Maharashtra

Chandrapur

CC/12/143

Sau. Vasudha Sanjay Turale - Complainant(s)

Versus

Shriya Developers Associates Through Arvind Chandrashekhar Shevalkar - Opp.Party(s)

Adv.P.M.Satpute

20 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/12/143
 
1. Sau. Vasudha Sanjay Turale
R/0 ViVekanand Nagar Tresury Colony Mul Road Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriya Developers Associates Through Arvind Chandrashekhar Shevalkar
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashtra
2. Shree Pramod Bapuraoji Kale
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/144
 
1. Shree Avinash Tukaram Dane
R/o-Jivan Safalya Colony Chandrapur
Chnadrapur
Maharashta
...........Complainant(s)
Versus
1. Shriya Developers Associates Through Arvind Chandrashekhar Shevalkar
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashta
2. Shree Pramod Bapuraoji Kale
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/145
 
1. Sau Shushma Prabhakar Bele
Chavare Lay-Out, Near Akashwani,Civil LiNe Chandrapur
Chandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriya Developers Associates Through Arvind Chandrashekhar Shevalkar
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharshtra
2. Shree Pramod Bapuraoji Kale
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharshtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/146
 
1. Shri Avinash Tukaram Dane
R/o- Jivan Safalya Colony Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriya Developers Associates Through Arvind Chandrashekhar Shevalkar
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashtra
2. Shree Pramod Bapuraoji Kale
RamMandir Ward Near Old Water Tank Vir Sawarkar Chowk Warora
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 20/01/2015 )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

1.    अर्जदाराने आापल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार भागीदार असून ते श्रीया डेव्‍हलपर्स या नावाने भुखंड विक्रीचा व्‍यवसाय करतात गैरअर्जदाराने निवासी भुखंड खरेदी करण्‍याकरीता आमंञित केले. गैरअर्जदाराचे म्‍हणण्‍यानुसार सदर भुखेडचे ले-आऊट तथा कुठै गहाण बक्षीस विक्री व अन्‍य रितीने हस्‍तांतरीत केलेले नव्‍हते. अर्जदाराने दि. 23/11/03 ला भुखंड क्रं. 04 आराजी 1879.66 चौ. फुट चतुसिमा हा भुखंड रु. 65,788/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्‍क्‍म 62,132/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराला विक्री संबंधी आवश्‍यक कागदपञे संबधी विचारले असता शेवटी दि. 5/5/07 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास आवश्‍यक परवानगी मिळाली नसल्‍याचे सांगितले व विक्रीची मुदत गैरअर्जदाराचे अडचणी दूर होवून आवश्‍यक परवानगी मिळेपर्यंत वाढविण्‍यात आल्‍याचे कळविले. अर्जदाराने दि. 7/3/08, 15/10/09, 4/5/10, 30/7/10 या दिवशी गैरअर्जदारांना विक्री संदर्भात विचारले असतांना परवानगी मिळाल्‍यावर विक्री करता येईल असे सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदाराना दि. 05/03/12 रोजी व‍कीलामार्फत सदर भुखंडाच्‍या विक्री करुन देण्‍याबाबत नोटीस पाठविले. गैरअर्जदार क्रं. 1 व 3 यांनी नोटीस नाकारले व गैरअर्जदार क्रं. 2 ला दि. 07/03/12 ला नोटीस मिळून सुध्‍दा गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतेही उत्‍तर दिले नाही व अर्जदाराला सदर भुखंड विक्री करुन दिले नाही गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली आहे म्‍हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली.

 

2.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराकडून अर्जदारा सदर निवासी भुखंड विक्रीपञ करुन देण्‍याचे आदेश दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

3.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 ला नोटीस मिळून सुध्‍दा मंचासमक्ष गैरहजर राहीले म्‍हणून 30/4/13 रोजी नि. क्रं. 1 वर गैरअर्जदार क्रं. 1 विरुध्‍दा सदर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.  गैरअर्जदार क्रं.  2 व 3 हजर होवून नि. क्रं. 16  वर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 ने आपल्‍या लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोपखोटे असून ते नाकबुल केले आहे. तसेच अर्जदाराने गैरअर्जदारासोबत केलेला करारनाम्‍याची शर्त व अटी भंग केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला वादातील प्‍लॉटची रक्‍कम दिली नाही म्‍हणून अर्जदाराला या मंचात दाद मागण्‍याचा कोणताही अधिकार नाही. तसेच सदर तक्रार मुदतबाहय असून ती खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.

 

 

4.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

            मुद्दे                                                    निष्‍कर्ष

 

(1)   अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ?                          होय.   

 

   (2)   सदर तक्रार मुदतीत आहे काय ?                                होय.

 

   (3)   गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला

  आहे काय ?                                                होय.                                             

                               

  (4) आदेश काय ?                                        अंतीम आदेशाप्रमाणे.

                       कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

 

5.    अर्जदाराने दि. 23/11/03 ला भुखंड क्रं. 04 आराजी 1879.66 चौ. फुट चतुसिमा हा भुखंड रु. 65,788/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्‍क्‍म 62,132/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असल्‍याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्‍द होत असल्‍याने मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

 

6.    अर्जदाराने दि. 23/11/03 ला भुखंड क्रं. 04 आराजी 1879.66 चौ. फुट चतुसिमा हा भुखंड रु. 65,788/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्‍क्‍म 62,132/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराला विक्री संबंधी आवश्‍यक कागदपञे संबधी विचारले असता शेवटी दि. 5/5/07 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास आवश्‍यक परवानगी मिळाली नसल्‍याचे सांगितले व विक्रीची मुदत गैरअर्जदाराचे अडचणी दूर होवून आवश्‍यक परवानगी मिळेपर्यंत वाढविण्‍यात आल्‍याचे कळविले. अर्जदाराने दि. 7/3/08, 15/10/09, 4/5/10, 30/7/10 या दिवशी गैरअर्जदारांना विक्री संदर्भात विचारले असतांना परवानगी मिळाल्‍यावर विक्री करता येईल असे सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदाराना दि. 05/03/12 रोजी व‍कीलामार्फत सदर भुखंडाच्‍या विक्री करुन देण्‍याबाबत नोटीस पाठविले. ही बाब अर्जदाराने दाखल तक्रार, नि. क्रं. 5 वर दाखल केलेले करारनामा पैसे भरल्‍याची पावती व नोटीस पोचपावत्‍यावरुन सिध्‍द होत आहे. म्‍हणून मंचाचे मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत राहीले असल्‍यामुळे सदर तक्रार मुदतीत आहे सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 3 बाबत ः- 

 

7.    अर्जदाराने दि. 23/11/03 ला भुखंड क्रं. 04 आराजी 1879.66 चौ. फुट चतुसिमा हा भुखंड रु. 65,788/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्‍क्‍म 62,132/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराला विक्री संबंधी आवश्‍यक कागदपञे संबधी विचारले असता शेवटी दि. 5/5/07 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास आवश्‍यक परवानगी मिळाली नसल्‍याचे सांगितले व विक्रीची मुदत गैरअर्जदाराचे अडचणी दूर होवून आवश्‍यक परवानगी मिळेपर्यंत वाढविण्‍यात आल्‍याचे कळविले. अर्जदाराने दि. 7/3/08, 15/10/09, 4/5/10, 30/7/10 या दिवशी गैरअर्जदारांना विक्री संदर्भात विचारले असतांना परवानगी मिळाल्‍यावर विक्री करता येईल असे सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदाराना दि. 05/03/12 रोजी व‍कीलामार्फत सदर भुखंडाच्‍या विक्री करुन देण्‍याबाबत नोटीस पाठविले परंतु सदर नोटीस गैरअर्जदार क्रं. 1 व 3 यांनी नाकारले व गैरअर्जदार क्रं. 2  यांनी उत्‍तर दिले नाही व सदर भुखंडा करीता गैरअर्जदार क्रं. 2 व 3 कडे आवश्‍यक परवानगी व दस्‍ताऐवज होते तसेच त्‍यांची अर्जदारासोबत पूर्ण पैसे घेवून विक्रीपञ करण्‍याची तयारी होती असे सिध्‍द करु शकले नाही म्‍हणून मंचाचे असे मत ठरले कि, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदर भुखंडाचे रक्‍कम घेवून अर्जदारास विक्रीपञ करुन दिले नाही म्‍हणून अर्जदाराप्रति अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली आहे.

 

8.    मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

            (1) अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येत आहे.

            (2) गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून घेतलेली रक्‍कम रु. 62,132/- दि.

               30/04/2012 पासून 12 टक्‍के व्‍याजासह  आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून

               45 दिवसाचे आत अर्जदाराला दयावे.

            (3) अर्जदाराला झालेल्‍या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदारांनी

               रु. 5,000/- व तक्रारीचाखर्च रु. 2,500/- अर्जदाराला

               आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.

            (4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

 

 

चंद्रपूर

दिनांक -   20/01/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.