Maharashtra

Ahmednagar

CC/17/180

Sunil Sukhdev Bhosale - Complainant(s)

Versus

Shubham Construction,Prop- Balkrishna Ganpat Jagdhane - Opp.Party(s)

Chowdari

17 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/180
( Date of Filing : 28 Jun 2017 )
 
1. Sunil Sukhdev Bhosale
Siddharth Nagar, Municipal Colony ,House No- 217,Lane No- 37,Laltaki Road
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shubham Construction,Prop- Balkrishna Ganpat Jagdhane
Siddharth Nagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 17 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, सामनेवाले मे. शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन्‍स नावाची प्रोपा. फर्म असुन बांधकामाचा व्‍यवसाय करते. सामनेवाले व तक्रारदर हे एकाच ठिकाणी राहत असुन त्‍यांची एकमेकांशी चांगली ओळख व परिचय होता व आहे. सिध्‍दार्थनगर, म्‍युनिसिपल कॉलनीतील सर्व्‍हे नं. ७३६६-१(अ) मधील तळमजला व पहिल्‍या मजल्‍यावरील बांधकामाचे क्षेत्र ३२ फुट लांब व १२ फुट रुंद, ३ फुट गॅलरी या जागेमध्‍ये तक्रारदारास स्‍वतःच्‍या कुटुंबाच्‍या    वापरासाठी बांधकाम करावयाचे होते. तक्रारदाराने महानगरपालिकेकडुन बांधकामाची परवानगी घेतली. सामनेवाले व तक्रारदारमध्‍ये परवानगीप्रमाणे सदर जागेत बांधकाम करावयाचे ठरले व दोघांचे संमतीने बांधकाम करण्‍याविषयीच्‍या  अटी व शर्ती ठरल्‍या. त्‍याप्रमाणे दिनांक १०-११-२०१४ रोजी तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये १०० रूपयेच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर स्‍वखुशीने बांधकामाचा करार झाला. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये जे अटी व शर्ती ठरल्‍या आहेत, त्‍याप्रमाणे सदर करार लिहीलेला आहे. त्‍याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या  दरम्‍यान मालक व ग्राहक असे नातेसंबंध निर्माण झालेले आहेत. सदर कराराप्रमाणे जसे जसे बांधकाम होईल त्‍याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवालेस पैसे द्यावयाचे ठरले होते. सदर करारामध्‍ये सामनेवाले तक्रारदाराचे बांधकाम करार झाल्‍यापासुन चार महिन्‍याच्‍या आत पुर्ण करावयाचे होते, ही सदर कराराची महत्‍वाची अट व शर्त होती.  सदर जागेचे संपुर्ण बांधकाम सामनेवालेने रूपये ९,८५,०००/- मध्‍ये करावयाचे ठरले होते. सामनेवालेने कबुल केल्‍याप्रमाणे कराराच्‍या अटी व शर्तीप्रमाणे वागला नाही. सदर कराराप्रमाणे पैसे दिल्‍यानंतरसुध्‍दा सामनेवाला हा तक्रारदाराकडे जादा पैशाची मागणी करू लागला. सामनेवाला याने वारंवार पैसे मागितले व तक्रारदारास विश्‍वास दिला की जादा पैसे द्या मला पैशाची जरूर आहे, मी तुमचे बांधकाम चार महिन्‍याच्‍या आत पुर्ण करून देईन. तक्रारदाराने सामनेवाला याच्‍यावर विश्‍वास ठेऊन त्‍यास एकुण रक्‍कम रूपये ८,९०,०००/- रूपये दिले. तक्रारदाराने सामनेवालेस पैसे दिले त्‍याबद्दल सामनेवालेने मे. शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शनच्‍या लेटर हेडवर जसे जे पैसे घेतले आहे त्‍याप्रमाणे पावत्‍या लिहुन दिल्‍या. सामनेवालेने रेव्‍हेन्‍यु टिकीटवर सह्या करून तक्रारदाराला पैसे मिळाल्‍याचे पावत्‍या दिलेल्‍या आहेत. तक्रारदाराला बांधकाम पुर्ण करण्‍याची जरूरी होती म्‍हणुन त्‍याने सामनेवालेस करारापेक्षा जास्‍त पैसे दिले. जास्‍त पैसे मिळूनसुध्‍दा सामनेवालेने ठरलेल्‍या नियमाप्रमाणे चार महिन्‍यात सदर बांधकाम पुर्ण केले नाही. वारंवार विनंती करूनही सामनेवालेने पैसे घेऊनसुध्‍दा काम करत नाही व त्‍यायोगे आपल्‍यास फसवल्‍याचे तक्रारदाराच्‍या लक्षात आले. संतोष एन. गडाख, इंजिनिअर व कॉन्‍ट्रॅक्‍टर, अहमदनगर यांच्‍यामार्फत तक्रारदार याने सामनेवालेने केलेले सदर बांधकामाचे मोजमाप केले. त्‍याप्रमाणे सामनेवालेने ६,०५,०००/- रूपयाचे बांधकाम केलेले आहे व राहिलेले बांधकाम २,६५,०००/- रूपयाचे आहे. तक्रारदाराने सदर बांधकाम पुर्ण करण्‍याचे सामनेवालेस वारंवार सांगुनसुध्‍दा त्‍याने ते पुर्ण केले नाही. दिनांक   १०-०३-२०१७ रोजी तक्रारदाराने सामनेवालेस बांधकाम पुर्ण करण्‍याकरिता वकिलामार्फत रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली. सदर नोटीसला सामनेवालेने खोटे उत्‍तर पाठविले.

     तक्रारदाराची विनंती अशी आहे की,  सामनेवाले याने तक्रारदाराकडुन करारापेक्षा घेतलेली जास्‍त रक्‍कम, मानसीक त्रास व वकिलाची फी अशी एकुण रक्‍कम रूपये ४,००,०००/- सामनेवालेने तक्रारदाराला द्यावे.  तसेच सदर अर्जाचा  संपुर्ण खर्च तक्रारदारांना सामनेवालेकडुन मिळावा.

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र तसेच नि.४ सोबत दिनांक १०-११-२०१४ रोजी केलेल्‍या करारनाम्‍याची छायांकीत प्रत, दिनांक १०-०३-२०१७ रोजी तक्रारदाराने सामनेवालेस पाठविलेली नोटीस, दिनांक २९-०३-२०१७ रोजी सामनेवालेने पाठविलेली नोटीस उत्‍तर इतर दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

         तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली.

 त्‍यानंतर या सामनेवाले यांनी मे.मंचात हजर होऊन नि.१४ वर तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जावर म्‍हणणे दाखल केले. त्‍यामध्‍ये सामनेवालेने तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल न केल्‍याने मुदतीच्‍या  कायद्याची बाधा येत असुन सदरचा अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे. तक्रारदाराची तक्रार मे. मंचाला चालविण्‍याचा मे.मंचाला अधिकार नसल्‍याने सदरचा अर्ज रद्द करण्‍यास पात्र आहे, असे नमुद असुन तक्रारदाराचे तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक १,२ कथन मान्‍य असून व इतर कथन सामनेवालेस मान्‍य व कबुल नसुन इतर कथन खोटे व लबाडीचे आहे, असे म्‍हटले आहे. सामनेवालेने सत्‍य  परिस्थितीमध्‍ये नमुद केले आहे की, सामनेवाले हे शुभम कस्‍ट्रक्‍शनचे प्रोप्रायटरअसून बांधकाम व्‍यवसाय करीत होते व आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे येऊन घर बांधकाम करून देण्‍याची विनंती केली त्‍याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात दिनांक १०-११-२०१४ रोजी आपआपसामध्‍ये ठरलेल्‍या अटी व शर्तीप्रमाणे स्‍टॅम्‍पवर साक्षीदारांसमक्ष करार केलेला होता. सदर बांधकाम रक्‍कम रूपये ९,८५,०००/- मध्‍ये करण्‍याचे ठरले होते. सदरचे बांधकामास तक्रारदाराची मोठी बहिण नामे शांताबाई अर्जुन कुचेकर व तिचे सर्व कुटुंबिय तक्रारदाराच्‍या  बांधकामास विरोध करीत होते. जवळपास ६ ते ७ महिने केवळ तक्रारदाराच्‍या  संमतीने बांधकाम बंद करण्‍यात आले होते. तक्रारदाराने त्‍याची बहिण व तिच्‍या  मुलांविरुध्‍द अहमदनगर येथील दिवाणी न्‍यायाधीश वरिष्‍ठ स्‍तर व मा. ज्‍युडि. मॅजिस्‍ट्रेट साहेब यांच्‍या कोर्टात दिवाणी व फौजदारी स्‍वरूपाच्‍या केसेस केलेल्‍या  होत्‍या व आहेत. त्‍यानंतर सुमारे ८ ते १० महिन्‍याच्‍या कालावधीनंतर तक्रारदाराचे बांधकाम शेवटच्‍या टप्‍पयापर्यंत पुर्ण केले व तक्रारदारास शेवटच्‍या  टप्‍प्‍याकरीता उर्वरीत रकमेची मागणी केली असता तक्रारदाराने सदरची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. बॅंकेचे कर्ज प्रकरण पुर्ण झाल्‍यानंतर बॅंकेचा पुढील हप्‍ता  येणार आहे त्‍यातुन तुमची उर्वरित रक्‍कम देऊ असे आश्‍वासन तक्रारदार देत होता. वास्‍तवीक तक्रारदाराचे विजया बॅंकेतील बांधकामाबाबतचे कर्ज प्रकरण व सामनेवाले यांच्‍या कराराचा काहीही संबंध नव्‍हता व नाही. आजही सामनेवाला हे राहिलेले बांधकाम आजच्‍या बाजारभावाने करून देण्‍यास तयार आहेत.  तसेच करारामधील पान क्र.५ वरील अटी व शर्ती या शीर्षकामधील ठरल्‍याप्रमाणे कलम नं. ३ तसेच कलम ४ मधल वाढीव काम म्‍हणुन केलेले पत्रा रूमचे बांधकाम व वॉल कंपाऊंडमध्‍ये काम केलेले आहे. त्‍याची वाढीव कामाची रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले यांना आजच्‍या  बाजारभावाने अदा करावी. सबब तक्रारदारचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्‍यात यावा तसेच तक्रारदारास सामनेवालेने केलेले वाढीव बांधकाम तसेच सामनेवालेचे नुकसान भरपाई आजचे बाजारभावाप्रमाणे अदा करणेबाबत योग्‍य ते आदेश व्‍हावेत, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.      

     वरीलप्रमाणे सामनेवाले यांनी त्‍यांचे म्‍हणणे सादर केले त्‍या बरोबर नि.१५ सोबत तक्रारदार यांनी शांताबाई अर्जुन कुचेकर व इतर यांचेविरूध्‍द दाखल केलेला रे.मु.नं.१२६/२०१५ ची छायांकीत प्रत दिनांक १३-०३-२०१५, तक्रारदार यांनी शांताबाई अर्जुन कुचेकर व इतर यांचेविरूध्‍द दाखल केलेली क्रि.केस नं.२९२७/२०१४  ची छायांकीत प्रत दिनांक ०६-१२-२०१४ राजीची व इत्‍यादी कागदपत्र दाखल कलेले आहेत. तक्रारदाराने नि.१५ वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्‍याचप्रमाणे नि.१६ वर कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये गडाख इंजिनीअर यांनी दिलेल्‍या कामाबद्दलचा रिपोर्ट, गडाख इंजिनिअर यांचे राहिलेले काम व झालेले काम याच्‍याबद्दलचा रिपोर्ट, सामनेवालेने पैसे मिळाल्‍याची पावती, सामनेवालेला पैसे पावती दिनांक ३०-०९-२०१५, १५-०५-२०१५, ११-१२-२०१४, ११-११-२०१४, २७-११-२०१४,०४-०२-२०१५, १७-०३-२०१५, ०६-०२-२०१५, २४-१२-२०१५, ११-१-२०१४  व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

     त्‍याचप्रमाणे सामनेवाले यांनी नि.२० वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  त्‍यामध्‍ये दिनांक १०-११-२०१४ रोजीच्‍या कराराप्रमाणे उर्वरीत रक्‍कम रूपये ९०,०००/- बॅंक दराने व्‍याजासह देण्‍यात यावी, असे नमुद केले आहे.    

४.    तक्रारदाराची तक्रार, तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदाराने दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवालेने दाखल केलेले म्‍हणणे, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केने अयतस मंचासमोर  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही  सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदाराची सदर तक्रार या मंचाला चालविण्‍याचा अधिकार आहे काय ?

 

 नाही

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

५.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत व लेखी युक्तिवादात तक्रारदारास सिध्‍दार्थनगर, म्‍युनिसिपल कॉलनीतील सर्व्‍हे नं. ७३६६-१(अ) मधील तळमजला व पहिल्‍या मजल्‍यावरील बांधकामाचे क्षेत्र ३२ फुट लांब व १२ फुट रुंद, ३ फुट गॅलरी या जागेमध्‍ये तक्रारदारास स्‍वतःच्‍या कुटुंबाच्‍या वापरासाठी बांधकाम करावयाचे होते. तक्रारदाराने महानगरपालिकेकडुन बांधकामाची परवानगी घेतली. सामनेवाले व तक्रारदारमध्‍ये परवानगीप्रमाणे सदर जागेत बांधकाम करावयाचे ठरले व दोघांचे संमतीने बांधकाम करण्‍याविषयीच्‍या  अटी व शर्ती ठरल्‍या. त्‍याप्रमाणे दिनांक १०-११-२०१४ रोजी तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये १०० रूपयेच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर स्‍वखुशीने बांधकामाचा करारनामा झाला. सदरील करारनाम्‍याप्रमाणे सामनेवालेने तक्रारदाराचे बांधकाम करार झाल्‍यापासुन चार महिन्‍याच्‍या आत पुर्ण करावयाचे आहे. सदर करारामध्‍ये   सामनेवालेने तक्रारदाराचे बांधकाम करार झाल्‍यापासुन चार महिन्‍याच्‍या आत पुर्ण करावयाचे होते, ही सदर कराराची महत्‍वाची अट व शर्त होती.  सदर जागेचे संपुर्ण बांधकाम सामनेवालेने चार महिन्‍यांच्‍या आत पुर्ण केले नाही, म्‍हणुन तक्रारदाराने नुकसान भरपाई व  कराराप्रमाणे व्‍याजासहीत द्यावी व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी या लेखी युक्तिवादात केली आहे.  तक्रारदाराने त्‍याच्‍या लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराची फसवणुक केल्‍याबद्दल मे. चिफ ज्‍युडिशिअल मॅजिस्‍ट्रेट साहेब अहमदनगर यांचे कोर्टात फौजदारी केस दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये मे. कोर्टाने सामनेवालेविरुध्‍द इं.पि.को. ४०६ व ४३० प्रमाणे प्रोसेस इशु केलेली आहे. सामनेवालेने या हुकूमाविरूध्‍द मे. सेशन जज्‍ज साहेब यांचे कोर्टात रिव्‍हीजन दाखल केले व प्रलंबित आहे, असे नमुद केले आहे. सामनेवालेने नि.२० वर त्‍यांचा लेखी युक्तिवादात तक्रारदार सुनिल सुखदेव भोसले यांनी सदर बांधकामाची जागा वादातील असल्‍याबद्दल त्‍यांची बहिण शांताबाई अर्जुन कुचेकर, भाचा विक्रांत अर्जुन कुचेकर यांचेविरूध्‍द अहमदनगर येथील मे.चिफ ज्‍युडिशियल मॅजिस्‍ट्रेट साहेब, अहमदनगर येथे दिनांक ०६-१२-२०१४ रोजी इं.पि.को. ४५१, ५०४,५०६ व ३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली, त्‍याचा केस नं.एस.टी.सी. २९२७/१४ असा आहे. सदर केस मे. कोर्टात चालु आहे. त्‍यानंतरसुध्‍दा तक्रारदार यांच्‍या बहिणीने व घरच्‍यांनी सदर वादातील कामात अडथळा आणण्‍याचे काम चालुच ठेवले असता तक्रारदार यांनी अहमदनगर येथील मे. सिव्‍हील जज साहेब, सि.डि. यांचे कोर्टात रे.मु.नं.१२६/२०१५ स्‍पेसिफीक रिलीफ अॅक्‍ट ३७ प्रमाणे सदर मिळकतीत हरकत अडथळा करू नये म्‍हणुन निरंतर ताकदीचा हुकुम व्‍हावा म्‍हणून दिनांक ०४-०३-२०१५ रोजी दावा दाखल केलेला होता.  तरीही देखील तक्रारदाराची बहिण व तिचे मुलांचा बांधकाम करण्‍यामधील अडथळा कमी झालेला नव्‍हता व नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे संबंधीत बांधकाम बंद करण्‍यात आले होते व आहे, असे लेखी युक्तिवादात नमुद केले आहे.

६.   तक्रारदाराने सदरची तक्रार शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन व कॉन्‍ट्रॅक्‍टर यांच्‍याविरूध्‍द  संबंधीत बांधकामाबाबत केली व त्‍यांनी त्रुटी दिली, असे म्‍हटले आहे. परंतु तक्रारदाराने संतोष गडाख शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन व कॉन्‍ट्रॅक्‍टर यांच्‍या शपथपत्र या तक्रारीच्‍या कामी दाखल केलेले नाही. साक्ष घेतलेली नाही. तक्रारदाराने त्‍याच्‍या  लेखी युक्तिवादात सामनेवालेविरूध्‍द मे. चिफ ज्‍युडिशिअल मॅजिस्‍ट्रेट साहेब अहमदनगर यांचे कोर्टात फसवणुकीबाबत फौजदारी खटला दाखल केल्‍याचे म्‍हटले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराने त्‍याची बहिण शांताबाई अर्जुन कुचेकर, भाचा विक्रांत अर्जुन कुचेकर यांचेविरूध्‍द अहमदनगर येथील मे.चिफ ज्‍युडिशियल मॅजिस्‍ट्रेट साहेब, अहमदनगर येथे दिनांक ०६-१२-२०१४ रोजी इं.पि.को. ४५१, ५०४,५०६ व ३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली, त्‍याचा केस नं.एस.टी.सी. २९२७/१४ असा आहे. सदर केस मे. कोर्टात चालु आहे.  तसेच  तक्रारदार यांनी अहमदनगर येथील मे. सिव्‍हील जज साहेब, सि.डि. यांचे कोर्टात रे.मु.नं.१२६/२०१५ स्‍पेसिफीक रिलीफ अॅक्‍ट ३७ प्रमाणे सदर मिळकतीत हरकत अडथळा करू नये म्‍हणुन निरंतर ताकदीचा हुकुम व्‍हावा म्‍हणून दिनांक       ०४-०३-२०१५ रोजी दावा दाखल केलेला आहे व त्‍या संदर्भाचे कागदपत्रही या मंचात दाखल केलेले आहेत. तक्रारदाराने त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्रात, लेखी युक्तिवादात या संदर्भात स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. तक्रारदाराने नमुद बांधकामाची जागेविषयी दिवाणी दावा व फौजदारी खटला दाखल असल्‍याचेबाबत तक्रारदाराने या मे. मंचापासुन लपविला असुन तक्रारदार या मे. मंचात स्‍वच्‍छ हाताने आलेले नाहीत. त्‍यामुळे सदरील तक्रारीत नमुद बांधकाम जागेविषयी दिवाणी व फौजदारी वाद असल्‍याने आणि सदरील दिवाणी दावा मे. सिव्‍हील जज साहेब, सि.डि. यांचे कोर्टात दाखल असुन रे.मु.नं.१२६/२०१५ असा क्रमांक दिलेला आहे व दावा प्रलंबित असल्‍याने सदरची तक्रार या मे. मंचास चालविण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्र.१ चे विवेचनावरून आम्‍ही  खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

आदेश

 

       १.  तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

      २.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

      ३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

      ४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.