जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/57. प्रकरण दाखल दिनांक – 06/03/2009. प्रकरण निकाल दिनांक –14/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. बुध्दरत्न पि. गंगाधर कांबळे वय, 327 वर्षे, धंदा व्यापार, रा.खोब्रागडे नगर, नवा मोंढा, नांदेड. अर्जदार विरुध्द 1. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी सिक्रद्राबाद कर्ज देणार अधिका-यांची कार्यालयीन शाखा दुकान नंबर 22, नविन कॉटन मार्केट, अमरावती. 2. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. तर्फे एंजट-गौरव रामकीशनराव कौटगिरे, रा.वृंदावन अपार्टमेंट, गोकुळनगर, नांदेड. गैरअर्जदार 3. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. द्वारा, वर्धमान फायनान्स 4/4/22, महानकाली स्ट्रीट,सिकंद्राबाद-500 002. अर्जदारा तर्फे. - अड.सी.पी. नरवाडे. गैरअर्जदार क्र.1,2 व 3 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे मारोती ओमनी एल.पी.जी. या वाहनासाठी रु.1,10,000/- कर्जाची मागणी केली. गैरअर्जदार यांनी रु.50,000/- अडव्हान्स कर्ज दिले व गाडीचा ताबा सूध्दा दिला. सदरील गाडीचा क्र.एम.एच.-18-एस-1823 असून मॉडेल हे वर्ष,2004 चे आहे. सदर वाहन दि.31.7.2008 रोजी हायपोथीकेशन डिड द्वारे अर्जदाराच्या नांवे करण्यात आले. अर्जदार हप्ते भरण्यास गेला असता गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्जाची रक्कम रु.1,48,000/- ची मागणी केली. गैरअर्जदार यांच्या फायनान्स कंपनीने अर्जदारास कर्जाच्या मागणीचे पूर्ण रक्कम दिलेली आहे परंतु अर्जदाराला कर्जाची रक्कम रु.50,000/- मिळाली आहे. परंतु गैरअर्जदार हे अर्जदाराच्या नांवे पूर्ण रक्कम लावून व्याजासह रु.1,48,000/- मागतात, जे की अर्जदारावर बांधील नाही. अर्जदार हे रु.50,000/- ची परत फेड करण्यास तयार आहेत. गैरअर्जदार यांनी वरील प्रमाणे रक्कम अर्जदाराच्या नांवावर लावलेले आहे जे की बेकायदेशीर व चूकीचे आहे. अर्जदाराची मागणी आहे की, वरील गाडीला दिलेले कर्ज रु.50,000/- स्विकारुन अर्जदाराच्या हक्कात बेबाकी प्रमाणपञ देण्यात यावे तसेच मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच कागदपञ दाखल केले आहेत यांचा विचार होता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे कडून मारोती व्हॅन एल.पी.जी.ही गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये हजर राहून त्यांचे लेखी म्हणणे व शपथपञा आधारे अगर इतर कागदोपञी पूरावा देऊन नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी मारोती व्हॅन खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडून रु.1,10,000/- कर्जाची मागणी केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.50,000/- एवढीच अडव्हान्स कर्ज म्हणून दिलेले आहेत. उर्वरित रक्कम अर्जदार यांना देण्यात आलेली नाही असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये रक्कम रु.1,10,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळण्यासाठी मागणी केलेली होती. या बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.50,000/- अडव्हान्स कर्ज मिळाले या बाबतही कोणताही कागदोपञी पूरावा गैरअर्जदार यांचे अर्जदार यांचे नांवे असलेला कर्ज खाते उतारा दाखल केलेला नाही. अगर सदरचे कागदपञ गैरअर्जदार यांचेकडून मिळण्यासाठी या मंचामध्ये अर्जही केलेला नाही. त्यामूळे अर्जदार प्रस्तूत तक्रार गैरअर्जदार यांचे विरुध्द शाबीत करु शकलेले नाहीत. अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून रु.1,48,000/- एवढी रक्कम भरणेवीषयी सांगितल्याचे नमूद केलेले आहे परंतु त्या बाबतही गैरअर्जदार यांचे थकीत रक्कमेची मागणी करणारी नोटीस असा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी या अर्जामध्ये हायपोथीकेशन डिड चा उल्लेख केलेला आहे परंतु प्रत्यक्षात हाथपोथीकेशन डिड या अर्जाचे कामी दाखल केलेले नाही. अगर गैरअर्जदार यांचे मार्फत दाखल होण्यासाठी गैरअर्जदार यांना साक्षी समन्स अर्ज देऊन तसे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून सेवेत कमतरता आहे ही बाब शाबीत करु शकलेले नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे ही बाब अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) अध्यक्ष. सदस्या जे.यु, पारवेकर लघुलेखक. |