जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/261 प्रकरण दाखल तारीख - 23/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 01/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य सौ.शकुंतलाबाई भ्र.अंकुशराव कुंडगीर, वय वर्षे 38, धंदा व्यापार, अर्जदार. रा.जुना मोंढा,मुरमुरागल्ली,नांदेड. विरुध्द. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, गैरअर्जदार. कार्यालय 3 रा मजला,जया चेंबर्स, जानकीनगर, हनुमानगड जवळ,हिंगोली रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) अर्जदारयांचीगैरअर्जदारश्रीरामट्रान्सपोर्टफायनान्सकंपनीयांच्यासेवेच्यात्रुटीबद्यलतक्रार आजे.त्यांचेमालकीचेवाहनक्र. एम.एच 24 एफ/7225 गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेऊन एकुन रु.7,63,515/- ला विकत घेतला होता. कर्जाचे परतफेडीसाठी रु.16,967/- प्रती महिना याप्रमाणे 45 हप्त्यामध्ये रक्कमेची परतफेड करावयाची होती. अर्जदाराने एकुण रु.7,63,749/- वेळोवेळी भरणा करुन त्याबद्यलचे पावत्या गैरअर्जदार कंपनीकडुन घेतल्या आहेत तसेच अर्जदाराचे नांवे त्यांचे खाते क्र.70757 मध्ये रु.30,000/- संतोष पुरभाजी राऊत यांनी दि.08/11/2007 रोजी भरले आहेत त्याची नोंद गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या खात्यात घेतलेली नाही व जमा सुध्दा दाखविली नाही. म्हणजे ही रक्कम धरुन रु.7,93,749/- रक्कमेचा भरणा केला होता. यानंतर मागणी प्रमाणे गैरअर्जदार कंपनीने वाहनावरील बोजा कमी करुन आर.टी.ओ. च्या नांवे नाहरकत प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली नाही तसेच नोडयुज प्रमाणपत्रही दिले नाही हे सोडुन अजुन गैरअर्जदार पैशाची मागणी करीत आहेत. म्हणुन अर्जदाराने सुरावातीस मागणी केल्याप्रमाणे रक्कम तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.15,000/- व प्रकरणांचा खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळण्याचे आदेश व्हावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचेकडुन सेवेत कुठेही कमतरता झाली नाही किंवा त्यांनी अनुचित व्यपार पध्दतीचा अवलंब केला नाही. रु.16,967/- प्रती महिना हप्ता याप्रमाणे 45 मासिक हप्त्यामध्ये कर्जाची रक्कम वापस करण्याचा ठराव झाला असतांना अर्जदाराने कर्जाची रक्कम वेळेत भरली नाही म्हणुन अर्जदाराकडुन अद्यापही रु.93,211/- येणे बाकी आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे रु.30,000/- जास्तीचे भरले आहे ही बाब खोटी आहे. अर्जदाराने जेंव्हा जेंव्हा रक्कम दिली आहे तेंव्हा तेंव्हा त्यांना पावत्या देण्यात आले आहे परंतु खात्यात ती रक्कम जमा दाखविण्यात आली नाही हे खाटे आहे गैरअर्जदाराचे अकाऊंटींग हे संगणकावर होते व पावत्या संगणकाद्वारे देण्यात येतात ब-याच वेळेस गैरअर्जदाराचे प्रतिनीधी हे कर्ज धारकाकडे जाऊन हप्ते वसुल करतात ते त्यावेळेस कच्ची पावती देतात ती रक्कम गैरअर्जदाराचे कार्यालयात जमा केल्यानंतर त्याची संगणकाद्वारे पावती देण्यात येते. ब-याच वेळा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर देखील कर्जाचे हप्ते आणुन दिली जाते त्या दिवशीचे अकाऊंटिंग बंद झाली असेल तर गैरअर्जदाराकडुन कच्ची पावती देण्यात येते यानंतर दुस-या दिवशी संगणकावर पावती काढण्यात येते. गैरअर्जदार यांनी दि.08/11/2007 चा धनादेश क्र.1120 रु.30,000/- दि.17/11/2007 रोजी दिला व त्याबद्यलची पावती अर्जदारास त्याच दिवशी देण्यात आली, ज्याचा क्रमांक 038078 असा आहे. अर्जदाराने सदरील प्रकरणामध्ये दोन पावत्या दोन वेळेस दाखल केले आहे. दि.19/05/2006 रोजी गैरअर्जदाराचे प्रतीनीधी प्रसाद अनंतराव जोशी यांनी फिल्डवर रोख रक्कम रु.17,720/- घेतले. यात मासिक हप्ता रु.16,967/- व ओव्हर डयुज रु.753/- व्याज वेगळे घेतले. गैरअर्जदाराचे प्रतीनीधी प्रसाद जोशी यांनी दि.19/05/2006 रोजी अर्जदारास तात्पुरती पावती दिली यानंतर गैरअर्जदाराच्या कार्यालयामध्ये रक्कम दि.20/05/2006 रोजी जमा केले त्याची पावती संगणकाद्वारे देण्यात आले. सदरील रक्कम ही रु.17,720/- च्या दोन पावत्या देण्यात आल्या. तात्पुरती व संगणकाद्वारे दिलेल्या कच्च्या पावत्या याचा अर्जदार गैरफायदा घेत आहे. अर्जदाराने सदरील प्रक्ररणांत दि.16/11/2007 च्या पावती क्र.038030 रक्कम रु.19,000/- च्या सारख्या दोन पावत्या दाखल केल्या आहेत. गैरअर्जदाराने अर्जदारास दि.16/11/2007 रोजी एक पावती दिली अर्जदाराने ती पावती हरवली आहे म्हणुन गैरअर्जदाराकडुन दि.30/11/2007 रोजी डयुप्लीकेट पावती घेवुन गेले आहे. अर्जदाराने केलेली टोटल मध्ये रु.36,720/- चा फरक आहे. गैरअर्जदाराचे अर्जदाराकडुन रक्कम रु.7,27,782/- आलेले आहेत व रु.41,001/- येणे बाकी आहे. अर्जदाराने कर्जाची रक्कम ही वेळोवेळी भरली नाही म्हणुन ओव्हरडयु, व्याज आजच्या तारखेस अर्जदाराचे रु.93,211/- येणे बाकी आहे व ती रक्कम दिल्यास अर्जदारास बेबाक प्रमाणपत्र देण्यात येईल कर्जाची रक्कम रु.5,98,000/- हप्त्याची रक्कम रु.7,63,515/- व मिळालेली रक्कम रु.7,27,782/- विलंब काळाचे व्याज रु.52,210/- अशा रक्कमेचा तपशिल आहे. म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील अनुचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी वाहन क्र.एम.एच.24 एफ/7225 टाटा मॉडेल 909 यासाठी गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेऊन घेतले. कर्जाची परतफेडीसाठी त्यांनी ज्या रक्कमा दिल्या आहेत. त्याबद्यलचे पुर्ण पावत्या दाखल केलेले आहेत. पावत्या पुर्ण यादी करुन एकुण टोटल केली असता, चाळीस वेळात या भरलेल्या आहेत. एकुण चाळीस पावत्याप्रमाणे अर्जदार यांनी रु.7,90,084/- भरल्याचे दिसुन येते. यात हप्त्याचा हीशोब लावल्यास रु.16,967/- x 45 हप्ते म्हणजे एकुण रु.7,63,515/- भरावयास हवे होते. अर्जदाराचे मते त्यांनी रक्कम जास्तीचे भरलेले आहे. गैरअर्जदार यांना अर्जदाराकडुनच अजुन रु.93,211/- येणे बाकी आहेत. गैरअर्जदार यांनी दिलेले ज्या पावत्या आहे हे कच्चे पावत्या व पक्के पावत्याबद्यल वाद आहे. गैरअर्जदाराची कच्ची पावती जरी बघीतली त्यावर श्रीराम फायनान्सचा मोनोग्राम व शिक्का अतीशय स्पष्टपणे दिसते त्यावर पावती क्रमांक देखील नोंद आहे. ब-याच पावत्या संगणकावर काढले आहे तेही दिसुन येते. गैरअर्जदाराचे मते यांचे प्रतीनीधी जेंव्हा जेंव्हा रक्कम वसुल करण्यासाठी जातात तेंव्हा सुरुवातीस त्यांना कच्ची पावती देण्यात येते व ते प्रतीनीधी कार्यालयात वापस आल्यावर त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी त्यांना संगणकावर रक्कम जमा दाखवुन दुसरी पक्की पावती दिली जाते त्यामुळे अर्जदाराने कच्ची व पक्की पावतीचा हीशोब डब्बल धरुन रक्कम जास्त भरण्याचा प्रयत्न केले आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांचे अकाऊंटिंग संगणकावर आहे, हे ठिक आहे व आमच्या मते गैरअर्जदार यांनी रक्कम घेतल्यानंतर एकदा पावती दिल्यानंतर तीच पावती कायम धरावी व त्यांचे प्रतीनीधीकडुन फक्त पावती बघुन संगणकावर पावतीचा संदर्भ देऊन ती रक्कम जमा दाखवावी असे न करता गैरअर्जदार संगणकारची पावती देतात व कच्च्या पावत्या देखील वापस घेत नाही व डब्बल डब्बल पावत्यांचा घोळ होतो व पक्क्या पावत्या, क्च्च्या पावत्याच्या संदर्भ देण्यात येत नाही असे असेल तर ही गैरअर्जदाराची पध्दत अतीशय चुकीची असुन यात पावतीचा घोळ घालण्यास पुरेशी आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराचे दोनच पावत्यावर आक्षेप घेतला आहे, त्यात त्यांनी दि.19/05/2006 ची त्याचे प्रतीनीधी प्रसाद जोशी यांचेकडे रु.17,720/- नगदी दिले त्याबाबत एक रु.16,967/- मासिक हप्ता व रु.753/- ओव्हरडयु, व्याज म्हणुन घेतले व दि.19/05/2006 ला त्याप्रमाणे पावती दिली व दि.20/05/2006 ला संगणकावरची पावती देण्यात आली. यात कच्या पावत्या सारखे व एकुण रक्कम नसुन दोन वेगवेगळया पावत्या दिलेले आहेत. त्यात दोन पावत्या रु.16,967/- ची व दुसरी पावती रु.753/- ओव्हरडयु व्याजाची अशी दिलेली आहे व हे बारकाईने पाहीले असता, तात्पुरती दिलेल्या पावतीत एकुण रक्कम लिहीलेले आहे व दि.20/05/2006 ला दोन रक्कमा वेगवेगळया दाखविण्यात आले आहे व पावती क्रमांक वेगळी दाखविण्यत आली आहे. त्यामुळे या पावतीचे त्या पावतीवर मेळ लागत नाही व तारखा वेगवेगळया आहेत. त्यामुळे हा त्यांचा आक्षेप मान्य करण्या जोगा नाही. अर्जदाराने सांगीतलेल्या पावत्याप्रमाणे रक्कम मान्य केले पाहीजे. अर्जदाराने दि.16/11/2007 ची पावती क्र.038030 रु.19,000/- च्या दोन सारखे पावत्या दाखल केले आहे. त्यात दि.16/11/2007 ची एक पावती त्यानी ती हरवली म्हणुन गैरअर्जदाराकडुन त्यांना डुप्लीकेट पावती घेतली असे म्हटले आहे. या दोन्ही पावत्या त्यांनी दाखल केले आहे. संगणकावरची पावती पाहीली असता, त्यावर पावती क्र.038030 या क्रमांकाचा संदर्भ देऊन त्याच तारखेला पावती परत दिल्याचे म्हटले आहे, हा गैरअर्जदाराचा आक्षेप मान्य करण्यात येतो व या दोन सारख्या पावत्या असल्या कारणाने रु.19,000/- एक पावती अर्जदाराचे एकुण रक्कमेतुन कमी धरण्यात येते. अर्जदाराने केलेल्या टोटलमध्ये रु.36,720/- चा फरक आहे त्यातुन रु.19,000/- कमी झाले. गैरअर्जदाराच्या मते अर्जदाराकडुन त्यांना रु.7,27,782/- मिळालेले आहेत व रु.41,001/- मुद्यल येणे बाकी आहे. गैरअर्जदारानी असेही म्हटलेले आहे की, रु.93,211/- व्याज व दंड येणे बाकी आहे. त्याप्रमाणे धरण्याची रक्कम रु.35,733/- व हप्त्याप्रमाणे कालावधीचा व्याज रु.52,210/- असे येणे बाकी आहे, असे एकुण रु.87,943/- होतात जे की, गैरअर्जदाराचे रु.93,211/- च्या आक्षेपाशी जुळत नाही. शिवाय अर्जदाराने रु.30,000/- त्यांच्या खात्यात चेकद्वारे दि.08/11/2007 ला चेक क्र.1120 द्वारे दि.08/11/2007 ला भरल्याचे म्हटले आहे. त्याबद्यलची पावती क्र.038078 दि.17/11/2007 ला दिली आहे ती रक्कम खात्यात दाखविण्यात आली आहे. ही रक्कम गैरअर्जदाराने रु.30,000/- दि.17/11/2007 च्या पावतीत दि.08/11/2007 चा संदर्भ देऊन चेक क्र.1120 सेंट्रल बँक इंडियाद्वारे प्राप्त झाल्याचे म्हटलेले आहे. गैरअर्जदाराने याबद्यल प्रसाद जोशी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. यात दि.19/05/2006 ला अर्जदाराच्या घरी जाऊन रु.17,720/- वसुल केले त्यात कच्ची पावती क्र. 1283961 ला रु.19,967/- चा हप्ता व ओव्हरडयु रु.753/- ही रक्कम कार्यालयात दि.20/05/2007 रोजी जमा केली याबद्यल दोन पावत्या संगणकावर देण्यात आले आहे. यावर पावती क्र.60520002 दि.20/05/2006 द्वारे रु.19,967/- व हप्त्याची रक्कम व पावती क्र.6052003 याद्वारे दि.20/05/2006 दंडाची व व्याजाची रक्कम रु.753/- ची दुसरी पावती असे दोन्ही पावत्याची टोटल केली असता, रु.17,720/- असे होतात. म्हणुन ही रक्कम दोन पावत्याद्वारे एकच आहे असे माणन्यात येते. अर्जदाराने देखील संतोष राऊत यांचे शपथपत्र दाखल करुन त्यांनी रु.30,000/- दि.08/11/2007 रोजी दिल्याचे म्हटले आहे. संगणकीय पावत्यावर दि.08/11/2007 चा संदर्भ नसुन रु.30,000/- ही रक्कम चेकद्वारे जमा केल्याचे म्हटले आहे व ती रक्कम गैरअर्जदार यांच्या खात्यात जमा आहे. त्यामुळे ही अधिकची रक्कम अर्जदाराच्या मते धरलेली नाही ती पावतीमध्ये म्हटलेले आहे. पावतीकडे नजर टाकले असता, एकंदरीत अर्जदाराचा डब्बल हप्ता धरण्या करीता होता व त्यात प्रती महिन्याला लंबसम रक्कम खात्यात जमा केलेली आहे. त्यामुळे हप्ता भरण्यास विलंब केला. म्हणुन विलंब आकार व दंड व्याज गैरअर्जदारांना लावता येणार नाही. अर्जदार जरी म्हणत असेल की, त्यांनी दि.17/11/2007 ला परत नगदी रक्कम भरली तशी पावती त्यांनी दाखल केली नाही जी पावती दाखल केली आहे व दि.30/11/2008 ला रु.30,000/- भरल्याची पावती क्रमांक देण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांचे वकीलाने त्यांचे युक्तीवादाच्या वेळी रु.7,63,515/- एवढी रक्कम भरल्याचे स्पष्ट होते असे म्हटले आहे. त्यांनी जी यादी दिली त्याप्रमाणे रु.7,93,749/- एवढी रक्कम म्हटलेले आहे. एकंदरीत गैरअर्जदाराने डब्बल पावत्या देऊन गोंधळात टाकले आहे. अर्जदाराचे एकुण रु.7,90,083/- रक्कमे पैकी दंडाची रक्कम रु.753/- कमी केली असता, रु.7,89,321/- यातुन एक पावती रु.17,720/- ची व दसुरी पावती जी की, पावती क्र.038030 डब्बल दाखविण्यात आलेली आहे व ती पावती रु.19,000/- असे दोन पावत्यांचे एकुण रक्कम रु.35,720/- कमी करण्यात येतात. म्हणजे आता रु.89,321 वजा रु.35,720 = 7,53,601/- अर्जदाराने भरलेली आहे. एकुण हप्त्याची रक्कम रु.7,63,515/- होतात म्हणजे रु.9,914/- एवढी रक्कम अर्जदाराकडे नीघते ही रक्कम गैरअर्जदाराकडे अर्जदाराने भरणा केल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्यांच्या वाहनावरील बोजा कमी करुन अर्जदारांना नोडयुज प्रमाणपत्र व आर.टी.ओ.च्या नांवाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे. गैरअर्जदार यांची रु.93,211/- ची मागणी फेटाळण्यात येते. गैरअर्जदार यांनी हीशोब वेळोवेळी कच्च्या पक्क्या पावत्या म्हणुन जो गोंधळ घातला व आपले अकांऊटींग खाते स्पष्ट व पारदर्शक ठेवले नाही. म्हणुन ते दंडास पात्र आहेत. झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहेत. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे या निकाला पासुन 30 दिवसांचे आंत रु.9,914/- व त्यावर शेवटचा हप्ता संपल्याची तारीख दि.30/11/2009 पासुन 5.64 टक्के व्याजाने रक्कम द्यावी ती रक्कम मिळताच ताबडतोब गैरअर्जदार यांनी वाहनावरील त्यांचा बोजा कमी करण्याची सुचनेनुसार आर.टी.ओ.च्या नांवाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे तसेच कर्ज बेबाक प्रमाणपत्र देण्यात यावे. 3. गैरअर्जदार यांनी, अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- द्यावे व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |