Maharashtra

Nagpur

CC/565/2020

SHILPA KAMBLE W/O SIMADRY SRIMANY - Complainant(s)

Versus

SHUBH PHOTOGRAPHY THROUGH ITS PROPRIETOR SHUBH SURUSE - Opp.Party(s)

ADV. A.S. SIDDIQUI

05 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/565/2020
( Date of Filing : 22 Dec 2020 )
 
1. SHILPA KAMBLE W/O SIMADRY SRIMANY
R/O. K. NARAYNAPURA, BANGALORE-560077
Bangalore
KARNATAKA
...........Complainant(s)
Versus
1. SHUBH PHOTOGRAPHY THROUGH ITS PROPRIETOR SHUBH SURUSE
R/O. PLOT NO.1, OPPOSITE MRUNGAYANI LAWN, PIPLA ROAD, VAISHNAV MATA NAGAR, MANEWADA, NAGPUR-34
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHUBH SURUSE
R/O. PLOT NO.1, OPPOSITE MRUNGAYANI LAWN, PIPLA ROAD, VAISHNAV MATA NAGAR, MANEWADA, NAGPUR-34
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.S. SIDDIQUI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 05 Apr 2022
Final Order / Judgement

 आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्तीने तिच्या लग्न सोहळयातील दिनांक 1.3.20219 ला हॉटेल ट्रीबो ए-वन सव्हीस अपार्टमेंट, वर्धा रोड,नागपूर येथे होणा-या हळदीचे कार्यक्रमाकरिता व दिनांक 2.3.2019 ला लेडीज क्लॅब लॉन, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे होणा-या लग्न समारंभातील संध्‍याकाळच्या फोटो शुट (Candid and traditional) आणि  व्हिडीओग्रॉफी (Candid and traditional ) करिता वि.प.ला रुपये 50,000/- एवढया रक्कमेत करण्‍याचे निश्‍चीत केले होते. तक्रारकर्तीने वि.प.ला दोन्ही समारंभाचे फोटोशुट आणि व्हीडीओग्राफीपोटी दिनांक 18.2.2019 ला रुपये 10,000/- अदा केले व उर्वरित रक्कम रुपये 40,000/- वि.प.ला हळदी व लग्न समारंभानंतर म्हणजे दिनांक 4.3.2019 अल्बम व सिडी पोटी अदा केले व त्याबाबत वि.प.ने तक्रारकर्तीला पावती दिली.
  3. वि.प.ने दोन्ही समारंभाच्या फोटो व व्हीडीओच्या सॉफ्ट कॉपी पेनड्राइव्हमधे तक्रारकर्तीला पाठविल्या व त्या तक्रारकर्तीला मिळाल्या. तक्रारकर्तीने कुटुंबातील व्यक्तीशी चर्चाकरुन अल्बममधे कोणते फोटो ठेवायचे याबाबत ठरविले. तसेच व्हीडीओ मधील कोणता भाग edit करायचा ते ठरविले व तसे वि.प.ला कळविले. तक्रारकर्तीने वि.प.ला समारंभातील व्हीडीओ शूट मधे गाणे अंर्तभूत करण्‍याबाबत स्पष्‍ट शब्दात सांगीतले होते.
  4. तक्रारकर्तीने वि.प. सोबत त्यानंतर अनेकदा अल्बम व सिडी बाबत संपर्क साधला परंतु वि.प.ने अल्बम व सिडी तयार केली नाही. पूढे ऑगस्ट-2019 मधे तक्रारकर्तीला एक पेनड्राईव्ह पाठविला त्यामध्‍ये तक्रारकर्तीचे सुचनेनुसार त्यांचे व्हीडीओला अंतीम रुप दिल्याचे सांगीतले. परंतु त्यामधे गाणे समाविष्ट नव्हते. वि.प..ने सप्‍टेंबर-2019 ला तक्रारकर्तीला व्हीडीओ मधे कोणती गाणे समाविष्ट करावी याबाबत विंनती केली. वि.प.चे विंनतीनूसार तक्रारकर्तीने व्हीडीओमधे समाविष्‍ट करावयाचे गाणे पाठविले जेणेकरुन वि.प.सदरचे काम पूर्ण करु शकेल. तक्रारकर्तीने आक्‍टोबर 2019 ला वि.प.कडे सिडी व फोटोबाबात चौकशी व विंनती केली असता वि.प.ने त्याबाबत दखल घेतली नाही. वि.प.ने तक्रारकर्तीचे मॅसेज व दुरध्‍वनीकडे लक्ष दिले नाही असे जानेवारी 2019 पर्यत सुरु राहिले.
  5. तक्रारकर्तीने पूढे वि.प.चे वागणूकीला कंटाळुन वि.प.ला व्हीडीओ व   फोटोपोटी दिलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतु वि.प.ने तक्रारकर्तीचे मागणी कडे लक्ष दिले नाही म्हणुन तक्रारकर्तीने वि.प.ला दिनाक 27.2.2020 ला नोटीस पाठविली असता वि.प.ने दिनांक 6.3.2020 whatsup व्दारे अल्बम Redesign  करु शकत नसल्याबाबत कळविले व त्यांने जे केले आहे त्यावर समाधान मानावयास सांगीतले व ईतर काम दुस-याकडुन करुन घेण्‍यास सांगीतले. वि.प.मुख्‍य काम लांबविण्‍याकरिता आणि तकारकर्तीला ते शक्य नसल्यामूळे मुद्दाम फोटोची निवड करुन अंतीम फोटो अल्बम मधे समाविष्‍ट करण्‍याकरिता सांगीतले होते.  तक्रारकर्तीने वि.प.ला रक्कम परत करण्‍याबाबत अनेकदा विनंती केली परंतु वि.प.ने रक्कम परत करण्‍याचे नाकारले. Whatsup स्क्रीन शॉट वरुन वि.प.ची तक्रारकर्तीचे प्रती वागणूक दर्शविते. वि.प.ने तक्रारकर्तीला फोटो व व्हीडीओची ग्राफीच्या सिडी न पूरविल्यामूळे तकारकर्तीने वि.प.ला दिनांक 1.6.2019 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने तक्रारकर्तीचे नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तकारकर्तीने मा.आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प.क्रं. 1व 2 यांना निर्देश देण्‍यात यावे की, त्यांनी तक्रारकर्तीला रुपये 50,000/- इतक्या रक्कमेची प्रतीपूर्ती दिनांक 4.3.2019 पासुन 15 टक्के व्याजासह परत करावे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावा.
  6. वि.प.क्रं.1 व 2 ला आयोगा मार्फत दिनांक 9.3.2021 रोजी जाहिर नोटीस वर्तमानपत्रातून प्रसिध्‍द करण्‍यात आली असता नोटीस प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन सदर त्यांचे विरुध्‍द 24.12.2021 रोजी तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  7. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्‍तावेजांचे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                                     उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?           होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?     होय
  4. काय आदेश                                                         अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.  तक्रारकर्तीने तिच्या लग्न सोहळयातील  दिनांक 1.3.20219 ला हॉटेल ट्रीबो ए-वन सव्हीस अपार्टमेंट वर्धा रोड,नागपूर येथे होणा-या हळदीचे कार्यक्रमाकरिता व दिनांक 2.3.2019 ला लेडीज क्लॅब लॉन सिव्हील लाईन्स, नागपूर येथे होणा-या लग्न समारंभातील संध्‍याकाळच्या फोटो शुट (Candid and traditional ) आणि  व्हिडीओग्रॉफी (Candid and traditional ) करिता वि.प.ला रुपये 50,000/- एवढया रक्कमेत करण्‍याचे ठरविले होते. तक्रारकर्तीने वि.प.ला दोन्ही समारंभाचे फोटोशुट आणि व्हीडीओग्राफीपोटी दिनांक 18.2.2019 ला रुपये 10,000/- अदा केले व उर्वरित रक्कम रुपये 40,000/- वि.प.ला हळदी व लग्नसमारंभानंतर म्हणजे दिनांक 4.3.2019 अल्बम व सिडी पोटी अदा केले  आहे हे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ती ही वि.प.ची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. 
  2. वि.प.ने तकारकर्तीचे दिनांक 1.3.2019 व 2.3.2019 ला झालेल्या लग्न सोहळयातील फोटोशुटचे अल्बम  व व्हीडीओशूट मधे गाण्‍याचा समावेश करुन सुर्पूद केले नाही हे तक्रारकर्तीने नि.कं.2 वर दाखल तक्रारकर्ती व वि.प.यांचे Whatsup स्क्रीन शॉट वरील संभाषणाचे अवलोकन केले असता स्पष्‍ट होते. वि.प.ने तक्रारकर्तीकडुन फोटो शुट व व्हीडीओग्राफीपोटी संपूर्ण रक्कम स्वीकारुन सुध्‍दा तक्रारकर्तीला फोटोशुटचे अल्बम  व व्हीडीओशूट मधे गाण्‍याचा समावेश करुन पूरविले नाही ही  वि.प.ची तक्रारकर्तीचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे सिेध्‍द होते. त्यामूळे तक्रारकर्ती वि.प.कडुन मानसिक व शारिरिक व तक्रारीचे खर्चापोटीस नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. वि.प.1 व 2 यांनी तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी 25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- अदा करावे.
  3. वि.प.क्रं.1 व 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत  वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
  4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.