जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 369/2010
श्री प्रकाश नाभिराज तारे
वय वर्षे 58, व्यवसाय – ट्रक वाहतूक
रा.सांगली मिरज रोड, तारे बंगलो,
विश्रामबाग, सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी
श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कं.लि
मुख्य ऑफिस 123, अनयाप्पा नायकेन मार्ग,
चेन्नई – 600 001 शाखा ऑफिस सांगली मिरज रोड
पुढारी भवन, रणजीत एम्पायर, सांगली ........ जाबदार
नि. 1 वरील आदेश
तक्रारदार व जाबदार तर्फे नि.32 वर तडजोड पुरसिस दाखल. सदर तडजोड पुरसिसमधील उभयपक्षी मान्य अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –
“ 1. अर्जदार यांनी रक्कम रु.1,70,000/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) जाबदार कंपनीचे भरणा करणेचे आहे. अशी ठरली रक्कम ही सन 2007 मध्ये अर्जदार नांवे जाबदार कंपनीने दर्शविले कर्जव्यवहाराची संपूर्ण फेड असून भरणा करणे आहे.
2. अशा रक्कम भरणा जाबदार कंपनीने घेवून अर्जदार यांचे मालकीचे लेलंड ट्रक नं.MH-11- F- 4441 मूळ अर्ज वर्णनाप्रमाणे त्यामधील जॅक, टॉमी, स्टेपनी, बॅटरी, सुस्थितीमधील परत ताबा जाबदार यांनी अर्जदार यांना प्रत्यक्ष समक्ष देणेचे ठरले आहे.
3. अर्जदार यांचे मालकीचे वाहन लेलंड ट्रक नं.MH-11- F- 4441 असे जाबदार कंपनीने दि.12/6/2010 पासून आपले कंपनीचे गोडावून कोल्हापूर येथे बंद अवस्थेत विनावापर ठेवीले आहे. जाबदार कंपनीने वाहन वापर असे केलेले नाही. जाबदार कंपनीने दि.12/6/2010 पासून आपले ताबेत बंद अवस्थेत ठेविले वाहनाचा आर.टी.ओ. टॅक्स, व्यवसाय कर, सूट माफ करणेबाबत जरुर सर्वतोपरी कागदोपत्रीद पूर्तता, दाखले, जाब-जबाब, अर्ज असे अर्जदार समवेत करविणेची जबाबदारी ठरली आहे. असे वाहनाचा कर, टॅक्स याबाबत आर.टी.ओ. ऑफिस कडे उभयतांनी पूर्तता करणेची असून कर व टॅक्स, माफी रक्कम वगळता अंतिम निश्चित केली रक्कम व कर्ज पूर्ण फेड रक्कम रु.1,70,000/- (रु.एक लाख सत्तर हजार मात्र) अर्जदार यांनी आर.टी.ओ. ऑफीसकडे व जाबदारकडे भरणा करणेचे त्याचवेळी जाबदार कंपनीने वाहन ताबा अस्सल कागदपत्रांसह देणेचे ठरले आहे.
4. आर.टी.ओ. ऑफिसकडे टॅक्स, कर माफीबाबत लवकरात लवकर पूर्तता करणेची ती अंतिम रक्कम निश्चित झालेपासून 15 दिवसात कर्ज रक्कम, ताबा, सामान, कागदपत्रे याबाबत लगेचच एकमेकांनी ठरलेप्रमाणे पूर्तता करणे, वागणेचे ठरले आहे.
5. अर्जदार यांना वाहन ताबा दिलेवर त्याचबरोबर रक्कम स्वीकार करुन कर्जखाते बाकी संपूर्ण फेड दाखला जाबदार कंपनीने देणेचे ठरले आहे.
6. अर्जदार यांचे वाहनाचे संपूर्ण अस्सल कागदपत्रे जाबदार कंपनीने अर्जदार यांना देवविणेचे आहेत.
वर नमूद केलेप्रमाणे उभयतांनी एकमेका संमतीने, मान्यतेने तडजोड अशी केलेली आहे. त्याप्रमाणे एकमेकांनी वागणेचे ठरले असून मान्य केले आहे. ”
सदर तडजोड पुरसिसचे अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येते.
सांगली
दि. 3/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.