Maharashtra

Nagpur

CC/11/739

Shri Sheikh Rafik Sheikh Khalil - Complainant(s)

Versus

Shriram General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kutub Jafar

16 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/739
 
1. Shri Sheikh Rafik Sheikh Khalil
Ward No. 42, Kundanlal Gupta Nagar,
Nagpur 440017
Maharahstra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram General Insurance Co.Ltd.
T-5, Sharda House, 3rd floor, 345, Kingsway,
Nagpur 440001
Maharashtra
2. Shriram General Insurance Co.Ltd.
E-8, EPIP, Rico Industrial Area
Jaipur 302 022
Rajsthan
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. Kutub Jafar, Advocate
For the Opp. Party:
ORDER

 (पारित दिनांक – 12/06/2014)

 

 पारित व्‍दारा श्री मनोहर चिलबुले, मा.अध्‍यक्ष

 

 

1.                तक्रारकर्ता श्री शेख रफीक वल्‍द शेख खलील   यांनी  विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे.  सदर तक्रारीची संक्षिप्‍त पार्श्‍वभूमी पुढीलप्रमाणे –

 

2.                      यातील विरुध्‍द पक्ष क्र. 1 व क्र. 2 ही विमा कंपनी असून अनुक्रमे तिचे शाखा कार्यालय, नागपूर आणि मुख्‍य कार्यालय जयपूर येथे आहे. तक्रारकर्त्‍याने जून-2010 मध्‍ये श्री. तपस कुंदु, क्‍वॉर्टर नं.302, पटीया, नयापली, बीबीएसआर, खुर्दा जजपूर यांचे कडून 10 चाकी ट्रक जनरल सामानाची वाहतुक करण्‍यासाठी खरेदी केला. खरेदी केलेल्‍या ट्रकचे विवरण खालील प्रमाणे-

 

 

 

Truck  Chasis No

444026-CSZ-206769

Truck Engine No

697-TC-57-CSZ-115178

Truck Old.Registration Details at Jajpur (Orissa)

 

M.V.Regn. No

OR-14 P-0699

M.V.Regn.Date

08/05/2007 RTO Jajpur (Orissa)

Truck New Registration Details at Nagpur (Maharashtra)

 

M.V.Regn. No

MH-31/ CQ-8463

M.V.Regn.Date

06/10/2010 RTO Nagpur (Maharashtra)

Maker’s Name

Tata Engineering & Locomotive Co.Ltd.

Class of Vehicle

Heavy goods vehicle

Maker’s Class

LPT 2525/697/COWL/BS-II

Month and year of Mfg.

03/2007

R.T.O.Certificate Valid upto

15/07/2011

 

                  तक्रारकर्त्‍याने वरील ट्रक खरेदी केल्‍यावर सदर ट्रकचा विमा वि.प. कंपनीकडून काढला, त्‍याचा पॉलीसी  क्रमाक 215034/31/11/001375 असा आहे. तक्रारकर्त्‍याचे नावावर उपरोक्‍त वर्णनातीत वाहनाचे विम्‍याची नोंद दि.23.08.2010 रोजी दि.23.08.2010 ते 20.07.2011 या कालावधीसाठी झाली आणि  या कालावधीसाठी तक्रारकर्त्‍यास नविन इन्‍शुरन्‍स क्रं 1692922 देण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने ट्रकची वाहतुक करण्‍यासाठी लागणारे परमीट क्र. 003944, दि.28.10.2010 ते 27.10.2015 पर्यंत मिळविले. तसेच, ट्रक चालविण्‍यासाठी टॅक्‍सची रक्‍कम भरली.  पी.यु.सी. सर्टिफीकेट प्राप्‍त केले.  फिटनेस सर्टीफीकेट क्र. 122046 दि.27.10.2010 संबंधित विभागाकडून प्राप्‍त केले. तक्रारकर्त्‍यास श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फॉयनान्‍स कंपनी, मुंबई कडून दि.26.08.2010 रोजीचे पत्र प्राप्‍त होऊन त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता कर्ज घेण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍यास श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी, मुंबई यांचेकडून पत्र क्र. 3683 दि.19.01.2011 प्रमाणे ट्रकचे आर.सी. पुस्‍तकावर जे हायपोथीकेशन आहे ते काढून टाकण्‍यासाठी नाहरकत प्रमाणपत्र प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याजवळ टेम्‍पररी परमीटक्र. 9451/आयसीपी/एडीबी/2010, दि.24.11.2010 आहे, जे मोटर गाडी निरिक्षक आयसीपी भोराज आदिलाबाद यांनी दिले आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने वरील ट्रक श्री. तपस कुंदु यांचेकडून खरेदी केला व आपले नावे नागपूर येथे रजिस्‍टर्ड करुन ट्रकचा विमा वि.प.कडे उतरविल्‍यानंतर रोजगार करण्‍यास सुरुवात केली. दि.22.12.2010 रोजी रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजताचे दरम्‍यान विमाकृत ट्रक कळमना रिंग रोड, हसन कबाडीचे दुकानाजवळून, कुंदनलाल गुप्‍ता नगर, नागपूर येथून चोरी झाला. त्‍याची तक्रार तक्रारकर्त्‍याने यशोधरा पोलीस स्‍टेशन, नागपूर येथे एफ.आय.आर.क्र.298/10, दि.22.12.2010 अन्‍वये केली. पोलीसांनी आवश्‍यक तपासणी केल्‍या नंतर नागपूर येथील जे.एम.एफ.सी. कोर्ट क्रं 7 येथे अ फायनल क्र. 15/11 दि.08.04.2011 रोजी  दाखल केली व त्‍यात नमुद केले की, ट्रक चोरी झाला आणि शोध लागू शकत नाही. न्‍यायालयाने अ समरी मंजूर केली. वि.प.विमा कंपनीचे दि.03.05.2011 आणि दि.09.05.2011 चे पत्रानुसार आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता तक्रारकर्त्‍याने दि.22.06.2011 पर्यंत व पोच प्राप्‍त केली. परंतु विमा दाव्‍या संबंधाने वि.प.विमा कंपनीने काहीही कळविले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता श्री. मोहम्‍मद सईद यांचेमार्फत विरुध्‍दपक्षास दि.16.09.2011 रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्‍द पक्ष विमा कंपनीस प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली व चौकशी केल्‍यानंतर सर्व्‍हेअर यांनी विमा क्‍लेम लवकरात लवकर देण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा विरुध्‍द पक्षास दि.01.11.2011 रोजी नोटीस पाठविली. परंतु तिला वि.प.ने उत्‍तर दिले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा शेवटपर्यंत निश्‍चीत केला नाही वा काहीही कळविले नाही. अशाप्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली.

  

तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

अ.क्रं

बाब

मागणी केलेली रक्‍कम रुपयांमध्‍ये

1

पॉलिसीनुसार ट्रकची विमित रक्‍कम

7,50,000/-

2

पी.ए. कव्‍हर

2,00,000/-

3

वाहनाचे चोरीमुळे व्‍यवसायाचे झालेले नुकसान                   दि-22/12/2010 पासून ते 31/01/2011 पर्यंत प्रतीदिन रुपये-1500/- प्रमाणे 40 दिवसां करीता

 

60,000/-

 

 

 

 

4

वाहनाचे चोरीमुळे व्‍यवसायाचे झालेले नुकसान                    दि.01/02/2011 पासून ते 30/11/2011 पर्यंत प्रतीमाह रु.50,000/- प्रमाणे 08 महिन्‍याकरीता

4,00,000/-

5

विमा दावा रक्‍कम रु.6,50,000/- वर दि.01.02.2011 पासून 18% दराने व्‍याजाची रक्‍कम 08 महिने/12 महिन्‍याकरीता

78,000/-

6

शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई

50,000/-

 

                                एकूण विमा दावा रक्‍कम

15,38,000/-

 

 

3.                वि.प.क्र. 1 व 2 विमा कंपनीतर्फे संयुक्‍त लेखी उत्‍तर मंचासमक्ष अमित प्रदीप देशमुख, व्‍यवस्‍थापक, श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी, नागपूर यांनी प्रतिज्ञालेखावर सादर केले. वि.प.विमा कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याची तक्रार ही मूळातच खोटी असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याचे वाहन ट्रक क्र. एम.एच.31-सी.क्‍यू-8453 मूळात खोटया दस्‍तऐवजांवर आधारीत असून नागपूर आर.टी.ओ.कडे खोटे दस्‍तऐवज दाखल करुन त्‍याची नोंदणी करण्‍यात आलेली आहे. तक्रारकर्त्‍याने जून-2010 मध्‍ये तपस कुंदू यांचे कडून दहा चाकी ट्रक उचित मूल्‍य देऊन खरेदी केला हे विधान खोटे असून, वाहनाचे विवरणसुध्‍दा खोटे आहे. ख-या ट्रकचे चेसीस व इंजिन नंबर हे वेगळे असून सदर दाव्‍यातील ट्रक हा चोरीचा असून त्‍याचे खरे कागदपत्र नसल्‍यामुळे खोटे दस्‍तऐवज एजंटव्‍दारे बनवून त्‍याआधारे आर.टी.ओ. नागपूर येथून रजिस्‍ट्रेशन नंबर मिळवून तक्रारकर्त्‍याने धोखाघडी केली असल्‍याचे चौकशीत उघड झाले आहे. तक्रारकर्त्‍याने चोरीचा ट्रक पेश करुन व खोटे दस्‍तऐवज सादर करुन वि.प.क्र. 2 कडून दि.23.08.2010 रोजी विमा मिळविला व जुनी विमा पॉलिसी असल्‍यामुळे त्‍याचे भरवश्‍यावर तक्रारकर्त्‍याचे नाव चढवून दिले. आर.टी.ओ. नागपूर यांनी ट्रक बद्दल कोणतीही शहानिशा न करता परमिट दिले, त्‍याकरीता तक्रारकर्ता स्‍वतः जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याचा ट्रक हा चोरीचा असल्‍यामुळे श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनीने कर्ज देण्‍यास नकार दिला. तक्रारकर्त्‍याने सदर ट्रक श्री तपस कुंदू यांचे कडून खरेदी केल्‍याचे खोटे दस्‍तऐवज तयार करुन नागपूर येथे नोंदणी करुन वि.प.कडून विमा काढला. विमाकृत ट्रक चोरीस गेल्‍या नंतर चौकशीअंती धक्‍कादायक घटना उघडकीस आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत दि.06.01.2012 चे पत्राव्‍दारे कळविले व त्‍यात विमा दावा नामंजूरी बाबतची सविस्‍तर कारणे नमुद केलीत. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीनुसार त्‍याने सदर ट्रक  क्र. एम.एच.-31/सी.क्‍यू-8463 दि.26.06.2010 रोजी श्री तपस कुंदु यांचे कडून गुरु नानक ऑटो डिल मार्फत खरेदी केला, त्‍यावेळेस ट्रकचा नोंदणी क्र.ओआर-14/पी-0699 असा होता. त्‍यानंतर ट्रक नोंदणी क्र.ओआर-14/पी-0699 ची विमा पॉलिसी काढण्‍यात येऊन आर.टी.ओ., नागपूर यांचेकडून खोटया दस्‍तऐवजांचे आधारावर नोंदणी करण्‍यात येऊन, नोंदणी क्र.एम.एच.-31/सी.क्‍यू.-8463 देण्‍यात आला व त्‍याआधारे विमा पॉलिसी दि.21.07.2010 ते 20.07.2011  कालावधी काढण्‍यांत आली.  आर.टी.ओ.,  नागपूर  यांनी  सदर  ट्रक  हस्‍तांतरणापूर्वीची चौकशी न करता  एजंटव्‍दारे बनावट दस्‍तऐवजांचे आधारे नोंदणी केली आणि त्‍यानंतर तक्रारदाराने बनावट कागदपत्रांचे आधारे विमा पॉलिसी काढली ही बाब स्‍पष्‍ट आहे. सदर ट्रक दि.22.12.2010 रोजी चोरीस गेला. सदर ट्रक हा चोरीचा असल्‍याने व वाहनाचे दस्‍तऐवज बनावट असल्‍याचे विमा सर्व्‍हेअर यांचे लक्षात आले, त्‍यावरुन त्‍यांनी त्‍यांचा विस्‍तृत अहवाल विमा कंपनीस दिला, तो या लेखी बयानासोबत संलग्‍न करण्‍यात आला आहे. सदर ट्रकचा मूळ रजिस्‍ट्रेशन क्र.ओ.आर.-14/पी-0699 असल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे कथन आहे. त्‍या ट्रकचा इतिहास पाहिला असता रजिस्‍ट्रेशन क्र.ओ.आर.-14/पी-0699, चेसीस नंबर-426031-जीटीझेड-127311 व इंजिन नंबर-60-जी-62492878 हा श्री शंकर शाहू, रा. कोथियासाही, पोस्‍ट कुजंगा, जिल्‍हा जगतसिंगपूर राऊरकेला (ओरीसा) यांच्‍या मालकीचा असून त्‍याने तो 12.09.2006 मध्‍ये मे. राजपथ सर्विसेस, एनएच5, भतकूनी पो. गंगापाडा, जि. खुर्दा 752 064 यांच्‍याकडून मे. मॅग्‍मा लिजिंग प्रा.लि. यांचेकडून कर्ज घेऊन विकत घेतला आहे व आजही कर्जफेड करीत आहे व सदर ट्रक आजही त्‍यांच्‍याकडे आहे. त्‍या ट्रकचे फोटो व आरटीओकडून घेतलेले पर्टीक्‍युलर्स वि.प.ने दाखल केले आहेत. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, वरील ट्रक क्र.ओ.आर.-14/पी-0699 हा चोरीस गेलेला नाही. वरील ट्रक मालकाने आपला जबाब लिहून दिलेला आहे.

 

                  वि.प. यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याचे कथनानुसार त्‍याने ट्रक क्र.एम.एच.-32/सी.क्‍यू-8463 श्री तपस कुंदु यांचेकडून विकत घेतला, त्‍या संबधाने वि.प.ने चौकशी केली असता तपस कुंदू यांचा दर्शविलेला पत्‍ता क्‍वॉर्टर  क्रं 302, पतिलनथपल्‍ली, चंदीखोल, जाजपूर (ओरीसा) हा खोटा पत्‍ता असून त्‍याचा खरा पत्‍ता गाव नातूल कॉलोनी, पो.सिपल्‍ली, बुरदवान (प.बंगाल) असून त्‍याचे जवळ असलेला ट्रक क्रं-डब्‍ल्‍युबी-41/सी-5133, ज्‍याचे चेसीस नबर 444026-सीएसझेड-206769 व इंजिन नंबर-697-टीसी-57-सीएसझेड-115178 असल्‍याचे आरटीओ पर्टीक्‍युलरप्रमाणे असून तक्रारकर्त्‍याचे चोरीला गेलेल्‍या ट्रकचा चेसीस नंबर व इंजिन नंबर सारखे असून, ट्रक चोरणा-या टोळीने शंकर शाहू यांचे ट्रकचा क्रमांक व तपस कुंदु हयांचा ट्रक क्रं-डब्‍ल्‍युबी-41/सी-5133 चा चेसीस नंबर व इंजीन नंबर हयांचे एकत्रिकरण करुन  दुस-या चोरीच्‍या  ट्रकला  (तक्रारकर्त्‍याच्‍या) देऊन आर.टी.ओ.चांदीखोलचा ना-हरकत प्रमाणपत्राचा खोटा दस्‍तऐवज तयार करुन, नागपूर आर.टी.ओ.ला सादर करुन नागपूर येथे रजिस्‍ट्रेशन करुन घेतले. नागपूर  आर.टी.ओ. यांनी पडताळणी  न  करता  सदर  चोरीच्‍या  ट्रकला एम.एच.-31/सीक्‍यू-8463 असा नोंदणी क्रमांक दिला.

 

                  वि.प.ने पुढे असे नमुद केले की, श्री तपस कुंदु हयांनी चौकशीमध्‍ये तोंडी सांगीतले की, ट्रक क्र.डब्‍ल्‍युबी-41/सी-5133 काही काळापूर्वी चोरीला गेला, म्‍हणून त्‍याने त्‍या ट्रकचे पर्टीक्‍युलर्स आर.टी.ओ. मधून घेतले, त्‍यानुसार त्‍या ट्रकचा चेसीस क्रं-444026-सीएसझोड-206769 व इंजिन नं.-697-टीसी-57-सीएसझेड-115178 असून त्‍यावर मे.मॅगमा लिजींग कंपनी, कोलकाताचे हायपोथिकेशन आहे. सदर वस्‍तुस्थिती वरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने चोरीचा ट्रक अल्‍प किंमतीमध्‍ये विकत घेतला व त्‍या ट्रकचे बनावट दस्‍तऐवज एजंटव्‍दारे तयार करुन आर.टी.ओ. नागपूर येथून नोंदणी करुन नोंदणी क्र.एम.एच.-31/सी.क्‍यू-8463 मिळवून घेतला. तक्रारकर्त्‍याने वि.प.विमा कंपनीकडे खोटे दस्‍तऐवज व चोरीचा ट्रक पेश करुन प्रथम श्री तपस कुंदु यांचे नावाने विमा पॉलीसी काढली व नंतर स्‍वतःचे  नावाने  ट्रकची नोंदणी आर.टी.ओ.नागपूर कडून  ट्रान्‍सफर करुन घेतली.  वरील सर्व गोष्‍टी विरुध्‍द पक्षाचे लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास दि.06.01.2012 रोजी पत्र देऊन त्‍यामध्‍ये सविस्‍तर कारणे दर्शवून विमा क्‍लेम नाकारला. तक्रारकर्त्‍याचा दावा हा खोटा व बनावटी असल्‍याने तक्रार दंडासह खारीज होण्‍यास पात्र आहे अशी विनंती विरुध्‍द पक्षातर्फे करण्‍यात आली.

 

4.                तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज यादीनुसार दस्‍तऐवजांच्‍या प्रती सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये पॉलिसी प्रत, एन्‍डार्समेंट शेडयुल, वाहनाचे ओडीसा येथील नोंदणीचे दस्‍तऐवज, सौदेचिठठी, फॉर्म नं.35, वाहनाचे महाराष्‍ट्रातील नोंदणीचे दस्‍तऐवज, बीएमयु टॅक्‍स रिसीप्‍ट, सर्टिफीकेट ऑफ टॅक्‍सेशन, फॉर्म नं.38, पोलूशन टेस्‍ट सर्टीफीकेट, श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स ना-हरकत-प्रमाणपत्र, फीटनेस सर्टिफीकेट, व्‍हेईकल परमिट, टेम्‍पररी परमीट, चांदरपूर रोडलाईन्‍स लॉरी रिसीप्‍ट, एफआयआर, विरुध्‍दपक्षाने दिलेल्‍या पत्रांच्‍या प्रती,  चालक सतिश भैयालाल धुर्वे यांचे मृत्‍यू प्रमाणपत्र, चालकाचा मोटर वाहन परवाना प्रत, आरटीओ नागपूर यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीस, पोस्‍टाच्‍या पावत्‍या व पोच पावत्‍या, ट्रकचे फोटो अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने प्रतीउत्‍तर दाखल प्रतिज्ञालेख व लेखी युक्‍तीवाद/अतिरिक्‍त लेखी युक्‍तीवाद सादर केला. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाची निकालपत्रे सादर केलीत.

 

5.                विरुध्‍दपक्ष विमा कंपनीतर्फे दस्‍तऐवज यादीनुसार इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, इन्‍शुरन्‍स कव्‍हर, ट्रक मालकाचे पत्र, वाहनाचे नोंदणीचे दस्‍तऐवज, वाहनाची छायाचित्रे, श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारकर्त्‍यास दिलेले पत्र अशा दस्‍तऐवजांचे प्रतींचा समावेश आहे. तसेच लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

6.                प्रकरणाच्‍या निर्णयासाठी  खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारण मिमांसा खालीलप्रमाणे.

 

         मुद्दे                                 निष्‍कर्ष

 

1)    वि.प. ने त.क.चा विमा दाव्‍याची रक्‍कम

     न देऊन सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार  केला

     आहे काय ?                                नाही. 

2)    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास         

      पात्र आहे काय ?                              नाही.

3)    अंतिम आदेश काय ?                         तक्रार खारीज.

 

 

-कारण मिमांसा-

 

7.          मुद्दा क्र. 1 बाबत –  सदरच्‍या प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने रजि.नं. OR-14 P-0699चेसिस नं. 444026-CSZ-206769 इंजिन नं. 697-TC-57-CS115178

 हा आरटीओ चंदीखोले यांच्‍याकडे तपस कुंदु यांचे नावाने नोंदणी असलेला ट्रक विकत घेतला हे दर्शविण्‍यासाठी दस्‍त क्र. 3 प्रमाणे  तपस कुंदु याच्‍या नावाचे रजिस्‍ट्रेशन पर्टिकुलर्स दाखल केले आहेत. त्‍यांत तपस कुंदु याचा पत्‍ता क्‍वार्टर नं. 302, पटीया, नयापल्‍ली बीबीएसआर, खुर्दा असा नमुद केला आहे. वरील ट्रकची नोंदणी महाराष्‍ट्रात करण्‍यासाठी आरटीओ नागपूर यांना आरटीओ चंदीखोले यांची ना हरकत नमुद आहे. तपन कुंदु यांचेकडून वरील ट्रक श्रीजी सर्विस, कामठी रोड नागपूरमार्फत खरेदी केल्‍याबाबत दि.29.06.2010 ची सौदा चिठ्रठी  दस्‍त क्र. 4 वर दाखल केली आहे. त्‍यानंतर  तक्रारकर्त्‍याने तपस कुंदुच्‍या नावाने वि.प.कडे वरील ट़कची विमा पॉलीसी काढली ती दस्‍तऐवज क्र. 1 वर आहे. पॉलीसी कालावधी 21.07.2010 ते 20.07.2011 असा आहे. सदर सौदा चिठ्रठीच्‍या आधारे तक्रारकत्‍याने वरील ट्रकची पॉलीसी स्‍वतःच्‍या नावाने ट्रान्‍सफर करुन घेतली, तिचा कालावधी  23.08.2010 ते 20.07.2011 असा आहे. ती दस्‍तऐवज क्र. 2 वर दाखल केली आहे. सदर पॉलीसीवर ट्रक श्रीराम फायनान्‍स कडे हॉयपोथीकेटेड असल्‍याची नोंद केली आहे. परंतु हॉयपोथीकशन एग्रीमेंट रद्द झाल्‍यामुळे रजिस्‍ट्रेशन प्रमाणपत्रावरुन श्रीराम फायनान्‍स यांचे नावाने असलेली हॉयपोथीकेशनची नोंद काढून टाकण्‍यास हरकत नसल्‍याबाबत दि.19.01.2011 चे पत्र दस्‍तऐवज क्र. 14 वर दाखल आहे. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या नावाने ट्रकची नोंदणी आरटीओ नागपूर  यांचेकडे 6.10.2010 रोजी करुन घेतली  आणि सदर ट्रकला नविन नोंदणी क्रमांक एमएच-31सीक्‍यू-8463 असा मिळाला. सदर नोंदणी प्रमाणपत्राची प्रत दस्‍तऐवज क्र. 7 वर आहे. आणि रजि. पर्टिकुलर्स दस्‍तऐवज क्र. 8 वर आहेत. तसेच सदर ट्रक दि. 22.12.2010 रोजी नागपूर येथून चोरी गेला व तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीवरुन एफआयआर क्र. 298/10 दि. 22.12.2010 रोजी पो.स्‍टेशन यशोधरानगर येथे नोंदवून तपास करण्‍यांत आला, परंतु ट्रक व चोराचा शोध लागला नसल्‍याने पोलीस स्‍टेशनने अंतीम अहवाल  क्र. 15/11 दि.08.04.2011 ‘अ’ समरी मंजूरीसाठी प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी कोर्ट नं. 7 यांचेकडे पाठविला व त्‍यांनी तो 15.06.2011 रोजी मंजूर केल्‍याबाबत आदेशाची प्रत दस्‍त क्र. 19 वर दाखल केली आहे.

 

8.                सदर प्रकरणाच्‍या निर्णयासाठी वरीलप्रमाणे तपस कुंदु यांचे नावाने रजि.नं. OR-14 P-0699 चेसिस नं. 444026-CSZ-206769 इंजिन नं. 697-TC-57-CSZ-115178 आरटीओ चंदीखोले यांच्‍याकडे नोंदणी असलेला ट्रक अस्तित्‍वात होता काय ? व तो तक्रारकर्त्‍याने विकत घेतला काय ? या प्रश्‍नाचे उत्‍तर शोधणे आवश्‍यक आहे.

 

9.                वि.प.चे म्‍हणणे असे कि, त्‍यांनी इन्‍वहेस्टिगेटर नेमून तक्रारकर्त्‍याने तपस कुंदु याच्‍याकडून खरेदी दर्शविलेल्‍या  ट्रक रजि.नं. OR-14 P-0699 चेसिस नं. 444026-CSZ-206769 इंजिन नं. 697-TC-57-CSZ-115178 आरटीओ चंदीखोले बाबत चौकशी केली असता त्‍यांना असे आढळून आले कि, ट्रक रजि.नं. OR-14 P-0699 हा तपस कुंदु यांचे नावाने नोंदलेला नसून शंकर साहू याचे मालकीचा, त्‍याच्‍या नावाने नोंदलेला आणि त्‍याच्‍या ताब्‍यात असून त्‍याचा इंजिन नं. 60G62492878  आणि चेसिस नं. 426031GTZ127311  आहे. तपस कुंदु याचे नावाने नोंदणी असलेला ट्रक क्र. WB 41 C 5133  आहे. आपल्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍टयर्थ वि.प.ने Able Insurance Investigators  Investigators  & Consultants  यांचा दि.31.10.2011 चा इन्‍हेस्टिगेशन रिपोर्ट दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केला आहे. तसेच इन्‍हेस्टिगेशनचे वेळी शंकर साहू याने इन्‍हेस्टिगेटरला दिलेले पत्र दस्‍तऐवज क्र. 3 वर दाखल केले आहे. शंकर साहू याचे नावाने आरटीओ, राऊरकेला येथे नोंदलेल्‍या ट्रक क्र. OR14P0699  चे रजिस्‍टेशन पर्टिकुलर्स आणि  पर्टिकुलर्स मागणीसाठी इन्‍व्‍हेस्टिगेटरने आरटीओ, राऊरकेला यांना दिलेल्‍या पत्राची प्रत दस्‍तऐवज क्र. 4 वर दाखल केली आहे. वि.प.ने दि.06.01.2012 च्‍या पत्रान्‍वये तक्रारदाराचा विमा क्‍लेम नामंजूर केला आहे. सदर पत्र वि.प.ने दाखल केले असून त्‍यांत नमुद केले आहे कि, तक्रारकर्त्‍याने खोट् दस्‍तऐवजाचे आधारे वि.प.कडून पॉलीसी घेवून विश्‍वासघात केला आहे आणि त्‍यामुळे विम्‍याचा करार शून्‍यवत आहे म्‍हणून “ No Claim” सदरात क्‍लेम नामंजूर करण्‍यांत येत आहे व फाईल बंद करण्‍यांत येत आहे.

 

10.               तक्रारकर्त्याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्तिवाद असा कि, तक्रारकर्त्‍याने तापस कुंदु याचेकडून ट्रक क्र. OR14P0699  दि. 29.06.2020 रोजी रु. 8,00,500 मध्‍ये खरेदी केला आहे व त्‍याबाबत सौदा चिठ्ठी  दाखल केली आहे. सदर वाहनाचा विमा प्रथम तापस कुंदु चे नावाने तक्रारकर्त्‍याने दि.21.07.2010 रोजी काढला होता. विक्रीपत्राचे आधारे सदर विमा दि.23.08.2010 ते 22.08.2010 पर्यंतच्‍या उर्वरित कालावधीसाठी तक्रारकर्ता शेख रफिकच्‍या नावाने ट्रान्‍स्‍फर करुन घेतला. सदर वाहनाची नोंदणी तक्रारकर्त्‍याच्‍या नांवाने आरटीओ नागपूर यांनी दि.06.10.2010 रोजी केली असून नविन नोंदणी क्र. एमएच-31सीक्‍यू-8463 असा आहे. विमा काढतांना वि.प.ने सर्व दस्‍तऐवजांची  तपासणी करुन तापस कुंदू व तक्रारदार शेख रफिक यांच्‍या मालकी हक्‍काची खात्री झाल्‍यावरच तक्रारकर्त्‍याकडून रु. 24,609 इतके प्रिमियम घेवून  विमा पॉलीसी  दिली आहे. तक्रारकर्त्‍याचा विमाकृत ट्रक विमा कालावधीत चोरीस गेला असल्‍याने सदर ट्रकचे विमा घोषीत मुल्‍य रु.9,50,000 देण्‍यास विरुध्‍द पक्ष कायदेशीररित्‍या जबाबदार असूनही तक्रारकर्त्‍याचा वाजवी विमा क्‍लेम  खोटया व कल्पित कारणांनी नाकारुन सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार केला आहे.

                  तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादाचे पुष्‍टयर्थ खालील न्‍यायनिर्णयांचा दाखल दिला आहे.

 

      1. 2012(1)C.P.R. 62 (Kerala State Con.Disp.Red.Commi.)

          United Insu.Co. Ltd. Vs. C.M.Ibrahim Kutty

 

वरील प्रकरणांत मा. राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“Mere fact that FIR is lodged by another person stating that vehicle belongs to him will not entitle insurer to repudiate claim when R.C. book and Insurance are in name of insured/Complainant.

 

          

      2. 2012(1)CPR 386 (NC)

          National Insu.Com. Ltd.  Vs. Mohd.Ishaq

 

 सदर प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय  आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“District Forum as well as State Commission rightly rejected report of surveyor on the ground that it is not  supported by affidavit of its author.”

 

3. 2012(1)CPR 130 (NC)

          National Insu.Com. Ltd.  Vs. Rajesh Ohri

 

 सदर प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय  आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“In instant case Petitioner/Insurance  Co. on whom onus was placed to do so has not been able to produce credibel evidence to concusively prove that original licence was fake. In absence of this,affidavit of Divisional Manager of Insurance Co. has little evidentiary value.”

 

4. 2012(2)CPR 190(Kerala State Con.Disp.Red.Commi.)

 

          National Insu.Com. Ltd.  Vs. E.J.Anto

 

 सदर प्रकरणांत मा. राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“Doctor who issued medical certificate was not exsmined due to reason that opposite parties-appellants did not raise any objection when document was marked. Opposite parkties had not produced any material before /Forum to show that complainant was having any pre-existing diseases and complainant had suppressed any material facts.” Appeal was partly allowed directing the O.P. Insurance Co. to pay Insurance amount with costs.

 

5. 2012(2)CPR 208

( Andhra Pradesh  State Con.Disp.Red.Commi.Hyderabad)

Pallapu Venkateshwarlu Vs=. LIC of India and Anr.

 

सदर प्रकरणांत मा. राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“In case of repudiation of claim burden of proof heavily lies upon Insurance Corporation which did not adduce any contemporaneous evidence in order to support repudiation of claim.” Order of District Forum set aside and Complaint was allowed.

 

6. 2012(2)CPR212

( West BengalState Con.Disp.Red.Commi.Kolkata)

Dipit Dasgupta Vs. C.D.Construction and Ors.

 

सदर प्रकरणांत मा. राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“District Forum has rightly not given much weight to inspection oand measurement conducted by Surveyor appointed by Complainant-Appellant as concerned report was not annexed with any field note nor it was conducted in presence of both sides. Case was remanded to District Forum for holding joint inspection and measurement.

 

7. 2012(3)CPR   65

(  Rajasthan State Con.Disp.Red.Commi.Jaipur)

Tata AIG Life Insu. Com.Ltd. Vs. Sita Devi.

 

सदर प्रकरणांत मा. राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“ A common man is not supposed to know all niceties and technicalities of law. Once accepting premium and having entered into an agreement without verifying facts Insurance Co. can not wriggle out of liability merely by saying that contract was made by misrepresentation and concealment.Insurance policies should not be issued and repudiated in a casual mechanical manner..

 

 

11.                  वि.प.तर्फे शपथेवरील लेखी बयान हाच त्‍याचा लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसिस दि.23.12.2013 रोजी दाखल करण्‍यात आली आणि त्‍यानंतर वि.प.तर्फे अधिवक्‍त सचिन जैस्‍वाल यांनी मौखिक युक्‍तीवाद केला.

 

                  वि.प.चे अधिवक्‍त्‍याने तोंडी युक्‍तीवादात सांगितले की, विमा करार हा परस्‍पर विश्‍वासावर आधारित आहे. तक्रारकर्त्‍याने दि.29.06.2010 रोजीची जी सौदे चिठ्ठी दस्‍तऐवज क्र. 5 वर दाखल केली आहे, त्‍यात

ट्रक मालकाचे नाव        तापस कुंडु

रजि. नं.                 OR 14 P 0699

इंजिन नं.                697 TC 57 CSZ 115178

चेसीस नं.                444026 CSZ 206769

 

दर्शविला आहे. सदर सौदेचिठ्ठीनंतर तक्रारकर्त्‍याने दि.21.07.2010 रोजी सदर ट्रकची विमा पॉलिसी तापस कुंडुच्‍या नावाने वि.प.कडून खरेदी केली. त्‍यात ट्रकचे विमा घोषित मुल्‍य हेतूपूरस्‍सर ट्रकच्‍या खरेदी किंमतीपेक्षा जास्‍त रु.9,50,000/- दर्शविले. त्‍यात हायपोथिकेशन एग्रीमेंटचा रकाना मोकळा सोडला आहे. सदर ट्रकचा पूर्वी विमा असल्‍याबाबत कोणतेही दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याने दाखल केले नाही,  सदर विमा पॉलिसी तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. विमा पॉलिसी काढतांना सदर ट्रक ओरीसा राज्‍यात तापस कुंडुच्‍या नावाने नोंदणीकृत आहे हे दर्शविण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने रजिस्‍ट्रेशन पटीक्‍युलर्स दाखल केले होते. ते दस्तऐवज क्र. 3 वर आहेत, त्‍यात तक्रारकर्ता शेख रफीक याचे नावाने सदर ट्रक ट्रांसफर करण्‍यासाठी आर टी ओ, नागपूर यांना ना हरकत दिल्‍याबाबत दि.15.07.2010 चा रजिस्‍ट्रेशन ऑथारीटी, एम.व्‍ही.डिपार्टमेंट चंदीखोले, जायपूर, ओरीसा यांचा शेरा आहे.

 

                  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 3 प्रमाणे विमा पॉलिसी स्‍वतःच्‍या नावाने दि.23.08.2010 ते 20.07.2011 या उर्वरित काळासाठी ट्रक खरेदीदार म्‍हणून ट्रांसफर करुन घेतली. त्‍याबाबत Endorsement Schedule तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 2 वर दाखल केले आहे. त्‍यात सदर ट्रक श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांसकडे हायपोथीकेट असल्‍याची नोंद आहे.

 

                  वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांनी युक्‍तीवादात सांगितले की, श्रीराम फायनांस कंपनीने सुरुवातीस सदर ट्रकवर फायनांस देण्‍याचा तक्रारकर्त्‍याचा प्रस्‍ताव मंजूर केला होता, परंतू ट्रकच्‍या मालकीबाबत शंका आल्‍याने फायनांस देण्‍याचा करार रद्द केला. याबाबत वि.प.ने इन्‍व्‍हेस्‍टीगेटरला इन्‍व्‍हेस्‍टीगेशन दरम्‍यान प्राप्‍त ई-मेल कॉपीज यादीसोबत पृ.क्र. 42, 43 व 44 वर दाखल केल्‍या आहेत. त्‍यावरुन श्रीराम फायनांस यांनी सदर व्‍यवहार रद्द केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

                  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदर वाहन ना हरकत प्रमाणपत्राचे आधारे आर टी ओ नागपूर यांचेकडे दि.06.10.2010 रोजी स्‍वतःच्‍या नावाने नोंदणी क्र. एमएच-31सीक्‍यू-8463 या क्रमांकाने नोंदणी करुन घेतले. त्‍याचे नोंदणी प्रमाणपत्र दस्‍तऐवज क्र. 7 वर आहे.

 

                  वि.प.ने सदर ट्रक चोरी प्रकरणाच्‍या तपासासाठी नेमलेल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने ट्रक क्र.  OR 14 P 0699 प्रत्‍यक्षात कोणच्‍या मालकीचा होता, याचा शोध घेतला आणि रजिस्‍ट्रेशन ऑथारीटी मोटर व्‍हेईकल डिपार्टमेंट राऊरकेला यांचेकडून रजिस्‍ट्रेशन पटीक्‍युलर्स मिळविले, ते वि.प.ने दाखल केलेल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटर अहवालासोबत पृ.क्र. 15 वर दाखल आहेत. त्‍यात सदर ट्रक आजही शंकर सनादा साहू यांच्‍या मालकीचा त्‍यांच्‍या ताब्‍यात व त्‍यांच्‍या नावाने नोंदलेला असल्‍याचे नमूद आहे. सदर नोंदणी क्रमांकाच्‍या ट्रकचा चेसिस क्र. 426031GTZ127311 आणि इंजिन क्र. 60G62492878  असून सदर ट्रक मॅग्‍मा लिजिंग लि. यांचेकडे हायपोथीकेटेड असल्‍याची नोंद आहे. याशिवाय शंकर साहू याचा जवाब इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने नोंदला असून तो इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रीपोर्टचा भाग म्‍हणून दाखल केला आहे. सदर ट्रकचे फोटोदेखिल इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने काढूले असून रीपोर्टसोबत दाखल केले आहेत.

 

                  तापस कुंडु याचे नावाने असलेल्‍या ट्रकचे पर्टीक्‍युलर्सदेखिल इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने रीपोर्टच्‍या पृ.क्र.41 वर दाखल केले आहेत. त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या ट्रकचा क्र. डब्‍ल्‍युबी-41/सी-5133 असून तो RTO Burdwan West Bengal यांच्‍याकडे नोंद‍ला असून त्‍याचा इंजिन क्र. 697 TC 57 CSZ 115178 चेसिस नं. 444026 CSZ 206769 असल्‍याचे व सदर ट्रक मॅग्‍मा लिजिंग कोलकाताकडे हायपोथीकेटेड असल्‍याने इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रीपोर्टच्‍या पृ.क्र.41 वर नमूद आहे.

 

12.               वि.प.ने दाखल केलेल्‍या वरील सर्व पुराव्‍यावरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेला ट्रक ज्‍याचा इंजिन क्र. 697 TC 57 CSZ 115178 चेसिस नं. 444026 CSZ 206769 दर्शविला आहे. त्‍याचा खरा नोंदणी क्रमांक OR 14 P 0699 असा नव्‍हता व नाही, म्‍हणून सदर ट्रक तापस कुंडु यांच्‍या मालकीचा नव्‍हता व नाही, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या चोरीच्‍या ट्रकचे रजिस्‍ट्रेशन ऑथारीटी, चंदीखोले यांच्‍या नावाचे खोटे शिक्‍के वापरुन खोटे रजिस्‍ट्रेशन पर्टीक्‍युलर्स आणि खोटे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्‍त करुन त्‍याचा वापर करुन आर टी ओ नागपूरकडे स्‍वतःच्‍या नावाने OR 14 P 0699 या ट्रकची नोंदणी दि.06.10.2010 रोजी एमएच-31सीक्‍यू-8463 या क्रमांकावर करुन घेतले. मुळातच तक्रारकर्त्‍याने तपास कुंडु यांचेकडून ट्रक क्र. OR 14 P 0699 ची करुन घेतलेली सौदाचिठ्ठी खोटी आहे, कारण सदर ट्रक तापस कुंडु यांच्‍या मालकीचा नसून तो प्रत्‍यक्षात शंकर साहू यांच्‍या मालकीचा असून आजही तो त्‍याच्‍या ताब्‍यात आहे.

 

13.               तक्रारकर्त्‍याने सदर ट्रकचा विमा प्रथमतः खोट्या कागदपत्राद्वारे तापस कुंडु यांच्‍या नावाने OR 14 P 0699 या ट्रकची मालकी दाखवून दस्‍तऐवज क्र. 1 प्रमाणे काढला आहे. सदर पॉलिसी ही तक्रारकर्त्‍याने हेतूपुरस्‍सर तयार केलेल्‍या खोटया कागदपत्रांवरुन काढली असल्‍याने ती void ab initio आहे व म्‍हणूनच तक्रारकर्त्‍याने सदर पॉलिसीनंतर स्‍वतःच्‍या नावाने केली असली तरी ती मुळातच शुन्‍यवत (void) असल्‍याने त्‍याला कोणताही विमा लाभ मिळू शकत नाही. सदर कारणामुळे दस्‍तऐवज क्र. 6 अन्‍वये दि.06.01.2012 च्‍या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्‍याचा विमा क्‍लेम नामंजूर करण्‍याची वि.प.ची कृती पूर्णतः कायदेशीर आहे व म्‍हणून त्‍यांचेकडून सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार घडलेला नाही.

 

14.               तक्रारकर्त्‍याने सादर केलेल्‍या न्‍याय निर्णयातील वस्‍तुस्थिती व सदर प्रकरणातील वस्‍तुस्थिती पूर्णतः भिन्‍न असल्‍याने सदर न्‍याय निर्णयाचा कोणताही फायदा तक्रारकर्त्‍यास मिळू शकत नाही, म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

15.               उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन वि.प.ची सेवेत त्रुटी सिध्‍द होत नसल्‍याने मुद्दा क्र. 2 व 3 प्रमाणे तक्रारकर्ता सदर प्रकरणी मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल दस्‍तऐवजावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित आहे.

 

-आदेश-

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)    खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.              

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.