Maharashtra

Dhule

CC/09/749

Sayad Mustak Sayad Hakim, Kuresi Mohalla, Shirpur Dhule - Complainant(s)

Versus

Shriram Transport Finance, Belapur, New Delhi - Opp.Party(s)

P. P. YendaiT

31 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/09/749
 
1. Sayad Mustak Sayad Hakim, Kuresi Mohalla, Shirpur Dhule
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram Transport Finance, Belapur, New Delhi
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                            ग्राहक तक्रार क्रमांक –  ७४९/२००९


 

                                            तक्रार दाखल दिनांक – २४/११/२००९


 

                                            तक्रार निकाली दिनांक – ३१/१२/२०१२


 

 


 

१. सैययद मुश्‍ताक सैययद हनीफ


 

    उ.व. सज्ञान धंदा-व्‍यापर


 

    रा. कुरेशी मोहल्‍ला, शिरपूर.


 

    जि. धुळे.                                                 ............ तक्रारदार


 

 


 

            विरुध्‍द


 

 


 

१. श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लि.           


 

१०१-१०५ शिवचेंम्‍बर्स बी विंग


 

पहिला माळा सेक्‍टर ११,


 

सी.बी.डी. बेलापुर,


 

नवी मुंबई ४००६१४.


 

 


 

२. मॅनेजर


 

    श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लि.


 

ऑफिस नं.४, मनमोहन कॉम्‍पलेक्‍स,


 

एल.आय.सी. कार्यालयाजवळ,


 

माणिक नगर, धुळे रोड नंदुरबार,


 

ता.जि. नंदुरबार.                                           ...........विरुध्‍द पक्ष  


 

 


 

कोरम


 

(मा.अध्‍यक्ष – श्री.डी.डी.मडके)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.पी.पी. अेंडाईत)


 

(विरुध्‍दपक्ष  – अॅड. बी.एस.पवार)


 

 


 

निकालपत्र


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री.डी.डी.मडकेः  तक्रारदार यांचे वाहन विरुध्‍द पक्ष यांनी बेकायदेशिर जप्‍त करून लिलाव केल्‍याने तक्रारदार यांना वाहन परत करावे म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी पूर्वीच्‍या मालकाकडून टाटा कंपनीचा ट्रक एल.पी. मॉडेल २००२ रजिस्‍ट्रेशन नंबर एम.एच.१८/एम/२२३४ (यापुढे संक्षीप्‍तेसाठी ट्रक असे संबोधण्‍यात येईल) विकत घेतांना विरुध्‍द पक्ष क्र.२ श्री. श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लि. (यापुढे संक्षीप्‍तेसाठी कंपनी असे संबोधण्‍यात येईल) यांच्‍याकडुन घेतलेल्‍या अर्थसहाययापोटी रक्‍कम रूपये १,६५,०००/- भरणा करूनदेखील  विरूध्‍द पक्ष यांनी कोणतीही पुर्व सुचना, कागदपत्रे व हिशोब न देता सदरील ट्रक परस्‍पर जप्‍त करून लिलाव केला.


 

 


 

३.    तक्रारदार यांनी असे म्‍हटले आहे की ते विरूध्‍द पक्ष क्र.२ यांच्‍या कार्यालयात जावुन हिशोबाची मागणी करून व रक्‍कम भरण्‍याची तयारी दाखवून सुध्‍दा विरूध्‍द पक्ष क्र.२ यांनी कोणत्‍याही वेळेस हिशोब दिला नाही, करारनाम्‍याच्‍या प्रती देखील दिल्‍या नाहीत व अवास्‍तव असा आकडा त्‍यांना तोंडी सांगण्‍यात आला.


 

 


 

४.    तसेच तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ते रक्‍कम भरण्‍यास तयार असुनदेखील विरूध्‍द पक्ष क्र.२ च्‍या अधिका-यांनी परस्‍पर लिलावादृवारे विक्री केली. तक्रारदार यास लिलावाची पूर्ण सुचना अगर नोटीस देखील देण्‍यात आली नाही. उलट तक्रारदाराचे गैर हजेरीत, वाहन अत्‍यंत कमी किंमतीत लिलाव करण्‍यात आले व पूर्वी घेतलेल्‍या सहयांचा दुरूपयोग करून ट्रान्‍सफर देखील करण्‍यात आले.


 

 


 

५.    तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांचा अज्ञानाचा फायदा घेवुन, त्‍यांना कोणतीही कागदपत्रे मागणी करूनही देण्‍यात आली नाही. उलट तक्रारदार हे रक्‍कम भरणेस तयार असूनही त्‍यांना कायदेशिर पध्‍दतीने व्‍याज आकारून रक्‍कम न घेता, पूर्व सुचना न देता, अवास्‍तव मागणी करून वाहन जप्‍त करून त्‍याचा संगनमताने अत्‍यंत कमी किंमतीत लिलाव करण्‍यात आला.


 

 


 

६.    वरील म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले आहेत. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून तक्रारदार यास हिशोब देवुन, योग्‍य ती रक्‍कम भरून घेवुन, तक्रारदार यांचा ट्रक त्‍वरीत परत करावा व दिनांक २६/१२/२००८ पासून प्रत्‍यक्ष वाहन ताब्‍यात मिळे पर्यंत दरमहा रूपये ५०,०००/- प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

७.    विरुध्‍द पक्ष यांना या न्‍यायमंचाची नोटिस मिळाली असून त्‍यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ शपथपत्रात आपले लेखी म्‍हणणे दाखल करुन तक्रारदार यांनी तक्रार अर्जात नमुद केलेली सर्व कथने खोटी व चुकीची आहेत असे नमुद करून तक्रार नाकारली आहे. शपथपत्रात त्‍यांनी असे म्‍हटले आहे की,


 

 


 

८.    तक्रारदार यांनी केलेल्‍या अर्जानुसार वाहन कर्ज म्‍हणुन रक्‍कम रू.४,४०,०००/- लोन कम हायपोथिकेशन अॅग्रिमेंट करार करून दिलेले आहे. सदरील कराराचा क्रमांक टिएसएलडिएचएल ००००२५२ असा आहे. सदरील करार हा दिनांक २३/०६/२००७ रोजी झालेला आहे. सदर कराराचे मुल्‍य रक्‍कम हि ७,९२,०००/- अशी होती. सदर कर्ज  हे  मासिक  हप्‍ता रक्‍कम रूपये १३,२००/- ने एकुण ६० हप्‍त्‍यात दिनांक २३.०७.२००७ पासुन २५.०६.२०१२ पर्यंत परत फेड व्‍याजासहीत करणे गरजेचे व बंधनकारक होते व आहे. 


 

 


 

९.    विरूध्‍द पक्ष यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, सदर तक्रारदार यांनी कंपनीस संपुर्ण रक्‍कम तारखेत परतफेड केली नाही व त्‍यासाठी कंपनीने तक्रारदार यास वेळोवेळी तोंडी व लेखी सुचना व समज देवुन कळविले होते व‍ आहे, तसेच सदर हप्‍ते भरणा न केल्‍यास वाहन जप्‍त करून विकण्‍यात येईल व कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे तक्रारदार यास नोटीसीदवारे कळविण्‍यात आले होते तरी देखिल तक्रारदार याने कोणत्‍याही प्रकारे रक्‍कम भरणा केलेली नाही. सदर तक्रारदार याने कर्जाची रक्‍कम वेळेवर करारानुसार अदा केली नाही त्‍यामुळे कंपनीने सदर वाहन हे तक्रारदारास सुचना देवुन व वाहन ताब्‍यात घेणेपुर्वी संबंधीत नासिक पोलीस स्‍टेशनला सुचना देवुन व वाहन ताब्‍यात घेतले आहे. त्‍यावेळी संबंधीत वाहन चालकाचे समक्ष व हजेरीत सदर वाहनाचा असलेल्‍या परिस्थितीचा पंचनामा केलेला आहे व त्‍याची एक प्रत त्‍यास त्‍याच वेळी देवु केलेली आहे व मिळालेबाबत त्‍याने सहीदेखिल केलेली आहे. 


 

     


 

१०.   सदर वाहन हे कंपनीने ताब्‍यात घेतल्‍या नंतर सदर वाहनाचे कर्जाची घेणे असलेली रक्‍कम आपण तक्रारदाराने अदा करावी म्‍हणून नोटीसदवारे अनुक्रमे दिनांक १०/०१/२००९, दि.०४/०२/२००९, दि.०२/०३/२००९, दि.१४/११/२००९ व दि.०३/०१२/२००८ रोजी कळविण्‍यात आलेले होते. तरीदेखील तक्रारदार यांनी रक्‍कम अदा केली नाही त्‍यामुळे कंपनीस नाईलाजास्‍तव सदर वाहन हे जाहीर लिलावाने विक्री करावे लागले आहे. सदर वाहनाचा लिलाव करणे संबंधी कंपनीने तक्रारदारास नोटीसीदवारे कळविले होते. सदर जाहीर लिलाव नोटीस व जाहीरात ही दैनिक ‘आपला महाराष्‍ट्र’ या वर्तमानपत्रात दिनांक ०४.०३.२००९ रोजी प्रसिध्‍द केली होती व त्‍याची माहीती तक्रारदारास देण्‍यात आली होती. त्‍यामुळे त्‍यांनी सेवेत त्रृटी केलेली नाही.


 

 


 

११.   विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.१ वर पोलीस इंटीमेशन ची प्रत, नि.२ व ३ वर वाहन ताबा पावती व वाहन चालकाच्‍या सहीची प्रत, नि.४ ते २३ पर्यंत तक्रारदार यास पाठवण्‍यात आलेल्‍या नोटीसा व  पोच पावतींच्‍या  प्रती दाखल करण्‍यात आल्‍या आहेत.


 

       


 

१२. सबब विरुध्‍द पक्ष यांनी गाडीच्‍या लिलावाच्‍या विक्रीतून मिळालेली रक्‍कम वजावट करून उर्वरीत कर्जाची रक्‍कम रूपये २,५८,५६१/- व खर्चापोटी रक्‍कम रू.१०,०००/- तक्रारदारा कडुन देण्‍यात येण्‍याची मागणी केली आहे.


 

 


 

१३.   तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता तसेच त्‍यांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकले नंतर न्‍यायमंचासमोर तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.



 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

१. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                      नाही.


 

२. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

 


 

विवेचन


 

१४.   मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची तक्रार आहे की, तक्रारदार यांनी पूर्वीच्‍या मालकाकडून टाटा कंपनीचा ट्रक एल.पी. मॉडेल २००२ रजिस्‍ट्रेशन नंबर एम.एच.१८/एम/२२३४ (यापुढे संक्षीप्‍तेसाठी ट्रक असे संबोधण्‍यात येईल) विकत घेतांना विरुध्‍द पक्ष क्र.२ श्री. श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लि.  (यापुढे संक्षीप्‍तेसाठी कंपनी असे संबोधण्‍यात येईल)    यांच्‍याकडुन   घेतलेल्‍या अर्थसहाययापोटी रक्‍कम रूपये १,६५,०००/- भरणा  करूनदेखील विरूध्‍द पक्ष यांनी  कोणतीही पुर्व सुचना, कागदपत्रे व हिशोब न देता सदरील ट्रक परस्‍पर जप्‍त करून लिलाव केला. तसेच तक्रारदार हे विरूध्‍द पक्ष क्र.२ यांच्‍या कार्यालयात जावुन हिशोबाची मागणी करून व रक्‍कम भरण्‍याची तयारी दाखवून सुध्‍दा विरूध्‍द पक्ष क्र.२ यांनी कोणत्‍याही वेळेस हिशोब दिला नाही, करारनाम्‍याच्‍या प्रती देखील दिल्‍या नाहीत व अवास्‍तव असा आकडा त्‍यांना तोंडी सांगण्‍यात आला.


 

 


 

१५.  तक्रारदार रक्‍कम भरण्‍यास तयार असुनदेखील विरूध्‍द पक्ष क्र.२ च्‍या अधिका-यांनी परस्‍पर लिलावादवारे विक्री केली. तक्रारदार यास लिलावाची पूर्ण सुचना अगर नोटीस देखील देण्‍यात आली नाही. उलट तक्रारदाराचे गैर हजेरीत, वाहन अत्‍यंत कमी किंमतीत लिलाव करण्‍यात आले व पूर्वी घेतलेल्‍या सहयांचा दुरूपयोग करून ट्रान्‍सफर देखील करण्‍यात आले.


 

१६.   वरील म्‍हणणे पाहता फायनान्‍स कंपनीने वाहन ताब्‍यात घेण्‍यापूर्वी व लिलावा पूर्वी तक्रारदारास सुचना दिली होती काय हे पाहणे आवश्‍यक ठरते. फायनान्‍स कंपनीने नि.२० सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये २०/१ वर पोलीस स्‍टेशन भद्रकाली नासीक यांना दिलेले पत्र, नि.२०/४ वर तक्रारदारास पाठवलेली नोटीस दि.२३/०७/०७, नि.२०/८ वर नोटीस दि.०३/१२/०८ व नि.२०/१२ वर नोटीस दि.१४/११/०८ च्‍या प्रती व नि.२०/५, २०/१३   वर    त्‍या तक्रारदारास मिळाण्‍याचे पोष्‍टाच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या आहेत. त्‍यावरून तक्रारदारास रक्‍कम भरणेबाबात नोटीसा पाठवल्‍या होत्‍या हे दिसुन येते. तसेच नि.२०/९ वर गाडी ताब्‍यात घेतल्‍यानंतर पूर्ण रक्‍कम भरून खाते बंद करणेबाबत नोटीस पाठवल्‍याचे दिसुन येते. त्‍याच प्रमाणे दि.०४/०२/०९, दि.०२/०३/०९ रोजी त्‍याच आशयाच्‍या नोटीसा पाठवलेचे दिसुन येते. तसेच तक्रारदाराने रक्‍कम न भरल्‍यामुळे गाडी विक्रीसाठी जाहीर निविदा मागवल्‍याचे नि.२०/१६ वरील जाहीरातीवरून दिसुन येते. सदर कार्यवाहीकेल्‍यानंतरही तक्रारदार यांनी रक्‍कम न भरल्‍यामुळे गाडीची विक्री करण्‍यात आली.


 

 


 

१७. फायनान्‍स कंपनीने म्‍हटले आहे की, तक्रारदार यांनी रक्‍कम भरण्‍याची कधीही तयारी दाखवली नाही व नोटीसा मिळूनही त्‍यांनी रक्‍कम भरलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांना करारानुसार गाडी विक्री करणे भाग पडले. करारानुसार थकीत रक्‍कमेच्‍या वसुलीसाठी त्‍यांना अधिकार आहेत हे दर्शविण्‍यासाठी त्‍यांनी खालील न्‍यायीक दृष्‍टांताचा आधार घेतला आहे.


 

 


 

1)   IV 2012 CPJ 104 Maharashtra State Commission, Aurangabad BenchMahindra & Mahindra Finance V/s Sanjay Shivaji Padghan & Ors.


 

 


 

Hire Purchase Agreement- Default in payment of installments- Repossession of vehicle- Alleged deficiency in service- District Forum allowed complaint- Hence appeal- Complainant was in arrears of payment of installments- Complainant has denied to have surrendered tractor and trolley-   Finance company is authorized to repossess the vehicle- Finance company not deficient in selling of said tractor and trolley- Impugned order set aside.


 

 


 

2)   IV 2012 CPJ 359 National Commission


 

Mahindra & Mahindra Finance Co.Ltd. V/s Sankatha Prasad & Ors.


 

 


 

Consumer Protection Act, 1986 Sections 2(1)(g), 21(b) – Banking and Financial Institutions Services – Hire purchase agreement – Non-payment of loan amount – Vehicle seized- Alleged deficiency in service-  District Forum dismissed complaint- State Commission allowed complaint- Hence revision Contention, vehicle repossessed without prior notice – Not accepted- Petitioner was authorized to re-possess vehicle after notice to borrower and sell the same – Three prior notices were given- Respondent was a defaulter – Vehicle seized in terms of agreement between parties- Order set aside.


 

 


 

१८.   वरील न्‍यायीक दृष्‍टांतांमध्‍ये दिलेले तत्‍व पाहता फायनान्‍स कंपनीस  थकीत रक्‍कमेच्‍या वसुलीसाठी गाडीचा ताबा घेण्‍याचा अधिकार आहे असे आम्‍हास वाटते. तसेच कंपनीने तक्रारदारास पूर्व सुचना देऊन गाडी ताब्‍यात घेऊन, त्‍याची विक्री केल्‍याचे दिसुन येते. फायनान्‍स कंपनीने पुर्वसुचना देऊनही, तक्रारदाराने कर्जाची रक्‍कम न भरल्‍यामुळे  फायनान्‍स कंपनीने केलेली कार्यवाही चुकीची आहे असे म्‍हणता येणार नाही त्‍यामुळे त्‍यांनी सेवेत त्रृटी केली हे तक्रारदाराचे म्‍हणणे सिध्‍द होऊ शकले नाही. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देत आहोत.


 

 


 

१९.   मुद्दा क्र.२-    तक्रारदार यांना फायनान्‍स कंपनीने पुर्वसुचना देऊनही तक्रारदार यांनी रक्‍कम भरलेली नसल्‍यामुळे फायनान्‍स कंपनीने गाडीची विक्री करून रक्‍कम वसुलीची केलेली कार्यवाही अयोग्‍य ठरत नाही. त्‍यामुळे  तक्रार  अर्ज  रदद होणेस पात्र आहे.  त्‍यामुळे   आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.                  तक्रार अर्ज रदद करण्‍यात येत आहे.


 

२.                  तक्रारदार व विरूध्‍द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.


 

 


 

 


 

 


 

                  (सौ.एस.एस. जैन)                    (डी.डी.मडके)


 

                      सदस्‍या                            अध्‍यक्ष              


 

                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.