::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 28.01.2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, सदस्य यांचे अनुसार
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम :27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीमध्ये तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर आज दि. 28/01/2016 रोजी पुरसीस दाखल केली. त्यामधील मजकुर येणे प्रमाणे…
“ वरील प्रकरणात वि. मंचाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादीस आरोपी कडून रक्कम रु. 10,04,089/- घेणे निघतात, त्यापैकी फिर्यादीस रु. 9,75,652/- प्राप्त झालेले आहे, उर्वरित रक्कम रु. 28,437/- अद्याप घेणे बाकी आहे. आरोपीने वि. मंचासमक्ष रु. 25,000/- जमा केले होते, ती रक्कम अद्यापही वि. मंचाकडे जमा आहे. सबब फिर्यादी उर्वरित रक्कम रु.25,000/- काढण्याच्या मुभेसह, सदरहू प्रकरण पुढे चालवू इच्छीत नाही, सबब प्रकरण काढून टाकण्यात यावे. ”
तक्रारकर्ते यांचे उपरोक्त पुरसीसनुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीमधील वादाचे पुर्णपणे समाधान झालेले आहे. त्यामुळे सदर तक्रारीतील कार्यवाही कायमची येथेच थांबविण्यात येत असून, तक्रारकर्त्यास सदर प्रकरणाच्या अनुषंगाने मंचात जमा असलेली रक्कम काढण्याच्या मुभेसह, सदर तक्रार नस्तीबध्द करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत व अशा प्रकारे सदर तक्रार कायमची निकाली काढण्यात येत आहे