच नाही किंवा तो वापस घेतला जाईल यांची कोणतीही हमी दिलेली नाही. फक्त मालामध्ये काही दूरुस्तीची आवश्यकता असल्यास तो दूरुस्त करुन दिला जाईल असे स्पष्ट सांगितले होते. गैरअर्जदारास अर्जदाराकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. मा. मंचाने विधिज्ञाची नेमणूक कमीशनर म्हणून करावी त्यांचे समोर सोफासेटची पाहणी करुन तो दूरुस्त करुन दिला जाईल. अर्जदाराकडे येणे बाकी आहे तशी नोंद पावती केलेली आहे व त्यावर अर्जदाराची सही आहे. बाकी रक्कम बूडविण्याच्या हेतूने त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गैरअर्जदाराच्या सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. अर्जदाराने पुरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच सूमाशंकर मार्केटींगची पावती हे कागदपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून श्री. श्याम शंकरराव जाधव यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली आहे. अर्जदारातर्फे व गैरअर्जदारातर्फे कोणीही हजर नाही म्हणून मंचाने तक्रार गूणवत्तेवर आधारीत निकालासाठी घेतली. यातील अर्जदारांनी प्रतिउत्तर दिले नाही व गैरअर्जदाराने म्हणणे खोडून काढले नाही. तसेच अर्जदारांनी गैरअर्जदार यांना नोटीस दिल्याची बाब नमूद केलेली आहे व नोटीसची प्रत दाखल केलेली आहे. ती नोटीस गैरअर्जदार यांनी मिळाल्याची बाब स्पष्टपणे नाकारली आहे आणि अर्जदार यांनी त्या बाबत पोहच पावती दाखल केलेली नाही. त्यामूळे नोटीस दिल्याची बाब अर्जदार सिध्द करु शकले नाही. वॉरंटी/गॅरंटी बददल पावतीमध्ये उल्लेख नाही. अशा परिस्थितीत अर्जदार हे आपली तक्रार योग्य त्या पूराव्यानीशी सिध्द करु शकले नाहीत. माञ गैरअर्जदार यांनी या प्रकरणात असे कबूल केले आहे की, अर्जदार यांच्या सोफयाचे स्प्रिंग नीघाले असेल तर ते दूरुस्त करण्यास तयार आहेत. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे सोफा दूरुस्तीसाठी आदेश प्राप्त झाल्यापासून एक महिन्यांचे आंत नेऊन दयावा व गैरअर्जदार यांनी तो दूरुस्त करुन अर्जदारास दयावा. 3. अर्जदाराच्या इतर मागण्या नामंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक |