Maharashtra

Chandrapur

CC/13/5

Shri Prashant Babnrao Sakharkar - Complainant(s)

Versus

Shriram Transport Finance Company Limited Through Chandrapur Branch Maneger - Opp.Party(s)

Adv.A.U.Kullarwar

17 Mar 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/5
 
1. Shri Prashant Babnrao Sakharkar
Near jama Masjid Rani Laxmi Ward ,Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram Transport Finance Company Limited Through Chandrapur Branch Maneger
Prestige Plaza Mul Road chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 13/03/2015 )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

1.    अर्जदाराने आापल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून ट्रक खरेदी करण्‍याकरीता 10/6/08 रोजी 7,00,000/- रु. कर्ज घेतले होते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या 70 ते 80 छापील कागदावर करारनाम्‍याच्‍या नाव्‍याखाली सहया घेतल्‍या. अर्जदाराला सदर कर्जाची परतफेड व्‍याजासह दरमहा 23,200/- प्रमाणे गैरअर्जदाराकडे भरणा करायचे होते. अर्जदाराने तक्रार दाखल तारीख पर्यंत गैरअर्जदाराकडे 9,54,046/- रु. वेळोवेळी भरणा केलेली आहे. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, जानेवारी 2009 मध्‍ये अर्जदाराने ट्रकचे टायर खरेदी करण्‍याकरीता गैरअर्जदाराकडुन 18,000/- कर्ज घेतले व त्‍याची परतफेड 18,550/- रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केली आहे. या अतिरिक्‍त अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन कोणतेही कर्ज घेतलेले नाही. अर्जदाराने दि. 13/6/12 रोजी 250/- गैरअर्जदाराकडे भरणा करुन अर्जदाराचे कर्ज खाते उतारा व करारनाम्‍याची प्रत घेतली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 9,57,046/- रु. ची भरणा केला आहे व 1,29,266/- रु. भरणा करणे बाकी आहे. अर्जदार एक रकमी रक्‍कम भरुण आपले कर्ज खाते बंद करायचे असल्‍यामुळे अर्जदार रु. 1,30,000/- मार्च 2012 मध्‍ये गैरअर्जदाराकडे गेला असता गैरअर्जदाराने 6,92,000/- रु. बाकी आहे असे अर्जदारास सांगून पूर्ण रक्‍कम भरणार तरच कर्ज खाते बंद होईल असे सांगितले. गैरअर्जदाराच्‍या अधिका-यांनी अर्जदारास प्रत्‍येकी दोन वेळा 50,000/- रु. व्‍यक्‍तीगत व तीन वेळा विमा पॉलिसीचे कर्ज दिल्‍याचे सांगितले. गैरअर्जदाराने 20/2/09 ते 31/1/12 या कालावधीत अर्जदाराला 1,45,312/- रु. चे इतर सहा कर्ज दिल्‍याने दर्शविलेले आहे. वास्‍तविक असे अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्‍यात कर्ज न देता अतिरिक्‍त रक्‍कम अर्जदाराचा असहायतेचा फायदा घेऊन समाविष्‍ट केली ही गैरअर्जदाराने ही अनुचित व्‍यवहार पध्‍दती केली आहे. या करीता सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली आहे.

 

2.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून ट्रकचे कर्जापोटी 1,30,000/- रु. घेवून अर्जदारास नो डयु प्रमाणपञ कागदपञ देवून वरील बोझा कमी करुन दयावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

3.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 14 वर आपले लेखीउत्‍तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्‍या लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराच्‍या विरुध्‍द लावलेले सर्व आरोप खोटे असून त्‍यांना नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला कर्ज दिल्‍याबाबत दि. 10/6/08 रोजी दस्‍ताऐवज दिले होते. सदर दस्‍ताऐवज अर्जदाराला दिल्‍याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराला पोच पावती सुध्‍दा दिलेली आहे. अर्जदाराने दि. 29/8/10 रोजी रु. 50,000/- रु. चे बुलेट लोन सुध्‍दा घेतले आहे अर्जदाराला सदरहु कर्जाची व्‍याजासहीत रु. 93,850/- चे परतफेड करायची होती. सदर कर्जाबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराला डिमोंड प्रॉमिरी नोट करुन दिलेले आहे तसेच 30/8/10 रोजी करारनामा करुन दिलेला आाहे. तसेच या शिवाय अर्जदाराने अर्ज करुन दि. 7/9/10 रोजी गैरअर्जदाराकडुन परत रु. 50,000/- चे बुलेट लोन सुध्‍दा घेतलेले आहे. सदरहु कर्जासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराला डिमांट प्रॉमिसरी नोट दि. 7/9/10 व 8/9/10 ला करारनामा करुन दिलेले आहे. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेले ऍक्‍सीस बॅकेंचे क्रेडिट कार्ड ची सुविधेचा देखिल उपभोग घेतला आहे. स्‍टेटमेंट मध्‍ये त्‍याचा उल्‍लेख आहे. याशिवाय अर्जदाराने दि. 15/1/10, 22/12/11, 31/1/12 व 30/1/13 रोजी अनुक्रमे रु. 22,440/-, रु. 19,236/-, रु. 10,488/-  व रु. 25,908/- विमा कर्ज घेतलेले होते व आहे. यापैकी दि. 15/1/10 व 22/12/11 चे विमा कर्ज व 31/1/09 रोजी घेतलेल्‍या टायर कर्जाची परतफेड केलेली आहे. अर्जदाराने गाडी संबधी दि. 10/6/08 रोजीचे कर्जाचे कालावधी दि. 10/5/12 रोजी संपुष्‍टात आलेले आहे. अर्जदाराने गाडी संबंधी घेतलेल्‍या कर्जाची रक्‍कम तसेच  दि. 29/8/10 व 8/9/10 रोजी बुलेट कर्ज व सर्व विमा कर्जाची रक्‍कम नियमित पणे न भरल्‍यामुळे अर्जदार हा आज रोजी थकीतदार आहे. अर्जदाराचे कर्जाची थकीत रक्‍कम 7,99,686/- रु. अशी आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्‍द कारयदेशिर कार्यवाही करु नये व कर्जाची थकीत रक्‍कम गैरअर्जदाराकडे भरायची नाही म्‍हणून सदर खोटी तक्रार अर्जदाराने मंचासमक्ष दाखल केलेली आहे. अर्जदाराने सदर कर्ज हे व्‍यवसायासाठी घेतलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदास कोणतीही न्‍युनतम सेवा व अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली नसून सदर तक्रार खर्च व दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.  

 

4.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

            मुद्दे                                               निष्‍कर्ष

 

(1)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?                     होय.                 

 

   (2)   गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा

         अवलंब केला आहे काय ?                                 नाही                                                                                          

   (3)   आदेश  काय ?                                   अंतीम आदेशाप्रमाणे.

                       

 

 कारण मिमांसा

 

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

 

5.    अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून ट्रक खरेदी करण्‍याकरीता 10/6/08 रोजी 7,00,000/- रु. कर्ज घेतले होते. ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असल्‍याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्‍द होत असल्‍याने मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

 

6.    अर्जदाराने नि. क्रं. 4 वर दस्‍त क्रं. अ- 4 वर गैरअर्जदाराने नि. 16 वर दस्‍त क्रं. ब – 17 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कर्जाची नियमित परतफेड 23,200/- रु. (मासीक हप्‍ता) दरमहा प्रमाणे केलेली नाही. या अनुषंगाने अर्जदाराने घेतलेले कर्जावर अतिरिक्‍त व्‍याज व भत्‍ते गैरअर्जदाराने कर्जावर लावले आहेत. गैरअर्जदाराने नि. क्रं. 16 वर दस्‍त क्रं. ब- 04, ब  08, ब – 09, ब- 12 वर दाखल डिमांड प्रॉमिसरी नोट वरुन अर्जदाराने गैरअर्जदाराकडून अतिरिक्‍त बुलेट कर्ज घेतलेले होते व त्‍याचाही भरणा सुध्‍दा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नियमितपणे केला नाही असे अर्जदाराने नि. क्रं. 4 वर दस्‍त क्रं.अ- 4 व गैरअर्जदाराने नि. क्रं. 16 वर दस्‍त क्रं. ब – 16 दाखल केलेली स्‍टेटमेंट ची पडताळणी वरुन निष्‍पन्‍न होत आहे. सदर प्रकरणात अर्जदाराला हे मान्‍य आहे कि, सदर वाहनावर अर्जदाराने घेतलेल्‍या कर्जाच्‍या मासीक हप्‍त्‍यांचा भरणा नियमितपणे केली नसून व थकीत कर्जाची भरणा अर्जदाराला गैरअर्जदाराला करायची आहे.

 

मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्‍या न्‍याय निर्णयानुसार

 

1)II (2014) CPJ 225(NC)

 

BHIM MAHARAJ V/S. SHIVAM MOTORS PVT. LTD. & ORS.

Decided on 17.1.2014

            Consumer Protection Act, 1986-Sections 2(1) (g), 14(1)(d), 21(b) – Hire Purchase Agreement- Surrender of Vehicle- Default in payment of installments- Forcible repossession alleged- Alleged deficiency in service- District Forum allowed complaint- State Commission allowed appeal- Hence revision – Petitioner admitted that “Due to financial crisis, he could not pay balance installments”- Petitioner himself was defaulter and surrendered vehicle on his own undertaking to pay balance installments- Signatures on all documents tally with each other- Deficiency not proved.

 

2) III (2014) CPJ 523 (NC)

 

ZIAUL HAQUE V/S. THE L&T FINANCE LTD. & ORS.

Decided on 19.5.2014

Consumer Protection Act, 1986- Sections 2(1)(g), 21(b) – Hire Purchase Agreement- Default in payment of installment- Repossession of vehicle-Mental and physical harassment- Alleged deficiency in service- District forum allowed complaint- state Commission allowed appeal- Hence revision- Existence of agreement between parties and its terms and conditions have not been denied by complainant anywhere- District Forum took erroneous view in allowing refund along with cost of body and cost of registration of truck to complainant- Order passed by state commission is based on rational analysis of facts and circumstances on record-Deficiency not proved.

 

सदर तक्ररीत सुध्‍दा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नियमित कर्जाच्‍या हप्‍त्‍यांची रक्‍कम भरलेली नाही तसेच  अर्जदाराने गैरअर्जदारासोबत सदर वाहनाबाबत केलेल्‍या करारनाम्‍यातील शर्ती व अटी नाकारलेले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून उर्वरित कर्जाची रकमेची मागणी करुन कोणतीही अर्जदाराप्रति अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली नाही. म्‍हणून मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर हे नाकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 3 बाबत ः- 

 

7.    मुद्दा क्रं. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

  अंतीम आदेश

            (1) अर्जदाराची खारीज तक्रार करण्‍यात येत आहे.

            (2) दोन्‍ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.

            (3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

 

 

चंद्रपूर

दिनांक -   13/03/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.