निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 23/04/2013
तक्रार निकाल दिनांकः-13/05/2014
कालावधी 1 वर्ष 0 महिने 28 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
लक्ष्मण प्रल्हादराव मुंढे अर्जदार
वय 31 वर्षे, धंदा व्यवसाय, अWड.डी.व्ही.दाभाडे
रा.कंडक्टर कॉलनी,
परळी (वैजनाथ), जि.बीड.
विरुध्द
श्रीराम जनरल इंशुरंस कंपनी मर्या. गैरअर्जदार
तर्फे शाखा अधिकारी, लिगल ऑफिसर, अWड.बी.ए.मोदानी
ई-8 ईपीआप, आर आय आय सि ओ,
ईन्डीस्ट्रीयल एरीया, सितापुरा,
जयपुर 302022 (राजस्थान)
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदाराने ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदाराने टिप्पर.क्र.एम.एच.-44-7661 ची पॉलिसी गैरअर्जदाराकडुन घेतली होती. त्या पॉलिसीचा क्रमांक 215037/12/005993 असा व कालावधी दिनांक 25.02.2012 ते 24.02.2013 असा होता. दिनांक 08.06.2012 रोजी वाहन चालक काशिनाथ नागरगोजे टिप्पर घेवुन धर्मापुरी गावी जात असतांना मुंडेगाव पाटीचे पुढे अंतरवेळी गावाच्या शिवारात खंडोबा मंदिराजवळ सदरील टिप्पर नादुरुस्त झाला. टिप्परला कुलूप लावून गंगाखेडवरुन मेकॅनीकला आणण्यासाठी टिप्पर चालक गंगाखेडला गेला असता त्या दरम्यान टिप्पर चोरीला गेला. टिप्पर चालकाने पोलीस स्टेशन पिंपळदरी येथे दिनांक 14.06.2012 रोजी फिर्याद दिली व त्यानुसार भा.दं.वि. 379 प्रमाणे गु.न.41/12 नोंदविण्यात आला व टिप्पर चोरीला गेल्यानंतर अर्जदाराने सामनेवाला यास सदर घटनेची माहिती दिली. परंतु सामनेवाला याने दिनांक 18.07.2012 रोजीच्या पञाव्दारे अर्जदाराची तक्रार मुदतीत नसल्याच्या कारणास्तव निरस्त केली व अर्जदारास विमा दाव्याची रक्कम दिली नाही म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा टिप्पर क्र.एम.एच.44, 7661 हा चोरी गेल्याबद्दल रुपये 800000/- दिनांक 08.08.2012 पासून 12 टक्के व्याजासह द्यावे. तसेच मानसीक व शारीरीक ञासापोटी रक्कम रुपये 20000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 10000/- मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.5 व नि.16 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन अनुक्रमे नि.13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर टिप्परची चोरी दिनांक 08.06.2012 रोजी झाल्यानंतर अर्जदाराने सदर घटनेची माहिती दिनांक 09.07.2012 रोजी गैरअर्जदारास व संबंधीत पोलीस स्टेशनला दिनांक 14.06.2012 रोजी कळविली. वास्तविक पाहता चोरीची घटना झाल्यानंतर पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार गैरअर्जदार विमा कंपनीस त्वरीत कळविणे गरजेचे होते. तसेच पोलिसांना सुध्दा तातडीने चोरीची घटना कळविण्याची गरज होती कारण त्या शिवाय चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध घेणे अशक्य ठरते. पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की विमाकृत वाहनाच्या सुरक्षिततेविषयी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे सुध्दा सदरचे टिप्पर चोरीला गेले व त्यामुळे सुध्दा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले आहे. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा योग्य त्या कारणास्तव निरस्त केलेला आहे. सबब अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.15 व पुराव्यातील कागदपञ नि.17 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 अर्जदाराचा विमा दावा निरस्त करुन गैरअर्जदाराने
अर्जदारास ञुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले
आहे काय ? नाही
2 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराने टिप्परची पॉलिसी गैरअर्जदाराकडुन घेतली होती. दिनांक 08.06.2012 रोजी सदर वाहन चोरीला गेले. अर्जदाराने चोरीला गेलेल्या टिप्परची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला असता अर्जदाराची तक्रार मुदतीत नसल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा विमा दावा निरस्त केला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने सदर घटनेची माहिती दिनांक 14.06.2012 रोजी संबंधीत पोलीस स्टेशनला व दिनांक 09.07.2012 रोजी गैरअर्जदारास कळविली. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास त्वरीत कळवणे गरजेचे होते तसेच विमाकृत वाहनाची योग्य खबरदारी न घेतल्यामुळे सदर वाहन चोरीला गेले. अशाप्रकारे पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे विमा दाव्याची रक्कम अर्जदारास देण्यास गैरअर्जदार बांधील नाही. निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुददा असा की अर्जदाराने सदरची घटना गैरअर्जदारास त्वरी न कळविल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले आहे काय ? पॉलिसीच्या अटी व शर्तीची झेरॉक्स प्रत गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केली आहे. त्याचे अवलोकन केले असता कंडीशन नं.1 Notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the Company shall require. Every letter claim writ summons and/or process or copy thereof shall be forwarded to the Company immediately on receipt by the insured Notice shall also be given in writing to the Company immediately the insured shall have knowledge of any impending prosecution Inquest or Fatal Inquiry in respect of any occurrence which may give rise to a claim under this policy. In case of theft or criminal act which may be the subject of a claim under this policy the insured shall give immediate notice to the police and co-operate with the company in securing the conviction of the offender दृष्टीपथात येते. या कंडीशन नुसार अर्जदाराने टिप्पर चोरीला गेल्याचे गैरअर्जदार विमा कंपनीस त्वरीत कळविणे गरजेचे होते. अर्जदाराने तक्रार अर्जातून सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास केव्हा दिली होती त्या संदर्भात कोणतेही कथन केलेले नाही. परंतु गैरअर्जदाराने लेखी निवेदनातुन टिप्पर चोरीला गेल्याची माहिती अर्जदाराने दिनांक 09.07.2012 रोजी कळविल्याचे म्हटले आहे व अर्जदाराने त्याचा इनकार केलेला नाही. यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदाराने जवळपास एका महिन्यानंतर सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास कळविली याचा अर्थ असा की अर्जदाराने खूप उशिरा गैरअर्जदारास विमाकृत टिप्पर चोरीला गेल्याचे कळविले. त्यामुळे गैरअर्जदाराने घेतलेला बचाव योग्य व रास्त असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच राञीच्या वेळेस टिप्पर बेवारस स्थितीमध्ये असल्याने चोराने संधी साधून टिप्पर पळविले त्यामुळे सुध्दा पॉलिसीच्या कंडीशन क्र.5 चे उल्लंघन झालेले आहे. तसेच गैरअर्जदाराने वरीष्ठ न्यायालयाचे खालीलप्रमाणे न्यायनिवाडे मंचासमोर दाखल केले आहे.
1) RD No. 2534 of 2012 (N.C.)
2) F.A.No. 321 of 2005 (N.C.)
3) F.A.No.426 of 2004 (N.C)
4) R.P.No.2982 of 2012 (N.C.)
5) R.P.No.3719 of 2011 (N.C.)
6) R.P.No. 3864 of 2012 (N.C.)
मा.रार्ष्टीय आयोगाने उपरोक्त न्यायनिवाडयामध्ये व्यक्त केलेले मत सदर प्रकरणालाही लागू पडते. तसेच अर्जदाराने मा.छत्तीसगड राज्य आयोगाचा न्यायनिवाडा (2012(1) सीपीआर 30) मंचासमोर दाखल केला आहे. परंतु त्या न्यायनिवाडयातील वस्तुस्थिती व सदर प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी असल्यामुळे मा.छत्तीसगड राज्य आयोगाने व्यक्त केलेले मत या प्रकरणासाठी विचारात घेण्यात आलेले नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष