::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 10/03/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार हे दि. 29/8/11 पासून टिप्परचे मालक आहेत. अर्जदाराने सदर वाहनाकरीता गैरअर्जदार क्रं. 2 कडे दि. 31/8/11 ते 30/8/12 या कालावधी करीता दि. 31/8/11 ला विमा पॉलिसीचे प्रिमियम भरुन विमाकृत केलेले होते. सदर वाहन दि. 19/09/11 ला मध्यराञी 1.00 वाजताचे दरम्यान घुग्घुस रोड खुटाळा गावाजवळ अपघात झाला सदर अपघाताची माहीती अर्जदाराने गैरअर्जदाराला कळविली व गैरअर्जदार क्रं. 2 चे पॅनल सर्व्हेअर (अधिकृत सर्व्हेअर) श्री. मनिष तिवारी यांनी अपघातग्रस्त वाहनाची शहानिशा करुन वाहनाचे दस्ताऐवज, मूळ बिल व पेमंट रशिदची अर्जदाराकडून मागणी केली. सदर संबंधीत दस्ताऐवज अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 कडे यांचे दि. 31/12/11 ला पाठविले परंतु गैरअर्जदार क्रं. 2 याने सदर वाहनाचे नुकसान भरपाई रक्कम अर्जदाराला दिली नाही. सदर अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान भरपाई / दावाचे रकमेबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 ला वेळोवेळी विचारणा केली. अर्जदाराला सदर अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्ती करीता रु. 386686/- खर्च आला. गैरअर्जदाराने अर्जदाराचे विमा क्लेम वर कोणतीही दखल घेतली नसल्याने व अर्जदाराचे पॉलिसी मध्ये अर्जदाराचा पत्तारा. मोहदा, जि. चंद्रपूर असा चुकीचा नोंद असल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराना दि. 16/1/13 ला नोटीस पाठवून निर्देशनास आणून दिले तरी सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचे विमा क्लेम व नोटीसाला कोणतीही दखल न घेतल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारस रु. 3,86,886/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचे आदेश व्हावे तसेच अर्जदाराला झालेला व्यवसायीक नुकसान, शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हजर होवून नि. क्रं. 10 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप हे खोटे असून ते नाकबुल केले आहे. अर्जदाराने जसे वाहनाच्या अपघाताची माहीती पुरविली तात्पुरतीने गैरअर्जदाराने श्री. मनीष तिवारी यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री. तिवारी यांनी वाहनाचे अवलोकन करुन सदर वाहनाला 2,53,475/- चे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने गैरअर्जदाराने अर्जदाराकडून दि. 31/1/12 आणि 8/2/12 चे लिहीलेले पञाव्दारे अर्जदाराकडून क्लेम संबंधी इतर दस्ताऐवजाची मागणी करण्यात आली. दि. 15/2/12 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराला पञ लिहून असे कळविले कि, दस्ताऐवजासंबंधी पुर्तता करीता अर्जदाराला शेवटची संधी देण्यात येते. आणि जर सदर माहीती व दस्ताऐवजाची पुर्तता अर्जदाराने नाही केल्यास अर्जदाराचा क्लेम फेटाळण्यात येईल. अर्जदाराने सदर अपघाताविषयी कोणतीही पोलिस तक्रार केलेली नाही म्हणून नियम व शर्ती व अटी नुसार अर्जदार सदर वाहनाचा क्लेम / दावा मागण्याचा अधिकारी राहत नाही. अर्जदाराने सदर वाहनाचे नुकसान अपधातामुळे झाले होते हे सिध्द करु शकले नाही. जर अर्जदार हे सिध्द करु शकतात कि, सदर वाहनाचे नुकसान हे अपघातामुळे झाले आहे तर सर्व्हेअरनी नुकसानाची आकारणी प्रमाणे अर्जदार फक्त 2,53,375/- रु. चे नुकसान भरपाई मि�ळण्यास पाञ आहे. सदर तक्रार अर्जदाराची खोटी असल्याने ती खारीज करण्याची मागणी करीत आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने सदर वाहनाकरीता गैरअर्जदार क्रं. 2 कडे दि. 31/8/11 ते 30/8/12 या कालावधी करीता दि. 31/8/11 ला विमा पॉलिसीचे प्रिमियम भरुन विमाकृत केलेले होते.ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. गैरअर्जदारानी नि. क्रं. 10 (अ) वर दस्त क्रं. ब – 2, ब- 3 व ब – 4 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, सदर दस्ताऐवजांचे छायचिञ (झेरॉक्स) म्हणून दाखल करण्यात आले त्यावर कोणत्याही गैरअर्जदाराच्या अधिका-याची सत्यप्रत म्हणून साक्षांकित केलेले दिसून येत नाही. म्हणून सदर पञामधील नमुद असलेला मजकुर ग्राहय धरण्यासारखी नाही. गैरअर्जदाराने सदर प्रकरणात अर्जदाराला लिहीलेले पञ दि. 31/1/12, 8/2/12 व 15/2/12 चा मूळ प्रत सुध्दा दाखल केलेला नाही. म्हणून गैरअर्जदाराचे जबाबात असे म्हणणे कि, गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराकडून विमा क्लेम विषयी दस्ताऐवजांची मागणी केली होती व अर्जदाराला अंतीम संधी देवून अर्जदाराचा विमा क्लेम नाकारण्यात आला हे पण ग्राहय धरण्यासारखे नाही. याउलट अर्जदाराने नि. क्रं. 4 वर दस्त अ – 13 वर दाखल दि. 16/1/13 चे नोटीसाची प्रत व नि. क्रं. अ – 14 व अ- 15 वर पोष्टाची मूळ पावती व मूळ पोहच पावती वरुन असे सिध्द होते कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर वाहनाचे अपघाताविषयी विमा क्लेमची मागणी केलेली आहे व अर्जदाराचे पॉलिसीमध्ये नमुद चुकीच्या पत्त्या सदंर्भात माहीती सुध्दा पुरविली आहे. सदर नोटीसवर गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर दिलेले नाही. गैरअर्जदारांनी त्यांची कंपनीनी नेमलेल्या सर्व्हेअरची रिपोर्टचे आधाराने असे लेखीउत्तरात कबुल केले आहे कि, अर्जदाराचे वाहनाला नुकसान झालेले आहे. म्हणून मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराचे अपघातग्रस्त वाहनाचा विमा कोणतेही ठोस कारण नसल्याने नाकारुन अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दर्शविली आहे व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराला अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई
म्हणून रु. 3,86,686/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45
दिवसाचे आत करुन दयावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी
रु. 5,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,500/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 10/03/2015