Maharashtra

Nagpur

CC/215/2017

Sarsurenana Sukhdas Ghodeswar - Complainant(s)

Versus

Shubham Trading Company, Through its Proprietor Ishwar Lakshane - Opp.Party(s)

Adv. Shahida Parween

04 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/215/2017
( Date of Filing : 09 May 2017 )
 
1. Sarsurenana Sukhdas Ghodeswar
R/o. Plot No. 829, Gumgaon Mine, Vaishali Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shubham Trading Company, Through its Proprietor Ishwar Lakshane
Jivan Tower, Vaishali Nagar, Last Bus Stop, Nagur 440017
Nagpur
Maharashtra
2. The Manager, Capital First
222, Vishnu Vaibhav Building, 3rd floor, Palm Road, Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Jan 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन वॉशिंग मशिन विकत घेतली होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे इलेक्‍ट्रॉनिक सामान विकण्‍याचा व्‍यापार करतात. आपसात चर्चा झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारदारास मायक्रोवेव मशिन कर्जावर विकत घेण्‍याकरीता सुचविले व विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांनी तक्रारदारास बिनव्‍याजी कर्ज मिळवून देण्‍याचे आश्‍वासीत केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने र्व्‍हलपुल  कंपनीची वॉशिंग मशिन एकुण रक्‍कम रुपये १३०००/- मध्‍ये घेण्‍याचे निश्‍चीत केले. त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रुपये ३०००/- अग्रीम राशी दिली व उर्वरीत रक्‍कम १०,०००/- रुपये १२५०/- रुपयाच्‍या सारख्‍या आठ हप्‍त्‍यांमध्‍ये देण्‍याचे ठरले. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने रक्‍कम रुपये ६५००/- रुपयात मायक्रोवेव ओवन घेण्‍याकरीता ८१२.५/- रुपयांचे आठ सारख्‍या हप्‍त्‍यामध्‍ये कर्ज घेण्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन कर्ज घेण्‍याचे निश्‍चीत केले.  याकरीता सुद्धा विरुध्‍दपक्ष क्रमांक १ ने विरुध्‍दपक्ष क्रमांक २ कडुन बिनव्‍याजी कर्जाची सुविधा तक्रारकर्त्‍यास उपलब्‍ध करवुन दिली. परंतु तक्रारकर्त्‍यास आजतागायत मायक्रोवेव ओवन चे देयक (Bill) प्राप्‍त झालेले नाही. मंचात तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारकर्त्‍याकडुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची वसुली चालु होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन कर्ज दिलेल्‍या  रकमेपेक्षा भरपुर जास्‍त प्रमाणात वसुली केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन दिनांक १८/११/२०१६ रोजी कर्जाचे विवरण मागविले. त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याच्‍या लक्षात आले की, त्‍यांच्‍याकडुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने भरपुर जास्‍त प्रमाणात वसुली केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन एल.ई.डी. करीता कर्ज घेतले नव्‍हते. तरी सुद्धा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन एल.ई.डी. ची वसुली केली आहे.  त्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ला कायदेशीर नोटीस पाठविली.
  3. तक्रारकर्त्‍याचे मागणी प्रमाणे - विरुध्‍द पक्षाने सेवेत ञुटी केली असल्‍याचे घोषित करावे व तक्रारकर्त्‍याकडुन जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रुपये ४७,२१०/- द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याज दराने ऑगस्‍ट २०१५ पासुन ते तक्रारकर्त्‍यास प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत देण्‍याचे आदेशीत करावे तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- अदा करण्‍याचे आदेशीत करावे.
  4. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठ‍वूनही विरुध्‍द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही, करीता मंचाने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १६/११/२०१७ रोजी पारीत करण्‍यात आला. तसचे विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांचे विरुध्‍द प्रकरण लेखी जबाब शिवाय पुढे चालविण्‍याचा आदेश दिनांक १६/११/२०१७ रोजी पारित  करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर सादर केलेले दस्‍ताऐवज, तक्रारकर्त्‍याचा वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून मंचाने खालिल मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविली आहे.

अ.क्र.            मुद्दे                                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

दिली काय ?                                                                             होय

  1. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन वॉशिंग मशिन विकत घेतली होती. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने र्व्‍हलपुल  कंपनीची वॉशिंग मशिन एकुण रक्‍कम रुपये १३०००/- मध्‍ये घेण्‍याचे निश्‍चीत केले. त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रुपये ३०००/- अग्रीम राशी दिली व उर्वरीत रक्‍कम १०,०००/- रुपये १२५०/- रुपयाच्‍या सारख्‍या आठ हप्‍त्‍यांमध्‍ये देण्‍याचे ठरले. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडुन रक्‍कम रुपये ६५००/- रुपयात मायक्रोवेव ओवन घेण्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यास रुपये देण्‍याकरीता ८१२.५/- रुपयांचे आठ सारख्‍या हप्‍त्‍यामध्‍ये देण्‍याचे निश्‍चीत केले. याकरीता सुद्धा विरुध्‍दपक्ष क्रमांक १ ने विरुध्‍दपक्ष क्रमांक २ कडुन बिनव्‍याजी कर्जाची सुविधा तक्रारकर्त्‍यास उपलब्‍ध करवुन दिली. परंतु तक्रारकर्त्‍यास आजतागायत मायक्रोवेव चे देयक (Bill) प्राप्‍त झालेले नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन उपरोक्‍त कर्जाची वसुली चालु केली. मंचात तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारकर्त्‍याकडुन वसुली चालु होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन कर्ज दिलेल्‍या रकमेपेक्षा भरपुर जास्‍त प्रमाणात वसुली केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन दिनांक १८/११/२०१६ रोजी कर्जाचे विवरण मागविले. त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याच्‍या लक्षात आले की, त्‍यांच्‍याकडुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन रुपये ४७२१०/- रकमेची वसुली केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ला कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन एल.ई.डी. करीता कर्ज घेतले नव्‍हते. तरी सुद्धा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्‍याकडुन एल.ई.डी. च्‍या रकमेची वसुली केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या निशानी क्रमांक २ वरील दस्‍ताऐवजाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन वॉशिंग मशिन करीता रुपये ३०००/- नगद दिल्‍याची पावती दाखल आहे. त्‍याचप्रमाणे कर्ज वसुलीचे विवरणपञ, वकीलाची नोटीस व त्‍याची पोच पावती इत्‍यादी दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे. सदर दस्‍ताऐवजावरुन दिसून येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याकडुन ठरल्‍यापेक्षा जास्‍त रक्‍कम तक्रारकर्त्‍याकडुन वसुल केलेली  आहे. सबब विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी सेवेत ञुटी केली असल्‍याचे निष्‍पन्‍न होते. करिता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याकडुन कर्ज वसुलीपोटी जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रुपये ४७२१०/- तक्रारकर्त्‍यास द.सा.द.से ६ टक्‍के व्‍याज दराने ऑगस्‍ट २०१५ ते प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत देण्‍यात यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाकरीता रुपये ५०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०००/- देण्‍यात यावे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.