अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/284/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 23/06/2006
तक्रार निकाल दिनांक : 28/12/2011
श्रीमती. शालिनी जे. चौधरी, ..)
रा. सोरतापवाडी, खालिल नायगाव, ता. हवेली, ..)
जिल्हा – पुणे. ..).. तक्रारदार
विरुध्द
1. श्री. श्याम घोष, ..)
चिफ एक्झीक्युटीव मॅनेजर, ..)
बजाज आलियांझ लाईफ इन्श्युरन्स कंपनी लि., ..)
जी. ई. प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा, ..)
पुणे – 411 006. ..)
..)
2. श्री. आशिष जोशी, ..)
ब्रॅन्च मॅनेजर, M02 ब्रॅन्च, ..)
आलियांझ लाईफ इन्श्युरन्स कंपनी लि., ..)
वर्धमान बिल्डींग, 4था मजला, ..)
7 लव्हज हॉटेल जवळ, शंकरशेठ रोड, ..)
पुणे – 411 042. ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/162/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/284/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांना नोटीस काढली असता तक्रारदारांची नोटीस “ घेण्यास नकार” या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 28/12/2011