निकालपत्र :- (दि.11/11/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांतर्फे लेखी युक्तीवाद दाखल करणेत आला. सामनेवाला वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे वाहतूक व्यावसायिक असून त्यांचे मालकीचा टाटा मोटरचा सहा चाकी ट्रक व्दारे निरनिराळया साखर कारखान्याकडे तसेच खाजगी वाहतूक करुन येणा-या उत्पन्नातून चरितार्थ चालवतात. तक्रारदाराने सामनेवाला वित्तीय संस्थेकडून ऑक्टोबर-06 मध्ये रु.1,50,000/- इतके कर्ज काढले होते. पुन्हा लगेचच डिसेंबर-06 मध्ये रक्कम रु.1,50,000/- चे कर्ज काढले होते. सदर दोन्ही कर्जासाठी तक्रारदाराचे मालकीचा ट्रक क्र.MH-09-BC-5535 तारण ठेवलेला होता. सदर ट्रकचा जुना क्र.GA-02-V-5859 असा होता. रितसर रजिस्टर होऊन तक्रारदाराने नवीन नंबर घेतलेला आहे. सदर दोन्ही कर्जासाठी 17 टक्के व्याज होते. तक्रारदाराने सुरुवातीला सामनेवाला यांना मासिक हप्ता वेळेवेळ भरता येणार नाही. कारण ट्रकचा धंदा बेभरवश्याचा आहे. एकदम रक्कम मिळेल तशी कर्ज खातेवर जमा करणार असलेबाबत सांगितले होते. त्यास सामनेवाला यांनी संमत्ती दिली होती. तसेच तक्रारदाराकडून दंडव्याज आकारणार नाही अशी हमी दिली होती. तक्रारदाराचे कर्ज खाते क्र.TSLKLP0071084 वर दि.03/02/2010 अखेर 8 हप्त्यामध्ये 2,64,270/- इतक्या रक्कमेचा भरणा करुनही सामनेवाला यांनी जादा व्याज दंडव्याजाची आकारणी करुन रक्कम रु.4,50,000/-ची मागणी तक्रारदाराकडे केली. सदर रक्कम न भरलेस नमुद ट्रक जप्त करुन त्याचा लिलाव करणेची धमकी दि.07/03/2010 रोजी दिली. तक्रारदाराने कर्ज खाते उतारा व कराराची मागणी करुनही सदर कागदपत्रे देण्यास सामनेवाला यांनी विरोध केला. मात्र नंतर तक्रारदारास खातेउतारा दिला असता सदर खातेउतारा प्रथमदर्शनीच चुकीचा असलेचे तक्रारदाराचे लक्षात आले. कारण तक्रारदाराचे खाते हे रु.3,00,000/- चे नसून रु.1,50,000/- आहे असे लक्षात आलेवर त्याचा जाब सामनेवालांचे कर्मचा-यांना विचारला असता संगणक प्रणालीतील बिघाडामुळे डाटा चुकीचा येत असलेचे सांगितले. सामनेवाला यांनी नमुद खाते उतारा चार्टड अकौन्टट यांचेकडे तपासणीसाठी दिला. त्यांनी सदरचा खाते उतारा अपुरा असलेचे सांगितले व अचुक खातेउतारा देणेविषयी तक्रारदारास सांगितले व तसा रिपोर्ट तक्रारदारास दिला. दि.07/03/2010 रोजी सामनेवाला यांचे अधिकारांची भेट घेतली असता अदयापही रु.2,00,000/- कर्ज थकीत असून दंडव्याज व थकीत हप्ते रु.2,50,000/- असे मिळून रु.4,50,000/- इतकी रक्कम येणे असलेचे सांगितले व सदर रक्कम भरणा न केलेस वाहन जप्त करुन वाहनाचा लिलाव करणार असलेचे सांगितलेने तक्रारदारास मानसिक धक्का बसला. सामनेवाला यांनी सन 2009 मध्ये तक्रारदारास कार्यालयात बोलवून तक्रारदाराच्या को-या करारपत्रावर असंख्य सहया घेतल्या होत्या. त्याबाबत विचारणा केली असता कर्जाचे नुतनीकरण केले असून त्याबाबतच्या सहया असलेचे सांगितले. तक्रारदाराने करार कागदपत्रांची तोंडी व दि.26/05/2010 रोजी लेखी मागणी करुनही त्यास सामनेवाला यांनी दाद दिलेली नाही. सामनेवाला यांचे वसुली अधिकारी यांनी दि.12/06/2010 रोजी तक्रारदाराचे अपरोक्ष घरी येऊन पुन्हा ट्रक जप्त करणेची धमकी दिलेने तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदारास सदर धमकी दिलेमुळे नमुद ट्रकचे भाडे घेत आलेले नाही. ट्रक एका जागी उभा असलेने झालेले नुकसान रक्कम रु.50,000/- मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावेत. तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावेत. तक्रारदाराचे को-या करारपत्रावर सहया करुन घेऊन रु.4,50,000/- ची मागणी केलेली आहे. त्याचा सविस्तर चौकशी होऊन हिशोब दाखल करणेबाबत आदेश व्हावा. तक्रारदारास वाहन जप्तीचे धमकीचे सत्र चालू केले आहे. त्यास मनाई करणेत यावी अशी विनंती मे. मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ कर्ज खाते करार क्र.TSLKLPOO71084 व KLPRO904180012 चा खातेउतारा, कर्ज खाते करार क्र.TSLKLPOO71084 वर भरलेली रक्कम रु.6,762/-, रु.9,000/-, 28,508/-, रु.40,000/-, रु.65,000/-, रु.50,000/-,रु.40,000/-, रु.25,000/- च्या पावत्या, सामनेवालांकडे कर्ज खातेबाबत लेखी मागणी केलेले पत्र, सदर पत्राची पोष्टाची पोहोच पावती, आर.टी;ओ.कोल्हापूर यांचेकडे तक्रारदाराचा ट्रक रजिस्टर्ड असलेचे प्रमाणपत्र,चार्टर्ड अकौन्टट श्री गिरीश सामंत यांनी कर्ज खाते उता-यासंदर्भात दिलेला अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच कर्ज/हायपोथीकेशन करारपत्र दाखल केले आहे. (04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराने व्सतुस्थितीच्या विरहीत बिनबुडाचे आरोप करुन मंचाची दिशाभूल केलेली आहे. सामनेवाला पुढे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे नमुद असलेले वाहन क्र. GA-02-V-5859करिता कंपनीच्या अटी व शर्ती मान्य करुन सदर हेव्ही व्हेईकल गुडकरिता सामनेवालांकडून वित्त पुरवठा करुन घेतलेला आहे. सदर वित्त पुरवठा हा कमर्शिअल व्हेईकल करिता आहे. सबब वाणिज्य हेतूसाठी तक्रारदाराने कर्ज घेतलेले आहे. त्याबाबत हायपोथीकेशन करारपत्र केलेले आहे. तक्रारदाराचे शेती तसेच अन्य व्यवसाय असलेबाबत सामनेवाला यांचे अधिकारी श्री केतनकुमार बोंगाळे यांना सांगितले होते. कायदेशीर करारात लिहून दिलेप्रमाणे ठरलेले हप्ते वेळेत न भरता व कराराचे पालन न करता कराराचा भंग केला आहे व सदरची चुक लपवून ठेवून भलतेसलते आरोप करुन सामनेवाला यांना आरोपी ठरवणेचा प्रयत्न तक्रारदार करत आहेत. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज वस्तुस्थितीनुसार व कायदेशीरपणे मे. मंचासमोर चालणेस पात्र नाही. कोणत्याही सबळ पुराव्याअभावी सामनेवालांविरुध्द खोटे आरोप केले असून सामनेवालांना ते मान्य व कबूल नाही. सबब तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही असे सामनेवाला यांनी आपले म्हणणे सांगितले आहे. (9) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि.चे दि.12/11/2010, दि.30/11/2009, दि.19/10/2008 च्या पॉलीसीचे सर्टीफिकेट, इचलकरंजी जनता सह.बँकेच्या चार पे ऑर्डर्स, सामनेवाला फायनान्सचे कर्जाबाबतचे टर्म व कंडिशन्स, टॉपअप लोनचे तक्रारदाराने केलेले नोटराईज्ड अॅग्रीमेंट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराचे वाहनाचे हायपोथीकेशन अॅसेटस (खातेउतारा) दाखल केले आहेत. (10) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे, तसेच उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद व सामनेवालांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ? ---होय. 2. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय ? ---नाही. 3. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी वाणिज्य हेतूचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. याचा विचार करता तक्रारदाराने वाहनावर घेतलेले कर्ज हे त्याचे वाहतूकीतून येणा-या उत्पन्नातू चरितार्थ चालवणेसाठी घेतलेले आहे. सामनेवाला यांनी जरी कमर्शिअल व्हेईकलसाठी कर्ज दिले असले तरी सदर कर्जपुरवठा व त्याबाबत असणारे वाद मे. मंचास निर्णित करणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येते. सबब प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जातील कलम 2 मध्ये ऑक्टोबर-2006 व डिसेंबर-2006 मध्ये प्रत्येकी रक्कम रु.1,50,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.3,00,000/- इतके कर्ज त्याचे मालकीचा जुना क्र.GA-02-V-5859 (नवीन ट्रक क्र. MH-09-BC-5535) तारण ठेवून कर्ज घेतलेचे मान्य केले आहे. सदर कर्जासाठी 17 टक्के व्याजदर असलेचे मान्य केले आहे. तक्रारदाराने दाखल केलेला खातेउतारा सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. कारण प्रस्तुतचा खातेउतारा हा अधिकृत सहीशिक्क्यानिशीचा नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांवरुन दि.20/10/06 रोजी रु.6,762/- दि.15/01/07 रोजी रक्कम रु.9,000/-, दि.12/02/07 रोजी रु.28,508/- दि.17/03/08 रोजी रु.40,000/-दि.20/06/08 रोजी रु.65,000/- दि.30/09/08 रोजी रु.50,000/-, दि.05/06/09 रोजी रु.40,000/-, दि.03/02/10 रोजी रु.25,000/-अशी एकंदरीत रक्कम रु.2,64,270/- कर्ज खातेस भरणा केलेचे दिसून येते. सामनेवाला यांनी दाखल केलेले कर्जाचे हायपोथीकेशन करारपत्राचे अवलोकन केले असता ट्रक क्र.GA-02-V-5859 ही कर्ज रक्कम रु.1,50,000/- द.सा.द.शे. 17 टक्के व्याजाने एकूण 36 हपत्यामध्ये परतफेड करणेचे होते. पैकी 35 हप्ते प्रतिमाह रु.6,762/- प्रमाणे व 36 वा हप्ता रु.5,830/5 प्रमाणे अदा करणेचा होता. प्रस्तुत कर्जाचे हप्ते दि.18/10/2006 ते 18/09/2009 अखेर अदा करणेचे होते. प्रस्तुतचे कर्ज ऑक्टोबर-2006 मध्ये अदा केलेले आहे. तक्रारदाराने भरणा केलेल्या रक्कमांची नोंद दाखल खातेउता-यावर आहे. तदनंतर तक्रारदारानेच नमुद हायपोथीकेटेड वाहनावर रक्कम रु.1,50,000/- इतक्या कर्ज रक्कमेची पुन्हा मागणी केली. तक्रारदाराने आपल्या लेखी युक्तीवादामध्ये सामनेवालांकडून घेतलेल्या रक्कम रु.1,50,000/- चे कर्जावर डिसेंबर-2010 मध्ये टॉपअप रक्कम रु.1,50,000/- घेतली असलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच तक्रार अर्ज कलम 2 मध्येही सदरची बाब तक्रारदाराने मान्य केली आहे. त्यासंदर्भात तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.08/11/2006 रोजी नोटराईज्ड शपथपत्र दिलेले आहे. सदर शपथपत्रामध्ये त्याच वाहनावर अंतिम रक्कम रु.1,50,000/- टॉपअप कर्ज घेतलेचे मान्य केले आहे. त्यानुसार सामनेवाला यांनी पूर्वीच प्रस्तुत वाहन हायपोथीकेटेड केले असलेमुळे मूळ कर्ज हे दि.18/09/06 रोजीचे कराराने दिले आहे. सदर मूळ कर्ज रु.1,50,000/- त्यावर 17 टक्केने होणारे रक्कम रु.76,500/-, इन्शुरन्स डिपॉझीट रु.16,000/- अशी एकूण रक्कम रु.2,42,500/- अशी देय रक्कम आहे. तक्रारदाराने नमुद केलेले टॉपअप कर्जाची नोंद मूळ खातेउता-यावर दि.21/03/2007 रोजी अनुक्रमे रु.1,25,000/- व रु.25,000/- अन्वये रु.1,50,000/- नोंद केलेचे दिसून येते. प्रस्तुतचे वाढीव कर्ज हे मूळ कर्जाचे अटी व शर्तीस अधिन राहून दिलेले आहे व त्यास तक्रारदाराने मान्यता दिलेली आहे. सबब त्यासंबंधीचा पुरेसा पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला आहे. तक्रारदाराचे आर्थिक नड काढणेचे दृष्टीने व तक्रारदाराचे मागणी व संमत्तीने मूळ कर्ज रु.1,50,000/- व तदनंतर रु.1,50,000/- असे एकूण रक्कम रु.3,00,00/- तक्रारदारास दिलेले आहेत व ते तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात व लेखी युक्तीवादात मान्य केलेले आहे. यामध्ये सामनेवाला यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेचे दिसून येते नाही. तक्रारदाराने भरणा केलेल्या रक्कमा त्यांचे कर्ज खातेस नोंदवलेल्या आहेत. तक्रारदाराने नमुद कर्जाचे वेळापत्रकाप्रमाणे रक्कमा न भरता जशा येतील तशा एकूण रक्कम रु.2,64,270/- भरलेचे खातेउता-यावर नमुद आहे. उर्वरित कर्ज रक्कम त्याचे हप्ते व व्याज थकीत आहेत ही वस्तुस्थिती दाखल खातेउता-यावरुन निदर्शनास येते. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |