Maharashtra

Nagpur

CC/17/2021

SATISH PARASRAM SARETHA - Complainant(s)

Versus

SHRIWAS REALITIES PARTNERSHIP SANSTHA THROUHG PARTNER ABHAYNARAYAN D SHRIVAS SMT PRAGATI ABHAYNARAYA - Opp.Party(s)

ADV SHRIKANT GAWANDE

30 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/17/2021
( Date of Filing : 07 Jan 2021 )
 
1. SATISH PARASRAM SARETHA
QUARTER NO 103, CHOKS COLONY KAMTHI ROAD, NAGPUR 17
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRIWAS REALITIES PARTNERSHIP SANSTHA THROUHG PARTNER ABHAYNARAYAN D SHRIVAS SMT PRAGATI ABHAYNARAYAN SHRWAS AND ROHAN NANHELAL SHARMA
BHUKHAND NO 3, GURUKRUPA APARTMENT, VISHRAM NAGAR, NAGPUR 440026
NAGPUR
MAHARASHTRA
2. ABHAYNARAYAN D SHRIWAS
BHUKHAND NO 3, GURUKRUPA APARTMENT, VISHRAM NAGAR, NAGPUR 440026
NAGPUR
MAHARASHTRA
3. PRAGATI ABHAYNARAYAN SHRWAS
BHUKHAND NO 3, GURUKRUPA APARTMENT, VISHRAM NAGAR, NAGPUR 440026
NAGPUR
MAHARASHTRA
4. ROHAN NANHELAL SHARMA
BHUKHAND NO 17B, MAYUR NAGAR, NARI ROAD, NAGPUR 440026.
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV SHRIKANT GAWANDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 May 2022
Final Order / Judgement

आदेश

 आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 नुसार दाखल केलेली आहे.
  2.  वि.प. ही भागीदारी संस्था असुन वि.प.क्रं. 2 ते 4 हे संस्थेचे भागीदार आहेत. तक्रारदाराने वि.प. चे मौजा-नारी.ख.क्रं.63,65-1-2,न.भु.क्र.296, शिट क्रं. 883,(69/1) ,कॉरपोरेशन घर क्रं. 2482/सी/614, कबीर नगर, नागपूर या जागेवर बांधलेल्या रहिवासी सदनिका व व्यावसाईक बांधलेल्या बहुमजली इमारतीतील तळमजल्यावरील दुकान क्रं. GFS-3,एकुण क्षेत्रफळ 13.93 चौ.मी. एकण रूपये 15,00,000/- एवढया रक्कमेत खरेदी करण्‍याचा करार वि.प. सोबत दिनांक 20.11.2018 रोजी केला. तक्रारदाराने वि.प. ला दुकान गाळे खरेदीपोटी दिनांक  20.11.2018 पर्यत एकुण 5,75,000/- अदा केले व उर्वरित रक्रकम रुपये 9,25,000/- वि.प. विक्रीपत्राचे वेळी अदा करण्‍याचे ठरले होते.
  3. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.ला करारानुसार एकुण 1,25,000/- वेळोवेळी अदा केले व त्याबाबतची पावती वि.प.ने तक्रारदाराला दिली. त्यानंतर देय असलेली रक्कम रुपये 8,00,000/- ची जुळवाजूळव करण्‍याकरिता तक्रारदाराने सारस्वत बॅंकेकडे कर्ज घेण्‍याकरिता अर्ज केला. त्यावेळी तकारदाराला कळले की, वि.प.ने सदरहू प्रस्तावीत इमारतीत तळमजल्यावरील सलग एकच व्यावसाईक गाळयाची मंजूरात मिळाली आहे. परंतु वि.प.ने सलग मंजूर एका गाळयाचे तीन भाग करुन त्यास तीन दुकानाचे गाळयात रुपांतरण केले. वि.प. चे प्रस्तावित मंजूर नकाश व प्रत्यक्ष बांधकामाचा नकाश यामध्‍ये बरीच तफावत आहे. याबाबत तक्रारदाराने वि.प.ला विचारणा केली असता वि.प. यथोचित स्पष्‍टीकरण देऊ शकले नाही. उपरोक्त आपणास पटत नसल्यास आपण सदर दुकानाची नोंदणी रद्द करु शकता असा प्रस्ताव वि.प.ने तक्रारदाराला सुचविला. भविष्‍यात कुठलीही तांत्रीक अडचण येऊ नये म्हणुन तकारदाराने वि.प. चा सदरहू प्रस्ताव मान्य केला. त्या अनुषंगाने वि.प.ने तक्रारदारास दुकान विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 7,00,000/- परत करण्‍याचे आश्‍वासीत केले. वि.प. ने तक्रारदाराला वेळोवेळी रुपये 1,50,000/- परत केले.  परंतु तद्नंतर उर्वरित रक्कम रुपये 5,50,000/- परत करण्‍यास टाळाटाळ करु लागले. तक्रारदाराने वि.प.कडे रक्कम मागण्‍याचा तगादा लावल्यानंतर वि.प.ने तक्रारदाराला रुपये 1,00,000/- चा एक व रक्कम रुपये 2,00000/- चे प्रत्येकी दोन असे एकुण 5,00,000/- रक्कमेचे तीन धनादेश तक्रारदाराला दिले व उर्वरित रक्कम NEFT व्दारे देण्‍याचे मान्य केले. वि.प.ने उपरोक्त धनादेश देतांना तक्रारकर्ता व वि.प. यांचेमध्‍ये दिनांक 20.10.2018 ला करण्‍यात आलेला विक्री करारनामा दिनांक 5.10.2020 रोजी रद्द केला व सदरहू रद्द लेख वि.प. व तक्रारकर्ता यांनी साक्षांकीत केला. वि.प.ने तकारदाराला देय असलेल्या 5,50,000/- पैकी फक्त रक्कम रुपये 1,50,000/- तक्रारदारास परत केले. वि.प.ने तक्रारदाराला दिलेले रुपये 2,00,000/- एवढया रक्कमेचे दोन्ही धनादेश अनादरित झाले. तक्रारदाराने वि.प.ला रक्कमेची मागणी केली असता वि.प. रक्कम देण्‍यास टाळाटाळ करित होता म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प.ने तक्रारदाराला रक्कम रुपये 4,00,000/-, द.सा..द.शे.4 टक्के व्याजदाराने परत करावे अशी मागणी केली आहे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.  
  4. वि.प.यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली परंतु नोटीस प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 22.10.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्तीवाद बघता, तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

 

                     मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                       होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                          होय

  1. काय आदेश                                                                  अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.  तक्रारदाराने वि.प. चे मौजा-नारी.ख.क्रं.63,65-1-2, न.भु.क्र.296, शिट क्रं. 883,(69/1) ,कॉरपोरेशन घर क्रं. 2482/सी/614, कबीर नगर, नागपूर या जागेवर बांधलेल्या रहिवासी सदनिका व व्यावसाईक बहुमजली इमारतीतील तळमजल्यावरील दुकान क्रं. GFS-3,एकुण क्षेत्रफळ 13.93 चौ.मी. एकुण रूपये 15,00,000/- एवढया रक्कमेत खरेदी करण्‍याचा करार वि.प. सोबत दिनांक 20.11.2018 रोजी केला. तक्रारदाराने वि.प. ला दुकान गाळे खरेदीपोटी दिनांक  20.11.2018 पर्यत एकुण 5,75,000/- अदा केले हे नि.क्रं.2 वरील दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तक्रारदाराने करारानुसार तद्नंतर वेळोवेळी रुपये 1,25,000/- अदा केले व उर्वरित रक्कम अदा करण्‍याकरिता गृह कर्ज घेण्‍याकरिता सारस्वत बॅंकेकडे गेला असता त्याला वि.प.चे प्रस्तावीत मंजूर नकाशा व बांधकामात बरीच तफावत असल्याचे निर्देशनास आले व मंजूर नकाशाप्रमाणे बहुमजली प्रस्तावीत इमारतीतील तळमजल्यास सलग एकाच व्यावसाईक माळयास मंजूरी असल्याचे कळले. वि.प.ने मंजूर नकाशाप्रमाणे तळमजल्यावर सलग्न एकाच गाळयाला मंजूरी असतांना तक्रारदाराला सलग गाळयाचे तीन भाग करुन एका गाळयाचे विक्रीपत्र करुन दिले ही वि.प.ची तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे आयोगाचे मत आहे.तसेच उभयपक्षाचे संमतीने दिनांक-5.10.2020 चा करार रद्द करुन गाळयाचे विक्रीपोटी स्व‍ि‍कारलेली रक्कम परत करण्‍याचे आश्‍वासीत करुनही रक्कम परत केली नाही ही वि.प.चे सेवेतील त्रुटी आहे.त्यामूळे तक्रारकर्ता वि.प.कडुन गाळयाचे खरेदीपोटी दिलेली रक्कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सदर प्रकरणातील वस्तुस्थीती व मा. राष्‍ट्रीय आयोगाचा Soumitra Kumar Shaw Vs. Lokhandwala Kataria Constructions Pvt Ltd.. And Anr. 2019 NCJ 517 (NC) व आमच्या समोरील प्रकरणातील वस्तुस्थीती सारखीच आहे.   सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.ने तक्रारदारास गाळयाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 4,00000/- परत करावी. सदर रक्कमेवर दिनांक 5.10.2020 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के दराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो मिळुन येणारी रक्कम तक्रारदारास द्यावी.
  3. वि.प.ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20 ,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.