Maharashtra

Nagpur

CC/61/2017

Shri Suresh Wamanrao Lambat - Complainant(s)

Versus

Shriram Transport Finance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Trupti M Khade

16 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/61/2017
( Date of Filing : 04 Feb 2017 )
 
1. Shri Suresh Wamanrao Lambat
R/o. Plot No. 646, Near Priya Bar, Reshimbagh Chowk, Nagpur 440009
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram Transport Finance Co.Ltd.
Wardhaman Nagar Branch, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shriram Transport Finance Co.Ltd.
Office- 101-105, 1st floor, B-Wing, Shiv Chambers, Sector-11, CBD, Belapur, New Mumbai 400614
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. Trupti M Khade, Advocate for the Complainant 1
 ADV. GAJANAN D. KALE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 16 Nov 2021
Final Order / Judgement

                                आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमिटेडची विरुध्‍द पक्ष क्रमांक 1  ही वधर्मान नगर, नागपूर येथील शाखा असून विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 हे मुंबई येथील मुख्य कार्यालय आहे. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 22.3.2016 ला 2007 Tata LPK-25166 x 4 TIPPER,  MH-34, M-6507 या वाहनाच्‍या लिलावामध्‍ये रुपये 20,000/- अदा करून भाग घेतला होता व तो विकत घेतला. लिलावामध्‍ये सदरच्‍या टिप्परची किंमत रुपये 3,75,000/- ठेवण्यात आली होती व सदरचा लिलाव Ground Inauguration Automall,  नागपूर येथे भरविण्यात आला होता.

 

  1.      दिनांक 27.05.2016 ला तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 येथील शाखेत जाऊन टिप्परचे रुपये 65,000/- नगदी भरले व त्याबाबतची तक्रारकर्त्‍याला पावती देण्‍यात आली, तसेच त्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, तुमचा टिप्‍पर तुम्ही कधीही नेऊ शकता व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे भरण्यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्ता जून 2016 ला विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांच्याकडे धनादेश घेऊन  गेला असता तेथील अधिकाऱ्यांनी संबंधीत टिप्‍पर आम्ही जास्त रक्‍कमेत दुसऱ्याला विकला व तक्रारकर्त्याला जमा असलेली रक्कम परत घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता जुलै 2016 ला विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांच्याकडे जमा असलेली रक्कम परत घेण्याकरिता गेला असता, तेथील अधिकारी जसविंदरसिंग नारायण यांनी तक्रारकर्त्याला रक्‍कम परत केली नाही व एकदा जमा केलेली रक्कम परत होत नसल्याबाबत सांगितले. त्यानंतर ही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडे जाऊन अनेक वेळा रक्‍कम परत करण्‍याची मागणी करुन ही विरुध्‍द पक्षाने रक्कम परत केली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्याने दिनांक 05.12.2017 ला विरुध्‍द पक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 ने  नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष   दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे व तक्रारकर्त्‍याला नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 1,60,000/- द्यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.
  2.       विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, SHRIRAM AUTOMALL INDIA LTD.. यांनी आयोजित केलेल्‍या लिलावात तक्रारकर्त्‍याने भाग घेतला होता ( दस्‍तावेज क्रं. 6). व विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 ने MH-34, M- 6507 हे वाहन दुस-याला विकले आणि रुपये 85,000/- परत केले नाही हे कथन अमान्‍य केलेले आहे.
  3.        तक्रारकर्त्‍याने सदर वाहन श्रीराम अॅटोमेल इंडिया लि. अमरावती रोड, चिंचभवन, तह. कळमेश्‍वर जि. नागपूर यांच्‍याकडून विकत घेतले व त्‍यांनी आयोजित केलेल्‍या लिलावात तक्रारकर्त्‍याने भाग घेतला होता. तक्रारकर्त्‍याने MH-34, M-6507 हे वाहन दि. 22.03.2016 ला रुपये 3,75,000/- मध्‍ये विकत घेतले आणि तक्रारकर्त्‍याने टोकन रक्‍कम रुपये 20,000/- श्रीराम अॅटोमेल इंडिया यांच्‍याकडे लिलावामध्‍ये भाग घेण्‍याकरिता जमा केली होती. विरुध्‍द पक्ष 1 यांनी सदर वाहन तक्रारकर्त्‍याला विकलेले नाही आणि सदरचे वाहन दुस-याला जास्‍त किंमतीत विकलेले नाही. विरुध्‍द पक्ष 1 हे फायनान्‍सर (कर्ज पुरवठादार) आहेत. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन श्रीराम अॅटोमेल इंडिया लि. नागपूर यांच्‍याकडून दि. 22.06.2016 ला झालेल्‍या लिलावामध्‍ये विकत घेतलेले आहे, त्‍यामुळे वि.प. 1 व 2 यांच्‍या विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्‍याने श्रीराम अॅटोमेल इंडिया प्रा.लि. यांना प्रकरणात पक्षकार केलेले नाही, त्‍यामुळे योग्‍य पक्षकारा अभावी सदरची तक्रार  खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.  

 

  1.       उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

          मुद्दे                                                                 उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?      होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय

 

2. काय आदेश ?अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने श्रीराम अॅटोमेल इंडिया लि. अमरावती रोड, चिंचभवन, तह. कळमेश्‍वर, जि. नागपूर यांनी दि. 22.03.2016 ला Grant inauguration Automail Nagpur येथे वाहनाचा लिलाव ठेवला होता हे नि.क्रं. 2(6) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच सदरच्‍या Buyer registration या मथळयाखाली खालीलप्रमाणे नमूद आहे.
  • RSD (Refundable Security Deposit) is must for the Regisration.  A minimum deposit of Rupees Nineteen Thousand Nine Hundred and Ninety Nine Only (19,999/-) or ten percent (10%) of Bid price of the vehicle/ equipment/asset, Whichever is higher, as RSD has to be made in favour of SAMIL at the time of registration, this deposit is refundable.
  •  For un-successful bidders, RSD(Refundable Security Deposit) will be refunded immediately after the closure of the event. If  such refund amount is over and above Rupees Nineteen Thousand Nine Hundred and Ninety Nine Only (19,999/-) the same shall be refunded only by way of Cheque/RTGS/DD within  seven(7) working days.
  •   For successful bidders, RSD(Refundable Security Deposit) will be refunded only upon receipt of copy of transfer of ownership documents. If such refund amount is over and above Rupees Nineteen Thousand Nine Hundred and Ninety Nine Only (19,999/-) then the same shall be refunded by way of Cheque/RTGS/DD within  seven(7) working days
  • For the vehicles with value below 2 lakhs, SAMIL will retain Rs.10,000/- of the RSD amount till the submission of copy of ownership transfer by the successful bidder and the remaining amount of the RSD will be refunded on the request of successful bidder receipt of Dispatch note Delivery note by the seller/ owner and after adjusting, the applicable service charges to SAMIL, if any.
  •  For the vehicles with value below 2 lakhs, SAMIL will retain the entire RSD till receipt of copyof transfer of ownership documents, receipt of Dispatch note/Delivery note by the seller/ owner and after adjusting, the applicable service charges to SAMIL, if any.
  1.     तक्रारकर्त्‍याने वरील सूचनेनुसार विरुध्‍द पक्ष 1 कडे रुपये 20,000/- भरुन वाहनाच्‍या लिलावात भाग घेतला होता व लिलावाकरिता ठेवलेल्‍या वाहनामधून 2007 Tata LPK-2516 6x4 TIPPER, वाहन क्रं. MH-34, M-6507 रुपये 3,75,000/- एवढया रक्‍कमेत दि. 22.03.2016 रोजी विकत घेतले. तसेच विरुध्‍द पक्ष 1 श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लि. वर्धमान नगर, नागपूर येथील शाखेकडे वाहन खरेदी पोटी रक्‍कम रुपये 65,000/-  दि. 27.05.2016 ला जमा केले होते व ती रक्‍कम विरुध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या पावती क्रं,  WARH 1605270006  Dt. 27.05.2016 Vehicle asset  Sr.No. MH-34, M-6407   Loan No. CNDPRO-406100001  अन्‍वये स्‍वीकारली होती हे नि.क्रं. 2(7) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्ता वाहनाकरिता असलेली उर्वरित रक्‍कम विरुध्‍दपक्ष 1 कडे जमा करण्‍यास गेला असता विरुध्‍द पक्षाने दि. 20.03.2016 ला लिलावात विकत घेतलेले वाहन दुस-या व्‍यक्‍तीला विकल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम स्‍वीकारली नाही व लिलावात वाहन खरेदी करिता जमा केलेली रक्‍कम रुपये 85,000/- ही तक्रारकर्त्‍याला परत केली नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने नि.क्रं.2( 7)वर दाखल केलेली पावती ही त्‍याने दिलेली नाही व श्रीराम अॅटोमेल इंडिया लि. अमरावती रोड, चिंचभवन, तह. कळमेश्‍वर, जि. नागपूर व श्रीराम ट्रान्‍स्‍पोर्ट फायनान्‍स कंपनी  वर्धमान नगर हया दोन्‍ही वेगवेगळया कंपनी आहेत  हे म्‍हणणे ही सिध्‍द केलेले नाही, अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने कराराचे उल्‍लंघन केले असून तक्रारकर्त्‍या प्रति त्रुटीपूर्ण सेवा दिले असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे.

      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 85,000/-  व त्‍यावर दिनांक 22.03.2016 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.