::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 16/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, त्यांनी ट्रॅक्टर विकत घेण्याकरीता गैरअर्जदार क्रं. 3 च्या मार्फत गैरअर्जदार क्रं. 2 कडून सन 2008 मध्ये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पूर्णपणे करुन सुध्दा नाहरकत प्रमाणपञ अर्जदारास गैरअर्जदाराने दिले नाही. म्हणून अर्जदाराने दि. 16/6/14 रोजी अर्जदाराचे खाते तपशिल व संपूर्ण परतफेड केल्याच्या पैशाच्या पावत्या नाहरकत प्रमाणपञ देण्याकरीता नोटीस पाठविली परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने दि. 1/7/14 रोजी खोटया आशयाचे नोटीस पाठविले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन सुध्दा अर्जदाराला परतफेडीच्या पावत्या, खाते उतारे व नाहरकत प्रमाणपञ दिले नाही म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार दाखल होवून अर्जदाराच्या वकीलातर्फे प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराच्या प्राथमिक युक्तीवादात व तक्रार व दस्ताऐवजाची पडताळणी करुन सदर मंच खालील असलेले कारणे व निष्कर्षानुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
कारणे व निष्कर्ष
3. अर्जदाराने दाखल नि.क्रं. 4 वर दस्त क्रं. अ- 1 ची पडताळणी करतांना गैरअर्जदार क्रं. 3 ने गैरअर्जदार क्रं. 1 ला रक्कम स्विकारण्याबाबत व अर्जदाराला स्विकारलेल्या रकमेची रशिदबाबत दि. 7/12/11 रोजी पञ लिहीले होते सदर पञाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या प्राथमिक युक्तीवादात केला असून, सदर तक्रार दाखल करण्याचे कारण 2011 पासून घडले होते व त्यानंतर ते कारण सतत राहीले. अर्जदाराने 2011 च्या नंतर गैरअर्जदाराला 2014 मध्ये वकीलामार्फत नोटीस पाठविली, परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराला कर्ज परतफेडीकरीता पावत्या व नाहरकत प्रमाणपञ बाबत कोणतेही पञ व्यवहार केले नसून मंचाचे असे मत ठरले कि, अर्जदाराचे सदर तक्रार दाखल करण्याचे प्रथम कारण सन 2011 मध्ये घडले म्हणून सदर तकार कलम 24 – (1) ग्राहक सरक्षण कायदा 1986 प्रमाणे मुदतीच्या बाहेर असल्याने खारीज होण्यास पाञ आहे. सबब खालील प्रमाणे नि. क्रं. 1 वर अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
//अंतीम आदेश//
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति परत देण्यात याव्या.
(3) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 16/01/2015