Dated the 16 Jan 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार यांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी वाहन टेम्पो क्रमांक-केए-10-सीयु-9291 घेतले होते. तक्रारदारांनी सदर वाहना करीता Cleaner म्हणुन श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना नेमण्यात आले होते. तक्रारदार त्यांना रु.5,000/- प्रतिमहिना पगार देत होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून त्यांचे Workmen करीता मोटार वाहन कायदयान्वये (Compulsory) असलेली विमा पॉलीसी घेतली. प्रस्तुत पॉलीसी अन्वये तक्रारदारांचे Employ ला अपघातात काही (Injury) झाल्यास अथवा मृत्यु पावल्यास सामनेवाले यांनी तक्रारदारातर्फे Employ ला नुकसानभरपाई मिळण्याकरीता (Indemnity) केले होते. सामनेवाले यांनी विमा पॉलीसी ता.10.04.2010 ते ता.13.04.2010 या कालावधी करीता दिलेली होती. दुर्देवाने श्री.सय्यद मिझान मोहदाळी हे तक्रारदारांचे वाहना करीता काम करीत असतांना ता.10.04.2010 रोजी सकाळी 05.30 वाजता तक्रारदारांचे वाहनावर Cleaner श्री.सय्यद मिझान मोहदाळी म्हणून बेंगलोर येथुन आंबे घेऊन वाशी,मुंबई येथे येत असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे वरुन जात असतांना आडोशी गावाच्या हद्दीत सदर वाहन टेम्पोवर आदळून अपघात झाला. सदर अपघातात श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांचे दोन्ही पायाला मार लागला व टेम्पोचे नुकसान झाले, सदर घटनेची नोंद पोलीसांनी खोपोली पोलीस स्टेशन येथे करणत आली व श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये ता.10.04.2010 ते ता.13.04.2010 या कालावधीत जखमी झाल्याने वैदयकीय उपचाराकरीता दाखल होते.
2. श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांचे वय-24 वर्षे असुन त्यांना रु.4,000/- मजुरी तक्रारदार देत असल्यामुळे (215.28X 50% of Wages i.e. Rs.4000/-) रु.5,23,328/- एवढी नुकसानभरपाई त्यांना देय आहे. तक्रारदारांनी यासंदर्भात विमा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासहीत सामनेवाले यांचेकडे दाखल केला. विमा पॉलीसीची नुकसानभरपाईची रक्कमही अदा केली नाही असे तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे.
3. सामनेवाले यांचे लेखी म्हणण्यानुसार श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना तक्रारदारांचे येथे कामावर असतांना अपघात झाला आहे, त्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार कामगार नुकसानभरपाई (W.C. Act) कायदयान्वये दाखल करणे आवश्यक होते. सदर तक्रार मंचाच्या अधिकार क्षेत्रात (Jurisdiction) मध्ये येत नाही. तक्रारदारांनी सदर अपघातात जखमी झालेल्या कामगार श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना सदर प्रकरणात समाविष्ठ केले नाही.
तक्रारदारांनी त्यांच्या कामगाराकडून कायदेशीर नोटीस प्राप्त झाल्यानंतर कमिशनर ऑफ वर्कस मेन कॉम्पेशन यांचेकडे नुकसानभरपाईची रक्कम अदा करणे आवश्यक आहे, व त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून सदर रक्कम घेणे (Re-imbrues) वर्क्स मेन कॉम्पसेशन कायदयातील तरतुदीनुसार बंधनकारक होते.
4. तक्रारदार यांची तक्रार,सामनेवाले यांची लेखी कैफीयत तसेच उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे व युक्तीवाद यासर्वांचे अवलोकन केले यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष निघतो.
अ. तक्रारदार यांनी त्यांच्या वाहनाकरीता सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलीसी घेतल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांचा कामगार Cleaner हे ता.10.04.2010 रोजी बेंगलोर येथुन वाशी-मुंबई येथे येत असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर जात असतांना आडोशी गावाचे हद्दीत सदर वाहन टेम्पोवर आदळून आपघात झाला. सदर अपघातात श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांचे दोन्ही पायास मार लागला व दोघांचे नुकसान झाले. गंभिर जखमी होऊन मृत्यु पावले. पोलीसांनी घटनेची माहिती झाल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशनला एफ.आय.आर.ची नोंद घेण्यात आली.
ब. सामनेवाले यांचे वकीलांनी Employees compensation act 1923 मधील कलम-3 प्रमाणे वर्कमॅन ला नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी तक्रारदारांची असल्याबाबत युक्तीवादामध्ये नमुद केले, तसेच सदर कायदयाच्या कलम-4 A नुसार तक्रारदारांनी श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना विहीत मुदतीत नुकसानभरपाईची रक्कम देणे आवश्यक होते, व त्यानंतर सदर रक्कम सामनेवाले यांचे कडून (Re-imbrues) करणे आवश्यक होते. सामनेवाले यांनी विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांना दयाव्या लागणा-या नुकसानभरपाईच्या रकमेला (indemnity) केले आहे.
क. तक्रारदारांनी नुकसानभरपाईची रक्कम श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांना अदा केल्याचे अथवा कमिशनर ऑफ काम्पेनसेशन यांचेकडे भरणा केल्याचा पुरावा तक्रारीत दाखल नाही. तसेच श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांनी कमिशनरकडे नुकसानभरपाई मागणीचा अर्ज केला किंवा काय ? याबाबतचा पुरावा दाखल नाही. अशा परिस्थितीत तक्रार मुदतपुर्व (Pre-mature) आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही.
ड. Employees compensation act 1923 clause 8 Distribution of Compensation नुसार एम्प्लॉयरने नुकसानभरपाईची रक्कम कमिशनर यांचेकडे भरणा करणे बंधनकारक आहे व त्यानंतर कमिशनर अँवार्डनुसार ती कामगारांना अदा करण्यात येते.
ई. तक्रारदारांनी मा.राज्य आयोग दिल्ली यांचा अपील नं.एफए-1297/2006 ता.14.02.2007 रोजीचा न्याय निर्णय दाखल केला आहे. वरील न्याय निर्णयातील परिस्थितीव वस्तुस्थिती (Facts and circumstances) प्रस्तुत तक्रारीपेक्षा भिन्न आहेत.
मा.राज्य आयोगाने वरील न्याय निर्णयामध्ये कामगारांनी कमिशनर ऑफ वर्क्स मेन्स कॉम्पेनसेशन यांचेकडे नुकसानभरपाईची रक्कम रु.10,00,000/- (अक्षरी रुपये दहा लाख) मागणी करीता प्रकरण दाखल केले होते व सदर प्रकरणात employer & Insurance Company ला समाविष्ठ करण्यात आलेले होते. विमा कंपनीने रु.5,00,000/- ऐवढया रकमेची कामगाराची नुकसानभरपाईच्या रकमेची जबाबदारी (liability) लेखी म्हणण्यानुसार (accept) मान्य केली होती. परंतु कामगार हा इएसआय (ESI) चा सदस्य असल्याने प्रकरण काढून घेण्यात आले होते. त्यानंतर employer & employee च्या वारसांनी मिळून ग्राहक मंच,दिल्ली यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
ईई. प्रस्तुत तक्रारीमध्ये कामगार श्री.सय्यद मिझान मोहदाळी यांनी नुकसानभरपाईची मागणी कमिशनर यांचेकडे केली किंवा काय ? याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही, तसेच सदर तक्रारीमध्ये तक्रारदारांनी त्यांना समाविष्ठ केले नाही. अशा परिस्थितीत वरील न्याय निर्णय प्रस्तुत प्रकरणात लागु होत नाही असे मंचाचे मत आहे.
सबब,प्रस्तुत तक्रार मुदतपुर्व (Pre-mature) असल्याचे कारणास्तव खारीज करण्यात येते. तसेच तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण (Cause of action) घडले नाही.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-280/2010 खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.16.01.2016
जरवा/