Maharashtra

Bhandara

CC/19/80

MANGALA NEMICHAND PATLE - Complainant(s)

Versus

SHRIRAM SAMARTH MULTI AGRO PURPOSE PAT SANSTA - Opp.Party(s)

MR.L.S. DORLE

18 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/80
( Date of Filing : 05 Aug 2019 )
 
1. MANGALA NEMICHAND PATLE
PO. MALUTOLA TAH SAKOLI
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRIRAM SAMARTH MULTI AGRO PURPOSE PAT SANSTA
AYODHYA TAWAR FIRST FLOOR KASTURBA ROAD GIRNAR CHOWK
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. VIVEK HIRAMAN DESHMUKH SHRIRAM SAMARTH PAT SANSTA
KOSANBI PO AAWALGAO TAH. BRAMHAPURI
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. NEPAL PRABHAKAR MESHRAM SHRIRAM SAMARTH PAT SANSTA THROUGH BRANCH MANAGER
BRANCH SAKOLI RO KUNBHITOLA PO.BARABATI TAH ARJUNI/MOR
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Feb 2022
Final Order / Judgement

               (पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

                                                                              (पारीत दिनांक–18 फेब्रुवारी, 2022)

   

 

01.  तक्रारकर्ती श्रीमती मंगला नेमीचंद पटले हिने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986  च्‍या कलम 12  खाली विरुध्‍दपक्ष श्रीराम समर्थ मल्‍टी अॅग्रो परपज सहकारी पतसंस्‍था लिमिटेड ही पतसंस्‍था आणि तिचे निर्देशक व शाखा प्रमुख यांचे विरुध्‍द पतसंस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम  देय लाभासंह व व्‍याजासह मिळण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल केलेली आहे. मा.सदस्‍य व मा.सदस्‍या हे कोवीड पॉझेटीव्‍ह होते त्‍यामुळे आज रोजी निकाल पारीत करण्‍यात येत आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारी प्रमाणे यातील विरुध्‍दपक्ष श्रीराम समर्थ नागरी सहकारी पतसंस्‍था ही जय सिध्‍दी विनायक ग्रुप अंतर्गत सहकारी कायदया खाली स्‍थापन झालेली असून तिचा नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014 मर्यादित चंद्रपूर असा आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 संस्‍थेचे निर्देशक आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 हे सदर सस्‍थेची शाखा साकोली येथील शाखा प्रमुख आहेत. विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय हे चंद्रपूर येथे असून संस्‍थेच्‍या विविध शाखा आहेत. विरुध्‍दपक्ष संस्‍थेचा व्‍यवसाय हा ठेवीदारांच्‍या ठेवी गुंतवणूक करण्‍याचा आहे.   

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर या सहकारी संस्‍थे मध्‍ये दिनांक-14.02.2015 रोजी रजिस्‍ट्रेशन नंबर-0070080000531 प्रमाणे 09 वर्ष 18 महिने कालावधी करीता एकूण रुपये-1,00,000/- एवढया रकमेची गुंतवणूक केली होती आणि सदर गुंतवणूक तीन वर्षा नंतर 10 टक्‍के व्‍याजासहीत परत घेण्‍याचे अटीवर केली. अशाप्रकारे ती विरुध्‍दपक्ष संस्‍थेची लाभार्थी ग्राहक असून तिला आज पर्यंत विरुध्‍दपक्ष संस्‍थेनी तिने गुंतवणूक केलेल्‍या  रकमे बाबत  कोणतीही  रक्‍कम  दिली  नसून विरुध्‍दपक्ष गुंतवणूक केलेली रक्‍कम देय व्‍याज आणि लाभासह देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत तसेच माहिती देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी तिची फसवणूक केलेली आहे. विरुध्‍दपक्षांनी तिला दोषपूर्ण  सेवा दिली म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्षांनी तिने ठेवी मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये-1,00,000/- परिपक्‍व व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

ब. तिला झालेल्‍या शारिरीक  मानसिक त्रासा बददल रुपये-10,000/-  विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

क.     तक्रारीचा खर्च रुपये-3000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

ड. या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी. 

 

 

03.   जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1) निर्देशक, श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज सहकारी पतसंस्‍था लिमिटेड,  मुख्‍य कार्यालय- अयोध्‍या टॉवर, पहिला माळा, कस्‍तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर-442402 या नाव पत्‍यावर रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस घेण्‍यास इन्‍कार सबब सेंडरला परत दिनांक-03.10.2019 या पोस्‍टाचे शे-यासह परत आली. सदर पॉकीट अभिलेखावर दाखल आहे.  करीता विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-09.04.2021 रोजी पारीत करण्‍यात आला.

 

04.  जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे रजिस्‍टर पोस्‍टाने यातील विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख, निर्देशक, श्रीराम समर्थ सहकारी पतसंस्‍था लिमिटेड राहणार-कोसंबी, पोस्‍ट आवळगाव,तालुका-ब्रम्‍हपूरी, जिल्‍हा-चंद्रपूर या नाव आणि पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली असता सदर नोटीस त्‍यास दिनांक-01.10.2019 रोजी मिळाल्‍या बाबत पोस्‍टमास्‍तर साकोली जिल्‍हा भंडारा यांचा  रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही तो जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाला नाही म्‍हणून त्‍याचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-17.01.2020 रोजी पारीत केला.  

 

05. जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे  रजिस्‍टर पोस्‍टाने यातील विरुध्‍दपक्ष क्रं 3 श्री नेपाल प्रभाकर मेश्राम, शाखा प्रमुख, श्रीराम समर्थ सहकारी पतसंस्‍था लिमिटेड शाखा साकोली, जिल्‍हा भंडारा राहणार- कुंभीटोला, पोस्‍ट- भाराभाटी, तहसिल- अर्जुनी मोर, जिल्‍हा-गोंदीया या नाव आणि पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली असता सदर नोटीस त्‍यास दिनांक-03.10.2019 रोजी मिळाल्‍या बाबत रजिस्‍टर पोस्‍टाची पोच त्‍याचे स्‍वाक्षरीसह दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही तो जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाला नाही म्‍हणून त्‍याचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-17.01.2020 रोजी पारीत केला.  

 

06.  तक्रारकर्तीची तक्रार, तिचा शपथे वरील पुरावा  आणि तिने दाखल केलेले दस्‍तऐवज इत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले त्‍यावरुन जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेने तक्रारकर्तीने गुंतवणूक केलेली परिपक्‍व रक्‍कम देय लाभ आणि व्‍याजासह देय  दिनांकास न देऊन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

2

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                                     :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

 

07.    तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ही सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर या पतसंस्‍थे मध्‍ये दिनांक-14.02.2015 रोजी रजिस्‍ट्रेशन नंबर-0070080000531 प्रमाणे 09 वर्ष 18 महिने कालावधी करीता एकूण रुपये-1,00,000/- एवढया रकमेची गुंतवणूक केल्‍या बाबत सदर संस्‍थेच्‍या कॉन्‍ट्रीब्‍युशन सर्टीफीकेटची प्रत दाखल केली, त्‍यावर संस्‍थेचे सी.ई.ओ. यांची स्‍वाक्षरी आहे. सदर सर्टीफीकेटवर तिला मुदती अंती रुपये-2,80,000/- देण्‍याचे अभिवचन नमुद केलेले आहे तसेच परिपक्‍व दिनांक-14.08.2024 अशी नमुद केलेली आहे. सदर पावतीचे सुक्षम अवलोकन केले असता असे दिसून येते की, गुंतवणूकीचा कालावधी हा पावतीवर 09 वर्ष 18 महिने दर्शविलेला आहे, जेंव्‍हा की, तो कालावधी हा 10 वर्ष 06 महिने असा राहिल. तसेच मुदती अंती आकडयां मध्‍ये रुपये-2,80,000/- नमुद केलेले आहे परंतु अक्षरा मध्‍ये RS. TWO HUNDRED EITHTY THOUSAND ONLY असे चुकीचे नमुद केलेले आहे त्‍याच बरोबर परिपक्‍व दिनांक-14.08.2024 सुध्‍दा चुकीचा नमुद केलेला आहे, तो परिपक्‍व दिनांक हा दिनांक-14.08.2025  असा येईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येते. तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तिने  विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेत सदर केलेली गुंतवणूक तीन वर्षा नंतर 10 टक्‍के व्‍याजासहीत परत घेण्‍याचे अटीवर केली होती. 

 

08.   यातील विरुदपक्ष क्रं 1 ते 3 यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाच्‍या नोटीसची सुचना प्राप्‍त होऊनही ते जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्‍यांनी तक्रारकर्तीने त्‍यांचे विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढले नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्‍द वर नमुद केल्‍या प्रमाणे एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे. अशा परिस्थितीत प्रस्‍तुत तक्रार ही गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍यात येत आहे.

 

09.  यामधील वादाचा मुद्दा एवढाच आहे की, तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तिने वारंवार विरुध्‍दपक्षांशी संपर्क साधूनही तिने विरुध्‍दपक्ष सहकारी संसथे मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह आज पर्यंत तिला  मिळाली नाही तसेच  विरुध्‍दपक्षांना अधिवक्‍ता श्री डोरले यांचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्‍टाच्‍या पोच दाखल केल्‍यात. अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीला तिने मुदतपूर्व मागणी केल्‍या प्रमाणे  विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

मुद्दा क्रं 2 बाबत

 

10.  विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे आणि ही तक्रार दाखल करावी लागली असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या प्रकरणात तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या मुदतीचा परिपक्‍व दिनांक हा वर नमुद केल्‍या प्रमाणे सन-2025 मध्‍ये येईल परंतु तक्रारकर्तीने तिचे वकील श्री एल.एस.डोरले यांचे मार्फतीने  विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या रकमेची मुदतीपूर्व मागणी दिनांक-24.05.2019 रोजीची नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने विरुध्‍दपक्षांना  पाठवून केलेली आहे त्‍यामुळे तिला परिपक्‍व रक्‍कम अदा करण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेशित करता येणार नाही परंतु तिने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये फेब्रुवारी, 2015 मध्‍ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्‍यावेळी विविध बॅंका मधील व्‍याज दर हे जास्‍त होते ही बाब विचारात घेता तक्रारकर्तीने  विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये-1,00,000/- आणि सदर रकमेवर गुंतवणूक केल्‍याचा दिनांक-14.02.2015 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याज विरुदपक्ष सहकारी संस्‍था आणि तिचे तत्‍कालीन आणि आताचे निर्देशक यांनी तिला परत करण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल तसेच विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था आणि तिचे तत्‍कालीन आणि आताचे निर्देशक यांनी तिला तिची गुंतवणूक केलेली रक्‍कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याने तिला जो शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्‍या बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- तसेच नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था आणि तिचे तत्‍कालीन आणि आताचे निर्देशक यांचे कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ही एक सहकारी संस्‍था आणि तिचे निर्देशक आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख हा विरुध्‍दपक्ष संस्‍थेचा निर्देशक आहे त्‍यामुळे त्‍यांचेवर तक्रारकर्तीला रक्‍कम देण्‍याची जबाबदारी येते. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 3 हा विरुघ्‍दपक्ष संस्‍थेचा शाखा साकोली, जिल्‍हा भंडारा येथील शाखा प्रमुख असल्‍याने व तो पगारदार कर्मचारी असल्‍यामुळे त्‍याचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

11.    उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

 

 

                                                                                     :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार  विरुध्‍दपक्ष क्रं-1) श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014 ही सहकारी संस्‍था आणि सदर सहकारी संस्‍थेचे तत्‍कालीन निर्देशक व आताचे निर्देशक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख, निर्देशक यांचे विरुध्‍द  वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014 ही सहकारी संस्‍था आणि सदर सहकारी संस्‍थेचे तत्‍कालीन निर्देशक व आताचे निर्देशक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख, निर्देशक यांना आदेशित करण्‍यात येते की  त्‍यांनी तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये दिनांक-14.02.2015 रोजी रजिस्‍ट्रेशन नंबर-0070080000531अनुसार गुंतवणूक केलेली एकूण रक्‍कम रुपये-1,00,000/-(अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) आणि सदर रकमेवर गुंतवणूक दिनांक-14.02.2015 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याज अशा रकमा तक्रारकर्तीला दयाव्‍यात.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं-1) श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014 ही सहकारी संस्‍था आणि सदर सहकारी संस्‍थेचे तत्‍कालीन निर्देशक व आताचे निर्देशक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख, निर्देशक यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा व नोटीसचा  खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्तीला दयाव्‍यात. 

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं-3 श्री नेपाल प्रभाकर मेश्राम, शाखा प्रमुख, श्रीराम समर्थ सहकारी पतसंस्‍था नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014, शाखा साकोली, जिल्‍हा भंडारा हा पगारदार कर्मचारी असल्‍यामुळे त्‍याचे  विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1) श्रीराम समर्थ मल्‍टी स्‍टेट अॅग्रो परपज को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड मुख्‍य कार्यालय चंद्रपूर नोंदणी क्रं-MSCS/CR/1066/2014 ही सहकारी संस्‍था आणि सदर सहकारी संस्‍थेचे तत्‍कालीन निर्देशक व आताचे निर्देशक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री विवेक हिरामन देशमुख, निर्देशक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांना-त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.