Maharashtra

Satara

CC/14/184

shri surendrkumar shrirang shinde - Complainant(s)

Versus

shrisan bildars and devhlpar s - Opp.Party(s)

jagdale

27 Jan 2016

ORDER

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                      

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे मौजे गोटे, ता.कराड, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी असून जाबदार हे वारुंजी, ता. कराड, जि. सातारा येथील रहिवाशी असून त्‍यांचा बांधकामाचा व्‍यवसाय आहे.   जाबदार ‘श्रीसन बिल्‍डर्स अँन्‍ड डेव्‍हलपर्स’ या नावाने बांधकाम व्‍यवसाय करीत आहेत.  जाबदाराने मौजे गोटे, ता. कराड, जि.सातारा येथील वारुंजी फाटा हद्दीतील स्‍वतःच्‍या नावे असणारी मिळकत भूमापन क्र. 45 गोटे, ता. कराड, जि.सातारा या कराड नगरपरिषद हद्दीबाहेरील मिळ‍कतीत ‘ऋतुजा रेसिडेन्‍सी’ या नावाने इमारत बांधलेली आहे.  सदर इमारतीचे बांधकामास ग्रामपंचायत ठराव क्र.6 (6) ता. 23/8/2010 ने मंजूरी मिळाली आहे.  तक्रारदार हे प्रस्‍तुत ऋतुजा रेसिडेन्‍सी या इमारतीमधील सदनिकाधारक आहेत.  तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी जाबदारकडून अनुक्रमे सदर इमारतीमधील पहिल्‍या मजल्‍यावरील एफ-1 चे सुपर बिल्‍ट अप क्षेत्रफळ 70.53 चौ. मी. व एफ-2 यांचे सुपर बिल्‍टअप क्षेत्रफळ 70.53 चौ. मी. या दोन्‍ही सदनिका जाबदार कडून खरेदी घेतलेल्‍या आहेत.

    वर नमूद पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका एफ-1 चे सुपर बिल्‍टअप क्षेत्रफळ 70.53 चौ. मी. चे खरेदीपत्र जाबदाराने तक्रारदाराला दि. 4/5/2013 रोजी करुन दिले असून त्‍याचे मुद्रांक शुल्‍क रक्‍कम रु.51,700/- तक्रारदार क्र. 1 ने भरलेली आहे.  सदर निवासी सदनिकेची एकूण रक्‍कम रु.10,34,000/- तक्रारदार क्र. 1 यांनी जाबदार यांना मोबदल्‍याच्‍या स्‍वरुपात दिलेली आहे व प्रस्‍तुत सदनिकेचा कब्‍जा घेतलेला आहे.  तसेच तक्रारदार क्र. 2 ने सदर इमारतीतील पहिल्‍या मजल्‍यावरील एफ-2 चे सुपर बिल्‍टअप क्षेत्रफळ 70.53 चौ. मी. ही सदनिका जाबदारांकडून खरेदी घेतली.  प्रस्‍तुत सदनिकेचे खरेदीपत्र दि.4/5/2013 रोजी झाले असून त्‍याचे मुद्रांक शुल्‍क रक्‍कम रु.51,700/- तक्रारदार क्र. 2 ने भरलेले आहे.  तसेच सदनिकेची एकूण रक्‍कम रु.10,34,000/- तक्रारदार क्र. 2 ने मोबदल्‍यापोटी भरलेली आहे व सदनिकेचा कब्‍जा घेतला आहे.  अशाप्रकारे तक्रारदार क्र. 1 व 2 हे त्‍यांनी खरेदी घेतले वर नमूद सदनिकेचे मालक झालेले असून ते त्‍याचा उपभोग घेत आहेत व वीजबील, पाणीबील व घरपट्टी भरत आहेत.  परंतू जाबदार यांनी प्रस्‍तुत इमारत बांधताना योग्‍य दर्जा न राखता बांधकामावर दुर्लक्ष केलेने सदर बांधकामात काही सोईसुविधांमध्‍ये त्रुटी राहीलेल्‍या आहेत.  तसेच काही कामे अद्याप अपूर्ण आहेत.  जाबदाराने मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केलेले नाहीत.  तसेच तक्रारदाराने प्रस्‍तुत बांधकामात खाली कामे अपूरी ठेवली आहेत.

   1.  सर्व सदनिकांना पुरेसा पाणीपुरवठा होईल याची सोय केली नाही, पाण्‍याच्‍या टाक्‍या फुटलेल्‍या असून साफ केल्‍या नाहीत, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय सोय केली नाही.

   2.  इमारतीस चारी बाजूस कुंपन नाही/ कोणत्‍याही बाजूस कंपाऊंड वॉल बांधलेली नाही.

   3.  पार्कींगला अपूरी जागा सोडली आहे.

   4.  मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नाही.

   5.  इमारतीचे पार्कींगमधील स्‍लॅबचे (पार्कींग लॉफ्ट) प्‍लास्‍टर केलेले नाहीत, इमारतीचे पार्कींगमधील स्‍लॅबचे प्‍लास्‍टर निकृष्‍ठ पध्‍दतीचे आहे, ठिकठिकाणी प्‍लास्‍टर केलेले नाही,  पार्कींगमध्‍ये फ्लोअरींग व्‍यवस्थित न केलेने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.  प्‍लेवर ब्‍लॉक बसविलेले नाहीत.

    6. इमारतीचे टेरेसवर लाईटची सोय करुन, इमारतीचे टेरेसवरील पावसाचे पाणी पार्कींगमध्‍ये सोडल्‍याने पार्कींगमध्‍ये पाणी साचते, त्‍याचे निच-याची सोय करणे, टेरेसवर वॉटर प्रुफिंग केले नाही, त्‍यामुळे भिंतींना व स्‍लॅबला आतून व बाहेरुन ओल येते.

   7.  लाईट डी.पी. स्‍वतंत्र देणेसाठी रक्‍कम रु.24,000/- भरुन घेऊनही स्‍वतंत्र डी.पी. दिला नाही.

   8.  ड्रेनेज पाईपचे फिटींग योग्‍य केले नसलेने सर पाईप उघडयावर आहेत त्‍यातून घाण पाणी पार्कींगमध्‍ये पडत आहे.

   9.  इमारतीचे जिन्‍याशेजारील डक्‍टमध्‍ये खिडक्‍यांना ग्रील बसविलेले नाहीत तसेच खिडक्‍यांना सज्‍जे काढले नसल्‍याने पावसाचे पाणी खिडकीतून आत येत आहे.

  10. बिल्डिंगजवळील इलेक्‍ट्रीक धोकादायक पोल त्‍या जागेवरुन दुसरीकडे हलविला नाही.

  11. सदनिकाधारकांना स्‍पेसिफिकेशनमध्‍ये खिडक्‍यांना सेफ्टी ग्रील देणार होते ते दिलेले नाहीत.  तसचे मुख्‍य दरवाजाला मॉडेल डिझायनर शटर कराराप्रमाणे दिले नाही. तसेच टॉयलेट चौकटींना अँल्‍यूमिनियम बॅक लाईट शटर दिले नाही.

  12.  24 तास वॉचमन सुविधा दिलेली नाही.

  13. सदनिकाधारकांची सोसायटी स्‍थापन करुन दिलेली नाही.

  वर नमूद केलेप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदाराचे सदनिकेमध्‍ये अपूरे बांधकाम, अपु-या सोयीसुविधा दिलेने तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागत आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांना जाबदाराने सदोष सेवा पुरविली आहे.  सबब जाबदार यांचेकडून अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करुन मिळणेसाठी व नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदार यांनी जाबदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.     

2.     प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांना अर्जात नमूद केलेप्रमाणे सर्व अपूर्ण कामे पूर्ण करुन देणेचे आदेश व्‍हावेत, इमारतीस 24 तास वॉचमन सुविधा द्यावी, सदनिकाधारकांची सोसायटी स्‍थापन करुन प्रत्‍येकी रक्‍कम रु. 30,000/- जाबदार यांचेकडून मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.80,000/- जाबदारकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

3.     प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने नि. 2 व 3 कडे अँफीडेव्‍हीट, नि.6 चे कागदयादीसोबत नि. 6/1 ते नि.6/7 कडे अनुक्रमे इमारतीचे फोटो, इमारतीचे स्‍पेसीफिकेशनची जाहीरात, पोलीस निरिक्षक यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज, करारनामा, खरेदीपत्राची प्रत, तक्रारदाराने जाबदाराला पाठविलेली नोटीस, व प्रस्‍तुत नोटीसची पोहोच, नि. 9 कडे जाबदाराला तक्रार अर्जाची नोटीस पोहोचलेची जाबदाराची सही असलेली पाहोचपावती, नि. 10 कडे मूळ तक्रार अर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हेच तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र समजणेबाबत पुरसिस, नि. 11 कडे सर्व्‍हेअर/व्‍हॅल्‍युअर/तज्ञ इंजिनियर यांचे प्रतिज्ञापत्र, नि. 12 चे कागदयादीसोबत प्रस्‍तुत इंजिनियर सर्व्‍हेअर यांनी दिलेला इमारत पाहणी अहवाल, नि. 13 कडे लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार यांना नोटीस लागू होवूनही जाबदार मे. मंचात हजर राहीले नाहीत.  तसेच जाबदार यांनी तक्रार अर्जावर म्‍हणणे/कैफीयत दाखल केलेली नाही अथवा तक्रार अर्जातील कोणतेही कथन जाबदार यांनी खोडून काढलेले नाही अथवा नाकारलेले नाही.  सबब जाबदार यांचेविरुध्‍द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  सबब प्रस्‍तुत प्रकरण जाबदार विरुध्‍द एकतर्फा चालवणेत आले.

5.  वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

अ.क्र.               मुद्दा                            उत्‍तर

1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

   असे नाते आहे काय?                                       होय.

2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय?        होय.

3. अंतिम आदेश?                                      खालील आदेशात

                                                     नमूद केलेप्रमाणे

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार क्र.1 व 2 यांनी जाबदार यांनी मौजे गोटे, ता.कराड,जि.सातारा येथील वारुंजी फाटा हद्दीतील त्‍यांचे स्‍वतःचे नावे असणारी मिळकत भूमापन क्र. 45 या कराड नगरपरिषद हद्दीबाहेरील मिळकतीत ‘ऋतुजा रेसीडेन्‍सी’ या नावाने बांधलेल्‍या इमारतीमधील तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी अनुक्रमे पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्र. एफ-1 चे सुपर बिल्‍टअप क्षेत्र 70.53 चौ.मी. व सदनिका नं. एफ-2 सुपरबिल्‍टअप क्षेत्र 70.53 चौ.मी. या सदनिका जाबदारकडून दि.4/4/2013 रोजी प्रत्‍येक सदनिकेची किंमत रक्‍कम रु.10,34,000/- या किंमतीस रजि.खरेदीपत्राने खरेदी घेतली आहे.  प्रस्‍तुतची करारपत्रे व खरेदीपत्रे  याच्‍या सत्‍यप्रती तक्रारदाराने नि. 6 चे कागदयादीसोबत मे. मंचात दाखल केलेली आहेत.  तसेच जाबदार हे मे. मंचाची नोटीस लागू होवूनही मे. मंचात हजर झाले नाहीत.  तसेच तक्रार अर्जावर म्‍हणणे/कैफियत दाखल केलेली नाही.  सबब प्रस्‍तुत जाबदार यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झाला आहे.   जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही अथवा फेटाळलेले नाही.  सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार असलेचे स्‍पष्‍ट होते.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

7.     वर मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने वर नमूद केलेल्‍या सदनिका नं. एफ-1 व एफ-2 या जाबदार यांचेकडून प्रत्‍येकी रक्‍कम रु.10,34,000/- या किंमतीस खरेदी केल्‍या होत्‍या व आहेत.  परंतू प्रस्‍तुत जाबदार यांनी तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान झाले करारपत्रातील नमूद केलेप्रमाणे सोयीसुविधा पुरविण्‍यात आल्‍या नाहीत. ब-याच सोयीसुविधा या अपूर्ण आहेत हे सिध्‍द करणेसाठी तक्रारदाराने नि. 12 चे कागदयादीसोबत इमारतीचे उणिवा असलेचे व्‍हॅल्‍यूअर यांनी काढलेले फोटो व इमारत पाहणी अहवाल तक्रारदाराने त्‍यांचे तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे जाबदाराने या इमारतीसाठी पुरेसे पाण्‍याची सोय केलेली नाही.  तसेच पाण्‍यासाठी ज्‍या पाण्‍याच्‍या टाक्‍या टेरेसवर बसवलेल्‍या आहेत त्‍यापैकी काही टाक्‍या तोंडाला फुटल्‍या असून झाकणेही फुटलेली आहेत.  त्‍यामुळे तसेच ओव्‍हरफ्लो पाईपही काढलेल्‍या नाहीत.  त्‍यामुळे टाकी भरल्‍यावर टाकीतून वाहणारे पाणी टेरेसवरुन वाहते.  त्‍यामुळे टेरेस लीक होऊ शकते.  तसेच इमारतीला सुरक्षेसाठी चारी बाजूला कंपाऊंड असणे आवश्‍यक असून कंपाऊंड वॉल बांधलेली नाही, इमारतीस वाहनतळाची जागा कमी आहे, तसेच प्रस्‍तुत इमारतीच्‍या दोन्‍ही बाजूला म्‍हणजे दक्षीण व पश्चिमेस ले-आऊट प्‍लानमधील रस्‍ते अस्तित्‍वात आहेत.  परंतू सदर इमारत बांधताना रस्‍त्‍यासाठीचे सामायीक अंतर (Road side margin) जागेवर सोडलेले दिसून येत नाही,  तसेच दोन्‍ही बाजूस म्‍हणजे उत्‍तर व पूर्व बाजूस इमारतीसाठीचे सामायिक अंतर (Building side margin) सोडलेले दिसून येत नाही, इमारतीसाठी स्‍वतंत्र इलेक्‍ट्रीकल ट्रान्‍स्‍फॉर्मर (डी.पी.) बसवलेला नाही, सदर इमारतीच्‍या सांडपाण्‍याच्‍या ड्रनेज पाईप रस्‍त्‍याच्‍या बाजूला असून उघडया दिसत आहेत.  त्‍या कॉंक्रीटमध्‍ये मुजविणे गरजेचे आहे.  इमारतीच्‍या बाहेरचे बाजूस खिडक्‍यांना पुरेशा मापाचे सज्‍जे काढलेले नसलेने पावसाचे पाणी खिडकीतून आत येऊ शकते, तरी खिडक्‍यांना सज्‍जे काढणे आवश्‍यक आहे, सदर इमारतीजवळून पश्चिम बाजूस हाताच्‍या अंतरावरुन इलेक्‍ट्रीक लाईन बाल्‍कनी जवळून गेली आहे.  सुरक्षिततेसाठी ती दुसरीकडे हलविणे गरजेचे आहे.  सदर तक्रारदाराचे सदनिकांची पाहणी केली असता फ्लॅटच्‍या बाल्‍कनी पश्‍चीम व दक्षीण बाजूस आहे व मान्‍सूनचे पावसात पाणी बाल्‍कनीतून बाहेर जाणेसाठी पुरेशा आकाराच्‍या पाईप न बसवल्‍याने बाल्‍कनीतून पाणी फ्लॅटमध्‍ये येते.  तरी योग्‍य आकाराच्‍या पाईप बसविणे आवश्‍यक आहे.

    अशास्‍वरुपाच्‍या इमारत पाहणी अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केला आहे.  तसेच याकामी तक्रारदाराने केलेल्‍या  तक्रार अर्जातील कोणताही मुद्दा जाबदाराने फेटाळलेला नाही अगर जाबदाराने याकामी हजर होऊन म्‍हणणे/कैफियत दाखल केलेली नाही.  सबब जाबदार यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश याकामी नि.  वर पारीत झालेले आहेत.  सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली कथने व प्रस्‍तुत इमारत पाहणी अहवाल यांचे अवलोकन करता प्रस्‍तुत जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्‍पष्‍ट होत आहे व तक्रारदार यांना ज्‍या सोयीसुविधा  दिलेल्‍या आहेत त्‍यामध्‍ये कमतरता व त्रुटी ठेवलेली आहे हे या इमारत पाहणी अहवालावरुन व फोटोग्राफ्सवरुन स्‍पष्‍ट होते.  सबब जाबदार यांनी तक्रारदार यांचे सदनिकेमध्‍ये ठेवलेल्‍या उणिवा तसेच प्रस्‍तुत ‘ऋतुजा रेसीडेन्‍सी’ या इमारतीमध्‍ये ब-याच सुविधा अपु-या दिलेचे यावरुन स्‍पष्‍ट होते.

9.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.   

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार यांनी तक्रारदार यांचे सर्व सदनिकांना पुरेसा पाणीपुरवठा होणेसाठी योग्‍य ती सोय करावी, पाण्‍याच्‍या फुटलेल्‍या टाक्‍या दुरुस्‍त करुन साफ कराव्‍यात.

3. जाबदार यांनी वादातील इमारतीचे चारी बाजूस कंपाऊंड वॉल बांधून द्यावी.

4. जाबदाराने वाहनतळाची जागा वाढवून द्यावी.

5. जाबदाराने प्रस्‍तुत इमारतीस स्‍वतंत्र इलेक्‍ट्रीक ट्रान्‍सफॉर्मर डी.पी. बसवून द्यावा.

6.  जाबदाराने ड्रेनेजच्‍या उघडया पाईप्‍स कॉंक्रीटने झाकून घ्‍याव्‍यात.

7.  तक्रारदाराचे सदनिकांचे बाहेरील बाजूच्‍या खिडक्‍यांना योग्‍य मापाचे सज्‍जे जाबदार यांनी काढून द्यावेत.

8.  सुर‍क्षेच्‍या दृष्‍टीने इमारतीचे पश्चिमेस हातभर अंतरावरुन गेलेली इलेक्‍ट्रीक लाईन सुरक्षित ठिकाणी हलविणेसाठी जाबदाराने व्‍यवस्‍था करावी.

9.  तक्रारदारांचे सदनिकांच्‍या बाल्‍कनीतून पावसाचे पाणी बाहेत जाणेसाठी पुरेशा आकाराच्‍या पाईप्‍स जाबदाराने बदलून द्याव्‍यात.

10.  तक्रारदाराचे मागणीतील इतर बाबी प्रस्‍तुत इमारत पाहणी अहवालात दिसून येत नसलेने त्‍या मागण्‍यांचा विचार करता येणार नाही.

11.  जाबदाराने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍क्‍म रु,20,000/- अदा करावेत तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- जाबदाराने तक्रारदाराला अदा करावेत.

12.  वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावी.

13.  विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांना

यांना जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई

करणेची मुभा राहील.

14.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

15.  सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

ठिकाण- सातारा.

दि. 27-01-2016.

 

         (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

      सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

      जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.