Maharashtra

Additional DCF, Pune

CC/14/236

Mr Mushataq Allabaksh Shaikh - Complainant(s)

Versus

Shriram Transport Finance Company Limited through its Branch Maager - Opp.Party(s)

Jayshree Kulkarni

08 Dec 2014

ORDER

ADDITIONAL PUNE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
PUNE
FINAL ORDER
 
Complaint Case No. CC/14/236
 
1. Mr Mushataq Allabaksh Shaikh
R/at 39 Wanwadi Bazaar Pune
Pune 411040
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram Transport Finance Company Limited through its Branch Maager
1st Floor Gheewala Complex Above Axsis Bank Opp Ramkrishna More Sabhagruha Chinchwad
Pune 411033
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Anjali Deshmukh PRESIDENT
  S.K. Pacharne MEMBER
  Shubhangi Dunakhe MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रारदारांतर्फे       -     अॅड.श्रीमती. जयश्री कुलकर्णी

            जाबदेणारांतर्फे             -     अॅड.श्री. श्रीधर धुमाळ

 

// अर्जदार / जाबदेणार यांच्‍या दि. 14/10/2014 रोजीच्‍या अर्जावरील आदेश //

(दि.8/12/2014)

 

 (द्वारा-  श्रीमती. अंजली देशमुख, अध्‍यक्ष)

 

 

             अर्जदार/जाबदेणारांनी दि. 14/10/2014 रोजी अर्ज दाखल केला.  त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, ही तक्रार मंचात चालण्‍याजोगी नाही कारण अर्जदार/जाबदेणारांनी यापूर्वीच तक्रारदारांच्‍या विरुध्‍द आर्बीट्रेटरकडे आर्बीट्रेशन आणि कन्‍सीलिएशन अॅक्‍टनुसार केस दाखल केली  होती.  आर्बीट्रेटरने त्‍यामध्‍ये दि. 7/9/2012 रोजी अॅवॉर्ड पारीत केला.  एकदा आर्बीट्रेशन अॅक्‍टनुसार अॅर्वार्ड पारीत केल्‍यानंतर तक्रारदाराची ही तक्रार या मंचात चालण्‍याजोगी नाही म्‍हणून हा अर्ज मंजूर करावा आणि तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात. जाबदेणारांनी अर्जासोबत आर्बीट्रेटरने पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे.   

 

2.          तक्रारदारास संधी देऊनही त्‍यांनी त्‍यांचे  म्‍हणणे दाखल केले नाही तसेच युक्तिवादाच्‍या वेळेस हजर राहिले नाहीत.

 

3.          अर्जदार / जाबदेणारांचा अर्जावरील युक्तिवाद ऐकला.  अर्जदार/जाबदेणारांनी दाखल केलेल्‍या आर्बीट्रेशन अॅक्‍टनुसार त्‍यांनी प्रस्‍तुतच्‍या तक्रारदाराविरुध्‍द आर्बीट्रेटरकडे तक्रार  दाखल केल्‍याचे दिसून येते. (आर्बीट्रेशन केस क्र. 917/2012) आर्बीट्रेटरने दि. 7/9/2012 रोजी प्रस्‍तुत तक्रारदाराच्‍या विरुध्‍द अॅवॉर्ड पारीत केले आहे.  आर्बीट्रेशन केस मधील आणि प्रस्‍तुतच्‍या तक्रारीमधील  वाद एकाच प्रकारचा आहे आणि त्‍याच पक्षकारांविरुध्‍द आहे.  तक्रारदारांनी अर्जदार / जाबदेणारांकडून व्‍हेईकलसाठी कर्ज घेतले होते आणि अर्जदार/जाबदेणारांनी त्‍या संदर्भातील काही कागदपत्रे तक्रारदारास दिली नाहीत म्‍हणून तक्रार दाखल केली.  याच कर्जासंदर्भात अर्जदार / जाबदेणारांनी तक्रारदारांनी हे कर्ज फेडले नाही म्‍हणून आर्बीट्रेटरकडे तक्रार दाखल केली होती.  एकदा आर्बीट्रेटरने अॅवॉर्ड पारीत केल्‍यानंतर त्‍याविरुध्‍द दाद मागण्‍याचे अधिकार फक्‍त उच्‍च न्‍यायालयासच आहेत.  असे असतानाही, तक्रारदारांनी तिकडे दाद न मागता मंचामध्‍ये ही तक्रार दाखल केली आहे.  हे अॅवॉर्ड दि. 7/9/2012 रोजीचे आहे आणि तक्रारदारांनी मंचामध्‍ये दि. 19/8/2014 रोजी म्‍हणजे जवळपास दोन वर्षांनी दाखल केली आहे.  तक्रारदारांनी या आर्बीट्रेशनच्‍या अॅवॉर्डबद्दल तक्रारीत नमुद केले नाही, ही माहिती दडवून ठेवल्‍याचे दिसून येते.  अर्जदार/जाबदेणारांनी या संदर्भात मा. राज्‍य आयोग, रायपूर यांचा Appeal No. FA/12/313 dtd.29/6/2012 Magma Fincop Limited V/s. Maan Singh  हा निवाडा दाखल केला आहे, त्‍यामध्‍ये मा. राज्‍य आयोगाने, एकदा आर्बीट्रेटरने आर्बीट्रेशन आणि कन्‍सीलिएशन अॅक्‍ट सेक्‍शन 34 नुसार, अॅवॉर्ड पास केल्‍यानंतर डिस्‍ट्रीक्‍ट जज हे कॉम्‍पीटन्‍ट कोर्ट असते. तिकडे न जाता तक्रारदारांनी मंचामध्‍ये ही तक्रार दाखल केली आहे.  एकदा आर्बीट्रेशन अॅवॉर्ड पारीत केल्‍यानंतर मंचामध्‍ये केस दाखल करु शकत नाही (not maintainable) म्‍हणून तक्रार नामंजूर करण्‍यात आली.  हा निवाडा प्रस्‍तुतच्‍या तक्रारीस तंतोतंत लागू होतो, म्‍हणून मंच या निवाडयाचा आधार घेऊन अर्जदार / जाबदेणारांचा अर्ज मंजूर करुन तक्रार अर्ज क्रमांक एपीडीएफ/2014/236 नामंजूर करतो.       

 

 
 
[ Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ S.K. Pacharne]
MEMBER
 
[ Shubhangi Dunakhe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.